Niyati - 20 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 20

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 20





भाग 20





तिलाही तर तेच हवे होते... स्पर्शातून त्याच्या निरपेक्ष प्रेम जाणवत होते..... भावना उचंबळून गेल्या तिच्या .....सादाला प्रतिसाद देऊ लागली तेवढीच...


क्षण गेले काही चढाओढीचे..... 





त्यावेळी तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते प्रेमळपणे.
आणि आता त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवू लागले तिला..







वेगळेपण स्पर्शामध्ये जाणवताच तिने उजवा हात त्याच्या माने कडे नेला आणि केसांमध्ये घेऊन मुठीत केस पकडले आणि त्याची मान मागे ओढली...


आणि मग.... मान मागे ओढल्यामुळे मोहितचा चेहरा वर
उचलला गेला....
तर डोळे त्याचे पाणावलेले होते...





ती बोलू लागली....
"मोहित ....माझी चिंता करू नकोस... तू गेल्यावर मी स्वतःची काळजी घेईन... स्वतःला जपेन रे...."





ती पुढे म्हणाली.......
"बघ.......येथून गावाला गेल्यावर तर काही दिवस निवडणुकीच्या धामधुमीत जाईल... आणि असं तसं काही आढळलं तर मी घर सोडून तुझ्याकडे येईन बरं... मग तू मला आपल्याजवळ ठेवशील ना...!! तिथे मग लग्न करून घेऊ आपण... म्हणजे आपल्याला एकत्र राहता येईल. मी ट्युशन क्लासेस वगैरे घेईल... तुझे सर्व बरोबर होत पर्यंत. तू जे  काही पुढे शिक्षण घेणार आहे...... त्यामध्ये मी खंड पडू देणार नाही पण ...........हे तेवढे लक्षात ठेव. ...........मी कोणतेही काम करेन तुझ्याजवळ राहून...... आणि तू अभ्यास करायचा आणि ध्येय आपलं कंप्लीट करायचं..
पण मी तुझ्याजवळ येईल जर माझा नाईलाज झाला तर तेव्हा मात्र तू माझ्याशी लग्न कर ..........तेव्हाच मी तुझ्यासोबत राहू शकेन."





त्याला तर काही समजतच नव्हतं ...ती का अशी बोलत आहे..???... तो ती बोलत होती तर ऐकूनच ब्लँक झाला होता...



मोहित....
"असं का बोलते गं तू....??"





मायरा....
"खरं सांगू का मोहित ... इतक्यात सारख्या  निगेटिव्ह वाइब्ज येत आहेत.. अस्वस्थ वाटत असतं सगळं."





मोहित...
"अगं ...मी जाणार ना...!! तर तिकडे होस्टेलवर राहणार आहे."

मायरा....
"चल... जाऊ दे सोड.. फोन मात्र मला..... बरोबर करत राहा ....वेळेवर ठरलेल्या..."





मायरा.....
"ए मोहित... पण माझा जेव्हा नाईलाज झाला ना !!तेव्हाच येईन रे मी तुझ्याकडे.... त्यावेळी...... तू माझ्यासोबत राहशील ना !! आणि तेव्हा जर ......
तुझ्या सोबत राहायची पाळी आली ना ..!! 
तर,आपण लग्न करून घ्यायचं आणि मग राहायचं ....
मी करीन रे सगळं पण तू माझ्यासोबत खरंच लग्न करशील ना....!!!... तयारी आहे ना तुझी तेवढी..."






हे सांगताना तिचाही कंठ दाटून आला होता...
तसे त्याने तिला मिठीत कवटाळून शांतपणे तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून डोळे मिटून बसला...... आणि वर खाली मान हलविली आणि त्याची जाणीव तिला खांद्यावर स्पर्शाने झाली.




.
तिचे मन आनंदीत झाले आणि दोन आनंदाश्रू ओघळले खाली.....

....


इकडे सुंदर ने त्रयस्तांमार्फत आपल्या  बाबाच्या म्हणजे नानाजीच्या कानावर एक नाव घातले होते ते म्हणजे मायरा.
हे नाव ऐकताच नानाजी  विचारात पडले. पण नंतर जसा जसा विचार नानाजी  करू लागले तसतसे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटू लागले.





ते आपल्या गावात बाबाराव  यांच्या पोरीपेक्षा 
"बाबाराव " यांचाच विचार करत होता.





नानाजी  (मनात)....
"चांगलं  कुळ आहे ....आपल्या तोलामोलाचे आहे.. पोरीला चांगला खर्च देईल ....25 लाखाच्या खाली हुंडा घ्यायचा नाही म्हणून आपण ठरवूनच ठेवू ...... 
बाबाराव नक्कीच तयार होईल......... पोरीच्या अंगावर वीस पंचवीस तोळे सोनेही घालून देईल..... शब्द टाकायला हरकत नाही."






