भाग 57
सर्व परिस्थिती राम सुद्धा पाहत होता... त्याला हळहळ वाटायची लीला यांच्याकडे पाहून.... एकप्रकारे तो त्यांचा मानसपुत्रंच होता पण आज त्याची ही माता त्याच्याशी जवळपास तीन महिने झाले बोलत नाही हे बघून त्याला
कासाविस व्हायचे....
पण आता मात्र..... त्याने....
बोलायचे ठरवले बाबाराव यांच्यासोबत......
बाबाराव संध्याकाळच्या सुमारास शेरूला घेऊन बसले होते...
शेरू अगदी नावाप्रमाणे त्यांच्या बाजूला सोफ्यावर ....
एखाद्या वाघासारखा बसला होता आणि बाबाराव त्यांच्या पाठीवरून मानेवरून त्याला कुरवाळत होते....
राम ने बघितले की लीला ह्या बाहेर बंगल्याच्या परिसरात काही झाडांविषयी आणि नवीन लावलेल्या रोपांविषयी तेथे काम करणाऱ्या माणसांना समजावून सांगत आहेत काहीतरी....
आणि सोबतच रोपांना पाणीसुद्धा देत आहेत....
रामला बाबाराव यांच्या असणाऱ्या मूडचा अंदाज येत नव्हता.
तो हळूच बाबाराव यांना म्हणाला....
"मालक..... आज मालकीण बाईचा मूड काही तेवढा बरा दिसत नाही ...."
त्यावर बाबाराव म्हणाले....
"आजचं थोडी आहे.... एवढ्यात तुमच्या मालकिनबाईचं लक्षंच दुसरीकडे लागलेलं आहे.... तर मूड कसा चांगला राहणार....??"
राम हळूच म्हणाला.....
"इतक्यात मालकिनबाई ....मानसिकरित्या थोड्या आणि शरीराने सुद्धा हालावल्या सुद्धा आहेत.... मालक...."
त्यावर बाबाराव दूरवर पहात विचार करू लागले...
आणि केवळ ...."हम्म्म"....असे म्हणाले....
तेही पाहत होते.... लीला त्यांच्यासोबत आता सहा महिने झाले तरी बोलत नव्हत्या.... त्या सर्व रीतीने बाबाराव यांची काळजी घेत होत्या....त्यांची तब्येत चांगली नसेल तेव्हा सुद्धा व्यवस्थित सुश्रुषा करत होत्या... अगदी पूर्वीसारख्याच पण बोलत मात्र नव्हत्या....
बाबाराव यांना समजत होते.... त्यांच्या मनात काय चालले आहे...?? त्यांची तरी स्वतःची मनस्थिती कुठे चांगली होती...???
दिवसभर गावातली कामं..... गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार त्यांचे कार्य चालू केले होते त्यांनी आता.. गावात सहा महिन्यात बरेच काम उरकले केले होते...
तरी बरीच कामे शिल्लक होती..
दिवस त्यांचा कसातरी जायचा पण रात्र मात्र त्यांना खायला उठत होती..
घरी आले की सहजच त्यांचे त्यांच्या आईच्या रूम कडे लक्ष द्यायचे... त्याच रूममध्ये मायरा राहायची... बंगल्यात मायराची रूम वेगळी होती त्यांनी बनवलेली पण... मायरा तिच्या रूम मध्ये कधीच राहत नव्हती... ती नेहमी आजी सोबत आजीच्या रूममध्ये राहायची... आणि आजी गेल्यानंतरही त्याच रूममध्ये राहत होती ती....
बाबाराव यांना माहित होते की लीला यांना मायराची आठवण फार फार सतावते. ती आठवण पोखरून टाकतेय त्यांना हळूहळू..... म्हणून त्यांनी जीवनशैली बदलली होती आता.... गावातले जे महिला मंडळाची कामे आहेत ते करायची आणि ती नसतील....तर ....दिवसभर शेतात जायच्या बायांसोबत...
....
आज लीला ह्या शेतात गेल्या होत्या....
दुपार टळली... जेवनही तेथेच केले त्यांनी बायांसोबत....
आज रामही आला होता एरवी तो बाबाराव यांच्यासोबत राहत असे पण ते आज आराम करत होते घरी तर... त्यांनी सांगितलेल्या अनुसार तो लीला यांच्यासोबत शेतात गेला होता.
