Niyati - 27 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 27

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

नियती - भाग 27






भाग 27





❇️




मोहित म्हणाला...
"पण मालक....."

त्याला बोलण्याच्या अगोदरच मायरा हीने पुढे येऊन म्हटले.....
"परिस्थितीचे भान त्याला अगोदरच आहे. त्यानेच मला हा आरसा अगोदर दाखवला होता पण मी असे काही मानत नाही....."


बाबाराव मोहित कडे पाहून म्हणाले..,..
"मग तू जेव्हा हिला परिस्थितीचा आरसा दाखवला तेव्हा काय म्हणाली ही मुलगी....."





तर त्यावर...........

"मालक ....तेव्हाच काहीही असो ....आपण आताच बघूया का.....??? खरं म्हणजे आता आम्ही....."





मोहितला पुढे बोलू न देता बाबाराव म्हणाले....

"मोहित तू शहरांमध्ये चांगल्या ठिकाणी वावरला आहेस. चांगले विचार तू करायला शिकला आहे.
आता मला सांग ... एकुलत्या एका पोरीकडून मी काही अपेक्षा बाळगल्या तर माझं काही चुकलं.
मला हेही माहिती आहे की तिने ऐकलं नसेल तुझं पण .....निदान तू विचार करायला हवा होतास ....तू तर हुशार आहेस विचारीही आहेस....
आता या वयात आम्ही दोघांनी घराण्याच्या इज्जतीसाठी विष खाऊन मरावं असं जर वाटत असेल तर मग पर्याय नाही...."






मोहित गप्पच राहिला... त्याच्या मनात संघर्ष माजला होता.... विचारांची तुफानं उठले होते ......बाबाराव अप्रत्यक्षरीत्या काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत याची त्याला कल्पना आली होती .....त्याच्या तोंडी शब्द होते पण ते बाहेर पडत नव्हते.... जड झाले होते.






केविलवाण्या स्वरात......
बाबाराव म्हणाले...
"मोहित .....तू थोडा तरी आमचा विचार करायला हवा होता...बरं... जाऊदे.... आता तोच तो विषय ताणून धरण्यात काही अर्थ नाही....
मोहित तू माझ्या पोरीचा नाद सोड ... किंवा माझ्यासाठी सोड... "




मोहितने काहीतरी बोलायला तोंड उघडले पण शब्द बाहेर पडले नाहीत कारण बाबाराव यांचा आवाज पूर्णपणे उतरला होता.
त्यांच्या आवाजाला सुरुवातीला जी धार होती.... जे वजन होते..... त्याचा मागमूसही आता राहिला नव्हता.

त्याला तर आता समजतच नव्हते की आपण काय बोलावे...??? कारण ते मोहितला त्याचे काळीज शरीरातून बाहेर काढायला सांगत होते.





मायरा.... 
"बाबा हे काय बोलत आहात तुम्ही? 
माझं मोहितवर खूप प्रेम आहे. त्याचा यात काहीही दोष नाही ....मला त्याच्याशीच लग्न करायचे आहे हो..."

मायरा पोटतिडकीने बोलत होती.





बाबाराव.....
" मग काय तुला मी आणि तुझी आई मेलेलो चालणार काय ...??? जर असं असेल तर  आम्हाला काही फरक पडणार नाही.आमच्यासाठी इज्जत महत्त्वाची आहे त्यासाठी आम्ही आमचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पाहत नाही."





मायरा....
"बाबा ....असं काय करता...???"




बाबाराव.....
"मायरा ....गप्प बस... माझे अजून बोलून झाले नाही."




बाबाराव पुन्हा मोहित कडे पाहून म्हणाले.....
" हे.. बघ मोहित.. मी फार फार विचार करून काही 
दुसराही वेगळा निर्णय घेतलेला आहे. मलाही काही दुसरे लेकरं नाही ....एकमेव मायरा आहे.
कितीही मी क्रूर असलो तरी सुद्धा मला मायराचं जीवन व्यवस्थित जावं ....हेच मला वाटेल.
मी ठरवलं आहे की तुमच्या प्रेमाच्या आड यायचं नाही...
पण तुला हेही सांगतो की मी तिच्यासाठी एक मुलगा शोध लेला आहे आणि त्या लोकांना मी शब्दपण दिला आहे."






बाबाराव यांच्या बोलण्याचा मायरा आणि मोहित दोघांनाही धक्का बसला ....आज पण ......रामलाही धक्का बसला ऐकून. कारण ही गोष्ट त्यालाही माहित नव्हती.दिवस रात्र त्यांच्या सोबतच राहत होता राम ....
तरीही आता सांगितलेली गोष्ट त्याला माहीत नव्हती.
तोही दोन क्षण विचार करत उभा राहिला.






