Niyati - 46 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 46

Featured Books
Categories
Share

नियती - भाग 46






भाग 46




तिने एका झटक्यात त्याला ढकलून दिले आणि पटकन उठली. जॅक हातपाय झाडत पडला जागेवर..... त्याच्या तोंडातून किंचितही आवाज निघत नव्हता..... पण संपूर्ण शरीर तडफड करत होते ....संबंध खोली पूर्ण रक्ताने भरू लागली...


हे असं भयानक दृश्य पाहून मायराला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तशाच अवस्थेत.....मग...

ती भिंतीला पकडून उठली. अंगावरती ....वरचा जो कूर्ता तिचा फाटलेला होता... त्यासाठी आता काय करायचे ...??
हा विचार करू लागली....
पण तिला जास्त वेळ विचार करता येणार नव्हते.

यावेळी अगदी गडद अंधार आणि गडद रात्र होती....
बाहेर कुत्रे भुंकत होते... रातकिडे  किर्र किर्र आवाज करत होते.
कुणी उठायच्या आणि बाहेर येण्याच्या अगोदर तिला
कोणी पाहण्याच्या अगोदर...... बाहेर पडणे भाग होते.



मायराने आजूबाजूला पाहिले... तिला जुलीने दिलेली
साडी तेथे पलंगावर पडली होती. 
एका क्षणाला तिला वाटले की फाटका कुर्ता आपण घालून राहण्यापेक्षा ती साडी चोळी अंगात घालून घ्यावी.... 

दोन पावले त्या दिशेनेही ती गेली पण...
तिचे पाय थरथर कापत होते.... 
आजूबाजूंनी रक्ताचा ओघळ बघून आणखीनंच 
तिला ओकारी आल्यासारखे वाटू लागले.
आणि जुलीने दिलेल्या साडीकडेही तिला आता पाहून 
किळसवाणे वाटू लागले......


तिने मनोमन पक्का निश्चय केला आणि लांब श्वास ओढून 
एक सुस्कारा सोडला आणि तेथे पडलेली पलंगावरची
आपली ओढणी  घेतली आणि पूर्ण अंगावरती लपेटून घेतली.
कशीबशी धडपडत ती पण सरसर बाहेर निघाली....



रक्ताच्या ओघळावर पाय पडू नये यादृष्टीने तिने पावले टाकले आणि तेथे बालटी व डब्बा ठेवलेला होता त्या दिशेने गेली. 


तिथे जाऊन चेहरा चांगला धुऊन काढला कारण तिला असं वाटत होते.... काही तुषार चेहऱ्यावर पण आलेले आहेत रक्ताचे आणि त्या राक्षसाच.....  असलेले रक्त तिला अंगावर नकोसं वाटत होतं... चेहरा चांगला धुऊन काढला स्वच्छ आणि ओढणीने पुसून घेतला...


पुन्हा व्यवस्थित चांगली ओढणी अंगभर लपेटून घेतली. व्यवस्थित एक एक पाऊल टाकत..... रूममध्ये असलेले रक्ताचे लोट... त्यावर पाय पडू नये अशी  बाहेर आली
आणि दार ओढून घेतले....


आज आपण आपली लुटणारी अब्रू वाचवली या गोष्टीचं 
तिला समाधान होतं... पण....पण...
आता आपले हात खूनाने रंगले आहे..
आज आपल्या हातून असे भयंकर कृत्य घडले जे घडायला नव्हते पाहिजे..... ही जाणीव तिच्या मनाला छळू लागली.



तिला आता काय करावे हे सुचत नव्हते. पण...
एक गोष्ट मात्र तिला कळत होती की या खोलीतून आणि 
या इमारतीतून शक्य तितक्या लवकर आता बाहेर पडले पाहिजे.


जर कुणी आलं तर पुन्हा इथून निघणे होणार नाही... इथे राहिलो तर पुन्हा आपली अब्रू .....तिचे काय होईल सांगता येणार नाही...???... त्यापेक्षा बाहेर गेल्यानंतर जरी 
आपल्याला पोलिसांनी पकडले तरी कमीत कमी 
आपल्या अब्रूची लक्तरे तर होणार नाही.... निदान ती तरी वाचेल......


हा विचार येत .....असतील नसतील तेवढा जोर लावून पावलं उचलले..
......पटापट बाहेर येऊन .....बाहेरचे दार उघडून घेतले आणि जिना लवकरात लवकर उतरली....
त्या गडबडीमध्ये तिला काही न सुचून  तिने लाईट सुद्धा बंद केला नाही.


