Nikita raje Chitnis - 14 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | निकिता राजे चिटणीस - भाग १४

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

निकिता राजे चिटणीस - भाग १४

निकिता राजे चिटणीस

 

 पात्र  रचना

 

अविनाश ͬचटणीस                चंदन इंजीनीǐरंग चे मालक

नीतीन चीटणीस         अविनाश चिटणीसांचा मुलगा

निकीता चटणीस        नितीन ची बायको

शशीकला ͬचटणीस        नीतीन ची आई

रघुनाथ (मामा) राजे            निकीताचे मामा

पार्वती ( मामी )राजे            निकीता ची मामी

मुकुंद देशपांडे                 अविनाश चिटणीसांचे मित्र

अनंत दामले                  मुकुंद देशपांड्यांचे शेजारी  

चित्रा पालकर                 निकीताची कॉलेज ची मैत्रीण

विशाखा नाडकर्णी              निकीताची कॉलेज ची मैत्रीण

दिनेश कळसकर        निकिता चा कॉलेज चा मित्र

वसंत कुलकर्णी                निकिता चा कॉलेज चा मित्र

कार्तिक साने                  निकिता चा कॉलेज चा मित्र  

रघुवीर                      अͪवनाश चा ड्रायव्हर

पंडित                       नितीन चा ड्रायव्हर

वाटवे मॅडम                  चंदन इंजीनीǐरंग ची administrative manager

अंजिकर सर                  चंदन इंजीनीǐरंग चे administrative officer

साखळकर सर          चंदन इंजीनीǐरंग चे astt. administrative  officer

पांडे सर              चंदन इंजीनीǐरंग चे astt. Administrative officer

बबन                       चपराशी

चोरघडे सर                   चंदन इंजीनीǐरंग चे accounts officer

वाघूळकर सर                 चंदन इंजीनीǐरंग चे financial controller ͬ

भाग  १४

भाग १३ वरून पुढे  वाचा  .....

चोरघडे

“हो सर आम्ही लक्षात ठेऊ. यापुढे चुका होणार नाहीत याची खबरदारी घेऊ. पण या वेळेस माफ करा. मनापासून सॉरी.” इति वाघूळकर.

चहा आला. “बर आता रीलॅक्स व्हा, चहा घ्या मग आपण पुढच बोलू.” – अविनाश सर म्हणाले. आणि मग सर जणू काही घडलच नाही अश्या रीतीने बोलत राहिले.

आमच्या डोक्यावरचा ताण थोडा हलका झाला.

“आता मला सांगा तुम्हाला अचानक पांच वर्षांनंतर रिटर्न्स चेक करायची बुद्धी कशी झाली. अस काय घडलं, की तुम्हाला क्रॉस चेक करावस वाटलं.” – सर.

“चोरघडे सांगा” वाघूळकर म्हणाले.

“सर आपल्या कडे इंस्टीट्यूट मधून ट्रेनी येतात हे तुम्हाला माहीतच आहे. या वेळेची बॅच खूपच चांगली आहे. त्यात एक मुलगी तर कमालीची हुशार आहे. ती चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली म्हणाली मला पांच वर्षापूर्वीचे रिटर्न्स बघायचे आहेत. मी म्हंटल की स्टडी करता गेली पांच वर्षांचे रिटर्न्स पुरेसे आहेत. मग म्हणाली की तिला एक चूक आढळली आहे की जी पांच वर्षापासून वारंवार होते आहे. त्यामुळे आपण जास्ती टॅक्स भरला आहे. मला अजून मागे जायच आहे बघायला की कुठपासून ही चूक होते आहे.” मी थोडं थांबलो. सरांकडे बघितलं आणि पुढे सांगायला सुरवात केली. “मग मी तीच्याबरोबर रिटर्न्स तपासायला घेतले. आणि मला आढळल की ती म्हणतेय ते बरोबर आहे. तिने रिटर्न्स वरून back calculations करून घोडे पेडणेकरांच वर्किंग अंदाजे, काय असेल ते सुद्धा करून ठेवले होते. सगळं पाहून खात्री झाल्यावर मी वाघूळकर सरांकडे गेलो आणि त्यांना पण सांगितल.”

सर, “हे सगळ झाल्यावर मी वाटवे मॅडमशी बोललो कारण आधीचे तीन महीने ती त्यांच्याकडेच होती. त्यांनी जे सांगितल ते ऐकून मी तर थक्क झालो. त्यानी सांगितल की चारच दिवसांपूर्वी, त्या तुमच्याकडे, तिने केलेल काम घेऊन आल्या होत्या. आणि तुम्ही तिच्या कामाला ग्रीन सिग्नल दिल म्हणून.”

“हो खरं आहे. ही तीच मुलगी आहे का ?” – सर.

“हो सर.”

सरांनी इंटरकॉम वरुन वाटवे मॅडम ना बोलावून घेतलं.

मॅडम आल्यावर १५ -20 मिनिटे चर्चा झाली. मग अविनाश सर मला म्हणाले की “त्या मुलीला बोलावून घ्या मला तिच्याशी बोलायच आहे. काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. इतकी हुशार मुलगी साधी ट्रेनी म्हणून कशी आली याचच आश्चर्य वाटतंय.”

