Niyati - 5 in Marathi Love Stories by Vaishali S Kamble books and stories PDF | नियती - भाग 5

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नियती - भाग 5



भाग-5






मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले शब्द सारखे बोचत असतात हृदयात.




त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर  समांतर पावले टाकू लागला...गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....




समोर त्यांच्या घरचा भला मोठा पुतळा काळाकुट्ट कूत्रा आपले घारे डोळे टकमक करून लांब जीभ काढून उभा होता.त्याच्याकडे बघून त्याच्या अंगी सरसरून घाम फुटला.तेवढ्यात मायराने त्या कुत्र्याला आवाज दिला.




मायरा..."शेरू !!! बाजूला हो... शेरू... शेरू काय सांगितलं...?? समजलं का ??? बाजूला हो ....पटकन."




मग मात्र तो शेरू खाली मान करून निघून गेला.आता गेटवर पोहोचल्यानंतर मात्र मोहितला उगाचच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. कारण त्याच्या मुळे आज त्याचे प्रेम नाराज झाले होते.



तोही विचार न करता मनातील तसे बोलून गेला होता. त्याला आता तिला समजून सांगायचे होते.


पण समोर वाचमन बसलेला होता. आणि त्याने नजर फिरवली तर वरच्या माळ्यावरून दोघे जण अजूनही त्यांच्याकडे पाहत असताना दिसत होते...

हिरमुसल्या मनस्थिती ने त्याने मायराचा निरोप घेतला.


वळून आता गेटच्या बाहेर निघणार तर मायराने हळूच त्याच्या हातात चिठ्ठी सरकवली.



चमकून त्याने तिच्याकडे बघितले पण तोपर्यंत ती वळून परत निघाली होती. तोही मग गेट बाहेर निघून गेला.



गेटमधून बाहेर निघाल्यावर त्याने चिठ्ठी तशीच न खोलून पाहता खिशात टाकण्यासाठी खिशात हात घातला आणि तेथे ठेवून चालू लागला.



माहित होते त्याच्यावर नजर ठेवून आहेत बंगल्यातले कोणीतरी.


घरी गेल्यावर घरात एकांतात त्याला पहावे लागणार होते काय लिहिलय चिठ्ठी मध्ये...भराभर लांब पावले टाकत तो घराकडे निघाला.



जाता जाता त्याला थोड्या दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.....

नुकतीच फायनल इयरची एक्झाम झाली होती त्याची.



शेवटच्या पेपरच्या दिवशी, पेपर झाल्यानंतर दोघेही भेटले होते तेव्हा मायरा ने हट्ट धरला होता.


"शंभरदा विचारून झाले तरी तू मामाचा पत्ता नाही सांगितलास मला."



"हो गं... येण्यासारखे नाही तिकडे... तुझ्यासाठी तरी."



"का..??"




"मायरा... काही गोष्टींचा हट्ट करू नये कधी.. काहीतरी कारण असेल ना..!!"



"पण मी तिथे आले तर काय बिघडणार आहे...??"




मोहितने अगदी थंडपणे सांगितले"बिघडणार काही नाही .....फक्त तू तिथे येऊ शकणार नाहीस म्हणून म्हणतो."



"माझ्यापासून काही चोरून ठेवायचे आहे का..??"



"काय चोरून ठेवणार...??"



"मला नाही माहित."



मायरा रुसून बोलली तर तो गडबडल्यासारखा झाला.

अंत:करण धडधडल्यासारखे झाले त्याचे.

हळूच त्याने तिला आवाज दिला...

"मायरा..."


"हम्म..."


"रागावलीस का गं..??"


"नाही... खुश झाली तुझ्यावर... सरळ सांग ना..??"


"काय सांगू...??"


"काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवायच्या आहेत तुला. सांग ना !! मामाची मुलगी पाहिल मला म्हणून तू येऊ नको म्हणतोस."



मायरा चिडून बोलली आणि तो तिच्या तोंडाकडे पाहत राहिला...



त्याने कधीच मामाच्या मुलीबद्दल मायराला एक चूकार शब्दानेही सांगितले नव्हते.

मग तिला हे सर्व समजले कसे??...

