Ekapeksha - 16 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 16

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

एकापेक्षा - 16

एके दिवशी आम्ही असेच दुपारचे सुट्टी झाल्यावर घरी येत होतो. आय टी आय पासून आमचे घर हे जवळ जवळ पंधरा किलोमीटरचा अंतरावर होते. आम्हाला सुट्टी ही चार वाजता झाली होती आणि आम्ही सायकलने घराकडे येतांना बन्सीनगर या वस्तीचा समोर साढे चार वाजता आलेलो होतो. तेथून आम्ही फैक्टरी परिसरात दाखल झालेलो होतो. तर मित्रानो, तो परीसर औद्योगिक परीसर होता आणि निर्जन असा रहायचा. तेथे एक स्मशान होते आणि त्या स्मशानाकड़े जाणारा मार्ग हा घराकडे जाताना सरळ चढ़ाईचा होता. याउलट विरुद्ध दिशेने येणाऱ्याला खोल अशा उताराचा होता. तर आमचा तीघातून शेखर हा मुलींचा बाबतीत जास्त इंटरेस्ट घेणारा होता. म्हणजे समोरून किवा शेजारून कुठली मुलगी येतांना जातांना दिसली की त्याचा अंगातील किडे हे वळवळ करू लागायचे. तर आम्ही त्या स्मशानाचा मागावर आलेलो होतो आणि एक शाळेतील मुलगी आम्हाला आमचा उलट दिशेने समोरून येताना दिसली. आम्ही चढ़ावाकड़े जाणार तर ती उताराकड़े येत होती, ती मूलगी लांबून बघीतले तर तरुण वाटत होती. तर तीला येताना बघुन शेखरचा अंगातील कीड़ा वळवळ करु लागला आणि त्याने सायकलवर सर्कस करणे सुरु केले. ती मुलगी उतारावरुन वेगाने खाली येत होती आणि शेखर हा रस्त्यावर त्याची सायकल रस्त्याचा एका साईडवरून दुसऱ्या साईडवर नेत वेडीवाकड़ी सायकल चालवत होता. आम्ही दोघांनी त्याला समजावले, " शेखर व्यर्थची सर्कस करु नकोस एकतर निर्जन रस्ता आहे आणि दुसरे म्हणजे मुलगी एकटी आहे. काही झाले तर उगाच तुझ्यामुळे आम्हाला ही लाता खायला लावशील," तेव्हा शेखर शेफारुन बोलला, " माझा स्वतःवर ठाम विश्वास आहे ती मुलगी पोहोचण्याचा आत मी एका साईडने होऊन जाईल."

    आता ती मुलगी भरधाव वेगाने उतारावरुन आमचा दिशेने येत होती आणि शेखरची सर्कस सुरु होती. मग शेवटी तो क्षण आला आणि शेखरचा अंदाज चुकला आणि तो रस्त्याचा मधोमधी सापडला. ती मुलगी भरधाव वेगाने सायकल घेऊन आली आणि तीने शेखरचा सायकलला जोरदार धड़क दिली. धड़क झाल्यावर आम्ही एकदम घाबरून गेलो खर तर आम्ही आमचासाठी नव्हे तर त्या मुलीसाठी घाबरले होतो. कारण की दहा मिनिटांनी तेथील कंपनीला सुट्टी होणार होती आणि तेथील कामगार लोकांनी हे बघीतले असते आणि त्या मुलीला विचारले असते तर
आमचावार खरच लाता खाण्याची वेळ येणार होती. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले त्या मुलीला उचलण्यासाठी गेलो तर काय बघतो ती मुलगी शाळेकरु अवघी दहा ते पंधरा वयाची होती. परन्तु तिची कदकाठी ही एकदम वीस बावीस वर्षाचा मुलीसारखी होती. त्याच बरोबर ती तब्येतीने जाड़जुड़ आणि वजनदार होती. आम्ही तिला उचलले तर ती म्हणाली, " काय दादा तुम्हाला सायकल बघून चालवता येत नाही काय." तीने तसे म्हटले आणि शेखरने तीचे पाय पकड़ले आणि माफ़ी मागीतली. त्यानंतर तीचा सायकलकडे बघीतले तर तीची सायकल रेंजर सायकल होती एकदम दणकट. तर तीचा सायकलला काहीच झालेले नव्हते म्हणून तीची समजूत काढ़ून आम्ही तीघांनी तीला तेथून रवाना केले. शेवटी आम्ही समाधानाचा श्वास घेतला आणि आता घरी जाण्यासाठी निघालो. मी आणि रवी आपापली सायकल घेऊन पुढ़े निघालो तोच शेखरचा आवाज आला. तो म्हणाला, " अरे यार माझी सायकल पुढे वाढत नाही आहे." मग खाली सायकलकड़े बघीतले तर आमचा लक्षात आले की शेखरचा सायकलचे समोरचे चाक हे चंद्र बनलेले आहे ते ही अर्ध.
 