राम विचार करू लागला....
" माझ्या व्यतिरिक्त तर कुठे जात नाहीत मालक....
हे मग ....यांनी मायराच्या साठी कुठे बोलणी केली ...??
मला कसे माहित नाही...??? की नाही तर ....मालक चाल खेळताय दोघांसोबत बहुतेक....हां...असंच असेल तर गेम खेळत असतील कदाचित..."






यांच्या मनात विचार चालू असतानाच ....
बाबाराव पून्हा बोलायला लागले....
" दोघेही ऐकत आहात ना..!!.... मोहित..... तुझेही मामाच्या मुली सोबत लग्न जोडले तुझ्या बाबांनी. हे मला अगोदरच माहित आहे. पण तुला ती मुलगी पसंत नाही हेही मला माहित आहे. मायराचेही आम्ही आता..  शब्द दिलाय.. तसेही.... तुमच्या दोघांच्या लग्नाला तर आम्ही हसत हसत परवानगी देऊ शकत नाही....
त्यामुळे मी आता तुमच्या समोर दोन पर्याय ठेवतो..."




मायरा आणि मोहितला बाबाराव आश्चर्याचे धक्क्यावर धक्के देत होते



बाबाराव....
" ...एकतर झाले ते सगळे विसरून ....तुम्ही दोघेही तुमच्या आई-वडिलांनी ठरविलेल्या ठिकाणी लग्न
करायचे ...किंवा.......
जर तुम्हाला एकमेकांसोबत लग्न करायचे असेल तर
माझ्या काही अटी आहेत त्या तुम्हाला मान्य करावे लागतील.."





मायराच म्हणाली मोहितच्या अगोदर...
"अटी सांगा ...आम्ही मान्य करू योग्य असतील तर..."






मायराच्या उतावीळपणावर  बाबाराव किंचित हसले विषन्नपणे आणि म्हणाले...
"पहिली अट..तुम्हा दोघांनाही कुठलीही प्रॉपर्टी मिळणार नाही ......प्रॉपर्टीवर पाणी सोडावे लागेल.
दुसरी अट....दोघांचे लग्न झाल्यानंतर आमच्या घरचे दार दोघांसाठी बंद होईल कायमचे.
तिसरी अट....आम्ही ठरवलेल्यानुसार मोहितला दिल्लीला तर पाठवून ऍडमिशन ही करून देऊ शिक्षणासाठी.
पण जायचं मात्र तुमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर.. त्यानंतर तेथील तुमच्या दोघांचाही खाण्यापिण्याचा खर्च आम्ही उचलणार नाही. तो तुम्हाला स्वकष्टाने करायला लागेल.
चौथी अट.... लग्नाला मी तुम्हाला संमती देत तर आहे पण ते लग्न इलेक्शन झाल्यावर करायचे.... इलेक्शन होईपर्यंत एकमेकांसोबत कुठेही बोलायचे नाही..... भेटायचे नाही ....अनोळखी वागायचे एकमेकांसोबत.

पाचवी अट..
इलेक्शन का जरुरी आहे गावात...?? इलेक्शन मुळे कोणते फायदे गावाला होणार आहेत आणि त्या इलेक्शन मध्ये आम्ही निवडून येणे का जरुरी आहे...???? सर्व गावातल्या लोकांना मोहित तू पटवून द्यायचं की बाबाराव यांना निवडून आणून देणे का जरुरी आहे....???
सहावी अट....जर तुम्हा दोघांचं लग्न यशस्वी झाले पुढे.... तर नंतर कधीतरी येऊन..आम्ही हयात असताना किंवा आमच्या पश्चात .....येथे या गावात हे सिद्ध करून दाखवायचं की या बाबाराव ने जे केलं ते योग्य केलं आणि अभिमानास्पदच केलं.."


आता मात्र मोहित बोलला...
" मी ...मी काय करू शकतो.??..... मला निवडणुकीबद्दल काहीही समजत नाही आणि प्रचार याबाबत ही काही माहिती नाही...."


बाबाराव...
"हे बघ मोहित..... आम्हाला गावचे हित खरंच महत्त्वाचे वाटते आहे....आजपर्यंत आम्ही असा विचार करत नव्हतो. पण आता आम्हाला विचार येतो की जग कुठेतरी पुढे गेलेले आहे आणि आपण.... आपला गाव खूप खूप मागे आहे....
मला खरंच गावच्या हिता साठी बऱ्याच गोष्टी करायचे आहे. 
जर मी गावात प्रचार केला आणि सांगितले तर लोकांना लोक.. दबावाखाली येतील. पण सर्वसामान्य माणूस जर त्यांच्याशी बोलला तर ते त्यांचं ऐकतात... समजून घेतात.. म्हणून तू त्यासाठी अगदी योग्य आहे ....तू माझ्या साठी प्रचार करायचा...."