ती येऊन तर गेली नसेल मामाच्या घराकडे???

मामानेच तर तिला काही सांगितले नसेल???

त्याच्या मनातील गोंधळ प्रश्नांनी आणखी वाढला.




"मायरा.... असं काही नाही आहे.पाहिजे असेल तर तू आताही येऊ शकतेस माझ्यासोबत???"


"चल , मी येणारच आहे... खरंच."


"जरूर चल. मी कितीही सांगितलं तरी तुला ते पटत नाही असं दिसत आहे ....तिथे येशील तेव्हाच तुला पटेल माझी गोष्ट."


"त्यात काय आहे पटण्या आणि न पटण्यासारखे...??"


"हे बघ मायरा.... माझा मामा कातडी कमावण्याचा धंदा करतो. अगदी पिढी जात व्यवसाय आहे हा त्याचा. आमच्या एरियात जवळ गेलीस तरी दुर्गंधीने तू कासावीस होशील गं."


"मग तू कसा काय जातोस तिथे...??"


"माझ्यात आणि मामात फरक काय आहे ??वर्षे गेली मामाला मदत करून करून.. या दुर्गंधीची मला सवय झालेय पण तूझ्याने सहन नाही होणार म्हणून सांगतोय मी...!!"


"चल बघू या... किती कासावीस होते मी...??"


दोघेही बसने त्यांच्या झोपडपट्टीच्या एरियाच्या मेन रोडवर उतरले. दोघांपैकी कोणीही बोलत नव्हतं.

गप्पच होते दोघे. चालू लागल्यानंतर पाच मिनिटे झाली असतील आणि वस्तीतले घरं सुरू झाले.




त्यांच्याबरोबरच दुर्गंधी पण येणे सुरू झाली.मोहितला सारखे सारखे वाटत होते आपण तिला आणायला नको होते.

पण तो तरी काय करणार...??

तिचा हट्ट तसा होता आजचा. आणि आता तो तिला मागे घालवू शकत नव्हता.


"मोहित!!"


"बोल गं."


"कुठे आहे रे घर...?? केव्हा येणार...??"मायराच्या तोंडून कसा बसा प्रश्न निघाला.तिने आता नाकावर रुमाल ठेवला होता.


"मायरा ...रुमाल काढ तोंडावरचा."


"का...??"


"अगं.. तू अशी तोंडावर रुमाल ठेवशील तर इथले लोक भडकतात. तो त्यांच्या व्यवसायाचा अपमान समजतात....तुला आता तोंडावर कुणीतरी काहीतरी बोलेल गं......काढ गं बाई पटकन तोंडावरचा रुमाल.."




कारण समजताच मायराने तोंडावरील रुमाल काढला.

कशीबशी ती त्याच्या मामाच्या घरासमोर आली.

पण येताना तिने जे दृश्य पाहिलेले त्यामुळे तिला पोटात मळमळत होते.... कारण घरांच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूने कातड्यांचा खच पडला होता. पांढऱ्या रंगांचे कातडे होते सगळीकडे.




खरं पाहता तिला तेथे उभे राहानेही असह्य होत होते.मोहितची मामी दारातूनच दोघांकडे टकमक पाहत होती.कारण पहिल्यांदाच मोहित सोबत कोणीतरी एवढी मॉडर्न मुलगी आली होती.


तिच्या राहणीमानामुळे ती श्रीमंत ही दिसत होती मामीला.




मोहित हळूच म्हणाला...

"मायरा,आता आली आहेस तर आत मध्ये येऊन बसावं लागेल. ते जे देतील ते प्यावं लागेल.. खावे लागेल. आणि जर तू खाल्लं पिलं नाहीस तर तो माझा अपमान होईल."


"चल मग..?"


"कुठे..?"


"घरात आणि कुठे..??"


त्याला मात्र आता मायराची कमाल वाटली.

चेहऱ्यावरून तिच्या तर दिसत होतं त्याला की तिला किती असह्य होत आहे.

पण तरीही  ती घरात यायला तयार होती... मनातच त्याने तिच्या हिमतीला सलाम ठोकला.



घरात घेऊन आला.एक खुर्ची होती मळकटी. तिला थोडेसे पुसून बसायला लावले मायराला त्याने...


