Niyati - 9 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 9

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 9





भाग 9



आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..

संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव धडधड करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.
जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.
पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...



पण तिथे.....
......




मायरा ओढ्याच्या काठावर वीस मिनिटांपूर्वीच पोचली होती. एखाद्या दगडावर बसून वाट पाहत होती. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन गुरे गुरकावून एकमेकांशी भांडत होते... त्यांच्या शिंगांची आघात एकमेकांवर होत होते.






मायरा तिथे बसली होती तेव्हा दुरून तिला दोन डोळे न्याहाळत होते...




मायराचे वडील बाबाराव... गावातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती... घरंदाज करारीपणा त्यांच्या अंगात.
जातीचा अभिमान दांडगा होता त्यांना.

दरवर्षी कर्तबगार पूर्वजांच्या फोटोंचे ते दरदिवशी मनोभावे पूजा करत होते...





अशा या धोरणी व्यक्तिमत्त्वाच्या माणसाची.... प्रतिष्ठित बाबाराव यांची मुलगी ओढ्याच्या काठावर बसून कुणाची तरी वाट पाहत होती.




वयाच्या साठीकडे झुकलेले बाबाराव यांच्या मते शहरातल्या बायका शिकल्या सवरल्या.... पुरुषांबरोबर कामे करू लागल्या आणि पुरुषांच्याही पुढे गेल्या पण...






या गावातल्या बायकांनी ....घरातील बाई कितीही शिकलेली असू दे .....तिने ते शिक्षण घरच्या संस्कारासाठी कामी आणायचे निव्वळ... आणि पुरुषांसमोर आपली नजर पायाच्या अंगठ्याकडेच लावली पाहिजे या मताचा त्यांचा रिवाज होता तशी तिथली निती होती.






त्या गावात बाबाराव यांचेच नियम चालत होते.. गावच्या हद्दीमध्ये कोणतेही सरकारी नियम असो ते मानत नव्हते.
आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांचे उल्लंघन त्या गावात कुणीही करत नसे.




ज्याप्रमाणे.. जमिनीवर पडलेल्या बेलाच्या पानांवरून कोणीही सच्चा माणूस ओलांडून जात नाही त्याप्रमाणे.




अशा या बाबारावांची लाडकी लेक ...मायरा..




ती एकुलती एक होती म्हणून नव्हे तर कुणालाही लाड यावा अशीच तिचे रूप.... मायरा.. सर्वांची प्रिय....
अत्यंत सुखात वाढलेली पोर.... मायराने यौवणाची गुढी उभारली... आणि त्यांनी शिकण्यासाठी तिला शहरात होस्टेलवर ठेवले होते....



हेतू तोच..
शिकल्याने शिक्षण वाया जात नाही. नोकरी तर करायचीच नाही.. पण येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायची हिम्मत येते शिक्षण असेल तर... तसेच.. जेव्हा घरातली नवीन पिढी शिक्षणासाठी उद्युक्त होईल तेव्हा संस्कारासाठी
बाईला शिक्षण आवश्यक ठरते ....
या मताचे ते होते. तिचे गुण तिच्या संसारासाठी कामी येतात... असे बाबाराव चे विचार होते.





जे दोन डोळे पाहत होते मायराला...
मायराचे नैसर्गिक सौंदर्य पाहून तो मूग्ध झाला होता...
देखणी होती ती पाहायला.. पूर्ण गावाला तिच्या 
देखने पणाचे कौतुक होते.




रसरशीत अंग कांती असलेली... केतकी वर्णाची... रेखीव पण छोटेसे नाक-डोळे .... तिचे गुण.. मायाळू ... कनवाळू करारीही असणे.. हसू लागली म्हणजे शुभ्र पाणीदार 
दंतप्ंक्ती किती ती उठून चमकदार दिसत....!!

तिच्याशी बोलताना चालताना कोणी किंचित मर्यादा ओलांडली असे तिला वाटले तरी ती कडकशब्दात जाणीव करून द्यायची.
बाबारावांना आपल्या पोरीच्या या गुणांचे अप्रूप वाटत होते . 








मायराच्या आई लीला .... यांनाही वाटायचे ज्याच्या कुणाच्या गळ्यात मायरा वरमाळ घालीन लग्नाची ....त्याचा ती संसार उत्कृष्ट करेल.



