Niyati - 51 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 51

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

नियती - भाग 51








भाग 51









हळूहळू मोहित तिच्याशी संवाद करत होता...
पण हे ऐकताच ती पटकन त्याच्या अंगावरून खाली 
उतरली आणि बाजूला लेटली...
तसं तो कडावर होऊन इमॅजिन करू लागला की ती किती बावरली असेल ....?? त्याच्या या बोलण्याने....तो हसू लागला...





पुन्हा मग तिच्या कंबरेत हात घालून......

तिला जवळ ओढून कुशीत घेतले. तीही मग त्याच्या उबदार कुशीत झोपून गेली.

......






दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या दिनचर्येमध्ये थोडा बदल झाला.
मायरा सकाळचे काम आवरले की तिच्यात ठरलेल्या वेळी लायब्ररीमध्ये काम करायची आणि लायब्ररीचे काम उरकले.. ....सुट्टी झाली की ....तिने आता थोडे त्या कॅम्पस एरिया मधून बाहेर जाऊन कोचिंग क्लासेसबद्दल चौकशी सुरू केली.
पण तिला समजत नव्हते कुठून जावे.... दोन दिवस ती अशीच फिरून आली इकडे तिकडे.... पण तिला काही कोचिंग क्लासेस गवसले नाही.


मग तिने वॉचमनकाका जवळ ही थोडी विचारपूस 
केली तर......

त्यांच्याकडून तिला काही माहिती मिळाली नाही पण त्यांच्या मिसेस.... सावित्रीबाई .....ह्या बाहेर जाऊन काही घरी स्वयंपाक करून यायच्या... .......त्यामुळे त्यांच्याकडून मायराला समजले की त्या जेथून जातात......... त्या रस्त्याने एका बिल्डिंगमध्ये खूप साऱ्या सायकली.... टू व्हीलर्स थांबलेल्या असतात एक तासाकरिता .....आणि मग जेव्हा 
त्या काम करून येतात त्यावेळी त्या सायकल किंवा टू व्हीलर्स तिथे नसतात... तर त्यांच्या सांगण्यानुसार लक्षात ठेवून मायरा एक दिवस त्यांच्याचसोबत त्या परिसरात दुपारी...
काय असावे तेथे... खरंच कोचिंग क्लासेस असतील का...?? या उद्देशाने चौकशी करायला गेली...

......






इकडे फौजदार साहेबांनी मूळकाट खाटीक याच्या वर दाखल झालेल्या खटल्याचा निकाल लागला आहे हे सांगितले... बाबाराव यांना.......




बाबाराव यांना सांगितलेले की जॅकच्या खुनाच्या आरोपात
मूळकाट खाटीकला अटक केलेली आहे... 



दोघांनी एकमेकांच्या वैमनस्यातून केलेले कृत्य आहे.. असे कोर्टात सिद्ध झालेले आहे. 

तसेही मुळकाट खाटीक याने जॅकला त्यांच्या आपसांत झालेल्या  गॅंगवॉरच्या वेळी खुलेआम सर्वांसमोर त्याने तशीच धमकी दिलेली आणि नंतर रात्रीच्या तिसऱ्या प्रहरमध्ये 
जाऊन खून केला...





ज्या चाकूने खून केला गेला त्यावर मूळकाट खाटीक याच्या हातांचे ठसे सुद्धा मॅच होत आहेत आणि तो खून करून जातेवेळी तेथे त्या चाळीत राहणाऱ्या शेवंताबाई आणि
आणखी एका महिलेने पाहिल्यामुळे .... हे दोन सशक्त पुरावे... त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी न्यायालयाला पुरेसे होते...


पूर्वी मुळकाट खाटीक आणि जुली यांचे एकमेकांवर प्रेम होते.. नंतर मुळकाट खाटीक याचा मित्र जॅक हा त्यांच्या 
प्रेमाच्यामध्ये आला आणि नंतर जुली आणि जॅक यांचे प्रेम संबंध जूळले.




यामुळे मुळकाट खाटीक आणि जॅक यांची मैत्री तुटली 
आणि त्यांच्यात वैमानस्य निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्यात दोन-तीन वेळा गॅंगवॉर झाले होते. .....
आणि शेवटी संधी साधून मुळकाट खाटीक याने जॅकचा खून केला.


