Tuji Majhi Reshimgath - 3 in Marathi Love Stories by Swati books and stories PDF | तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3

The Author
Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 3

श्रेया रुद्र च्या मेशंन मधून पळून गेली होती.... मग ती सरळ तिथून आटो पकडुन तिच्या हॉस्टेल कडे गेली... रुद्र तीला पकडेल अशी भीती तीला वाटत होती... श्रेया पटकन तिच्या हॉस्टेलच्या खोलीत आली.....


श्रेयाची रूम मेट ज्योती तीला पाहते अणि तीला विचारते " श्रेया तु हे काय घातलं आहेस? अणि अशी धावपळ करत कुठून येत आहेस...?" असं बोलून ती हसायला लागते....


श्रेया वधूचा पोशाख घातला होता.... ती तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि पटकन तिचे कपडे बाधू लागते... हे बघून ज्योती काळजीत पडते अणि विचारते" काय झालं श्रेया हे काय करतेय अणि हे सगळ काय आहे... तु कुठून येतेय... गळ्यात मंगसूत्र भागेत कुंकू आणि हा लग्नाचा पोशाख... तुझ लग्न झालंय का?"


श्रेया तीची सुटकेस बंद करताना म्हणते" हे बघ ज्योती तुला आता काहीही सांगायला माझ्याकडे जास्त वेळ नाहीं आहे.... तुला काही जाणून घ्यायच असेल तर आजच न्यूज चॅनल बघ मी माझ्या घरी परत जात आहे... अणि प्लीज बाकी काहीच विचारू नकोस मी जातेय बाय...."


हे ऐकून ज्योती आश्चर्याने म्हणते" तुला काय म्हणायचं आहे की तु कोलकत्याला वापस जाते आहेस?"


त्यावर श्रेया सांगते" हो मी कोलकत्याला जाणार आहे...."


असं बोलून ती पटकन खोली बाहेर निघून जाते... ज्योती तीला मागून खुप आवाज देत राहते पण श्रेया तिचं ऐकून न घेता बाहेर निघून जाते.......


दुसरीकडे रूद्र त्याच्या मेशन मध्ये परत येतो आणि सरळ त्याच्या खोलीत जातो... रूम मध्ये येताच तो सर्वीकडे श्रेयाला शोधतो पण त्याला श्रेया खोलीत दिसत नाही..... रुद्र मग बाथरूम मध्ये चेक करायला गेला पण श्रेया बाथरूम मध्ये सुध्दा नव्हती.... रुद्र मग बाल्कनीत चेक करतो शश्रेया ही बाल्कनीत नव्हती... हे पाहून रूद्र मुठी घट्ट करून खोलीतून बाहेर येतो आणि सर्व नोकरांना बोलवतो..... त्याचा आवाज इतका जोरात होता की तो ऐकून सर्व सर्वंट्स ( नोकर). पटकन डोकं खाली घालून एका रांगेत उभे राहतात....


त्या सगळ्याकडे बघून रूद्र दात घासत सर्वांना विचारतो " माझी बायको श्रेया कुठे आहे अणि तिच्यासाठी हा दरवाजा कोणी उघडला? मी बाहेरून दार लावल होतं ना मग माझ्या परवानगी शिवाय दार उघडण्याची कोणाची हिंमत झाली....?"


रूद्र चा राग पाहून सर्व घाबरले होते.... मग त्यातला एक नोकर घाबरून पुढे येतो... पुढे येवून तो रुद्र ला घाबरलेला आवाज सांगतो" सर ते मॅम ला तहान लागली होती त्यानी माझ्याकडे पाणी मागितल म्हणूनच मला दार उघडाव लागलं... मी पाणी आणायला गेलो आणि नंतर मला माहीती नाहीं मॅम कुठे गेल्यात ते......"


हे ऐकून रूद्र ला खुप राग येतो.. मग तो रागाने सर्वंटला बोलतो" मझ्या परमिशन शिवाय हा दरवाजा उघडण्याची हिंमत कशी झाली तूझी.... आताच्या आता या मेशण मधून निघून जा... आजपासून तु या मेनशन मधून काम करणार नाहीस अणि तुला शिक्षेला सामोरे जावं लागेल..."


हे ऐकून त्या सर्वंनटला रूद्र चा पाय धरला आणि रडत म्हणाला"सर मला माफ करा माझ्याकडुन चूक झाली... मला माहिती नाहीं की मॅम तिथून निघून जातील ...... प्लीज सर मला नोकरी वरून काढू नका... माझी नोकरी गेल्यावर मी काय करेल कुठे नोकरी करेल मला माफ करा सर........


रुद्र परत एक जोरात आवाज देवुन त्याच्या गर्डला बोलवतो.... ते गार्ड स त्याच्या आवाज ऐकून आत येतात आणि मग येवून त्या सर्व्हन्ट ला घेऊन पकडुन बाहेर घेऊन जातात.,......, रुद्र ला त्याच्या रडण्याचा काहीही फरक पडत नव्हता.... तो मग रागातच वोचमनला सुद्धा आत यायला बोलवतो.,.. रूद्र चा आवाज ऐकून वॉचमन पटकन लगेच धावत आत येतात अणि रूद्र समोर डोकं खाली करून उभे राहतात........



