Niyati - 44 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 44

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

नियती - भाग 44



भाग 44





जुली ने तिच्या रूमचा दरवाजा खोलला. तेव्हा दरवाज्याच्या थोड्याशा बाजूलाच असलेली मायरा  जॅकच्या दृष्टिक्षेपात आली... 




आणि तो जुली कडे पाहून म्हणाला...
"सगळी मस्ती जिरवून ठेवणारे मी....मग पाहतो काय करते ही..."

असं म्हणून तो....बाहेर गेला....


........








तिकडे पोलिसांना संध्याकाळ होत असताना .... फोनच्या लोकेशन मुळे.... मोहितचा पत्ता मिळाला... आणि त्याला पोलिसांनी शोधून काढले....






पोलिसांना मोहितने सर्व जे काही घडले ते  सांगितले...
त्यामुळे लगेच त्यांनी बाबाराव यांच्याकडे तसे कळविले...






बाबाराव मनातून हादरून गेले... काय... कसे... कुठे..
झाले हे सर्व त्यांनी पोलिसांकडून माहीत करून घेतले 
पण लीला यांना अजिबात त्याची कल्पना येऊ दिली नाही...


फौजदार साहेबांनी त्यांना ...मोहितला अंत्यसंस्कार 
विधीसाठी घेऊन येतोय असे सांगितले....






बाबाराव यांनी सुद्धा समर्थन केले कारण कितीही म्हटलं तरी त्याचे ते कसे का असेना..??  पण आई वडील होते..


......






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोहितला कळले
की पार्वती आणि कवडू दोघांचाही मृत्यू झाला आहे 
तेव्हा त्याचा शरीराचा कण आणि कण हळहळला... 
आणि इकडे मायरासाठी सुद्धा तो हवालदिल झाला...

त्याला काय करावे सुचत नव्हते.... त्याच्या हृदयाचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटत होते त्याला... एक तुकडा तिकडे हरवलाय आणि एक तुकडा इकडे हरवला... असं झालं होतं सर्व त्याला.






फौजदार साहेबांनी  त्याला सांगितले की 
" तपास सुरू आहे कस्सून मायराचा .... 
उद्यापर्यंत ती नक्की सापडेल....
ती जशी मिळाली तशीच आम्ही तिला घेऊन येऊ....
सध्या त्याने अंत्यसंस्कार विधीसाठी गावात जावे..."





त्याला काय करावे ....??...काही समजत नव्हते....
तिकडेही जायचं होतं..... आणि इकडे....
या शहरात त्याची मायरा आहे 
आणि तो तिला शोधल्याशिवाय सोडून जाऊ 
शकत नव्हता...





शेवटी त्याने निश्चय केला आणि रामला कॉल करून सांगितले.....



"राम.... मला उद्या संध्याकाळपर्यंत वेळ पाहिजे आहे...
तोपर्यंत आई आणि बाबाला कसं ठेवायचं मी येतपर्यंत ते 
तेवढं बघ....कारण अंत्यविधी मीच करणार.... 
तर दोघांनाही व्यवस्थित ठेवण्यासाठी बाबाराव साहेबांना सांग.... एवढी माझ्यावर कृपा करा म्हणावं..... 
मी मायराशिवाय गावात येणार नाही.
माझी पत्नी आहे ती... तिची साथ शेवटपर्यंत सोडू नको 
अशी माझ्या आईचेच सांगणे होते... 
मग मी तिच्याशिवाय कसा येऊ गावात....??? 
मला तर माझ्या आईकडे डोळे उचलून पाहणे सुद्धा 
होणार नाही.... आणि तिलाही आपल्या पोराची लाज 
येईल की आपला मुलगा..... बायकोला दिलेल्या वचनाला जागला नाही....तेव्हा.....मी उद्या संध्याकाळपर्यंत जर 
मायराला घेऊन येऊ शकलो नाही. तर .....
गावकऱ्यांनाच त्यांचा अंत्यविधी करायला सांग..."


असे म्हणून मोहितने जड अंतकरणाने कॉल ठेवून दिला.

आणि.....




तो मग निश्चय करून ...
पोलिसांच्या गाडीत बसला मायराला शोधण्यासाठी.....
आणि पोलिसांना त्यांच्यासोबत असणाऱ्या तीन जेन्ट्स आणि दोन लेडीज फोटोग्राफर 
यांच्याबद्दल डिटेल माहिती देऊ लागला.... 
जेवढी त्याला माहीत होती.


.......









आपण अशा गलिच्छ वस्तीत येऊन पडलो आहोत...
की आपल्या शिलावर कोणत्याही क्षणी घाला 
पडण्याचा संभव आहे हे तिला आता पक्के समजले होते...
खरंतर हे असं काही घडेल तिने स्वप्नातंही विचार केला नव्हता ... 



