Nikita raje Chitnis - 13 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग १३

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग १३

निकिता राजे चिटणीस

 पात्र  रचना

 

अविनाश ͬचटणीस                चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस         अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस        नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस        नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे            निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे            निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                 अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                  मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                 निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी              निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर        निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी                निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                  निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                       नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                  चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                  चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर          चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative  officer

पांडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे astt. Administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                   चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

 

 

 भाग १३

भाग १२ वरून पुढे  वाचा ...........

चोरघडे

मीटिंग संपली. आता पुढची स्टेप म्हणजे वाघूळकर सरांना भेटाव लागेल आणि त्यांना सांगाव लागेल. उद्याच. दुसऱ्या दिवशी दुपारी मिस राज्यांना विचारल की “आणखी काही सापडल का ?”

“नाही सर बाकी सर्व चेक केल ठीकच आहे.” – राजे.  

“मग मी आता वाघूळकर सरांना भेटून सर्व सांगतो. सांगू ना ? की पुन: एकदा बघायचं आहे.”  

“नाही सर आता काही बघायचं शिल्लक नाहीये.” – राजेचा आत्मविश्वास वाखाणण्या सारखा होता.  

“ठीक आहे.” तो पर्यन्त चार वाजले होते. वाघूळकर सरां कडे गेलो. तसे सर हसतमुख आहेत. चिडचिड नसते. पण आताची परिस्थितीच वेगळी होती. त्यामुळे कशी reaction असेल याचा अंदाज येत नव्हता. जरा भीत भीतच आत गेलो.

“या चोरघडे बरे वेळेवर आलात आत्ताच चहा मागवला आहे. बसा.” – वाघूळकर

थोड इकडच्या तिकडच्या गप्पा आणि चहा घेऊन झाल्यावर मग सर म्हणाले

“हं बोला चोरघडे काय नवीन ? तुम्ही काही तरी सांगायला आला होतात.  बोला.” – वाघूळकरांनी विषयाला वाचा फोडली.

“सर मॅटर थोड सिरियस आहे. vat टॅक्स रिटर्न्स च्या संदर्भात आहे.”

“रिटर्न्स फाइल झालेत. टॅक्स भरून झाला. आता काय त्याच ?” – वाघूळकर.

“सर गेल्या पांच वर्षात आपण जवळ जवळ साडे तीन करोंड जास्त टॅक्स भरला आहे.” एवढं बोलतांना मला दम लागला होता.  

“काय? चोरघडे तुम्ही काय बोलता आहात हे कळतंय ना?” – वाघूळकर.

“हो सर.”

“Are you serious ?” – वाघूळकर

“Yes sir”

सर पाच मिनिटे शांत बसून होते. बहुधा धक्क्यातून स्वत:ला सावरायचा प्रयत्न करत होते.

“हा काय प्रकार आहे ? तुम्हाला अस म्हणायच आहे की गेल्या पांच वर्षात आपण करोडो रुपये टॅक्स जास्ती भरला ?” – वाघूळकर विमनस्क स्वरात बोलले.

“होय सर. फार मोठी चूक झालेली आहे. सर्व डिटेल्स मी बरोबर आणले आहेत. तुम्ही डोळ्यांखालून घातले तर बर होईल.” त्या नंतर तास दीड तास पुनः पुन्हा चेकिंग, क्रॉस चेकिंग वगैरे चाललं होत. सर्व झाल्यावर सरांनी माझ्याकडे बघितलं  चेहरा अतिशय गंभीर होता. गंभीर कसला विदीर्ण होता. चेहऱ्यावरची रया पार गेली होती. मला काय बोलाव ते कळत नव्हत. सरांची अशी अवस्था माझ्या कधी पाहण्यात नव्हती. मला वाईट वाटलं पण काय करणार, परिस्थितीच तशी होती.

“चोरघडे हे फार गंभीर प्रकरण आहे. घोडे पेडणेकरांकडून चूक झाली आहे, पण ती बाहेरची पार्टी आहे. आपण काय करत होतो या प्रश्नाला तुमच्या जवळ उत्तर आहे का ? कंपनी च्या हिताची जपणूक करणे ही तुमची प्राथमिक  जबाबदारी आहे आणि तुम्ही त्यात अपयशी ठरलात अस जर कोणी म्हणालं तर त्यावर तुमच्याकडे उत्तर आहे ?” – वाघूळकर. त्यांचा आवाज कापरा झाला होता.

