Niyati - 25 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 25

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 25




भाग 25

आता सुंदरला आपल्या प्रतिष्ठेला तडा गेल्यासारखे वाटले....
त्याचे दुःख दुहेरी होते. 

मायरा सारखी मुलगी हातची गेली हे एक दुःख आणि  आपली गावकऱ्यांमध्ये बेइज्जत झाली हे दुसरे दुःख.

असे दुहेरी दुःखाने सुंदरचे अंतकरण होरपळून गेले.
आणि त्याने आपल्या मित्रांसमोर एक शपथ घेतली...


""मायराला बायको म्हणून माझ्याच घरी आणिन.... तरच नावाचा सुंदर... नाहीतर डोक्यावरील केस आणि मिशी कापून ठेवीन. बाबाराव कुलकर्णी.... 
कुठला जावई पसंत करतोय तेच बघायचं आहे मलां....गाठ सुंदर नानाजी शेलार याच्याशी आहे...???""

आणि ही बातमी मग.... राममार्फत बाबाराव यांच्यापर्यंत पोहोचली.....

बाबाराव...
"काय....??? त्या नानाजी शेलारांच्या दिवट्याची
एवढी हिंमत....???
की तो बाबाराव कुलकर्णी ला आव्हान करणार....???
हा बाबाराव काही एवढा लेचापेचा नाही..... मुंडन करायला तयार राहा म्हणावं...... जावई तर आम्हाला मिळेलच पंचक्रोशीत आमचं नाव उज्वल करणारा... "


बाबाराव पुन्हा आता बिथरले... एक सोडवायला गेले की दुसऱ्या प्रश्न उभा राहत होता.... दूसरा प्रश्न सोडवला की पुन्हा पहिला प्रश्न तोंड आ वासून समोर उभे राहत होता.


बाबाराव आणि राम त्या खोलीमध्ये आले होते.... ज्या खोलीमध्ये त्यांच्या दोघांच्या चर्चा चालायच्या. बाबाराव इकडे तिकडे फिरत विचार करत होते ...आता पुढे काय...???
आज पर्यंत त्यांच्या विरोधात गावात कोणीही उभा नव्हता राहिला... कोणीही त्यांच्या धाकाने उभेच राहत नव्हते. पण हा चार दिवसाचा सुंदर नानाजी शेलार त्यांच्या विरोधात उभे राहून गावातील त्यांचा दर्जा कमी करण्याच्या वाटाघाटीवर होता.....


बाबाराव.....
"जावई काय  बनवायला निघालो...?? हा तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला तयार झाला...
नाही... नाही ...राम त्याला ठेचला पाहिजे.. काय करावं असं की ...हा मूर्ख ठेचला जाईल आमच्या पायाखाली..???"

क्रोधाने लालबुंद होऊन मोठे मोठे श्वास घेत त्या रूम मध्ये आराम खुर्ची होती तेथे बसले आणि स्वतःला मागे झोकून दिलं.... आणि त्या डोलत्या आराम खुर्चीत लेटून मागेपुढे   डोलू लागले....

राम त्यांच्याकडे बघत होता... सध्या त्याच्या जवळ शब्द नव्हते पण तो विचार करत होता. त्याला बाबाराव कुलकर्णी यांची मनस्थिती समजत होती.

राम....
"मालक.... मला वाटतं आपण शांतपणे विचार करावा...
निवडणुका येणार आहेत ..आपल्याला निवडणूक लढवून जिंकून आणायची आहे.... तर आपल्याला असे काही प्लॅनिंग करावे लागेल की .."साप भी मर जाये और लाठी भी ना तुटे"
आपल्याला माहिती आहे ना की आपल्या गावात प्रत्येक समाजाची लोकवस्ती वेगळी वेगळी आहे... जर जर आपण जनगणना केली आपल्या गावाची तर
आपल्याला माहितीच आहे की कोणाची संख्या जास्त निघेल..."


रामने असं म्हटल्यानंतर त्या दिशेने बाबाराव सुद्धा विचार करू लागले. त्यांच्याही लक्षात आले रामला कोणता मुद्दा बोलायचा आहे...????

रामपुढे म्हणाला..
"मालक म्हणजे बघा....???
अशा कित्येक सुंदरला आपल्याला जागेवर आणायला जास्त घटका लागणार नाही... तो काय.... तर त्याचा बापही आपल्या पायाशी लोटांगण घालत येईल... सुंदरला वाटेतून दूर करायला आपल्याला कितीसा वेळ लागणार आहे....???
पण आपण मोहित वर आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे... तो जेवढा साधा आणि सरळ आहे तेवढाच हुशारही आहे... एक तर आपण त्याला लवकरात लवकर दिल्लीला पाठवावं... किंवा... आपल्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यावा..."

त्यावर बाबाराव त्याच्याकडे  म्हणजे रामकडे डोळ्यामध्ये अंगार आणून विचारू लागले...