     त्या मुलीचा रेंजर सायकलचा धडकेने त्याचा सायकलचे समोरचे चाक हे अर्ध वर्तुळ झालेले होते. आधी शेखरची सर्कस झालेली होती आणि आता आमच्यावर सर्कस करण्याची वेळ आलेली होती. तेथून पाच ते सहा किलोमीटर घरापर्यंत आम्हाला त्या सायकलला नेण्याची सर्कस करायची होती. हो परन्तु त्या सायकलला न्यायचे तरी कसे कारण की तेथे कुठलेच साधन दिसत नव्हते. मग आम्ही निर्णय केला आता खरच सर्कस करायची आणि मग आम्ही शेखरची सायकल आमचा सायकलवर चढ़वली. शेखरचा सायकलचे पुढचे अर्धचंद्र चाक हे रवीचा सायकलचा मागील बाजुस असलेल्या क्यारीअरवर ठेवले आणि शेखरने मधून सायकलला खांद्यावर उचलून घेतले. अशा प्रकारे आम्ही घराकड़े सर्कस करत निघालो होतो. मग तेथील कंपनीला सुट्टी झाली आणि सगळे कर्मचारी आमचाकड़े बघत हसत हसत तेथून निघू लागले. तो प्रसंग त्याक्षणी सगळ्यांचासाठी हसण्याचा झालेला होता परन्तु आमचासाठी दयनीय असा झालेला होता. पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत जेव्हा आम्ही आमचा घराचा जवळ आलो तेव्हा सुद्धा आमचा भरपूर उपहास झाला लोकांचाकडून, आम्हा दोघांना राग तर इतका येत होता की काय सांगावे. हो ना करणी होती कुणाची आणि भरणी आम्हा दोघांना ही भरावी लागली. तर मित्रानो, हा माझा शालेय जिवनातील एक दयनीय असा प्रसंग मी तुमचा सोबत शेयर केला.

    मित्रांनो, आता मी तुम्हाला माझ्या त्याच काळातला आणखी एक प्रसंग सांगतो आणि मग तुमची पुन्हा रजा घेतो पुन्हा नव्याने तुमचा पुढ़े उपस्थित होण्यासाठी. मित्रांनो, आता मी जो प्रसंग सांगणार आहे तो गंमतीदार आहे. हा प्रसंग आहे एका लग्नातील आणि ते लग्न होते माझा मीत्र आशीष याचा मोठ्या भावाचे म्हणजे मंगेश भाऊचे. मित्रानो, माझ्या निवडक अशा मित्रांचा मध्ये आशीष हा एक मीत्र होता म्हणजे आज सुद्धा आहे आमचे मैत्रीचे सम्बन्ध हे एकदम घनिष्ठ असे होते तर आमचा मंगेश भाऊचा लग्राला आम्ही सगळे मित्र गेलेलो होतो. तेथे छान मौजमज्जा करून आम्ही वहिनीला घरी घेऊन आलेलो होतो. तर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि त्याची तयारी करण्याची जबाबदारी आम्हा मित्राचाकड़े आशीषने सोपवली होती. नेहमीप्रमाणे क्याटरस आणि आचारी याची जिम्मेदारी माझ्याकडे सोपवण्यात आली. म्हणजे आचारी सोबत रहायचे आणि स्वयंपाक होत असतांना त्याला काय आणि कसले साहित्य लागते ते अरेंज करून द्यायचे. तर तो दिवस होता उन्हाळ्याचा आणि गर्मी ही फार होती. आचारीला स्वयंपाक करण्यासाठी शेजारचा काकुचा घराचा जवळ एक लोखंडी टिनाचा शेड होता तेथे त्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. सायंकाळी सात वाजताचा कार्यक्रम होता म्हणून आचारीने दुपारी दोन वाजता स्वयंपाक सुरु केलेला होता. त्याचा सोबत पाच स्त्रिया आणि दोन पुरुष आचारी म्हणून होते. तर काम सुरु झाले होते आणि ऊन सुद्धा वाढली होती. ते शेड अशा ठिकाणी होते की तेथे हवा ही कुठूनही येत नव्हती कारण की त्याचा दोन्ही बाजूने घरे बनलेली होती. वरुन ऊन तपल्याने ते लोखंडी टिनाचे शेड अधिक गरम झालेले होते. त्याचा खाली त्या पाच स्त्रीया काम करत होत्या. त्यातील तीन स्त्रिया भाजी कापत होत्या तर दोन करणीक भिजवत
होत्या. गर्मी इतकी होत होती की त्यांचा शरीरातून घामाची धार ही निरंतर वाहत होती. त्यांचे ब्लाउज आणि शरीर हे चिंब घामाने भिजुन गेले होते आणि त्या घामात न्हाऊन गेलेल्या होत्या. त्यांचा डोक्यातून आणि केसांतून टप टप असा घाम हा निरंतर टपकत होता.
    
         शेष पुढील भागात .........