मी काहीच बोललो नाही. बोलण्या सारखं काही नव्हतच. बराच वेळ तसाच गेला. नि:शब्द शांतता काय असते, ते आज कळल. बबन आला चहा आणि बिस्किट घेऊन. आतलं वातावरण  बघून तो ही बावचळला त्याच्या सुद्धा असे वाघूळकर सर पाहण्यात नव्हते. त्यानी हातांनीच काय झालं अस विचारलं मी पण त्याला काही नाही, अस हात हलवून सांगितलं आणि जा अशी खूण केली.

“चहा घ्या साहेब जरा बर वाटेल आणि पुढची रूपरेषा ठरवता येईल. आपली चूक तर मान्य करावीच लागेल पण डॅमेज कंट्रोल पण आवश्यक आहे. पेडणेकरांशी आपण बोललो तर काही मार्ग निघेल.” मी आपला ताण कमी करण्याच्या उद्देशानी बोललो. बाकी मार्ग एकच होता. रिफंड साठी प्रोसेस सुरू करणे.

“हं” - वाघूळकर.  

चहा घेऊन जरा मन शांत झाल्यावर सरांनी पेडणेकरांना फोन लावला.

“पेडणेकर इथे जरा घोळ झाला आहे. आपल्याला मीटिंग करावी लागेल. उद्या सकाळी येता ?” – वाघूळकर.

.. .. .. .. 

“Vat रिटर्न्स मध्ये चूक झाली आहे. आपण बराच जास्ती टॅक्स भरलेला आहे अस लक्षात आलंय.” – वाघूळकर.

.. .. .. ..

“गेल्या पांच वर्षात” – वाघूळकर.

.. .. .. ..

“साडे तीन करोंड” – वाघूळकर.

.. .. .. ..

“म्हणजे अजून आठ दिवस काहीच होऊ शकत नाही ?” – वाघूळकर हताश.

.. .. .. ..

“ठीक आहे.” – वाघूळकर म्हणाले आणि फोन ठेवला.

“हुशः कठीण आहे.” – वाघूळकर माझ्याकडे पाहून म्हणाले.

“काय झालं सर ?”

“पेडणेकर म्हणतात की काळजीच काही कारण नाही. जे काही असेल ते पाहून घेऊ. पण टॅक्स ची कामे पिंगळे बघतात. आणि ते आउट ऑफ इंडिया आहेत. आठ दिवसांनी येतील, तेंव्हा मीटिंग करू.” – वाघूळकर.

“मग आता ?”

“ते थांबा म्हणाले तरी आपण, आठ दिवस थांबू शकत नाही. उद्याच अविनाश सरांच्या कानावर घालायला हव. तेंव्हा चोरघडे be prepared to face the situation. उद्या न जेवताच या. नाश्ता, जेवण सर्व इथेच सरांच्या केबिन मधे होणार आहे. काय ताट वाढून ठेवलं आहे ते उद्याच कळेल. तेंव्हा तयारीत रहा.” – वाघूळकर निराश झालेले दिसत होते.  

मी नुसतीच मान हलवली. मीटिंग संपली.

दूसरा दिवस, दुपारी तीन वाजताची वेळ, battle ground अविनाश सरांची केबिन, एकमेकांना धीर देत मी आणि वाघूळकर सर पोचलो. अविनाश सर आणि नितीन सर दोघे ही आत होते. double firing ला तोंड द्यायच होतं.

“May I come in sir” – वाघूळकर.

“अरे या या तुमचीच वाट बघत होतो. काही महत्वाचं बोलायचं म्हणत होता. या बसा.” – अविनाश सर.

“सर चेक केल्यावर अस लक्षात आलं की आपण गेल्या पांच वर्षांपासून excess vat भरतो आहोत. कुठे चुकल ते ही कळल आहे. पण आता रिफंड क्लेम करावा लागणार आहे.” वाघूळकरांनी एक दमात सर्व सांगून टाकल, ओझं उतरवून टाकलं आणि नी:श्वास टाकला.

“किती जास्त भरला आहे.” – अविनाश सर.