नानाजी  यांनी बाबाराव यांची मुलगी कशी आहे ते पाहिले नाही..... त्यांना वाटत होते.... हे स्थळ म्हणजे..
"वधू परीक्षा म्हणजे वधूच्या बापाची परीक्षा" ....
असेच होईल.





सुंदरने ठाम निर्धार केला होता लग्न करायचे तर मायराशीच.
आणि त्याला पक्की खात्री होती... आपण मायराला 
लग्नाची मागणी घातली म्हणजे लग्न जमणारंच कारण गावात आपणच एकमेव तोलामोलाचे आहोत...






देणे घेण्याच्या आणि मानापानाच्या प्रश्नावर आपण हट्ट करून राहायचे नाही असे त्याने मनोमन ठरविले होते.





आणि आपले आई वडील समजा..... त्यांनी हट्ट धरला तर आपण त्यांना जूमानायचे नाही हे सुद्धा त्याने पक्के मनाला बजाविले होते.
खरोखरंच मायराने सुंदर च्या मनाचा कब्जा घेतला होता.






आणि म्हणूनच ज्यावेळी नानाजीने  आपला माणूस बाबाराव यांच्या घराकडे पाठवला... 
नानाजी  यांचा निरोप देण्यासाठी....
त्यावेळी आपल्या  कपाळावर जणू बाशिंगच चढले या अविर्भावात सुंदर गावात फिरू लागला.
.....





इकडे बाबाराव आपल्या मित्राच्या गावावरून आल्यानंतर संतापाने ताडताड उडत होते. त्यांना अपमानाने लाजिरवाणे होऊन कुठे आपले तोंड लपवावे असे वाटू लागले होते... गावाच्या बाहेर पर्यंत बातमी जाऊन... आपल्याला दुसऱ्याने त्यावर काहीतरी बोलणे..
हे त्यांना आजपर्यंत..जे त्यांच्या पंचक्रोशीत कधीही झाले नाही असे ..... त्यांच्याच पिढीत  होताना आढळून त्यांना लाजिरवाणी बाब वाटत होती...





असे तर त्यांना समोरच्याची तोंड बंद करणे चांगले   माहित होते..
पण त्यांनी यावेळी  ठरवलं होतं की आपल्याला निवडणूक लढवून .....जिंकून यायचे आहे तर आपली बाजू गावामध्ये चांगली ठेवावी लागेल.... निदान तोपर्यंत तरी ....जोपर्यंत आपण जिंकून येत नाही.





मग आपल्याला पांढरपेशा समाजात वावरून पुढेही चढ चढता येईल आणि मान मरातब आणखी वाढेल...





झालेल्या अपमानाने स्वतःच्याच विचारांशी झुंज देत असताना.... नेमका नानाजी  यांच्याकडून निरोप आला मायरासाठी......





निरोप ऐकूण बाबाराव यांना दोन क्षण सुचले नाही.
त्यांनी हा विचार अजिबात केला नव्हता की नानाजी शेलार हे सुद्धा आपल्या मुलीसाठी विचार करत असतील.





.....पण बाबाराव यांच्या माहितीनुसार ....
नानाजी  यांचा मुलगा सुंदर चांगल्या वळणातला नव्हता.
....त्याचे चांगले चालचलन नाही... असे त्यांना वाटत होते .....पण आताची परिस्थिती बघता....






त्यांच्या मनात सुंदर विषयीच्या भावना...
पॉझिटिव्हली प्रबळ होऊ लागल्या....






काय होते मायराचे सुंदरशी लग्न करून दिले तर.??.... गावातल्या गावातही राहील आणि माझे मतंही वाढतील आणि एक स्ट्रॉंग बॉडी तयार होईल गावामध्ये ....आणखी भरभरून दबदबा असेल....






असा विचार करून बाबाराव यांनी नानाजी  यांना निरोप धाडला...
"ठीक आहे ..ठीक... आम्हाला तुमचा निरोप मिळालेला आहे ....पण मुलगी बाहेरगावी गेली आहे तर तुम्हाला बघण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर तिला
आल्यावरच करावे लागेल ....ती आठ दिवस तरी येणार नाही अजून.."






बाबारावांनी निरोप दिलेला घेऊन नानाजी  यांचा माणूस निघून गेला.






......






तिकडे मोहित आणि मायरा ... लाकडी तक्तपोषवर बसून गोष्टी करत होते....
त्यांना आज किती बोलू आणि किती नाही असे वाटत होते. पुन्हा केव्हा बोलायला मिळणार कोणास ठाऊक..??? हा विचार करून आतून भरूनही येत होते..





जसा जसा वेळ संपत होता तसे तसे दोघेही भाऊक होत होते ....विरह आता येणाऱ या जाणीवने..






