Tuji Majhi Reshimgath - 54 in Marathi Love Stories by Anjali books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 53

The Author
Featured Books
Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 53

शान त्याच्या हाताला बघत होता.... संजना शान कडे बघत होती पण शान ओठावर हसू होत ...... मग श्रेया तिकडे जाते आणि संजना आणि शानला पाहून शानला पाहून म्हणते" शान तिला भेट.... हि माझी कॉलेज फ्रेंड आहे संजना.... ती काही दिवसापूर्वीच भारतातून आली होती...."

शान हसतो आणि म्हणतो "हॅलो माझं नाव शान आहे आणि मी रुद्र प्रताप सिंगचा लहान भाऊ आहे....."

शान च बोलणं ऐकून संजना श्रेयांकडे बघते आणि म्हणते" म्हणजे श्रेया हा तुझा देवर आहेत....?"


तर श्रेया म्हणते" हो हे माझे देवर आहेत....."

सहन मग श्रेयाला बोलतो" ब्र झालं वाहिनी तुम्ही मला सांगितलं कि हि तुमची मैत्रीण आहे.... नाहीतर मला वाटलं कि ती चोर असेल जी चोरीच्या उद्देशाने घरात घुसली आहे....."

त्याच बोलणं ऐकून सन्जना त्याच्याकडे रोखून पाहते.... आणि म्हणते" मी तुम्हाला काय चोर दिसतेय....."

त्यांना असं बोलून श्रेया म्हणते" अरे बस करा तुम्ही दोघे..... आणि संजना तू शान च्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस.... ते फक्त मजाक करत होते.... मी तुला घर दाखवते चल ,........ "


यावर शान म्हणतो "वाहिनी तुम्ही राहू द्या मी त्यांना आपलं घर दाखवतो....."

हे ऐकून श्रेया म्हणे" ठीक आहे शान तुम्हीच दाखवा..." असं म्हणत श्रेया परत खाली गेली.... 


शान संजनाकडे बागाघतो आणि हसत म्हणतो" चल जाऊया....."


संजना शान सोबत निघून जाऊ लागली..... शान तिला हवेली भोवती घेऊन जात होता... संजना मग काही वेळाने त्याला म्हणाली तुम्हाला मी चोर वाटते का....? तुम्ही शरिया समोर असं का म्हणालात कि चांगलं झालं तुम्ही सांगितलं.... कि हि तुमची फ्रेंड आहे नाही तर मी त्यांना चोर समजलं असत...."

शान तिच्याकडे हसून पाहतो आणि म्हणतो" चोर तर आहेस तू....."

संजना चिडली आणि म्हणाली" तुम्ही मला पुन्हा चोर म्हणालात...."



शान त्याच्या हृदया जवळ हात ठेवतो आणि म्हणतो" हो ते काय आहे ना तू माझं हृदय चोरलं आहे संजना ..... पहिल्याच नजरेत तू मला आवडली आहेस.... आता मी काय करू..... म्हणूनच मी तुला चोर म्हटलं....."

त्याच बोलणं ऐकून संजना खोत हसू आणून म्हणते" मिस्टर शान प्रताप सींग कदाचित तुम्ही माझ्याकडे नीट बघितलं नाही आहे किवा मला पाहूनही तुम्हाला समजून घ्यायचं नसेल..."

शान तिच्याकडे आश्चर्याने पाहतो आणि म्हणतो "म्हणजे...?"

संजना रागाने त्याला तीच मंगळसूत्र आणि भांगेत भरलेलं कुंकू दाखवते आणि म्हणते" याचा अर्थ असं आहे कि मी विवाहित आहे........ मी विवाहित आहे आणि मी माझ्या पती सोबत हनिमूनला येथे आले आहे....."


यावर शान म्हणतो" तुझ लग्न झालं आहे....?"

हे ऐकून संजना म्हणते" हो माझं लग्न झालं आहे..... तर आता तुम्ही माझ्यावरून नजर हटाव कारण जर तुम्ही पुन्हा असं काही केलंत किंवा माझ्यासोबत काही बकवास बोललात तर मी तुमचं तोड फोडेन....."


