Niyati - 11 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 11

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 11




भाग 11


पण बाबाराव मात्र अगदी शांत होते पाहाडासारखे.

त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट करून दिसत होती. नेहमी ओठातून शब्द बाहेर पडणारे बंद झाले होते. आणि शांत डोळे असणारे खळबळ माजवू लागले होते.

डोळे त्यांचे अंतकरणातील वेदना व्यक्त करत होते..

लीला या अजूनही बडबड करत होत्या तर त्यावर थंड स्वरात डोळ्यांत .....
तांबडा अंगार घेऊन बाबाराव म्हणाले...
"लीला... नशिबात असतं ते चुकत नाही.. ते भोगावंच लागते."





अगदी थंडपणे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते शब्दंही थरथरत होते ज्याप्रमाणे त्यांचे हात रागाने थरथरत होते अगदी तसेच.



लीला...
"पण हे कसलं नशीब ??? ...काय कमी आहे हो तिला. काही सांगू नका तुम्ही.... काहीतरी करा लवकर.."





हताश स्वरामध्ये बाबाराव बोलले....
"काय करू मी आता..???"


लीला....
"ते मी आता कसं सांगू...??? पण तुम्ही मनात आणलं तर त्याला गावातून हाकलून काढू शकता. 
कवडूलाही गावातून हाकलून काढा...
अहो !!!...बोला ना काहीतरी...??"




बाबाराव....
"हे बघ लीला... माझे मस्तक फिरवू नकोस. गावात माझी प्रतिष्ठा आहे.  खानदानाला पंचक्रोशीत मान मरातब आहे आपल्या.... नाक थोडेसे कटले म्हणून अख्खे नाक कापून घेऊ काय...?? मी जे करणार आहे ते करणारंच आहे.... थोडासा धीर धर..."




लीला...
"आणि तोपर्यंत मायरा त्या पोरासोबत पळून गेली तर...???"




लीला यांनी असे म्हटल्यानंतर बाबाराव लीला कडे पाहतंच राहिले .....अगदी असे घडणारच आहे अशा भावनेने लिलाबाईंनी काढलेले उद्गार होते....



बाबारावांना वाटत होते की पोरीला आपण समजावून सांगितले तर ती पाऊल मागे घेईन आणि जर तिने प्रेमाने ऐकले नाही तर काय करावे हाच विचार त्यांच्या डोक्यात थैमान घालत होता.




बाबाराव म्हणाले....
"लीला... मायराला आल्यावर आता काही बोलू नकोस. आता तिची मनस्थिती आपण कितीही सांगितले तरी न ऐकणारी असेल. उलट ती आपल्यालाच मनवण्याचा प्रयत्न करेल. आपण तिला लहानपणापासून पाहतच आलेलो आहे. तिने एकदा मनात ठरवलं हे असं पाहिजे तर तिला पाहिजेच असते माहित आहे ना...!!! आणि जेव्हा तिचं डोकं शांत होईल तेव्हा आपण तिला या विचारापासून परावृत्त करू शकतो.
आता ती थोड्या वेळात घरी येईल तर आल्यावर तिच्याशी शांतपणे नेहमीप्रमाणे वाग .कचाकचा बोलू नको.. बाकीचे पुढचे मी पाहून घेईन. कारण व्यवस्थित पावले उचलली गेली नाहीत तर मला आणि तुला या बंगल्याबाहेर तोंड देखील काढता येणार नाही आणि असं जर झालं तर मी माझी स्वतःची मान छाटेन पण मान खाली करून बाहेर निघणार नाही."




त्यांचे बोलणे ऐकून लीला शांत झाल्या. त्यांना आता समजले होते की बाबाराव कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मायरा शब्दाबाहेर जाणार नाही असे तिला समजावणारच.





घराण्याची प्रतिष्ठा मायराच्या मनात ठासवली तर ती ऐकेल हा विश्वास आता बाबाराव यांना वाटत नव्हता.
हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असताना एकाएकी थांबून बाबारावांनी लिलाबाई यांना म्हटले...




"लीला... पदराला गाठ बांधून ठेव आपल्याला माहिती आहे हे मायराला जाणवू देऊ नकोस."




लीला.....
"अहो !!!  पण तिला कल्पना दिली नाही तर ती पुन्हा आज सारखीच ओढ्याच्या काठी जाईल त्याचं काय...??"



बाबाराव...
"जाणार नाही... आणि जेव्हा जाईल तेव्हा तिला मोहित भेटणार नाही."




बाबारावांचा आवाज थंड होता पण कोणता तरी ठाम निश्चय त्यांच्या मनात तयार झाला होता फक्त ते बोलत नव्हते त्याबद्दल.




