Niyati - 17 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 17

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 17



भाग 17



तेवढ्यात मोहित चा फोन व्हायब्रेट झाला....

तसा तो आपल्या जवळचे पुस्तक त्याने ठेवून दिले आणि तो उठला...




फोन त्याच्या पॅन्टच्या खिशात व्हायब्रेट होत होता.. पण ती व्हायब्रेशन मोड वरची गुणगुण ऐकू जाऊ नये म्हणून तो ताडताड बाहेर निघाला.... आणि....





बाहेर निघून सर सर सर एकांत हवा असल्यामुळे इकडे तिकडे जायचं सोडून तो सरळ स्मशानाच्या भिंतीच्या तिकडे आतल्या दिशेने गेला.



फोन उचलला...
पलीकडून मायरा बोलत होती.




दहा-पंधरा मिनिटे बोलणे झाल्यानंतर तो घरात आला.
मनात त्याच्या विचारांनी ढवळाढवळ केली होती.





काय करावे बरं आपण...?? मायरा म्हणते तसं करावं काय..?? एवढे दिवस दूर राहायचं का तिच्यापासून..??
आपल्याच धुंदीत घरात येऊन खाली चटई अंथरली आणि लेटला..





आज तरी त्याला सध्या कोणताही विचार करायचा नव्हता. एक मन त्याचं आई-वडिलांपासून दूर जाणे यासाठी अजिबात तयार नव्हतं.





पण जर आपण गेलो नाही तर बाबाराव त्यांच्या जीवाचं कमी जास्त केल्याशिवाय राहणार नाही. 







अजून आपण शिक्षण घेतलेले आहे फक्त ....स्वतःच्या पायावर उभे झालेलो नाही खंबीरपणे... आपण तिकडे जायचं.. आणि इकडे मायराला किती प्रकरणाला तोंड द्यावे लागेल....????





पण तिचेही म्हणणे तर बरोबर आहे.. मला तिला जर आपलंसं करायचे आहे ....जर मला तिच्याशी लग्न करायचे असेल तर मला स्वतःचे पाय खंबीर करण्यासाठी अगोदर काहीतरी बनावं लागेल.. एकदाचं मी काहीतरी बनलो मायरायोग्य तर बाबाराव नक्कीच सकारात्मक विचार करायला लागतील.....






विचार करून करून त्याचे डोकं ठणकायला लागलं होतं. खरंतर या क्षणी त्याला फक्त आणि फक्त मायराची गरज होती. पण आता तेही शक्य नव्हतं या वेळेला.





ती तर सकाळीच मामाच्या घरी निघून गेली होती आपल्या आई सोबत.





असाच विचार करत होता तर त्याच्या माथ्यावर थंडगार हात त्याचा माथा चोळू लागले... त्याने हलकेच आपले डोळे उघडून बघितले. तर त्याची आई त्याच्या उशाशी बसली होती. मग त्याला गलबलून आले आणि तो थोडासा उठून आईच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला.






पार्वती...त्याच्या आईला त्याची मनस्थिती समजली होती. पण .. त्याची आई.. ती सुद्धा त्याच मनस्थितीतून चालली होती.. 




तेवढ्यात कवडू हा सुद्धा दुसऱ्या बाजूने त्याच्याजवळ खालीच बसला.. आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन कुरवाळू लागला...





"आज पर्यंत आपल्याला पोराला स्वतःपासून दूर ठेवावे लागले .आज त्याची इच्छा नाही आहे सोडून जायची ...तरी सुद्धा आपल्याला पाठवावे लागत आहे त्याच्या जीवासाठी..."...
कवडू मनात विचार करत होता मोहितचा हात कुरवाळत.






मोहितला सुद्धा समजत होते... त्याच्या आईवडिलांची मनस्थिती. त्यालाही समजत होते की आपले प्रेम आज आई-वडिलांना आपल्यापासून दूर नेत आहे.
आपल्या हातून चूक तर होत नाहीये ना..!!
ज्या वयामध्ये आपल्या आई-वडिलांना आपण सुखी ठेवायचं......... त्या वेळेला आपण त्यांना संकटात टाकत आहोत.