बाबाराव...
"त्याचा काय उपयोग होणार आहे आपल्याला....???
आपल्यासाठी तर तो एक किटकूर आहे.... बोटाच्या चिमटीत उचलायचा आणि दूर फेकून द्यायचा..."

राम...
"नाही मालक... आपण निव्वळ एका बाजूनेच विचार करत आहात.. जर आपण अशा किटकुरांकडे दुर्लक्ष केलं तर लहानशे पण काही असे ..... चिकटतात की अगोदर रक्त ओढून घेतात आणि मग आत मध्ये प्रवेश करतात आणि पूर्ण शरीर सडवून टाकतात."


बाबाराव.....
"म्हणायचं काय आहे तुला.... राम...??"


राम....
"मी हे सांगू इच्छितो आहे ...... मालक...
की आपण सुंदर चा बंदोबस्त केव्हाही करू शकतो ते तुम्ही माझ्यावर सोपवा..."

बाबाराव......
" आणि मग....!!!"


राम....
"आणि मग मालक ... 
आपल्याला मोहित वर लक्ष केंद्रित करावे लागेल.... 
एक तर मोहितला दिल्लीला पाठवून त्याचं पुढचं शिक्षण बरोबर होऊ द्यावं आणि जेव्हा तो चांगल्या हुद्द्यावर लागेल तेव्हा आपल्या छोट्या मालकिन त्याला......"


बाबाराव....
"खबरदार ...राम पुढे एक शब्द बोललास तर..!!! आम्ही हयात आहोत तोपर्यंत उभ्या जन्मात हे शक्य नाही..!!"

बोलता बोलता ताडकन आराम खुर्चीवरून उभे झाले  आणि रागाने ते आता थरथर कापू लागले होते .
रामचे बोलणे सहन न झाल्यामुळे ते बाहेर निघून गेले.
आणि दोघांचे बोलणे अर्धवट राहिले.

बाबाराव निघून गेल्यानंतर.. रामही सुस्कारा सोडून बाहेर आला.....

....
....

इकडे नानाजी यांना सुंदर ने सांगितले की तो आपल्या मित्रांसोबत शहरात चाललेला आहे चार दिवसासाठी.. पूर्ण मूड खराब झालेला आहे तर चार दिवस बाहेर राहून थोडा शांत.. थोडे एन्जॉय करायला त्याचे मित्र त्याला सोबत नेत होते... तो नाहीच म्हणत होता तरी जबरदस्ती ते त्याला घेऊन गेले.


इकडे बाबाराव यांच्या डोक्यामध्ये राम ने वेगळेच बीज पेरले होते.. ते बीज आता रोप धारण करू लागले होते.

बाबाराव (मनात)....
"राम म्हणत होता... ते बरोबरच तर आहे.. या आपल्या गावामध्ये...  वस्तीत  जास्त त्यांचीच घरं आहेत... पिढ्यान पिढ्या चालत आलेले त्यांचे घरं... सर्व नातेवाईक आजूबाजूला वस्त्यातच राहत असणारे.. त्यामुळे त्यांचे लोकं नातेवाईक जास्त आहेत गावात...
हा म्हणजे राम म्हणतो तशी खेळी खेळावी लागेलंच तर..."

.....

चार दिवसाला म्हणून गेलेला मित्रांसोबत फिरायला सुंदर पंधरा दिवस झाले तरी परत फिरकला नव्हता. 
नानाजी शेलार आणि त्याचे नातेवाईक शोधून शोधून पिसाळून गेले...



तोही सापडत नव्हता आणि त्याचे ते मित्र सापडत नव्हते.
त्यांनी शहरात जाऊन पोलीस कम्प्लेंट करायचे ठरवले.
पण पोलिसांना सांगणार तरी कसे होते...??
आज पर्यंत पोलिसांना या गावातल्या.... याच बडेजावं आणणाऱ्या लोकांनी टिकू दिले नव्हते... आता पोलीस हे गावात येण्यास धजावत नव्हते.

नानाजी शेलार यांना कल्पना आली होती की आपला मुलगा गहाळ होण्याच्या मागे कोण असावे...???





अगदीच न राहून एक दिवस नानाजी शेलार ..
बाबाराव कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या दारात आले...
त्यावेळी त्यांना बंगल्याच्या गेटच्या बाहेर ....
जवळपास एक दीड तास थांबून राहिले तरी आतून बुलावा आला नव्हता...

तेव्हा त्यांना मागच्या वेळी ...
"आपण आलो तेव्हा किती आवभगत झाले होते ...???
किती आपल्याला मानसन्मान मिळाला होता याची आठवण आली...??? तो एक दिवस होता आणि 
आजचा हा दिवस आहे.....
आपल्याच पोरगं असं निघालं तर दुसऱ्याला कुणाला
काय म्हणायचं...??..."😞




जवळपास पूर्ण दोन तास उभे राहिल्यानंतर बाबाराव यांनी आतून बोलावणे पाठवले...