असे काही बोलायचे असेल तर ते कधीच आपल्या मुखातून एकही शब्द काढत नव्हते प्लॅन बद्दल. कारण बंगल्यामध्ये कितीही नोकर चाकर विश्वासू असले तरीही भिंतीला काने असतातच आणि कोणता नोकर कोणत्या दिवशी दगा देईल याचा भरोसा नसतो असं त्यांचं मत होतं.



लीला यांना बाबाराव यांची भेदक नजर लक्षात आली आणि त्यांनी विचारले...
" अहो ...तुम्ही असं तसं तर काहीही करणार नाहीये ना...???"



बाबाराव.....
"असं तसं म्हणजे...?? काय म्हणायचं काय तुला..??"


लीला....
"त्या राजूचं झालं तसं..."



लीला पुढे बोलणारंच होत्या की त्यांचे डोळे बघून त्यांनी आपलं वाक्य अर्धवट सोडलं....
बाबाराव यांचे लाल तांबे डोळे बघून पुढचे शब्द परत गीळून घेतले.



राजू  या तरुणाची शेती बाबाराव यांच्या जमिनीच्या एका लहानशा तुकड्याला लागून होती. बाबाराव यांच्या जमिनीत काम करणाऱ्या मजुरांना हा राजू  सारखा छळायचा. 



आणि जेव्हा राम ने त्याला बाबारावांचा धाक दिला तर राजूने  आजूबाजूच्या लोकांना ऐकायला जाईल एवढ्या आवाजात बोलला...
"ए राम्या ....त्या बाबारावाला सांग.... माझ्या भानगडीत पडेल तर  बरं होणार  नाही."



त्याने म्हटल्यानुसार राम ने बाबारावांना निरोप दिला. आणि नेमके चौथ्या दिवशी राजूचे  धड मुंडक्याशिवाय त्याच्याच शेताच्या धुर्‍यावर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला लटकत होते.
आजपर्यंत त्या राजूचं  शीर सापडले नव्हते.

हे कुणाचे काम असावे हे सगळ्यांना माहीत होतं. पण अख्या गावात कोणाची हिंमत नव्हती की त्यांच्याकडे बोट दाखवावे.




बाबाराव...
"लीला ...काही गोष्टी नाजूकपणे हाताळव्या लागतात.
आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आतापर्यंत आम्ही निवडणुका मानत नव्हतो. पण सरकारी नियम काही आता आड येऊ लागलेले आहेत. तर निवडणूक लढवून जिंकणे आता गरजेचं आहे....
अगोदरच गावामध्ये दुसरा गट आहे. गावामध्ये आपला वचक जरी असला तरी हा दुसरा गटही .. यालाही हलकं मानता येत नाही."




लीला....
"अहो पण नाजूकपणा संपला तर..."




बाबाराव...
"नाही... असं होणार नाही अजिबात. नाजूकपणा संपण्याच्या अगोदरच मी निकालात लावतो सगळं."




दिवेलागंण होऊन कितीतरी वेळ झाला होता पण अजून मायरा घरी पोहोचायची होती.... लीला चिंताग्रस्त होऊन आपल्याच धुंदीत बसलेले होत्या. बाबाराव एखाद्या पिंजऱ्यामध्ये कैद असलेल्या वाघाप्रमाणे हॉलमध्ये येरझाऱ्या घालत होते.




बाबाराव...
"लीला... तू आत जा.... मायरा येत आहे. आणि हो.... चेहऱ्यावर काहीही दिसू देऊ नकोस. शांत चेहरा ठेव. लक्षात ठेव पोरीला किंचितही भनक लागायला नको. कारण लेक माझी आहे ...मी जाणतो ती किती ...
किती चतुर आहे...??"

.....बाबाराव बंगल्याच्या भव्य फाटकातून येणाऱ्या मायराकडे पहात पण हलक्या आवाजात म्हणाले.


बाबाराव यांच्या बोलण्यावर लीला यांनी होकारार्थी मान हलवली आणि आत मध्ये निघून गेल्या.


मायरा बंगल्यात आली तीच मुळी चोरासारखी.
वडिलांकडे पाहण्याची तिला हिंमत नव्हती.




"किती वेळ केलास.... मायू...??"..
बाबाराव अगदी शांत आणि किंचित आवाज धारदार करत बोलले नेहमीप्रमाणे.




मायराने गडबडून उत्तर दिले..
"हो... थोडा उशीरच झाला."




मायराने आपल्या वडिलांकडे पहात उत्तर दिले खरे पण त्यांच्या तो शांत आणि नेहमीचा आवाज ऐकून तिला धीर आला.