ते मात्र आपल्यासाठी पुन्हा एकटे राहायला तयार झाले काळजावर दगड ठेवून.






मोहित म्हणाला...
"बाबा.... तुम्ही म्हणाला ना ..!!! दिल्लीला पाठवतो.
मी दिल्लीला जायला तयार आहे. मला माहित आहे तुमच्याजवळ एकही पैसे नाही मला पाठवण्यासाठी. आणि बाबा.. मला हेही माहित आहे  की पैशाची 
तजवीज कोणी केली आहे ..??
आणि क्लासेस कोणी शोधलेले आहे....??
काही हरकत नाही अजून सहा महिने..
आई.. तू सहा महिने.. स्वतःला सांभाळ आणि बाबालाही सांभाळ. एकदाचा मी परीक्षा पास झालो.. की पुन्हा थोडासा वेळ ट्रेनिंग मध्ये जाईल.. आणि मग मी तुम्हा दोघांनाही येथून शहरात घेऊन जाईन आपल्या सोबत. काही गरज नाही येथे राहण्याची.
बाबा ....मला एक सांगायचं होतं पण.. मी तुमचं सांगितलेलं ऐकत आहे तर कृपया तुम्ही पण माझे एक ऐका.."







त्याने असं म्हणताच कवडू त्याच्या चेहऱ्याकडे पाहून उजव्या हाताने त्याच्या केसात कुरवाळत वर खाली मान हलवून होकार देतात.






मोहित...
"बाबा ...तुम्ही मामाला सांगा की माझी वाट पाहत नको राहू त्यांच्या मुलीसाठी... मी काहीही झाले तरी मामाच्या मुलीशी लग्न करणार नाही..."





असे बोलून तो आपल्या वडिलांकडे होकाराच्या अपेक्षेने वाट पाहू लागला.

त्याचे बोलणे पार्वतीलाही पटले होते. पण कवडूचा चेहरा मात्र चिंताग्रस्त झाला होता...







पार्वती..
"हो म्हणा ना.. काय म्हणतोय मोहित..?? आता तो तेवढी तुमची गोष्ट ऐकत आहे तर तुमचं पण ऐकणं काम आहे."






कवडू...
"पण मी शब्द दिला आहे तुझ्या भावाला. त्या शब्दाखातरंच त्याने लहानपणी याला आपल्या घरी शिकायला घेऊन गेला. आणि शहरातल्या शाळेत त्याने टाकले. तो होता म्हणून आपण याच्यासाठी बिनधास्त होतो ना.. हे विसरत आहे तुम्ही दोघे.. जर त्याने शिक्षणाला याला ठेवलं नसतं तर हा शिकला असता का आज."






मोहित...
"हो बाबा... तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण मी तिथे रिकामा राहिलो नाही. अहो.. मी शाळेतून आल्यानंतर मामा सोबत नेहमीच काम करायचो. एक व्यक्ती जेवढे रोजीचं काम त्यांच्याकडे करते... तेवढेच मीही काम रोज करत होतो... एकही दिवस बिनाकामाने मी राहिलेलं नाहीये. आणि मग रात्री रात्री अभ्यास करायचो मी.."






पार्वती...
"तो बरोबर सांगत आहे.. मलाही माहित आहे माझा भाऊ कसा आहे..?? तो कधीतरी घरी कोणाला फुकट खाऊ देईल काय..?? आणि मीही गेल्यावर त्याच्या कामामध्ये कामंच करू लागते की...!! त्याचा स्वभावंच तसा आहे. एका बाईची रोजी वाचली पाहिजे म्हणून मी गेल्यावर रोज काम करते त्याच्याकडे...?? तसंच आपला मोहित पण काम करत होता..??"




पार्वतीने हे सांगितल्या वर चमकून कवडूने तिच्याकडे पाहिले.





कवडू...
"पारू.. तुला मग आतापर्यंत मला सांगता नाही आलं.
त्याचे अख्खं  शिक्षण पूर्ण होऊन गेलं आणि तू आता सांगतेस हे. तो आला म्हणजे मला सांगायचा की तुझा पोरगा आरामात राहतो माझ्याकडे. 
मी त्याला आरामात ठेवतो ...राजकुमारासारखा ठेवतो. त्याला कोणतेही काम सांगत नाही .....होणारा जावई आहे माझा...!!असा तो मला सगळे दिवस सांगत होता. तूही तर होती ना तेव्हा.."