लीला यांना थोडे अस्वस्थ वाटत होते तर.... दुपारी जेवण झाल्यानंतर त्या एकट्याच घरी परत निघाल्या. सोबत कुणीच नव्हते... गडी माणसं सर्व कामात होते... रामला त्या म्हणू शकत होत्या आपण अजूनही त्यांचा राग शांत झालेला नव्हता तर त्यांनी ठरवले....
"मला कोणाच्या सोबतीची गरज काय...?? घरीच तर जायचे आहे....!!"
त्यांच्या नेहमीच्या गतीने त्यांना असं वाटले की पंधरा ते वीस मिनिटे चालावे लागेल.... वाट थोडीशी वाकडी होती..
मध्ये एक ओढा होता... त्या ओढ्याच्या पाण्यात पाय बुडवून चालावे लागेल... पायाच्या घोट्यापर्यंत पाणी चुळूक चुळूक तुडवत बाहेर आलं की एक छोटासा टेकडभाग घ्यायचा त्यामुळे वडसा घालून जावं लागे त्याला....बस....
हा ओढा या वेळेला आता निमूटपणे झुळझुळ वाहत होता... पण पावसाळ्यात मात्र हा तुडुंब भरून उन्मत्तपणे गुर्मीत वाहायचा..... आजूबाजूची झाडे... रस्ते.... स्वतःमध्ये सामावून घ्यायचा.... पण त्याचा हा उन्मत्तपणा काही काळासाठीच
नंतर मात्र अगदी निमूटपणे शांत झूळझूळ वाहायचा...
आताही त्या ओढ्याला पाणी होते पण घोटाभरंच...
लीला विचार करतच त्या ओढ्याच्या पाण्यात पाय ठेवत खाली पहात चालत होत्या.... हळूहळू त्या पाण्याच्या बाहेर आल्या... आणि पुढे चालू लागल्या रस्त्याने आपल्या....
चालता चालता त्या थबकल्या...
त्यांना समोर दोन जोडी पाय दिसले मानवांची... एक स्त्री आणि एक पुरुष अशी दोघांची पायं.... दचकल्या आणि पुढे पाहू लागल्या...
तर त्यांना समोर कवडू आणि पार्वती जोडीने उभे दिसले...
भास असावा एखादा असेही वाटत नव्हते.... असे वाटत होते की दोघे समोरच्या वाटेने तर आलेले नसेल....
दोघेही असे दिसत होते जणू काही चालून चालून दमून आलेले असावे....
दाढी वाढलेली होती कवडूची आणि पार्वतीचे गालफळ बसलेली दिसत होती... दोघांचेही खोल गेलेले डोळे मनाचे दर्शन घडवत होते...
दोघेही असे लीला यांच्यासमोर एकदम उभे राहिल्यामुळे त्या मनातून घाबरल्या होत्या त्यांचे पाय थरथर कापत होते
पण तेवढ्यात त्यांचे लक्ष गेले की पार्वती केविलवाणे हसत होत्या.
तशी लता यांच्या छातीत धडधड वाढली....
तेवढ्यात पार्वती बोलू लागल्या....
"मालकिनबाई ...आम्ही दोघेही आता नाही आहोत....
पण तुम्ही तरी दोघं.... आहात सुनबाईकडे ...पण आता तिलंही पोरकं झाल्यागंत वाटंत असंल....... दुःखात किंवा सुखात आपले लोकं असतील तर .... सुखाचा आनंद काय सांगावा...?? आणि दुःखातही आपले लोक जवळ असले म्हणजे ते अर्धे होते जी....??? पण आम्हाले वाटतं आता.... त्या दोघांनले खरंच तुमची खूप गरज आहे.... निदान त्यांच्याशी दोन शब्द फोन करून तरी बोलत जावा... मालकिनबाई....."
धडधडत्या छातीने लता यांनी पूर्णपणे बोलणे ऐकले...
आणि तसे त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू खाली निखळले..
तसे त्यांनी पदराने आपले नेत्रं पुसले... आणि समोर पाहू लागल्या....
तर काय...?? समोर तर कूणीच नव्हते....