बाबाराव....
"हे बघ मायू... अशी अंधार होतपर्यंत बाहेर राहणे आता या वयामध्ये बरोबर नाही ...आमचं काळीज वर खाली होतं...??? समजलं ना मी काय सांगतोय...!!!"




मायरा...
"हो बाबा ...ते पलीकडे शेतात भटकत होते...
ओढ्याकडे पण गेले होते म्हणून उशीर झाला...
आता लक्षात ठेवीन ...
अंधार होण्याच्या पूर्वीच घरी येईल."




बाबाराव.....
"हे बघ पोरी... फिरायला माझी मनाई नाही.. पण काळ आणि वेळेचे भान ठेवावं. आणि अरे हो.... तुझ्या मामाकडे आईला जायचं आहे भेटायला... तर तिच्यासोबत उद्या जा म्हणजे तिलाही सोबत होईल."




आता बाबारावांना शांत राहून बोलताना मनावर ताबा ठेवून बोलणे किती जड असते हे लक्षात येत होतं. 



आतून प्रचंड कोलाहल माजलेला असताना जिभेवर नियंत्रण ठेवणे किती जड आहे ....याची जाणीव आता मायराशी बोलताना त्यांना क्षणाक्षणाला होत होती.



त्यांना आता हा एकच पर्याय बरोबर वाटत होता की तत्काळ तिला दुसऱ्या गावाला पाठवणे आई सोबत.. 



आठ दिवसाला पाठवणे म्हणून पाठवायचे आणि महिना लावून तिकडेच ठेवायची ...तोपर्यंत येथील त्यांचा हिशोब बरोबर करायचा.. किंवा हिशोब जूडत नसेल तर समोरच्या व्यक्तीला वठणीला आणायलाही मागे पुढे पाहायचं नाही..
हे सर्व करताना त्यांना मायराला आणि गावाला सुगावा लागू द्यायचा नव्हता.




मायरा...
" बाबा ...उद्यालाच निघायला हवं काय..??"




तिच्या प्रश्न विचारण्यावर बाबाराव यांनी मंदस्मित हसत होकारार्थी मान हलवली. पण त्यावर मायराने पुन्हा प्रश्न विचारला ...."का..??"



मायराच्या मनावरचे दडपण पूर्णपणे नाहीसे झाले होते बाबाराव यांच्याशी बोलताना... कारण ते अगदी शांत बोलत होते.




बाबाराव....
"हो मायू... लगेच आठ दिवसात परत यायला हवं तुम्ही. त्यानंतर तुझी मदत हवी आहे मला इथे.... आणि सोबत तिकडून धवल ला पण घेऊन ये. अगं.. यावेळी आम्ही इलेक्शनला उभे राहणार आहोत... धवल आणि तू दोघे मिळून इलेक्शन साठी तयारी करायची आहे आमच्या. जंगी तयारी व्हायला पाहिजे.. जिंकलो पाहिजे आपण.. काय म्हणते तू ...??? इलेक्शनला उभे राहू ना मी...???"




मायरा चे मेंदूमध्ये किंचितसा बल्ब चमकू लागला होता आता... आतापर्यंत सरळ सरळ वाटणारी गोष्ट तिला आता काहीतरी वेगळी वाटू लागली होती.. कारण तीही बाबारावांची लेक होती...




मंदस्मित करत मायरा म्हणाली...




"ऑफ कोर्स बाबा... इलेक्शन लढवणार ???
किती छान....??? माझं तर म्हणणं केव्हापासूनच होतं की आपण इलेक्शन मध्ये उभे राहायचं???
प्रॉपर निवडून यायचं आणि मग गावात कारभार करायचा??? तसेही येथील गावातील लोक तुमच्या पाठीशी आहेतच. पण धवल कशाला हवा ना त्यासाठी.. मी आणि तुमचे कार्यकर्ते आहेत की..."




तिला तिच्या मामाचा मुलगा धवल अजिबात पटत नव्हता.
त्याच्या अंगात संस्कार नावाची अजिबात गोष्ट नव्हती.
तो जवळ असला उभा तरी तिला किळस यायची त्याची..
तोंड भरून तो खर्रा... बाजूलाच उभा असेल तिथे थूंकायचा.. सदानकदा 24 तास चघळंत राहायचा.. ज्याप्रमाणे एखादं जनावर रवंथ करतोय...

इकडे तिच्या बोलण्यामुळे बाबाराव यांना समज झाली की मायराच्या मनात संशय अजिबात नाही.


बाबाराव....
"मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या जवळचा तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."



मायरा...
"ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."



असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....

🌹🌹🌹🌹🌹