तिचे चिडलेले शब्द ऐकून शान त्याच्या दोन्ही गालवर हात ठेवतो आणि म्हणतो " सॉरी मला माहित नव्हतं कि तुझं लग्न झालं आहे....."


मग पुढंच्याच क्षणी तो नाराज होऊन म्हणतो" एवढ्या लवकर लग्न करायची काय गरज होती... अजून काही महिने थांबायला काय झालं होत आणि तुला भारतात लग्न करायला कोणी सांगितलं.... तिथे यायचं होत.... मी तुझ्याशी लग्न केलं असत.... तू मला आधी का भेटली नाही.....?"

हे ऐकून संजना रागाने म्हणे" शट अप तुझी बकवास बंद कर... मी ज्याच्याशी लग्न केलं तो माझा बॉयफ्रेंड आहे.... मी त्याच्यावर प्रेम करते.... आम्ही दोघे कॉलेजच्या वेळेपासून एकत्र आहोत...... समजलं......"

 

हे ऐकून शान म्हणतो" पण निदान मला एक संधी तरी देऊन बघ ....."


यावर संजना म्हणते" काय म्हणालास.... मी तुला सांगितलं कि माझं लग्न झालं आहे तरीही तू मला संधी मागतोय..... तू समजलं काय आहे मला... आता मी जाऊन तुझ्याबद्दल तुझ्या भावाकडे आणि बहिणीकडे तक्रार करेन... मग ते दोघे तुझं काय करतील तू हे विचारहि करू शकत नाहीस....."


तीच बोलणं ऐकून शान शांत होतो... संजना मग रागाने निघून जाते.... ती गेल्यानंतर शान त्याच्या हृदयावर हात ठेवतो आणि म्हणतो" मी पहिल्यांदाच कोणाच्यातरी प्रेमात पडलो पण आता तीही दुसऱ्याची आहे.... " असं म्हणत तोही त्याच्या खोलीत जातो.... 

एक आठवड्यानंतर ........ 


रुद्रने अमितला त्याच्या ऑफिस मध्ये मॅनेजर च्या पदावर नियुक्त केलं होत.... त्याला अमितचा क्वालिफिकेशन खूप आवडलं होत.... अमित खूप इंटेलिजन्ट होता त्याला काम कमी वेळात चंगल समजलं होत आणि खूप मेहनत देखील करत होता त्यामुळे रुद्र खूप खुश होता.... 



सकाळची वेळ.....

रुद्र ऑफिसला जायच्या तयारीत होता तेव्हा श्रेयाने टाय काढला आणि गळ्यात बांधायला सुरवात केली ..... रुद्र हसतो आणि तिच्या कंबरेवर हात ठेवतो आणि तिला जवळ ओढतो..... 
श्रेया सुद्धा हसते आणि त्याच्याकडे बघते आणि म्हणते " आज मी शॉपिन्ग ला जातेय.... मी संजना आणि नयनाला बोलावलं आहे....." हे ऐकून रुद्र म्हणतो :" ठीक आहे जा माझ्यासाठी पण शॉपिंग कर....."   


यावर श्रेया म्हणते" रुद्र हि पण बोलायची गोष्ट आहे का..... आधी मी तुमच्यासाठी शॉपिंग करते आणि मग नंतर कुटूंबासाठी....."




तूच ऐकून रुद्र हसला.... मग तो त्याच्या पॉकेट ममधून एक कार्ड काढतो आणि तिला देतो आणि म्हणतो" डार्लिंग हे कार्ड ठेव ... या कार्डवर अजिबात मर्यादा नाहीये .... तुला पाहिजे तितके शॉपिंग करू शकते....."



त्याच बोलणं ऐकून श्रेया त्याला एक कार्ड दाखवते आणि म्हणते"रुद्र माझ्याकडे आधीच एक कार्ड आहे जे तुम्ही मला आधीच दिल आहे.... मी हे कार्ड नेहमी माझ्याकडे ठेवते त्यामुळे मला दुसरया कार्डची गरज नाही...."