अशी बातमी न्यूज पेपर आणि टीव्हीवर इकडे तिकडे झळकत होती....


ही बातमी  मोहितपर्यंत पोहोचली होती.... मायराला त्यांच्याकडे टीव्ही नसल्यामुळे समजले नव्हते.... ती न्यूजपेपरही तेवढासा वाचत नव्हती कधी..... पण तरीही  न्युजपेपरमध्ये बातमी दिसताच त्याने लायब्ररीमध्ये त्यादिवशी तिच्या नजरेसमोर येऊ नये या दृष्टीने .....न्युजपेपरकडे जेव्हा जेव्हा ती जायची तेव्हा तेव्हा कोणते ना कोणते पुस्तक मागून त्याने हैराण केले होते दोन तास...


......




खरं पाहता... मुळकट खाटीक मिळालेल्या सुपारीनुसार मायराला शोधत आलेला होता.... थोड्यावेळापूर्वीच तेथून
मायरा निघून गेली... आणि तो त्या जुनाट बिल्डिंगमध्ये असणाऱ्या त्या खोलीत आलेला... रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जॅकला पाहून क्षणभरासाठी तो बावरला... 





पण त्याच्या मनाला आनंदही झालेला की त्याच्या रस्त्यातल्या काटा आपोआप दूर झाला.

पण लगेच त्याला ....आपण कशासाठी आलो आहोत याची जाणीव झाली. .......आणि त्याला आतल्या बेडवर लोंबत असलेली साडी दिसली... त्यावरून त्याला वाटले ...
मायरा आत मध्ये असावी...
.............आणि तो रक्ताच्या ओघळवर पाय पडू नये यादृष्टीने पाय टाकत जॅक जवळून आतल्या दिशेने जाऊन पडदा सारून पाहिला........ तर तेथे कूणीही नव्हते...... निव्वळ साडी लटकत होती. .....मग तो तिथून बाहेर आला आणि ......





जे बाथरूम सारखा भाग होता साईडने .......तिथे जाऊन तो वाकून पाहू लागला.. ......तेथे त्याला ........
रक्त धुतल्यासारखे केल्यामुळे थोडेसे सांडल्यासारखे डाग दिसले त्यावरून त्याच्या लक्षात आले की कोणीतरी म्हणजे ज्याने कोणी खून केला आहे त्याने येथे स्वतःला धुवून साफ केलेले आहे..
कदाचित ती मायरा तर नव्हे.....!!!
नाही ....नाही ......आपल्याला येथून लवकर बाहेर निघावे लागेल अन्यथा आपल्या अंगावर हे सर्व येणार... 
यादृष्टीने तो भराभर पुन्हा रक्ताच्या ओघळवर पाय पडू नये 
या दृष्टीने बाहेर पडू लागला...





पण जसा तो पुढे आला तसा अचानक त्याचा पाय पकडल्यासारखा वाटला.
मुळकाट खाटीक कधी नव्हे तो घाबरला.. 
आता त्याचा दुसरा पाय ठेवायला जागा नव्हती...  एक पाय त्याचा उचललेल्या अवस्थेतंच होता.. तसेच त्याने वाकून 
पाहिले पायाकडे स्वतःच्या... तर.....
त्याचा पाय जॅकच्या हातात घट्ट पकडला गेला होता..





एका पायावर काही मुळकाट खाटीक ला बॅलन्स करता आले नाही. आणि तो पडल्यागंत झाला पण त्याने स्वतःला पडू नये म्हणून आपला हात जमिनीवर पटकन टेकवला.
टेकवल्याबरोबर त्याचा हात खाली पडलेल्या चाकूवर पडला.
पण मुळकाट खाटीकचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. 
त्याचे लक्ष केवळ जॅकने पकडलेल्या हातावर वेधले होते.





तसेच वाकून त्याने स्वतःला बॅलन्स करत..... दुसऱ्या हाताने  जॅकने पकडलेला पंजा .....आपल्या पायाला पकडलेला ...
तो सोडवू लागला.

आणि घाबरून एक नजर जॅककडे टाकली.