त्या खोलीचे दार सुरू होतं... 
पण लाईट बंद करून ठेवलेली होती... आता जूलीने.....
...त्यामुळे दाराच्या बाहेर लाईट दिसत होता तर विचार करत मायरा बाहेर पाहत होती तेथेच भिंतीजवळ बसून.





बाहेरच्या मेन दरवाज्याच्या कडीचा आवाज आला....
मायरा अलर्ट झाली... कोण आलं असावं...?? 
आता तर जास्त गडद रात्र झालेली आहे....






दारातून आतमध्ये येताना सावली दिसू लागली... 
तशी मायरा टकटक पाहू लागली... 
तर तेथे आता शाला... आली होती...
ती दुपारच्याच कपड्यांमध्ये होती....
जीन्स आणि शर्ट घालून...






ती आल्यावर आपल्याला काहीतरी तिच्याकडून 
मदत होईल या अपेक्षेने मायरा... ऊठून उभी राहणार 
तर तिच अचंबीत झाली.

कारण दुसऱ्या रूम मधून एक मुलगी येऊन शाला...
.....तिच्या गळ्यात पडली...






ती मूलगी म्हणाली....
"सिमरन ...किती वेळ लावायचा...??"


शाला म्हणाली.....
"अरे यार... रोमी.... बहुत काम था बाहर आज...."



तिला समजून आले होते की ती शाला नसून सिमरन आहे. 
तिने फसवण्याकरता वेगळे नाव धारण केलेले होते.



दोघीही आता विचित्रपणे एकमेकींच्या अंगांना स्पर्श करत एकमेकींशी झटू लागल्या.



समोरचे दृश्य पाहून तर मायराला तर चक्करंच येणे बाकी होते.




तेवढ्यात त्या सिमरन ने रोमीला थांबवून आपल्या खिशातून एक पॉकेट काढले आणि त्यातून एक काळसर रंगाची गोल आकाराची गोळी रोमीच्या तोंडात दिली आणि एक स्वतःच्या तोंडात घातली. 






दोघीही एकमेकींकडे पाहून गोळी चोखत आपल्या अंगावरचे कपडे काढून तेथेच टाकू लागल्या. आणि समोरंच एका खोलीचा दरवाजा खुलाच होता जिथून रोमी बाहेर आलेली ..
तेथे नंतर त्या दोघी केवळ अंतर्वस्त्रावर एकमेकांशी झटतंच
तेथे त्यांनी पूढचा खेळ पलंगावर सुरू केला.....मग.....




मायराला पुढील दृश्य तर पहावेसे वाटेना एवढे विदारक.. शारीरिक वासनेचा खेळ पाहून मायराला ओकारी आल्यागंत वाटत होते.....त्यांचे तिथून येणारे ते आवाज... आपले कान...
त्या नकोशा वाटणाऱ्या आवाजांनी... दोन्ही कानांमध्ये बोटं घालून बसली...






मायराचे डोळे बंद होऊ पाहत होते ....  पण किंचितही तिने डोळे बंद केले नाही... कारण आपण डोळे बंद केले 
आणि बेसावध राहिलो तर आपल्या इज्जतीच्या
चिंध्या चिंध्या होतील...
येथे येणारा पुरुष तर हपापलेला आहेच.. पण....पण....


विचार करून करून डोकं दुखत होते....
तरीही डोक्यातले विचार संपत नव्हते.... टकटक पाहून डोळे 
तारवटल्यासारखे झाले होते... तरीपण डोळे बंद होऊ द्यायचे नव्हते.... 







मायरा (मनात)......
"पुन्हा आता जॅक येईल... विचारच करून अंगात थरथर झाली.आपण त्याच्या थोबाडीत मारली...  तो परत येईल...  तो आपल्याला धमकी देऊन गेलाय... तो यायच्या अगोदर काहीतरी करावं आणि इथून पळून जाऊ... पण कुठे जायचं...?? आपल्याला तर काहीच माहित नाही.... कुठेही जायचं पण इथून बाहेर निघायचं आता... पण हे तर कुठूनही पकडतील आपल्याला पुन्हा...हूं.... पुन्हा यांच्या पकडीत यायचंच नाही..... रस्त्यावर ट्रक खाली मरायचं पण यांच्या हातात लागायचं नाही... नाही... नाही ...आपल्या शिलाला जपायचं असेल... तर मला येथून बाहेर निघालंच पाहिजे.."


तिची विचारांची साखळी काही थांबत नव्हती.