मग रुद्र म्हणतो" मग काय झालं हे पण ठेव......"

त्यावर श्रेया म्हणते" नाही रुद्र मी दोन कार्ड्सचं काय करणार.... मला ते नको आहे....."

मग रुद्र म्हणतो" ठीक आहे तुला पाहिजे ते विकत घे.... वस्तूची किंमत अजिबात पाहू नकोस...... वस्तू कितीही महाग असली तरी ती खरेदी कर .... मी फक्त तुझ्यासाठीच कमावतोय जेणेकरून तू खर्च करू शकतेस समजलं....."

यावर श्रेया म्हणते" हो हो मला माहित आहे.... चला नाश्ता करून ऑफिसला जा....."

असं म्हणत ती त्याचा हात धरून त्याला खोलीबाहेर आणते.... दोघेही मग येऊन सर्वांसोबत बसून नाश्ता करू लागले..... 

तर दुसरीकडे संजना अमितकडे पैसे मागत होती... 


अमित रागाने म्हणतो" मी तुला सांगितलं होत कि माझ्याकडे पैसे नाहीत...."


त्यावर संजना त्याला म्हणते" मग मी श्रेयांकडे पैसे मागणार का.....? मी तिच्या बरोबर शॉपिंग ला जात आहे... अमित प्लिज मला थोडे पैसे दे.... माझ्याकडे खर्च करायला एक पैसाही नाहियव.... मला थोडीच माहित होत कि आपण दोघे भारत सोदूनकायमच इथे राहणार आहोत... रुद्र सरानी तुम्हाला त्याच्या कंपनीत नोकरी दिली हे ब्र झालं... आणि त्यासोबत आपल्याला कंपनीच्यावतीने राहण्यासाठी हे घरही मिळालं आहे... पण त्यांनी तुम्हाला बोनसही दिला आहे त्यामुळे मला थोडे पैसे दे....."


हे ऐकून म्हणतो" माझ्याकडे एक पैसेही नाही आहे.... आणि माझ्या बोन्सकडे बघू नको ...... ते फक्त माझे पैसे आहेत....."


मग संजना म्हणते" पण मी पण तुझीच आहे ना.... तू माझ्यावर इतकाही खर्च करू शकत नाही का.....?"


यावर अमित म्हणतो" हे बघ संजना एक काम कर श्रेया तुझ्यासोबत असेल म्हणजे तू तिला स्वतःसाठी सुद्धा काही शॉपिंग करायला लाव आणि हो माझ्यासाठी काहीतरी शॉपिंग करूनघे... ती खूप श्रीमंत आहे... तिने काही पैसे आपल्यावर खर्च केले तर तिला काही फरक पडणार नाही...... रुद्र सर्च इथे खूप कारखाने आणि व्यवसाय आहेत ते खूप श्रीमंत आहे ..... तू तिच्यासोबत जा आणि कोणत्याही मार्गाने तिच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न कर ..... शेवटी ती तुझी मैत्रीण आहे ती कधी उपयोगी पडेल तुझ्या......"

अमितचा बोलणं ऐकून संजना रागाने म्हणते" तू खूप वाईट आहेस अमित... मी श्रेयांकडून पैसे घेईन असं विचार हि कसा करू शकतोस...."

मग अमित म्हणतो " मग नको घेऊस आणि माझ्याकडे पण पैसे नाहीत...." असं बोलून तो रागाने निघून जातो.... संजना त्याला जाताना पाहू लागली.... 



 ........ ....... ....................................... 


हेय गाईज ..... कसा वाटलं आजचा भाग ..... नक्की काळवा.... काय चालूय शान आणि संजना मध्ये..... काही ट्वीस्ट तर नसेल ना पुढे.... काय माहित बाबा... पण तुम्हाला त्यासाठी वाचत राहवं लगे ना पुढे... मग नक्कीच वाचत रहा.... 



माझी तुझी रेशीमगाठ.....🥰🥰🥰❤️❤️