आणि गावातल्याही लोकांना उत्सुकता होती की मायराला जोडीदार कोण मिळणार.,??? तो भाग्यवान कोण असणार.... गावातला असेल की बाहेरचा असेल..





अंगी करारी बाणा असलेली मायरा मात्र मोठी झाल्यानंतर मोहितच्या प्रेमात पडली. असा मोहितही असा तसा नव्हता पण एकमेव जाती व्यवस्था अडचण होती त्या दोघांची.
किती वेळ बसून वाट पाहत होते मायरा मोहितची...
आणि इकडे लपून दोन डोळे वेध घेत होते.


तेवढ्यात त्या दोन डोळ्यांना हालचाल जाणवली पावलांची. व तो मोठ्या झाडाच्या मागे आडोशाने उभा राहिला.





तर झपाझप पावले टाकत मोहित येत होता.
मोहितनेही तिला खडकावर बसलेली पाहिले.. आणि तिच्याकडे जाऊन तिच्या बाजूला खडकावर बसला.





मायरा ओढ्याच्या काठावर एकटी आहे म्हणून तो झपाटलेल्या आला खरा... पण त्यावेळीही बाबांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. वडिलांचा राकट आणि वयाने थकलेला चेहरा त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहत होता. आईचे केसातून प्रेमळपणे हात फिरवणे हे अजूनही त्या जाणिवा त्याला जाणवत होत्या.





पाच मिनिटे झाले तरी दोघेही एकमेकांसोबत बोलले नाही. निव्वळ बसून होते.




मायरा ती त्याच्याकडे पाहत पण नव्हती आणि त्याच्याजवळच दगडावर बसून रेघोट्या काढत होती.
तशी ती गोंधळली होती आणि चिडली पण होती त्याच्यावर. रोज हसत खेळत असणारा आणि विनोद करीत बोलणारा मोहित आज तिला गवसला नव्हता.






तेथे तिच्याजवळ बसून मोहित स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. एक दोन वेळा मायराकडे नजर गेली की तो हसायचा.... पण ते हसू कृत्रिम आहे हे कोणीही सांगू शकत होते.





काहीतरी बिघडलेले आहे मोहितचे हे मायराला चांगले समजले होते. पण नेमके काय बिघडले ??
काय बीनसले ..??? हे मात्र तिच्या मेंदूमध्ये समजत नव्हते.





मोहितला ती गंभीर दिसली तर तो अजूनच बेचैन झाला.
एक एक खडा टाकून त्याने ओढ्याच्या वाहत्या पाण्यात फेकायला सुरुवात केली.




इकडे दोन डोळे जे त्यांना पाहत होते त्या डोळ्यांना हे तर दिसत होतं की दोघे एकमेकांना भेटायला आले आहेत. पण ते काय बोलत आहेत हे मात्र त्याला ऐकायला येत नव्हते.






मोहितच्या खडे टाकण्याच्या वेगावरूनच मायराला समजले तो खूप खूप अस्वस्थ आहे.
त्याची अस्वस्थता जाणून मायराने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला आणि कुरवाळू लागली.





त्या तिच्या आश्वासक स्पर्शाने मोहितला राहाविले नाही आणि त्याने मायराला सांगितले....
पण मायराला त्याचे ऐकून..... तिला आश्चर्य वाटले नाही .....ती नॉर्मलच होती हे बघून मोहित विचार करू लागला.
पण तेवढ्यात मायरा बोलली....




"मोहित... गावातल्या सर्वांनाच माहीत होतं. हा आता मला माहित नव्हते..... पण घरी आल्यानंतर जेव्हा न्यूज पेपर मध्ये तुझा फोटो आला. ते फोटोला बघून आत्या आणि बाबांनी मला सांगितलं. पण आपल्याला बोलायला वेळच मिळाला नाही म्हणून मी तुला सांगू शकले नाही."





तसा तो चमकून मायराकडे बघू लागला. आता त्याचे लाईट लागले की बंगल्यातले वातावरण त्याच्यासाठी का निवळले होते...


जातिव्यवस्था येथे गावात एवढी कडक आहे तरीसुद्धा आपल्याला बंगल्यात सर्व नॉर्मल वाटले आणि सर्व नॉर्मलच वागले.. आपणास काहीच समजलं नव्हतं... 




ते आता कळते आहे...खरं कारण माहीत झालं म्हणून  त्याला घरी बोलवून त्याचे स्वागत करून मानपान केला...युनिव्हर्सिटी प्रथम आला म्हणून."