तेवढ्या आता जुली आली आणि म्हणाली...



"चल सो ले.... ऐसेच बैठे रहेगी क्या....??"



जुलीने हिला आता खूप  प्रयत्न केला गोड बोलून
समजवण्याचा.... की ....आता ती मोहितला कधीच भेटू शकणार नाही.. आणि... आणि गेली तरीही येथून गेल्यावर कोणीही घरात वापस घेत नाहीत... कलंक लागलेल्या मुलीला... पण इथूनंच ती बाहेर जाऊ शकणार नाही... कधीच...







सुरुवातीला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला पण जूलीच्या प्रयत्नांना यकिंचितही योग्य रिस्पॉन्स भेटत नव्हता तर ती 
निव्वळ  तोंड मिटून बधिर मनाने सगळे ऐकून घेत होती.




पण किती वेळ ऐकून घेणार... मायरा....???
कारण तिने आत्ता जागून होती ...तर सर्व दृश्य पाहिले होते 
की तिथे काय काय चालते..??







शेवटी मायरा रडू लागली आणि सर्व शरीर रडून गदगद हलत होते तरीही कसंबंसं म्हणाली...



"हे सर्व पाप आहे... मी हे असं कधीच करणार नाही... मला इथून बाहेर जाऊ द्या..."


असं ऐकलं आणि जुलीचा संताप संताप झाला...
आणि मायराला थोबाडामध्ये फाड फाड.... मारू लागली.....






दात ओठ खात जुली बोलू लागली....
" मुकाट्याने मी सांगते... त्याला तयार हो आणि हो म्हण... तरंच तू आरामशीर राहू शकशील....
नाहीतर असे लचके तोडेन ना...की तू जगण्यासाठी 
नाहीतर मरण्यासाठी भीक मागशील.... 
पण आम्ही तेही देणार नाही. "







तेथे बरेच काही कस्टमर आलेले काही जणींकडे तर 
काही कस्टमर सिमरनच्या जोडी प्रमाणे सूद्धा होत्या...
जास्तीत जास्त चाळे कस्टमरसोबत चाललेले 
उशिरापर्यंत थकलेल्या आता सर्व  मस्त झोपून होत्या आरामशीर... आणि कूणीतरी नशिल्या गोळ्या खावून 
त्याच्या धुंदीत...






मायराच्या रडण्याचा आवाज येत होता तेवढ्या रात्री तर
ती म्हातारी बाई... सवयीनुसार लचकंत मुरडत त्यांच्या
खोलीत आली...

"अरे... क्यूँ आवाजे कर रहे हो....???

तेवढ्यात जुलीला एका शेठजीचा कॉल आला.... 
तसे तिने मायराला ढकलून दिले.


ढकलून दिलेल्या मायराला त्या म्हातारीने आपल्याजवळ घेतले.
मायरा त्या म्हातारीला बिलगून रडू लागली ....


जूली जवळून जेव्हा जॅक गेला होता तेव्हा तिनेच त्याला शेठजीच्या कामासाठी बोलणी करायला पाठवले होते.



तिने जॅकसोबत त्या बाजूच्या खोलीत संबंध करताना त्याला सांगितले होते की.... "हिला येथे ठेवणे आपल्यासाठी घातक आहे... आपल्याला हिचे व्यवस्थित पैसे मिळाले की इथून हिला बाहेर ट्रान्सफर करायचे... "


उद्याच तिला त्या एका नवीन सेठजीसाठी सप्लाय करायचे असं त्यांचं दोघांचं ठरलं होतं.

तेव्हा त्याने मायरा त्याला एक वेळा पाहिजेच हे निक्षून सांगितले होते जूलीला..... जुलीनेही त्याच्या म्हणण्याला कबुली दिली होती.....



तसंही तेथे आलेली प्रत्येक मुलगी ही....
त्याच्याकडे ...त्या मुलीशी संग करण्याचा पहिला हक्क 
त्याचाच असायचा... कारण तो तेथील त्या एरियाचा
दादा होता आणि त्याला आत्तासुद्धा मायरासाठी
हिरवा कंदील मिळाला होता....
नेहमीप्रमाणे जुली कडून...



शेठजी सोबत बोलताना जुली मायराकडे आत्ताही संतापूनंच पाहत होती तर म्हाताऱ्या बाईंनी डोळ्यांनी इशारा केला जूलीला ......


तसे मग जुली बाहेर उभी राहून बोलू लागलेली.
एवढी रडत होती मायरा तरीही तिने तिची तीक्ष्ण नजर दोघींवर ठेवली होती.... त्या दोघींचाही झालेला इशारा मायराने पाहिला होता.




🌹🌹🌹🌹🌹