जवळपास रात्रीचे दीड ते दोन च्या सुमारास... 
मध्यरात्रीच्या पलीकडला वेळ असल्याने ती बाहेर निघताना तिथल्या एकाही तरुणीने किंवा त्या बायकांनी तिला पाहिले नाही.. प्रत्येकीच्या रूमची दारे बंद होती.


जशी ती इमारतीच्या बाहेर आली तशी सरळ रस्त्याने न जाता एका बाजूच्या गल्लीतून पुढे गेली जेणेकरून तेथे येणाऱ्या कोणाच्याही ती नजरेस पडू नये...

जिकडे तिकडे काळाकुट्ट अंधार.... त्या अंधारातंच ती जमेल तशी पावलं पुढे पुढे टाकत होती घाई घाईने.....


स्वतःची अब्रू वाचविण्याच्या हेतूने तिच्या अंगात आता बळ आले होते.



.......






इकडे मायरा त्या जुनाट इमारतीतून बाहेर गेली....
आणि तिच्या पाळतीवर असणारा मुळकाट खाटीक... 
त्याला माहित झालेले की मायरा येथेच आहे..तर 
तो पटापट जीना वर चढला....
आणि तो दार खोलून आत आला .



त्याला जुलीची खोली माहित होती त्या दिशेने  तो गेला.... 
नेमके त्यावेळीच त्या इमारतीतली जी मायराला समजावण्यासाठी आलेली म्हातारी बाई(शेवंताबाई)..... 
तिने आपल्या खोलीचे दार उघडले आणि मूळकाट खाटीक तिच्या नजरेस पडला.. जुलीच्या खोलीमध्ये आत जाताना...




मूळकाट खाटीक (जुलीचा पुराना मित्र... त्या एरियातला
एक दादाच... जॅकच्या पूर्वीचा....) दिसल्यामुळे
ती शेवंताबाई ..
....तिला आश्चर्य वाटले..... कारण तो या चाळीमध्ये आता कधीच येत नव्हता.



दोघांचीही एकच मैत्रीण जुली..... तिच्यामुळे झालेले...
जॅकचे आणि मुळकट खाटीकचे जबरदस्त हाडवैर 
सर्वांना माहीत होते.


दोन महिन्यापूर्वी याच इमारतीसमोर जॅकची आणि मुळकाट खाटीकच्या गॅंग मध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती...
गॅंगवार झाला होता...




जॅकची गॅंग सद्यस्थितीमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे मूळकाट खाटीक याच्या गॅंगला पराभव पत्करावा लागला होता. 
त्याच्या गॅंगमधील एक दोन जण.....
त्यांचा मृत्यू पण झाला होता....


त्यावेळी मुळकाट खाटीकने... सर्वांसमोर जॅकला...
खुलेआम धमकी दिलेली होती....


"माझ्या एरियावर तू कब्जा केला आहेस.....
चान्स मिळू दे मला.... हा मूळकाट खाटीक... 
एक दिवस तुला येथेच दफन करेल....
नुसता नावाचा खाटीक नाही मी...!!! असा वार करीन 
तुझ्यावर की तुझ्या गळ्यातून आवाजसुद्धा निघणार नाही... तडफडत तडफडत मरशील..... की तू पाणी सुद्धा 
मागू शकणार नाहीस...!!"



त्या शेवंता बाईने... मूळकाट खाटीकला जाताना पाहिले होते पण....पण.....त्या अगोदर जॅकला जुलीच्या खोलीमध्ये जाताना पाहिले होते थोड्या वेळापूर्वी तिनेच.....



जूली शेठजीच्या ड्रायव्हर बरोबर गेलेली आहे हे शेवंताबाईला माहीत होते... म्हणून आता जॅककडे मुळकाट खाटीक
आलेला पाहून ... काहीतरी नक्की विपरीत घडणार... 
असे तिच्या मनाला वाटू लागले.....


पण एकाएकी त्या दोन... गुंड असलेल्या व्यक्तीकडे... 
कसे जाऊन पाहणार ना...???
तर ती पुन्हा लचकत मुरडत मुख्य द्वाराकडे जो खोलूनंच होता. तेथे जाऊन बाहेर बघू लागली की.....
मुळकाट खाटीक ने गॅंग वगैरे आणली काय त्याची सोबत....???



तर तेथे तिला तसे काही दिसले नाही पण जिन्याजवळच्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर घाई घाईने बाहेर निघताना दिसली आणि त्या रूममध्ये असलेली तरुणी ती.... लगबगीने शेवंताबाई कडे आली आणि तिच्या कानात काहीतरी 
कुजबुजून सांगू लागली....