आकाशात तांबडी छटा पसरायला लागली.... तसे ते दृश्य दोघेही मनात साठवून ठेवू लागले..... खाली हिरव्यागार टेकड्या आणि त्या टेकड्यांच्या मधून तांबूस सूर्यगोळा खाली घसरत चाललेला... अप्रतिम सौंदर्य दिसत होते ते......






जशी जाण्याची वेळ आली तशी मायरा... मोहीतजवळ
पुन्हा गेली आणि गळ्यात हात टाकून त्याच्या मागून केस पकडून मान उंचावली आणि ओठांवर अधिकार गाजवू  लागली... दोघांचेही श्वास जेव्हा जड झाले तेव्हाच तिने त्याला सोडले.... दोघांच्याही मनात चाललेली हुरहुर दोघांनाही समजत होती... पण नाईलाज होता दोघांचाही.





मायराने ओढणीने आपल्या ओठ पुसून घेतले आणि....
तिने विचारल्यावर त्याने काहीही उत्तर दिले नाही तर ती थोडीशी नाराज होती.







तिच्या मनात चाललेला विचारांचा कल्लोळ मोहितला समजला होता.
तो तिच्याजवळ आला आणखी आणि कमरेत दोन्ही हात गुंफले तसे ती त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली...





मोहित...
"मायू...ए.. माझ्याकडे बघ ... जर तुला असं तसं काही वाटलं तर तू येणार ना माझ्याकडे खरंच नक्की...
तू म्हणते तसा आपण दोघं लग्न उरकून घेऊ . दोघेही मिळून काम करू. मी अभ्यासही करेन... फक्त मी थोडे कमी काम करीन ...तू जास्त काम करशील."😁☺️
असा तो शेवटी खट्याळपणे म्हणाला....
तर तिने त्याच्या छातीवर हळूच चापट मारली.








तेवढ्यात बाहेरून मैत्रिणीचा ... मायराच्या फोनवर कॉल आल्यावर... दोघेही अलग झाले आणि भावनाविवश  होऊन मोहित गावाकडे परत निघाला आणि मायरा मामाच्या घराकडे निघाली..... कारण तिने मामीला सांगितले होते की मैत्रिणीच्या घरी चाललेली आहे. पण आता  सहा झाले तरी ती पोहोचायची होती.





तीही आता मामाकडे काही झाले नाही अशा अविर्भावात निघाली.
.......





पाहता पाहता दोन-तिन दिवस संपून गेले....




मायरा आणि लीला परत आल्या गावात...
...आल्या... तेव्हा त्यांनी धवलला चल म्हटलं होतं आपल्या सोबत ... तर तो निवडणुकांच्या कामांच्या वेळीच येईल असे त्याने सांगितले म्हणून त्या दोघीच निघून आल्या होत्या.





बाबाराव यांनी नानाजीच्या मुलासोबत मायराचे लग्न जोडले हे सांगितले नव्हते घरात...
पण आता उद्या विधीप्रमाणे नानाजी  सुंदरला घेऊन रीतसर पाहायला येणार होते घरी .....तर सांगणे भाग होते त्यांना.....
तर त्यांनी संध्याकाळी मायराला बोलावले जवळ आणि म्हणाले....






बाबाराव.....
"मायू ....इकडे ये बेटा... येथे बस ....मला तुझ्याशी बोलायचे आहे...."






वडिलांनी आवाज दिल्यानंतर मायरा त्यांच्या जवळ जाऊन बसली तर त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत जवळ घेतले आणि म्हणाले प्रेमाने...





बाबाराव.....
"उद्या आपल्याकडे माझे एक मित्र..... त्याच्या तरुण मुलाला घेऊन येणार आहेत घरी आपल्या... पहाण्याच्या कार्यक्रमासाठी......"







मायरा...
"पण बाबा.... मी आताच माझे शिक्षण पूर्ण केलं आहे तर मला थोडे दिवस तुमच्या सोबत राहायचं होतं... असंच. आणि निवडणुकाही येणार आहेत... मला निवडणुकांच्या त्या कार्यक्रमांमध्ये तुमची मदत करायची आहे हो....हे सर्व असताना..... असं मध्येच का पाहुणे वगैरे...??"





बाबाराव......
"अगं पोरी.. इथे...ते फक्त पाहायला येत आहेत.... पाहुणे म्हणून .... म्हणून आणि पाहायला आले म्हणजे लग्न जुळलं असं होत नाही ना ...!!! ...येऊ दे.... बघू दे..,. आपण संबंध वाढवू.... आपल्या निवडणुकीला योग्य होईल .....असे संबंधांमुळे निवडणूक लढण्यासाठी आणखी प्रबलन  मिळते आणि मतांची वाढ होते आणखी भरपूर..... समजले काय गं..?? त्यासाठी येऊ दे त्यांना...मगची मग पाहू."

असे म्हणून त्यांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला..




पण त्यावर ती....

🌹🌹🌹🌹🌹