ती घरात बसल्यानंतर मोहितने इकडे तिकडे नजर फिरवली तर त्याला मामाची मुलगी घरात नाही याची जाणीव झाली. त्याला थोडेसे हायसे वाटले.



न सांगताच त्याच्या मामीने चहा ठेवला. मायराला पाणी देऊ केले. पण तिने कसेबसे हसत पाणी पिण्यास नकार दिला. मामी ने चहा दिल्यानंतर मात्र तिने गुपचूप घेतला.



चहा पिताना दिला त्या कपातूनही चामड्याची दुर्गंधी जाणवत होती. जीव पोटातून खळबळत होता. पण पर्याय नव्हता आता.



चहा झाल्यानंतर ती उठली. तर तिच्या मागोमाग चुपचाप मोहितही निघाला. जाताना सर्वजण कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होते.



एकही शब्द न बोलता ती चुपचाप समोर त्याच्यासोबत चालत गेली.

बस स्टॉप जवळ पोहोचली असेल तर आता तिच्या ने रहाविले नाही... तिने भडभड उलट्या केल्या. उलट्यांनी कानठळ्या बसल्यासारखे झाल्या मायराच्या.

कसेबसे सावरले स्वतःला.


तोही तिला काही मदत करू शकत नव्हता कारण त्यांच्या वस्तीतले अजूनही काही दोघं तिघेजण त्यांच्याकडे पाहत होते.


बस मध्ये बसवून मोहित परत आला. घरी आल्याबरोबर मामाचा भसाडा आवाज त्याच्या कानात शिरला.



"मोहित... ती कशी आली इकडे...??"



"मामा ...मी कुठे राहतो ते पाहायला आली होती..?



मग त्यावर मामा काहीच बोलला नाही.बरेच वेळ पर्यंत मामा चुपचाप होता. पण एकाएकी मामाने मग सुरुवात केली.



"मोहित... मला एकच मुलगी आहे..मला माहित आहे ती तुझ्यासारखी आणि मगाशी आलेल्या मुली सारखी नसली तरी आपल्याला शोभणारी आहे."



जेवता जेवता मामाने विषय घेतल्यामुळे मोहित मानेने हुंकार देत त जेवत होता.



"माझा एवढा मोठा व्यवसाय.मागेपुढे कोणीही पाहायला नाही... कोणीतरी पाहायला हवं ना !!!तू बघशील म्हणून मी आशेवर होतो. तू जर असा कूण्या मुलीच्या नादी लागला तर..."



"मामा... तसं काहीच नाही."



"तसं नाही आहे तर आनंदच आहे."


म्हणून मामाने लाल तांबडी नजर करून त्याच्याकडे पाहिले तसा मोहित अंतकरणातून थोडा घाबरला. कारण तो मामाला चांगलाच ओळखत होता.



"मोहित्या.... तुझ्या आशेवर मी पोर वाढवली माझी. आपल्यात वयात आली नाही तर लग्न करून मोकळे होतात. मी मात्र... तू शिकतो आहे म्हणून थांबलो आणि पोरगी वाढवली. आता तिच्याशी  कोणीही लग्न करणार नाही."



मामा बोलत होता. कितीतरी वेळ बसून मोहित त्याचे बोलणे ऐकत होता.



"बाबाला विचारायला हवं.".....हळू आवाजात मोहीत म्हणाला.



मामा..."मला वाटलंच होतं. तू कवडूच्या शब्दाबाहेर नाहीस. आता गावाला जाशील तेव्हा त्याला विचार. तो तुला मग सगळं सांगेल. अरे.... शब्द दिला होता त्याने.तू शिकून मोठा झाला की माझ्या पोरीशी तुझे तो लग्न लावून देणार असं म्हणाला होता तो."



मोहित ला माहीत होतं जर मामाचा शब्द मानला नाही तर आपली आणि आपल्या बाबाची मान खाली घालायला लागेल असा तो काहीतरी करायचा हे त्याला चांगले माहित होते......



चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा  झोपडी वजा घर आले समजले ही नाही.आणि त्याचे समोर लक्ष गेले....तर...


🌹🌹🌹🌹🌹