ते आल्यावर रूद्र रागाने त्यना विचारतो " तुम्ही दोघे गेटवर उभे होता की नाही?"


त्यावर एक वॉचमन म्हणाला" सर आम्ही तर गेट वर च होतो........"


हे ऐकून रूद्र दात घासत म्हणाला "तुम्ही दोघं गेटवर होता तर मझी बायको इथून कशी पाळली? कुठे होतें तुम्ही.....?"


रूद्र चा प्रश्न ऐकून वॉचमन ने मान खाली घातली... रुद्र पुन्हा त्याच्या गार्ड ला बोलवतो... ते गार्ड स पुन्हा पटकन तिथे येतात .....,


रुद्र त्यना सांगतो.." यां दोघांना घेऊन जा आणि शभर (100) वेळा चाबकाचे मारा अणि बाकीचे गार्ड स ला सर्वत्र पांगवायला सागा.. माला मझ्या डोळ्यासमोर मझी पत्नी हवी आहे..,...... निघा...."


गार्ड स हे ऐकतात अणि तिथून निघून जातात...... तो वॉचमन विनवणी करत राहतो.... पण रुद्रवर काहीही परिणाम होत नाही......


रुद्र रागाने तिथल्या सोफ्यावर बसतो आणि स्वतःशीच म्हणतो "एकदा तु मला फक्त भेट मग बघ मी तुला कसा केद करतो ते...... तु इथून पळून जावून खुप मोठी चूक केली आहेस श्रेया... तुला काय वाटल तु अशी सहज या रूद्र प्रताप सिंग च्या तावडीतून सुटून निघून जाशील.... नो नेव्हर......."


तर इकडे रूद्र चे गार्ड स सर्वत्र श्रेया चा शोध घेत होतें.... रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सर्वत्र.....


10 मिनिटानंतर.....


बस निघून 10 मिनिट झाली होती... श्रेया बाहेर बघत होती अणि विचार करत होती की एका दिवसात तिच्या आयुष्यात काय काय घडल आहे.... जिथे जिवलग मैत्रीनिला जबरस्तीच्या लग्नापासून वाचवण्यासाठी गेली होती आणि त्यातच ती अडकली होती.... अचानक तिचं लग्न झालं होत अणि त्यात रूद्र चा राग... सध्या तिच्या मनात हे सगळ चालू होत.... मग अचानक बस थांबते... बस अचानक बंद थांबल्याने बसमध्ये बसलेले लोक गोंधळ घालू लागतात.... सर्वांचा गोंधळ ऐकून श्रेया सुद्धा काळजीत पडते.....


त्या बस मधला एक माणूस ओरडतो " अरे बस का थांबवली स काय झालं आहे....?"


मग दुसरा माणूस उभा राहून म्हणलं" पेट्रोल भरल होत की नाही.....?"


बस अचानक का थांबली हे पाहण्यासाठी श्रेया ही पुढे पाहू लागली.... कंडक्टर ड्रायव्हर शी बोलायला समोरून जातो आणि तेवढ्यात कही लोकांच्या पावलाचा आवाज येतो.. ते बसच्या आत येतात अणि सर्व लोकांना पाहू लागतात... ते सर्व रुद्र्चे गार्ड स होतें अणि प्रत्येकाच्या हातात बंदूक होती..... रूद्र च्या गार्डला पाहून बस मधले बसलेले सर्व लोक घाबरले... ज्या बसमधे कही क्षणापूर्वी गोंधळ झाला होता आता इतकी शांतता पसरली होती की सुई पडल्याचा आवाज ही ऐकू आला असता.... रुद्र च्या गार्ड ला पाहून श्रेया ही खुप घाबरली... तिच्या तर पायाखालची जमीन च सरकली होती.......


तेवढ्यात रूद्र बसच्या आत येतो... त्याने थ्री पीस सुट घातला होता आणि तो खुप धोकादायक दिसत होता..... त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी राग होता स्पष्ट दिसत होता..... तो आत येतो आणि बसच्या शेवटच्या सीटवर बसलेल्या श्रेयकडे तो रागाने बघू लागतो.... हे बघून श्रेया पण घाबरते अणि तिथेच बसते......



----------------------------

हे गाईज.....


कसा वाटला आजचा भाग.... कशी वाटते य स्टोरी..... फस्ट फॉरवर्ड आहे ना..... त्यातच तर मज्जा आहे.... डेविल रुद्रचा अवतार बघुया.... त्याचसोबत त्याचा वेडेपणा अणि प्रेम हे सुध्दा बघायला मिळेल.... काय काय होईल पुढे जाणून घ्यायला वाचत रहा....


माझी तूझी रेशिम गाठ....

"माझी तुझी रेशीम गाठ.... भाग -3" साठी समीक्षा लिहा नाहीं तर पुढचा भाग टाकणार नाही भरपूर समीक्षा लिहा प्लीज..........