मोहितला काय बोलावे समजत नव्हते.
तो कचाट्यात सापडला होता. मायराला तर सोडू शकत नव्हता. बाबारावांचे बोलणे ऐकून मोहितचे विचारचक्र सुरू झाले....



त्याला शंका आली की बाबाराव काही डाव तर खेळत नाहीये...?? बाबाराव ...राम आणि मायरा ....तिघेही मोहीतकडे पाहत होते की मोहित काय बोलतो यावर...??"





विचारपूर्वक निर्णय घेऊन मोहित बोलू लागला.
"मालक .....तुम्ही आमच्या लग्नाला संमती दिली हे खरे आहे....पण खरं सांगू... आपण ठेवलेल्या अटी इतक्या जटील आणि विचित्र आहेत की मन होकार देण्यास तयार होत नाही...."


त्याच्या बोलण्यावर मायरा नाराज झाली .....तिच्या नेत्रांमध्ये पाणी भरले पण राम आणि बाबाराव खुश झाले.

बाबाराव म्हणाले.....
"मग पहिला पर्याय मान्य आहे तर तुला...!!"





मोहीत त्यावर म्हणायला.....

"मालक मी असे कुठे म्हटले....???
मला तुमच्या सर्वही अटी मान्य आहेत..…..
पण माझी एक छोटीशी अट आहे. ती तुम्ही मान्य करावी अशी माझी इच्छा आहे"





बाबाराव......
" मोहित ...हे बघ .....तुला अट ठेवण्याचा अधिकार नाही पण तरीही तू एवढ्या माझ्या अटी मानल्यास तर मी तुझी अट ऐकून घेतो जर मला योग्य वाटली तर ठिक आहे अन्यथा मानणार नाही."




मोहित......
" मी इलेक्शन झाल्यावर लग्न करणार नाही तर इलेक्शनचा रिझल्ट ज्या दिवशी असेल त्याच दिवशी मी हे लग्न करेल आणि त्याच दिवशी ....आम्ही दोघेही येथून शहरात निघून जाऊ...."






बाबारावांनी या मोहितच्या अटीला... त्यांना मानने ....काहीही हरकत वाटली नाही ते सहजगत्या मान्य करत म्हणाले....

"ठीक आहे ....आम्हाला मान्य आहे तुझी अट..
काय मायरा ...?? तूही ऐकलं ना ....सर्व तुझ्या समक्षच आम्ही निर्णय घेत आहोत...तर आता अटीनुसार ....जेव्हा तुही लग्न करून येथून जाईल.... तेव्हा तो निर्णय तुमचा आहे. त्याचे परिणाम ही तुमचेच आहे. आम्ही तुमची बाजू लक्षात घेऊन हृदयावर दगड ठेवून आमची बाजू मांडली आणि अट ही ठेवली..."


बाबाराव पुढे म्हणाले....
"बरं चला आता तुम्ही सगळे.. मला आता एकांतात राहायचे आहे.. मायरा आईकडे जाऊन एक कटाक्ष टाक.
मी जे काही बोललो त्यावर विचार कर ....कारण तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे.  मोहित चा निर्णय झाला आहे... तुझा निर्णय तोच असेल तर त्याला संमती देता येईल
अन्यथा तू माघार घेऊ शकतेस...."

मायरा....
"नाही बाबा.... माझा निर्णय मोहित सोबत आहे.





बाबाराव....
" ठीक आहे तर .....मग आता महिनाभर अटीचं बघा..... इलेक्शन होतील आणि तुम्ही.... तुमचा मार्ग... मग पुढे जायला मोकळा होईल..."





बाबाराव....
" प्रॉपर्टी मधून तुला काही एक मिळणार नाही. तुला त्याच्यासाठी कष्ट करावे लागतील आणि जर त्रासून तुम्ही दोघांनी एकमेकांना सोडले तर येथे चुकूनही परत यायचे नाही .....त्यापेक्षा जर तुझी प्रॉपर्टी सोडायची इच्छा नसेल तर मी सांगतोय त्या मुलाबरोबर लग्न करून सुखी हो..."


मायरा....
" नाही.... बाबा तो खरच माझ्यावर खूप प्रेम करतो..... मी त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहे.... तो माझ्यावर एवढा प्रेम करतो .....प्रसंगी माझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल ....मला थोडे दिवस कष्ट घ्यावे लागतील एवढेच...."




बाबाराव....
"हम्म्म....बरं... चला..
आता मला एकांत हवा आहे...
आणि अटी लक्षात ठेवा...."

मोहित आणि मायरा बाहेर निघाले. रामला बाबाराव यांनी थांबवून घेतले...

मोहित समोर निघाला होता की मागून रामने पटापट येऊन आवाज दिला... आणि मग...

🌹🌹🌹🌹🌹