तो अस्वस्थ झाल्यागत बेचैन स्वरात 
मायराला म्हणाला.....
"म्हणजे मी कोण आहे माहित आहे सगळ्यांना...???"





त्यावर मायराने संमती दर्शक मान वर खाली हलवली. आणि म्हणाली.....
"हो अरे ....पण...आईला गावातलं काहीच माहिती नव्हतं .."




मोहित....
"त्यांना नसेल माहिती."


मायरा ...
"मग असा का प्रश्न विचारलास.... "




मोहित....
"मला त्यांनी ...बाबाराव यांनी दिवाणखान्यात बसवलं होतं."





मायरा ...
"मग काय झालं...????"




मोहित....
"मायरा... अगं बाबाराव जुन्या वळणाचे आणि एकदम त्यांनी मला आत बोलवावं.....म्हणजे....
हे जरा थोडसं अजबज संयोगच होता.
एकदम त्यांनी मला आत बोलावले तर धडधड वाढली होती माझ्या हृदयाची.आणी आपल्याला माहित आहे ना !!!! गावात आणि शहरात किती फरक आहे ..."





मायरा...
"हो बरोबर आहे...पण तू कोण आहे हे सर्वांना माहिती आहे... अरे अगोदरच.. मला पण माहिती नव्हते पण मी काल आले तेव्हा घरच्यांनी फोटो पाहून सकाळी मला सांगितले."







कितीतरी नात्यांना धक्का बसल्या गत झाला होता.
बसल्या जागी मायराने त्याच्या दंडाला हात पकडून त्याच्या खांद्यावर मान टेकवली.




मोहित....
"पण मायू मला कसतरी वाटतय गं. मी आज पर्यंत ज्यांना माझी मायबाप समजत होतो .माझे मायबाप नाहीत. मला सहन होत नाही आहे. काय रिऍक्ट करू??? मला काही कळत नाहीये. आनंद वाटून घेऊ की वाईट वाटून घेऊ हेही समजत नाहीये. मला ना काही काही सुचत नाही."





मायरा...
"माही.... अरे सगळं सगळं विसरून जा तू.. आज पर्यंत तुला जे मायबाप होते ना!!!... तेच तुझे खरे मायबाप आहे आताही.    तुझे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून त्यांनी जीवावर दगड ठेवून तुला शहरात ठेवलं. आणि प्रामाणिकपणे तुला समज आल्यावर ....
आता सर्व शिक्षण झाल्यावर त्यांनी भूतकाळ ही सांगितला..."





मोहित...
"हो गं ...जर मला त्या काटेरी झूडूपामधून आईने उचलून आणले नसते तर माझे काय हाल झाले असते ना..
कदाचित मी जिवंतही नसतो.. कदाचित मला कुत्र्याने किंवा कोणीतरी माझे हाल हाल केले असते.."





विचार करूनही त्याच्या अंगावर काटा आला. अचानक त्याच्या काहीतरी लक्षात आले आणि तो झटकन उभा राहिला. तो उभा राहिला म्हणून मायराही आहे तेथे उभी राहिली. 





मोहित...
"चल ...चल... निघायला हवं आता. मी घरून काहीही न सांगता आलोय. आईने मला नुकताच भूतकाळ सांगितला. मी विचार करत होतो. आणि मग लक्षात आले की तू ओढ्यावर वाट पाहत असेल. तर मी तसाच निघून आलो इकडे. ते दोघेही माझ्या विचाराने कासावीस होत असतील गं.."




असं म्हणून त्याने मायराला जवळ घेतले आणि तिच्या ओठ कपाळावर टेकवले. आणि तिचा हात धरून तिला झरझर नेऊ लागला... तर एका क्षणासाठी मायराने त्याला थांबवले.. तिने इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि ओठावर ओठ टेकवले...




दोन क्षण होत नाही तर झाडाच्या आडोशाला जे दोन डोळे पाहत होते त्यांना .... असं पाहून त्याला राग आला ... रागाच्या भरात त्याने जवळ असलेली काठी जवळपास आदळली.



यासारखे दोघेही भानावर आले आणि विलग झाले.
संध्याकाळच्या कातरवेळी  मायराचा  हात पकडून जात असताना मात्र......

🌹🌹🌹🌹🌹