“साडे तीन कोटी” – वाघूळकर.

शांतता.

“पांच वर्षांनंतर कळतय आपल्याला हे ?” – अविनाश सर.

“सॉरी सर, पण हो.” – वाघूळकर.  

“रिफंड मिळण्याची शक्यता किती आहे.” – अविनाश सर.

“रिफंड मिळेल पण प्रोसीजर किचकट आहे ती करावी लागेल आणि वेळ पण लागेल. वकील करावा लागेल.” – वाघूळकर.

“ठीक आहे. यांचा अर्थ पैसा सुरक्षित आहे. फक्त आपल्याकडे यायला वेळ लागेल एवढच” – अविनाश सर.  

मध्येच नितीन सर म्हणाले की त्यांना एक महत्वाची मीटिंग आहे तर जाऊन येतो. तासा  दिड तासात येईन तोपर्यन्त तुमच चेकिंग चालू द्या.  अविनाश सर म्हणाले ओके, तू जा आम्ही बघून घेऊ.

त्याच्या नंतर बराच वेळ आम्ही सरांना सर्व तपशीलवार माहिती देत होतो. सर्व झाल्यावर सर म्हणाले

“ठीक आहे. याच्यावर निर्णय घेउच, पण वाघूळकर, तुम्हाला मी मघा पासून पाहतो आहे की तुमची सारखी चुळबुळ चालली आहे. अजून काही शिल्लक आहे का सांगायच?” – अविनाश सर

“नाही सर पण झालेली चूक मनाला फार खाते आहे. इतकी मोठी चूक झाली एवढा मोठा फटका बसला, मग आमच्या अनुभवाचा काय फायदा. यांची रुख रुख लागली आहे फार. काही सुचत नाहीये.” – वाघूळकर खाली मान घालून म्हणाले.  

“जे झाल ते चुकच आहे. पण ही चूक कशामुळे झाली हे बघण जरुरीच आहे. याचा शोध घेतला का ?” – अविनाश सर.  

“आमची calculations चुकली” – वाघूळकर. 

“नाही. ती चुकली नसती. जर तुम्ही घोडे पेडणेकरांवर, आंधळा विश्वास ठेवला नसता तर नसती चुकली. त्यांनी दिलेले रिटर्न्स तुम्ही वर वर चेक करून फायनल केलेत. ही ती चूक आहे. तुम्ही जर बारकाईने बघितल असत तर मला खात्री आहे की अस झालच नसत. तुमच्या लक्षात आलच असत. असो. भविष्यात अस होणार नाही यांची काळजी घ्या. कारण आम्ही तुमच्यावर विसंबून राहतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही चूक झाली आहे ती positive आहे. म्हणजे आपले पैसे आपल्याला मिळतील. ते वाहून नाही गेलेत. त्याची तरतूद आधीच केली असल्याने त्याचा ताण पण नाही जाणवला, पण जर उलट चूक झाली असती आणि साडे ती कोटींचा टॅक्स भरावा लागला असता तर फार महागात पडलं असतं. एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद कशी केली असती ? कंपनी बंद करायची वेळ आली असती. तेंव्हा यांच्या पुढे सर्व गोष्टी फार बारकाईने बघत चला. घोडे पेडणेकर बाहेरची पार्टी आहे, सॉरी म्हणून मोकळे झाले असते. पण आपलं काय झालं असत?” अविनाश सर बोलत होते आणि आम्ही बसल्या जागीच वितळत होतो. सरांनी हत्याराविनाच आमचा वध केला होता. सरांनी अगदी अचूक शरसंधान केल होतं. घाव वर्मी बसत होते. सोसण्याशिवाय पर्याय नव्हता.

“हो सर आम्ही लक्षात ठेऊ. यापुढे चुका होणार नाहीत याची खबरदारी घेऊ. पण या वेळेस माफ करा. मनापासून सॉरी.” इति वाघूळकर.

चहा आला. “बर आता रीलॅक्स व्हा, चहा घ्या मग आपण पुढच बोलू.” – अविनाश सर म्हणाले. आणि मग सर जणू काही घडलच नाही अश्या रीतीने बोलत राहिले.

आमच्या डोक्यावरचा ताण थोडा हलका झाला.

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.