पार्वती..
"तुम्हाला माहित आहे ना त्याचा स्वभाव.. त्याला काय आपण म्हटलं असतं तर आकांततांडव केला असता त्याने. जाऊदे आता सगळं ...तसे कोणाच्या घरी राहालं तर फुकट खाऊ नये म्हणतात.. जे झालं ते चांगलंच झालं. पण आता पोरगा काय म्हणत आहे..?? त्याच्याकडे लक्ष द्या आणि समजून घ्या."





कवडू...
"अस आहे तर मग पाहता येईल!! मुद्दा आहे आपल्याजवळ नाही म्हणण्याचा."




कवडूने असे म्हणताच मोहित आणि पार्वतीला चांगले वाटले.

...





तिकडे मायरा मंदिराच्या पायऱ्या उतरून जाताना
..तिला प्रसाद मागणारा सुंदर.. 
मायराला पाहून त्याचे डोळे लकाकले होते. 
ती जेव्हा त्याच्या इतर मित्रांना प्रसाद वाटत होती तेव्हा त्याच्या तोंडातला प्रसाद तोंडातंच राहिला आणि त्याचे डोळे समोरच्या कोवळ्या सौंदर्याला गीळू लागले होते.







मायरा प्रसाद देऊन निघून गेली.. 
तरी त्याची नजर तिचा पाठलाग करत होती. आणि ती जेव्हा कार मध्ये बसून गेली तेव्हा लगेचच त्याने आपल्या मित्राला विचारले...
"कोण आहे रे ही...?? पहिल्यांदा पाहतोय मी."





मित्र म्हणाला..
"चल ..अगोदर मंदिरात... सांगतो मग.."




तरी पण त्याने ..... गर्दीत मिसळला होता तरी तेथून खाली पाहू लागला. पण मायराची कार निघून गेली होती.




मित्र...
"पाघळलास काय..??"




सुंदर....
"अरे ...पण ती कोण आहे... सांगशील का नाही..??"





तोपर्यंत ते मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचले तर मग काही न बोलता दर्शन घेतले आणि बाहेर आले.
बाहेर येऊन खालच्या हॉटेलमध्ये शिरले.




त्या कडक दुपारी सुंदरने डबल पावडर चहाची ऑर्डर सोडली.




एवढा पैसेवाला असूनही सुंदरने चहाची ऑर्डर दिली म्हणून ते नाराज झाले. 
पण पाहिजे त्यावेळी नको ती गोष्ट करायचा त्याचा 
स्वभाव सर्वांना माहीत असल्यामुळे त्यांनी पुढ्यात आलेला चहा फुंकून फुंकून घशाखाली ओतला.
आणि गळ्यावरील ...तोंडावरील घाम पुसून काढला.





मंदिराच्या पायरीवर दिसलेली ती .....सुंदर तरुणी 
..दुसरी तिसरी कोणी नसून ...गावातल्या गडगंज श्रीमंत व्यक्तीची ...ज्याचा दबदबा संपूर्ण गावात आहे ...असे ....बाबाराव ....यांची एकुलती एक 
मुलगी आहे हे समजले तेव्हा तो चकीतच झाला.









सुंदर....
"काय सांगतो...???.. अरे .!!!.आठ दहा महिन्यापूर्वी जेव्हा मला ती दिसली होती....तेव्हा तर दहावी-अकरावीत असल्यासारखी वाटत होती. ही एवढी मोठी.. ..एवढ्याच दिवसात कशी झाली..??"







त्याचा मित्र म्हणाला...
"पोरींच्या बाबतीत ...आठ-दहा महिने ...काही कमी होत नाही... बापू... अरे मर्दा.. आठ दहा महिन्यांत काहीही होऊ शकतं... पोरगी बाई होऊ शकते.....पोरी म्हणतात कशाला मग...??"






सुंदरच्या मित्राने असे म्हटल्याबरोबर...
...मग..




🌹🌹🌹🌹🌹