जॅकने नेमके तेव्हाच जोऱ्याने लांब श्वास घेत आपली मान कलंडली एका बाजूने.

मुळकट खाटीकने त्याचबरोबर हळुवार ओठांतून श्वास बाहेर सोडला.

आणि जॅकचा हात .....पायाला पकडलेला बोटे अलगद सोडवत ....दूर केला. 


इकडे जो हात जमिनीला टेकवून होता...... टेकवलेला होता तिकडे आता त्याचे लक्ष गेले... आणि कसे तरी स्वतःला बॅलन्स करत उभा झाला... त्याच्या हातात असलेल्या त्याच्याकडे एक घटका तो पाहत राहिला... 


नंतर त्याच्या हृदयात धडधडी भरली आणि त्याने हातातला चाकू खाली टाकून दिला. आणि तेथेच त्या खोलीतल्या पडद्याला हात पुसून घेतला..
झरझर बाहेर आला..
दार ओढून बाहेरून कडी लावली.. आणि बाहेर निघून गेला.


ह्या सर्व प्रकारामुळे... तो या खून प्रकरणात फसला गेला.


तसेही त्याने बऱ्याच लोकांना निर्दयीपणे मारले होते आजपर्यंत पण हुशारीने कोणत्याही प्रकरणात तो फसला गेला नव्हता. पण इथे मात्र काहीही न करता तो चपखल फसला.

खटल्याचा निकाल ऐकून बाबाराव आणि राम दोघांनाही दिलासा मिळाला ...बरे वाटले त्यांना...
सुटकेचा विश्वास सोडला दोघांनी....


......

पण खटला चालू होता त्या कालावधीत .....एके दिवशी या मूळकाट खाटीक आणि सुंदर यांच्यासंबंधी बाबाराव यांना फोनवर फौजदार साहेबांशी बोलताना अचानकपणे लता यांनी ऐकले...

तेव्हा त्यांनी त्यांच्यापासून लपून ठेवले सर्व गोष्टी म्हणून बाबाराव यांना त्या खूप रागावल्या... त्यांना सहनच झाले नाही की आपल्या मुलीसोबत एवढे काही झाले आणि आपल्याला किंचितही माहिती नाही.

इव्हन ती त्यानंतर गावातही आली तरीसुद्धा आपल्याला या सर्वांनी माहीत केले नाही... म्हणून त्यांनी रामलाही खूप धारेवर घेतले.


गावात जरी कवडू आणि पार्वती या दोघांच्या मृत्यूचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेली असली तरी दोन दिवस राहून सुद्धा निदान थोड्या वेळासाठी मायराने आणि मोहित दोघांनीही त्यांना भेटू नये हेही त्यांना अचंबित करून गेले...



त्या विचार करू लागल्या......
" तिला तिच्या आईबद्दल माया नसावी का....???
आपण तिच्या आठवणीने एवढे झुरंत आहोत...
कदाचित आपण तेथे गेलो नाही त्या अंत्यसंस्काराला म्हणून आली नसावी.... पण त्या दोघांचा मृत्यू झालेला ही बातमी माझ्यापर्यंत त्यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर आली ......त्याला तरी मी काय करणार....??
मायराला तर माहित आहे ना तिचे बाबा कसे आहेत...???
त्यांनी माझ्यापर्यंत काहीच माहिती येऊ दिले नाही....
जर मला कळले असते तर मी निदान दूर उभी राहण्यासाठी तरी आली असती....
आणि हिचे लग्न झाल्यानंतर.... ती एवढ्या लवकर आपल्यापासून मनाने सुद्धा दूर जावी....
आपल्याला कोणीच कसे काही सांगितले नाही...."


निदान रामने तरी बाबाराव यांना माहीत न होता सांगायला पाहिजे होते... अशी त्यांची माफक अपेक्षा होती.... कुठून तरी दुरून डोळाभर तिला पाहिले असते....पण त्यानेही सांगू नये....



अशी नाना तऱ्हेचे विचार येऊन त्यांनी.... बाबाराव आणि राम सोबत अबोला धरला....


......

