दुसरीकडे नयना तिच्या खोलीत बसली होती जेव्हा श्लोक खोलीत येतो आणि सोफ्यावर बसून लॅपटॉप वर काम करू लागतो..... नयना बेडवर बसून मोबाईल खेळात होती..... तिची नजर श्लोक वर पडली.... श्लोक वारंवार डोक्यावर हात फिरवत होता ...........
त्याला पाहून नयना तिचा मोबाईल बाजूला ठेवते आणि म्हणते" काय झालं डोकं दुखतय का......?"
श्लोक म्हणतो "हो माझं थोडं डोकं दुखतंय ......."
नयना मग डोकेदुखीचा मलम काढते आणि श्लोकांच्या शेजारी बसते......
लॅपटॉप वर श्लोकांची बोट सतत फिरत होती.... ते पाहून नयना त्याचा हात धरला..... श्लोक तिच्याकडे पाहतो.....
मग नयना त्याला म्हणते"काम नंतर करा.... मला आधी बाम लावू द्या...." असं म्हणत ती लॅपटॉप बंद करते आणि मग हाताने श्लोकांच्या डोक्यावर लावू लागते.....
श्लोक तिच्या चेहऱ्याकडे स्माईल करत बघत होता.... तर नयनाला श्लोकांचे डोळे अस्वस्थ करत होते.... तीच हृदय धडधडू लागलं होत..... बाम लावल्यावर ती निघायला उभी राहताच श्लोकाने तिच्या हाताला पकडून आपल्या मांडीवर बसली ...... ती त्याचा चेहरा पाहू लागली.....
श्लोक प्रेमाने तीच्च चेहरा आपल्या हातात धरतो आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आणतो आणि म्हणतो " काय झालं तुझं हृदय एव्हढ का धडधडतंय ..... मी जेव्हाही तुझ्या जवळ येतो तेव्हा कुठेतरी तुला अस्वस्थ वाटत.....? असं तर नाहीये ना कि तू पण माझ्य प्रेमात पडायला लागली आहेस....?"
त्याच ऐकून नयना दूर बघते आणि म्हणते" असं काही नाहीये.... जास्त विचार करू नका आणि मला सोडा जाऊ द्या....."
तर श्लोक तिला म्हणतो" आधी एक किस दे मग जा जिथे जायचं आहे तिथे जा...."
त्याच म्हणणं ऐकून नयना त्याच्याकडे रोखून पाहते आणि म्हणती" काय म्हणालात किस.... मी तुम्हाला किस करणार नाही...."
त्यावर श्लोक म्हणतो" ठीक आहे मग मी पण तुला दिवसभर माझ्या मांडीवर बसवून ठेवेन,........"
त्याच बोलणे ऐकून नयना त्याच्याकडे रागाने पाहत होती....
श्लोक आपला गाळ पुढे करतो आणि म्हणतो" मी फक्त एक किसच तर मागत अणे..... एवढं हक्क तर आहे माझा .... प्लिज फक्त एक किस ....."
प्लिज म्हटल्यावर नयना वितळली पण ती त्याला किस करत नव्हती... तोच श्लोक तिला हातात धरून बसलेला दिसत होता....
जवळपास २ मिनिटे निघून गेली .... दोघेही एकमेकांकडे बघत होते... नयना श्लोकांच्या माडीवर बसली होती आणि त्याच्याकडे रागाने बघत होती श्लोकांच्या ओठावर हसू होत.... त्याने तिची कंबर आपल्या हातानी घट्ट पकडली होती....
नयना रागाने म्हणते" ठीक आहे फक्त एक किस.... मला पुन्हा किस करायला सांगू नका....."
त्यावर श्लोक म्हणतो" मी का नाही मागणार मी नक्की मागेल ..... जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुला नक्कीच मला किस करायला सांगेल आणि तुला मला किस करावं लागेल..... नाहीतर मी तुला असच माझ्या मिठीत पकडून ठेवेल......"
नयना त्याच्याकडे रागाने पाहते आणि मग त्याचा गाळ पकडून त्याला किस करते........ नायनाचे त्याला किस करताच श्लोकांच्या ओठावर मोठे हसू उमटलं आणि त्याचे डोळे आपोआप बंद होतात.......
संध्याकाळी रुद्र मेन्शन......
रुद्र ऑफिस वरून घरी आला होता... श्रेयाने त्याला अमित अन संजना बद्दल सांगितलं होत.... सर्वजण सोफ्यावर बसून संध्याकाळचा चहा घेत होते..... मग अमित आणि संजना एका नोकर सोबत हवेलीच्या आत येतात ....... दोघेही रुद्रच्या सुंदर मेंशनला बघत होते.....
अमित आजूबाजूला पाहतो आणि म्हणतो"हा मेन्शन खूप मोठा आणि सुंदर आहे..... मीही अशा ठिकाणी राहिलो असतो तर मजा अली असती......"
तेवढ्यात संजना ची नजर समोरच्या सोफ्यावर बसलेल्या श्रेयकडे जाते.... ती श्रेयांकडे बघते आणि जोरात म्हणते" श्रेया....."
संजनाचा आवाज ऐकून श्रेया ताबडतोब उभी राहते आणि तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारते.... संजनानेही हसून तिला मिठी मारली....