आणि स्वतः बाहेर बाजूला असलेल्या झोपाळ्यावर बसून मंद झोके घेऊन गेट कडे पहात नानाजी शेलार यांची वाट पाहू लागले.

बाबाराव कुलकर्णी दुरून गेट कडून आत येणाऱ्या नानाजी शेलार यांच्याकडे पहात होते एकटक. 
मागच्या वेळी नानाजी शेलार आले तेव्हा छाती फुगवून आले होते.आणि आज येणारे नानाजी शेलार हे खांदे झुकवून येत होते..
किती फरक दिसत होता तेव्हाचे आणि आताच्या नानाजी शेलार यांच्यामध्ये....





नानाजी शेलार जवळपास आल्यावर
बाबाराव म्हणाले....
"बोला नानाजी ....कसं काय येणं केलं आपण...???"





नानाजी म्हणाले...
"कुलकर्णी साहेब.. आमचा सुंदर शहरांमध्ये चार दिवसासाठी म्हणून गेला मित्रांसोबत पण अजूनही पंधरा दिवस झाले तरी आला नाही.. म्हणून मी आपणास भेटायला आलो आहे. एकुलता एक मुलगा आहे हो माझा."


बाबाराव...
"नानाजी... मग आम्ही काय करावे...???"


नानाजी...
"काय करावे म्हणजे...???.. कोण करणार आहे मग..!! आम्हाला आमचा सुंदर परत हवा आहे..."


बाबाराव...
"तुम्हाला तुमचा मुलगा परत हवा आहे तर
माझ्याकडे येण्याचे प्रयोजन काय...???"

नानाजी...
"हे काय बोलणं झालं कुलकर्णी साहेब... तुमच्याकडे नाही तर कुठे जाणार मी... ते काही नाही ......
माझा मुलगा उद्याच्या उद्या परत आला पाहिजे..."


बाबाराव...
"नानाजी... म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का ..???...तो माझ्याकडे आहे..."

नानाजी आता बाबाराव यांच्या गोल गोल बोलण्यामुळे कंटाळले... मग ते थोडेसे चिडून म्हणाले.

नानाजी...
"हे बघा बाबाराव... बऱ्या बोलानं ... सुंदरला जिथे कुठे असेल तेथून मोकळ करा... नाहीतर बरं होणार नाही ....सांगून ठेवतो..."


झोपाळ्यावर मंद झोके घेत असलेले बाबाराव 
नानाजी यांचे बोलणे एकूण ताडकन उभे झाले.

नानाजी यांना बाबाराव यांच्याकडे बघून आतून थोडी भीती वाटली. तरीही ते उसने अवसान आणून ... चेहऱ्यावर राग ठेवून बाबाराव यांच्याकडे पाहत होते.

बाबाराव....
"खबरदार ...आणखी एक शब्द जास्त बोलाल तर..!!
आमच्या बंगल्याच्या गेटच्या आत आहात म्हणून अजून पर्यंत शाबूत आहात बोलण्यायोग्य... अन्यथा जर तुम्हीही चुकून जास्त बोलाल सुंदर सारखे...तर..."

बाबाराव यांनी लाल भडक डोळ्यांसहित नानाजी शेलार यांचे कडे उजव्या हाताची बोट दाखवून धमकी वजा गर्जना केली.


नानाजीही चवताळून उठले पण त्यांना काय बोलावे सुचत नव्हते.. तेवढ्यात त्यांची नजर वर बंगल्याच्या बाल्कनीमध्ये गेली ....तेथे मायरा उभी होती त्या दोघांकडे
एकटक पाहत....

नानाजी....
"बाबाराव... तुम्ही हे फार फार वाईट केले.... माझ्या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर... 
मी शांत बसणार नाही...
आणि तसंही त्याने एवढं काय केलं होतं...??
तुमची ही पोरगी तर....."

पुढे बोलूच शकले नाही नानाजी शेलार..
त्यांचे तोंडातील पूर्ण वाक्य होण्याच्या अगोदरंच 
बाबाराव भरभर  लांब लांब टांगा टाकत त्यांच्याजवळ पोहोचले.. आणि नानाजी शेलार यांचे कॉलर पकडले......


नानाजी शेलार यांना काहीही क्षणभर सुचलं नाही...
त्यांना आतून दर दर घाम फुटला होता.


तोपर्यंत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेरील असलेला वॉचमन कम बॉडीगार्ड.. तेथे आला ...
तर नानाजी शेलार यांना... बाबाराव यांनी ढकलून दिले त्याच्याकडे...


नानाजी शेलार यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि व्यवस्थित सरळ उभे झाले...


वॉचमन कम बॉडीगार्ड...
"चला ...बाहेर चला....."
म्हणत जवळपास ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला.

नानाजी शेलार या घोर अपमानाने अद्वा तद्वा बोलू लागले बाबाराव यांच्या बद्दल....

वॉचमन ने त्यांना जवळपास ओढतच गेटच्या बाहेर आणले आणि समोर ....

🌹🌹🌹🌹🌹