लता यांनी इकडे तिकडे बघितले.... दूर दूर पर्यंत कोणीही दिसत नव्हते.... तसा त्यांचा जीव घाबरा घूबरा झाला... आणि लांब लांब पावले टाकत बंगल्यात आल्या...
....
इकडे सावित्रीबाई यांचे कोचिंग क्लासेस मध्ये प्रशिक्षक म्हणून व्यवस्थित रित्या काम चालू होते.... आता त्यांनी घरकामही बरेचसे कमी केले...
मायरानेही तेथे कोचिंग लावलेली संध्याकाळची....
थोडे दिवस तिने शिकवणी घेतली आणि मग तिलाही तेथे तिखट मॅडम यांनी काम दिले.... प्रशिक्षक म्हणून...
मायराची दगदग होती आहे हे मोहितला आता समजत होते.
त्याने तिला थोडेसे समजावण्याचा प्रयत्न केला पण ती समजली नाही... तिला थोडे अधिक पैसे मिळवण्याचा तो एक मार्ग वाटत होता.
वादही झाला दोघांचा एक दोनदा... पण आता ती मुद्देसूद भांडणे शिकल्यामुळे तिने तिचे म्हणणे खरे करून घेतले.
घरखर्चाला मदत होत होती.... राहणीमानातही थोडी सुधारणा आली होती त्यामुळे..
आजच तिने मिळालेल्या पैशातून पहिल्यांदा स्वतःच्या आवडीचे काहीतरी विकत घेतले होते तेही ऑनलाइन... ऑफर सुरू होत्या त्यामुळे तिला ते कमी किमतीत भेटले होते...
मोहित सायंकाळी आल्यानंतर रोजच्या वेळेवर दोघेही जेवण करून बाहेर फिरायला गेले सवयीनुसार आणि परत आल्यावर आपापली कामं करायला लागले....
मायरा दुसऱ्या दिवशीचे कोचिंगला शिकवण्याचे नोट्स काढत होती... नंतर तिच्या लक्षात आले की "अरे... उद्या तर आपल्याला सुट्टी आहे.."....नोट्स काढून झालेले तिचे तर तिने नेक्स्ट दिवशीची डेट टाकली आणि ती अशीच मोबाईल मध्ये टाईमपास करत होती....
मोहित लायब्ररीतून आणलेल्या बुक्सचा त्याचं त्याचं अभ्यासाचं बघत होता... तो झोपेल म्हणून मायरा वाट पाहत होती.... पण तो इतका झपाटून अभ्यासाला लागला होता की त्याचं तिच्याकडे लक्षंच नव्हतं... मग तीने हिरमुसून चुपचाप आपले बुक्स बॅगमध्ये नीट ठेवून दिले आणि बेडवर झोपावयास गेली हळूच त्याला डिस्टर्ब होणार नाही असे.
वाट पाहता पाहता ती झोपून गेली....
त्याला अभ्यास करता करता समजलेच नाही खूप उशीर झाला ते... लक्ष गेले त्याचे तेव्हा मायरा..... झोपून गेली होती...
तोही हळूच येऊन तिच्या बाजूला लेटला.....
त्याच्या ध्यानातंच आली नाही....
...... ती केव्हा झोपायला गेली...???
दिवसभराच्या श्रमाने ती एकदा झोपली म्हणजे गाढ झोपायची..
त्यामुळे अजून तरी त्यांच्यात.... सहवास मनसोक्त झाला नव्हता.... गेल्या सहा महिन्यात ..... दोन वेळाच झाला होता...
त्याने ठरवले होते ....उद्या मायूला सुट्टी आहे.... आपणही
तिच्या सोबत थोडासा वेळ घालवावा... साधं चांगले रीतीने बोलूनही होत नाहीये दोघांचं... गुजगोष्टी कराव्या...
म्हणूनच त्याने थोडासा उशिरापर्यंत अभ्यास करून घेतला.. जेणेकरून तिच्या सोबत दुसऱ्या दिवशी आरामशीर उठता येईल...
आपल्यासाठी ती स्वतःच्या इच्छा आकांक्षा... संयमात ठेवते..
सहवासाची आस तिलाही असते त्याला माहीत होते.... दोघांच्याही भविष्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे हे दोघांनाही समजत होते...
एवढ्यात त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली...
.... आणि...
🌹🌹🌹🌹🌹