अमितही त्या दोघीच्या जवळ येतो आणि त्याच्याकडे बघून हसायला लागतो.... श्रेयाने संजनाचा हात धरला आणि तिची रुद्र आणि इतर सर्वांशी ओळख करून दिली.... संजना सगळ्यांना खूप छान आणि प्रेमाने भेटते .... ती घरातील सर्व मोठ्याच्या पायाला स्पर्श करते आणि रुद्रला देखील हॅन्डशेक करते.... पण अमितला या सगळ्याचा काहीच फरक पडत नव्हता.... तो फक्त रुद्रच्या दिशेने पाहत होता... रुद्रच व्यक्तिमत्व पाहून तो त्याच्या जागी स्वतःची कल्पना करू लागला कि तो त्या मेन्शनचा मालक आहे... आणि त्याने रुद्रसारखे महागडे कपडे घातले आहेत .........
अमित मग रुद्रच्या समोरच्या सोफ्यावर बसतो आणि म्हणतो " रुद्र सर तुमचं नाव मी खूप ऐकलं आहे... मला तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती पण मला माहित नव्हतं कि तुमि माझ्या मैत्रिणीचे हसबंड आहेत... जर मला आधी माहित असत तर मग मी तुम्हला आघीच भेटलो असतो..... मला तुमच्यासोबत काम करायचं आहे.... तुमच्याइथे अनेक मोठ्या कंपन्या असतील ना.... मग तुम्ही मला त्यापैकी एक कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरी देऊ शकता का....? मी खूप मेहनत करेल...."
अमितचा बोलणं ऐकून संजना त्याच्याकडे एकटक पाहू लागली पण तो तिला काहीच बोल्ट नाही.... रुद्रही अमितकडे बघतो आणि म्हणतो" ठीक आहे तू उद्या ऑफिसला ये आणि तुझे सर्व डॉक्युमेंट घेऊन ये.... तू सक्षम असशील तर नितुला कामावर घेईन...."
अमित हसतो आणि म्हणतो"हो सर मल्ल याच शहरात राहून तुमच्यासोबत काम करायचं आहे..... तुमच्यासारखं मोठं व्हायचं आहे.... मला भारतात परत जायचं नाहीये......"
हे ऐकून रुद्र म्हणतो" मी एक दिवसात एवढा मोठा झालो नाही.... इथं पर्यंत पोहिचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.... त्याला माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुलाही खूप मेहनत करावी लागेल......"
यावर अमित म्हणतो" सर काळजी करू नका... मी तुम्हाला कधी हि निराश करणार नाही मी खूप मेहनत कारेन....."
त्याच बोलणं ऐकून रुद्रने हळूच मन डोलावली.... मग संजना श्रेया म्हणते" श्रेया तुझं मेन्शन खूप मोठं आहे आणि आम्ही एका दिवसात इकडे तिकडे फिरूही शकत नाही.... मी तुझा मेन्शन पाहू शकते का प्लिज....."
श्रेया हास तिला म्हणाली " यात प्लिज बोलण्यासारखं काय आहे.... तू नक्की बघू शकते.... थांब मी पण येते... तुझ्यासोबत...."
असं म्हणत ती तिच्या सोबत जाण्यासाठी उभी राहिली असता तिचा मोबाईल वाजला.....
श्रेया संजनाला म्हणते" तू जा मी येते...."
संजना मन हलवते आणि पायऱ्या चढू लागते.... एवढा मोठा मेन्शन ती पहिल्यांदाच पाहत होती.... नाहीतर ती नेहमीच कुठल्या ना कुठल्या मालिकेत किंवा चित्रपटात असे मेन्शन बघायची.... संजना तिच्याच नादात चालत होती जेव्हा तिची कोणाशीही तरी टक्कर होते.... आणि कोणीतरी तिला आपल्या मिठीत पकडत तेव्हा तिला वाटत ती पडतेय म्हणून संजना घाबरून डोळे बंद करते.....
काही वेळाने तिला कळलं कि ती पडली नाही..... तिने डोळे उघडले आणि समोर बघितलं.... शान तिच्या समोर उभा होता... संजना सोंदर्य पाहून तिच्या त हरवला होता... तो फक्त तिच्याकडे बघू शकतो..... संजनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली" थँक्स तुम्ही मला वाचवलं.... नाही तर आज मी या पायर्यांवरून खाली पडले असते.... आता तुम्ही मला सोडू शकता...." पण शान वर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नव्हता..... तो तिच्याकडे पाहत होता जणू तो तिच्या डोळ्यात हरवला होता.....
संजना त्याला पुन्हा हाक मारते" तुम्हाला ऐकायला येतंय कि नाही.... मी म्हणाले तुम्ही मल्ल सोडू शकता...." पण तरीही शान तिच्या बोलण्याला तुम्ही प्रतिसाद देत नव्हता..... तो तसाच तिला त्याच्या मिठीत घेऊन उभा होता...
हे पाहून संजना रागाने तिच्या केसातून क्लिप काढते आणि त्याचा टोकदार भाग शान च्या हातात घालते... त्यामुळे शान ओरडतो आणि तो पटकन संजनाला त्याच्या हातातून सोडतो आणि त्याच्या हाताला बघू लागतो....
................... ........ ....... ........ ......... ......
हेय गाईज ...... कसा वाटलं आजचा भाग.... कशी वाटतेय स्टोरी ..... आता अजून नवीन सदस्य ऍड झाले आहेत स्टोरी मध्ये... बघूया त्याचा काय रोल आहे ते..... अजून पुढे स्टोरी मध्ये काय होईल .... यासाठी वाचत रहा.....
माझी तुझी रेशीमगाठ......❤️❤️❤️❤️❤️