Shaapit Gaav - 5 in Marathi Horror Stories by DEVGAN Ak books and stories PDF | श्रापीत गाव.... - भाग 5

Featured Books
  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

  • ભાગવત રહસ્ય - 177

    ભાગવત રહસ્ય-૧૭૭   તે પછી સાતમા મન્વંતરમાં શ્રાદ્ધદેવ નામે મન...

  • કુંભ મેળો

    કુંભ પર્વ હિન્દુ ધર્મનો એક મહત્વપૂર્ણ પર્વ છે, જેમાં કરોડો શ...

Categories
Share

श्रापीत गाव.... - भाग 5

       सोबत आणलेले तेल त्यांनी घराच्या चौहोबाजूला शिंपडले. दुसऱ्यांनी मशालीने त्या घराला आग लावली , बघता बघता घर आगीच्या लोंढ्यात समावू लागले.

अचानक घराचे दार उघडले गेले. दारात श्वेतकमल व त्याची बायको कमळा उभी होती . गावकरी आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे बघत होते . श्वेतकमल पायऱ्या उतरून खाली आला. त्याने एक नजर आपल्या पेटत असलेल्या घरावर टाकली व परत ती गावकऱ्यांवर रोखली ."तुम्हाला काय वाटते , तुम्ही मला सहजरीत्या मारू शकता , नाही... तुम्ही माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही", श्वेतकमल ओरडतच सर्व गावकऱ्याना म्हणाला. श्वेकमलने आपले डोळे बंद केले आणि तो काही मंत्र उच्चारू लागला , त्याचबरोबर वातावरणात लगेचच बदल होऊ लागले. वारा जोरात घोंगावू लागला , त्या वाऱ्याबरोबर धुळ व सुकलेली पाने हवेत उडू लागली. विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झाला , सर्वत्र अवकाशात काळे ढग जमू लागले , संपूर्ण  सृष्टी एका  अनामिक भितीने थरथरू लागली होती . गावकरी भितीने थरथरू लागले . त्यांची अशी दसा बघुन तुकाराम ओरडला ," असे घाबरता काय त्या शैतानाला , त्याला आज जिवंत सोडता कामा नये . अरे बघता काय ? त्या शैतानाचे तुकडे तुकडे करा." असे म्हणत तुकारामने आपल्या हातात असलेली कुऱ्हाड सावरली व वेगाने श्वेतकमलच्या दिशेने धावला,  त्याने आपली कुऱ्हाड हवेत उचलली व एक जोरदार वार श्वेतकमलच्या मानेवर करण्यासाठी जोरात फिरवली. तोच त्याच्या पोटात काहीतरी तिक्ष्ण असे काहीतरी घुसले , ते  त्याच्या पाठीतुन बाहेर निघाले . मागून तुकाराम बरोबर धावलेले गावकरी जागच्या जागी थबकले, नकळत त्यांची पावले मागे सरकू लागली . थेंब , थेंब करून पाणी जमिनीवर पडू लागले, बघता बघता जोरदार पाऊस सुरू झाला.  रक्ताने माखलेला तो हाता धुतला गेला, काळी सडक जाड बोटे , त्यावर असलेली लांब तिक्ष्ण नखे . त्याने भासकन हात मागे ओढला , त्याबरोबर सखारामची आतडी बाहेर पडली. सखाराम खाली कोसळला . त्याचे रक्त पाण्याबरोबर वाहू लागले. ते दृश्य अगदी  भकास होते . श्वेतकमलच्या समोरच एक काळाकुट्ट , धिप्पाड व केसाळ प्राणी उभा होता. जो उंचीनेही जास्त होता, तो दोन पायांवर उभा होता. ज्याच्या डोक्यावर मधोमध एक सिंग होते , तोंडांत शूळ्यासारखे  लांब दात होते , त्यातले बहुतेक तोंडाबाहेर आलेले होते.लालभडक डोळ्यांची  एक शैतानी आकृती उभी होती.समोरचे सर्व दृश्य बघून गावकऱ्यांची बोबडीच वळाली.वारा जोरदार घोंगावू लागला, पावसाचा जोर आणखीनच वाढला. श्वेतकमलचे पेटत असलेले घर हळूहळू विझत चालले होते." बघतोस काय शैतानाच्या पिल्ला फाडून टाक एक एकाला .", श्वेतकमल रागाच्या भरात ओरडला. त्यासरशी ती शैतानी आकृती गावकऱ्यांवर धावली. सर्वत्र एकच गोंधळ माजला, जो तो आपला जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढू लागला. कित्येकजण त्या शैतानाच्या हाती लागले, त्याने त्यांना फाडून टाकले. सर्वत्र किंचाळण्याचे आवाज... वाचवा..वाचवा ... म्हणून आरडाओरड सुरू होता. अगदी दयनीयपणे ओरडण्याचा आवाज वातावरणात घुमत होता.साधूची नजर समोर गेली , श्वेतकमल अगदी त्याच्या तोंडाजवळ. येऊन उभा होता. दोघेही एकमेकांकडे तिक्ष्ण नजरेने बघत होते. श्वेतकमलने एक  धारदार खंजर साधूच्या पोटात खुपसले व त्याला मागे ढकलून दिले. श्वेतकमल आनंदाने राक्षसासारखा हसू लागला.जखमेतून रक्त ओंघळू लागले, असाह्य वेदनेच्या कळा उठू लागल्या. साधूने स्वत:ला सावरले , आपल्या हातातील कमंडलूमधून त्याने पाणी दुसऱ्या हातात ओतले. साधू श्वेतकमलवर ओरडला," हे शैताना.... जर का मी त्या ईश्वराची आयुष्यभर निस्वार्थ पुजा केली असेल, जर का माझ्यात त्याचे तेज, तप असेल तर..... तर...... मी तुला श्राप देतो..... आता ह्या क्षणी तुझा व तुझ्या सहचरणीचा मृत्यू होईल...... जे गाव तुझ्या पापाणे मळले आहे ते भविष्यात कधीच सुख , शांतीने ह्या भुतलावर टिकणार नाही . तुझ्याबरोबरच ह्या गावाचा विनास होईल हा माझा श्राप आहे."साधूने हातात घेतलेले पाणी श्वेतकमलच्या दिशेने भिरकावले . साधू काही क्षणातच जमिनीवर कोसळला , त्याचे डोळे हळूच मिटले गेले.श्वेतकमल जोरजोरात हसू लागला.. हा...हा....हा..हा..," मुर्ख साधू, मी अमर आहे . मला कोणीच मारू शकत नाही .....कोणीच नाही. तुझ्या श्रापाने माझे काहीच बिघडणार नाही..... हा.....हा...हा....श्वेतकमलच्या चेहऱ्यावर एक वेदनेची कळ पसरली , त्याने आपल्या छातीला घट्ट दाबून धरले , त्याच्या छातीत जोरदार वेदनेच्या कळा उठत होत्या. श्वेतकमलने तसा स्थितीत मागे वळून पाहिले, त्याची बायको कमळा जमीनीवर पडलेली होती , ती आपले हातपाय चिखलात झाडत होती .एक जोरदार कळा उठली , श्वेतकमलच्या तोंडातून एक किंकाळी फुटली , तोंडातून रक्ताची उलटी बाहेर पडली ,त्याचे हातपाय थरथरू लागले, तो क्षणात खाली कोसळला. श्वेतकमल एखाद्या पाण्याबाहेर असलेल्या मासासारखा तरफडू लागला.