तेवढ्यात मुळकट खाटीक जूलीच्या रूम मधून बाहेर आला.. दाराला कडी घातली आणि लाईट बंद केला... 
भराभर पावले टाकत यांच्या बाजूने बाहेर निघून गेला.....
तेव्हा या कुजबुजंत गोष्टी करणाऱ्या दोघी....... यांचे त्याकडे लक्ष गेले...

पटापट दोघींनी बाहेर पाहिले तर तेथे एक स्कॉर्पिओ होती 
आणि हा मूळकाट खाटीक स्कॉर्पिओमध्ये बसून निघून गेला.

मुळकाट खाटीक जेव्हा बाहेर निघाला... त्यावेळी ह्या दोघी जिन्याच्या आडोशात कुजबुजत होत्या ...
त्यामुळे त्याचे लक्ष यांच्याकडे गेले नाही अन्यथा हिंस्र स्वभाव असलेला मुळकाट खाटीक याने त्यांना रक्तामध्ये लोळवले असते.....

.....

इकडे मूळकाट खाटीक यांच्या मागावर असलेले ...
फौजदार आणि त्यांचे पथक......


त्यांना लागलेल्या सूगाव्याच्या आधारे ... त्यांची... नजर त्या रात्रीच्या अंधारात उभे असलेल्या स्कार्पिओवर जेव्हा पडली..
तेव्हाच ... झटपट सूत्रे हलविली गेली...

एक पथक जिथून मुळकाट खाटीक.... ज्या इमारतीतून बाहेर आला होता तेथे जाऊन छानबिन करू लागला... आणि विभागलेलं दुसरं पथक... त्याच्या स्कॉर्पिओ मागे भरधाव पाठलाग करू लागले....



इमारतीत गेलेल्या पथकासोबत मोहीत होता.... त्याचा जीव फार धडधडत होता आत मध्ये जाताना त्या इमारतीमध्ये....

एक एक खोली...त्या इमारतीतली एक एक जागा...
तिचा कोपरा आणि कोपरा शोधून काढला. पण त्याला मायरा तेथे आढळली नाही... त्याचा जीव आता कासाविस होऊ लागला आणखी...



जॅक तिथे मरून पडला होता... रक्ताच्या थारोळ्यात...
तिथे कार्यवाही करत  पथकातले काही पोलीस थांबले 
आणि पुढील कार्यवाहीसाठी काही... पोलीस....

ते तेथून बाहेर निघाले......
सरळ रस्त्याने जाऊ लागले.... आणि मोहितचं  काळीज अचानक जोरजोराने धडधडू लागलं ..की...
त्याला असे जाणवू लागले की त्याची मायरा इथेच 
जवळपास कुठेतरी आहे...???


सर्व पथक गाड्यांमध्ये... बसू लागले तसे...
मोहित म्हणाला....
" साहेब.... माझी मायरा येथेच कुठेतरी आहे...??
ती येथून निसटली यांच्या तावडीतून...पण ती काही जास्त दूर गेली नसणार....."


आणि मग त्यावर... पोलीस काही बोलणार त्या अगोदरंच....
बाजूने दिसणाऱ्या रस्त्याने तो पुढे चालू लागला भराभर...


जसे जसे रस्त्याने कुत्रे भुंकत होते तसे तसे त्याचा जीव धडधडंत होता आणखी..... त्याचं हृदय त्याला सांगू लागलं की येथेच कुठेतरी आहे त्याची मायरा....


धडधडते अंतकरणाने जवळपास धावतंच तो पुढे पुढे जाऊ लागला.....


आता कुत्र्यांचे भुंकणे जवळ जवळ येऊ लागले...


तसा मोहितने आणखी आपला धावण्याचा स्पीड वाढवला.


धावता धावता त्याच्या लक्षात आले... की कुत्र्यांचे भुंकणे मागे ऐकायला येत आहेत....
तसा तो पुन्हा परत आला....
आणि त्याला जाणवले की उजव्या बाजूने जो रस्ता दिसतो आहे त्यात दूरवर त्याच्या नजरेस पडले की सहा ते सात कुत्र्यांचा घोळका ....कुणावर तरी हल्ला करतोय आणि ती व्यक्ती प्रतिकार करते आहे.....


तसा तो त्या दिशेने जोऱ्याने धावला...
आणि ती प्रतिकार करणारी व्यक्ती त्याच्या दृष्टीपथात येताच त्याचे हृदय आनंदाने धडधडू लागले तसेच आणखी जोऱ्यामध्ये......


आणि मग.....


🌹🌹🌹🌹🌹