चौकशी करायला गेलेली मायरा...
..... सावित्रीबाई यांच्यासोबत...
तिला समजले खरंच तेथे कोचिंग क्लासेस आहेत...
पण ते छोट्या मुलांचे कोचिंग क्लासेस आहेत....
टेंथ स्टॅंडर्ड पर्यंत...
टेंथच्या पुढे कोचिंग क्लासेस आहेत त्यांना मास्टर्स डिग्रीवाले पाहिजे होते सोबत.... सोबत प्रोफेशनल डिग्री घेतलेले बीएड किंवा एम एड असलेले... हवे होती...


जाऊन तिने तिथे चौकशी केली तर त्यांनी दोन दिवसांनी डेमो लेक्चर देण्यास सांगितले.....

रात्री झोपताना याबाबत मायराने मोहितला सर्व सांगितले.
आणि ती दोन दिवसांनी क्लास 8 साठी डेमो देत आहे हेही सांगितले. त्यावर थोडा वेळ मोहित काही बोलला नाही. 

तीच म्हणाली मग महिला....
"मोहित... हे बघ... तू जास्तीत जास्त अभ्यास कर आता... जास्तीत जास्त लायब्ररीत बसून अभ्यासाला वेळ दे...
तू सिलेक्ट व्हायलाच पाहिजे एक्झाममध्ये कळलं ना...!!"

तिचा मुद्दा अगदी योग्य असल्याने त्याला तिच्यासमोर पडतीचे घ्यावे लागले..... ती तेथे लायब्ररीत काम करत होती..
तेथे जास्त पगार नव्हता ....भागत होते सर्व .....
पण काटकसर करावी लागत होती ......तिची त्यात होणारी ओढाताण तो पाहत होता..... ती ऐशआरामात राहिलेली असल्यामुळे तिला फार कठीण जात होते तरीही काचकूच न करता सर्व काही करत होती बरोबर... याचे त्याला फार कौतुक होते.


डेमो दिल्यानंतर तिला सिलेक्ट केले गेले आणि तिला शिकवणीसाठी संध्याकाळची बॅच मिळाली. 
ती कोचिंग क्लासेस मध्ये सायंकाळी जाऊन  येत होती ....आता बदललेली दिनचर्या सुरू झाली...

तेथे नियमित जात असल्यामुळे थोड्याफार ओळखीही झाल्या. बाहेर चार पैसे जास्त मिळू लागले .......नित्यनियम व्यवस्थित सुरू झाला .....परिस्थिती थोडीशी सुधारली.


आज शनिवार होता... आजचा तिचा क्लास सकाळचा असायचा... आणि वॉचमन काकाच्या मिसेस सावित्रीबाई दोन-तीन दिवसासाठी आपल्या भावाकडे गावाला गेलेल्या त्या आज परत आलेल्या.
दुपारी मायरा लायब्ररीमधून परत आल्यानंतर तिला त्या दिसल्या...


तसे तिने सावित्रीबाई यांना सांगितले...
"काकू.... चलता का...?? आपण बाजारात जाऊ... 
मला गादी आणि एक पलंग घ्यायचाय..."

सावित्रीबाई.....
"पलंग कसा पाहिजे बाई तुला... बाजेसारखा पाहिजे की पूर्ण पोलादी पाहिजे..."

माहेरा....
"काकू माझा बजेट थोडा कमी आहे.... पण मला दोन्ही गोष्टी पाहिजे..."


सावित्रीबाई....
"असं करू आपण फोल्डिंगचा पलंग घेऊ... म्हणजे रूम लहान असल्यामुळे आपल्याला तो टेकून ठेवता येईल... आणि मी काय म्हणते गादी कापसाची घे आणि ती ऑनलाईन बोलवून घे... इकडे तसंच स्वस्त पडते....."

मायरा...
"होय ...बरं झालं काकू ....तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलं....
तसंच करते मी...."

सावित्रीबाई.....
"ऑनलाइन बोलवलं ना तर  एक तासात येते इथं...
जास्त वेळ लागत नाही.. मी स्वयंपाक करायला जाते ना त्यांच्या घरचे तसंच करतात...."


दोघींनी चर्चा केली आणि....मग....
.....
🌹🌹🌹🌹🌹