वातावरण शांत झाले होते. काळे ढग सरले होते. सुर्याची किरणे जमिनीवर पडली होती, ती पाण्याच्या अंशात चमकत होती.अर्ध्या जळालेल्या घरातून काळ्या धुराचे लोट निघत होते . काळे ढग सरले होते. झालेल्या पावसाच्या सरीने  सर्वत्र चिखल झाला होता , त्या चिखलात रक्त व मांस एकत्र तुडविले गेले होते . तिथे मेलेल्यांसाठी कोणी आक्रोशही करणारे नव्हते, जे वाचले  ते पळाले कायमचे.... गाव सोडून पळाले होते .

श्वेतकमल उठला , समोरच त्याची बायको कमळा उभी होती ‌ आपण जिवंत आहोत ह्या कल्पनेने तो हसू लागला ,"बघ कमळा आपण जिवंत आहोत....... आपण अमर झालो आहोत ,कोणाच्या श्रापाने आपले काही एक वाकडे होऊ शकत नाही.", श्वेतकमल असे म्हणत परत हसू लागला . त्याची नजर कमळाकडे गेली , ती एकटक कसाला तरी पाहत होती. तीने आपले बोटही एका दिशेला उचलले होते . श्वेतकमलने त्या दिशेला पाहीले, त्याचे हसने क्षणात ओसरले . श्वेतकमल," नाही....नाही....असे होऊच शकत नाही ."  श्वेतकमल गळा फाडत मटकण खाली बसला .कारण समोरच त्याचा मृत्यूदेह पडलेला होता. त्याने गरागरा नजर फिरवली एका बाजूला कमळाचाही मृत्युदेह पडलेला दिसला .श्वेतकमल ते सर्व पाहून अगदी वेडावून गेला , तो मोठ्याने ओरडला ," तांत्रिक....." आम्ही त्या शैतानाची उपासना केली त्याचे फळ आम्हाला असे मिळाले आहे", श्वेतकमल तांत्रिकला म्हणाला. तांत्रिक अचंबीत पणे त्या दोघांच्या आत्म्याकडे पाहतच राहीला. तांत्रिक त्यांना म्हणाला ," अजून वेळ गेलेली नाही श्वेतकमल , जा..... जाऊन तुमच्या शरीराच्या सुरक्षिततेची व्यवस्था कर , त्या शैतानाला शंभर बळी देण्याचे प्रण पुर्ण कर ; तुला तुझे शरीर पुन: प्राप्त होईल व त्याचबरोबर अमरत्वही."

टिप -  इथे कमलाकर सखारामला सांगत असलेला श्वेतकमलचा भुतकाळ संपला . माझी सुध्दा ईच्छा होती की संपूर्ण कथा ह्याच पाचव्या भागात मांडावी , परंतु भुतकाळ आणि आता सध्या जे कथेत सध्या घडणार आहे ते सर्व एकत्र मांडणे  म्हणजेच खिचडी करण्यासारखेच आहे  . शेवट लाहान आहे , तरी आपणाला कथेच्या शेवटी काय घडले .... काय घडेल याची उत्सुकता असेल म्हणून शेवट संपूर्ण पणे वेगळ्या भागात मांडेन धन्यवाद .

कथा वाचल्या बद्दल ,                            💐 आभार 🌹 धन्यवाद 💖

Last part coming soon as soon........वाचकवर्गाचे फारफार आभार आपला प्रतिसाद अत्यंत चांगला मिळाला  , कथेच्या सुरवातीपासून तर शेवटपर्यंत त्याबद्दल  आपले फार फार आभार .