मी बाहेर आलो आमच्या सेक्शन मध्ये जाऊन तिला सांगितल की मिस राजे, अविनाश सरांच्या केबिन मध्ये या. सरांनी बोलावलय.

“सर मी कशाला, तुम्हीच काय ते सांगा न.  माझ नाव कशाला, मला भीती वाटते” राजे खरंच घाबरली होती.

“अग तुला घाबरण्याच काही कारण नाही. तू चूक केली नाहीस, तर शोधून काढली आहेस. ये लवकर.”

मी केबिन मध्ये आलो. माझ्या मगोमागच ती पण आली. सर वॉश रूम मध्ये गेले होते. सर बाहेर आले मिस राजे आमच्या मागेच उभी होती तिच्या कडे त्यांच लक्ष गेल आणि म्हणाले

“अरे तू इथे काय करते आहेस ? नितीन तर मीटिंग ला गेला आहे तुला गाडी हवी आहे का, माझी गाडी घेऊन जा, आत्ता एक महत्वाची चर्चा चालू आहे  आणि मला त्यात व्यत्यय नकोय.  तू माझी गाडी घेऊन जा. ओके ? ठीक.”

आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहत होतो. कोणालाच काही कळेना की काय चाललं  आहे. साहेब या मुलीला  ओळखतात? काही समजत नव्हतं. ते  तिला गाडी, ते ही त्यांचीच घेऊन जायला का सांगत होते? आणि ते ही तिने न मागताच? नितीन सर मीटिंग ला गेलेत अस का सांगितल, तिचा काय संबंध? सगळेच प्रश्न आणि उत्तर शून्य. तेवढ्यात नितीन सर आलेत, त्यांनीही तिला पाहीलं,  त्यांनाही आश्चर्य वाटलेलं  दिसलं. आणि म्हणाले  “अरे तू इथे काय करते आहेस ? मी आत्ता कामात आहे इथे एक महत्वाची चर्चा चालू आहे. तुला गाडी हवी असेल तर माझी घेऊन जा,  मी बाबांबरोबर येईन.”

“सर तुम्ही हिला ओळखता ?” अविनाश सरांना तिघेही आम्ही एकदमच.

“व्हॉट डू यू मीन ? मी माझ्या सुनेला आणि नितीन त्याच्या बायकोला ओळखणार नाही ? तुम्हाला एवढं नवल का वाटावं  हेच मला समजत नाहीये. बर. एनि वे” आणि, राजे कडे बघून सर, म्हणाले “तू कशाला थांबली आहेस. आता नितीनची गाडी घेऊन जा. तो आलाय.”

“मी घरीच जायला निघाले होते पण चोरघडे सरांनी सांगितल की तुम्ही ताबडतोब बोलावलं म्हणून मी आले.” राजे म्हणाली.

“मी बोलावल? मी कशाला बोलावू? चोरघडे मी केंव्हा म्हंटलं की हिला बोलवा म्हणून?” – सरांचा मला प्रश्न.

“सर तुम्हीच म्हणाले की कॉल मिस राजे म्हणून.”

“राजे? माय गॉड, निकिता, तू ट्रेनी म्हणून आली आहेस इंस्टीट्यूट मधून?  हे सगळ तू केलस?” – आता सर आश्चर्याने म्हणाले.

“हो” – राजे.

“ही राजे नावाची काय भानगड आहे.? तू म्हंटलं असतस तर सरळ येऊ शकली असती. हे आडवळण कशाला?” सरांनी राजेला प्रश्न टाकला.

“मग मला अनुभव कसा आला असता. सगळ्यांशी मिळून मिसळून वागतांना जो अनुभव मिळाला, तो अमूल्य होता. म्हणूनच वाटवे मॅडम च्या मार्गदर्शनाखाली मी तो प्रोजेक्ट करू शकले. आणि इथे चोरघडे सरांनी मला फ्री हँड दिला आणि मार्ग दर्शन केल, म्हणून रिटर्न्स सारखी किचकट गोष्ट पण कळायला लागली. हे सगळ मी, डायरेक्ट आली असती तर शक्य झाल नसतं. इथला स्टाफ किती चांगला आहे हे कळलंच नसत. सगळे माझ्याशी छान छानच वागले असते. आणि आता सगळ्यांना कळल असलं, तरी जी मैत्रीची नाती निर्माण झाली आहेत ती थोडीच तुटणार आहेत.” राजे म्हणाली.

“तू नुसत कामच चांगल करत नाहीस तर भाषण सुद्धा छान करतेस. I am proud of you. नितीन, इस  बात पर चाय हो जाय, मग काय मंडळी काय म्हणताय? एंजॉय.” सर आता एकदम चांगल्या मूड मधे आले होते.

जायच्या आधी राजे मॅडम म्हणाल्या की “सर्वांना माझी एक विनंती आहे. माझ्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका. मला आहे त्याच भूमिकेत राहू द्या. सर म्हणाले त्या प्रमाणे, मी वाटवे मॅडम च्या मार्गदर्शनाखाली माझ प्रोजेक्ट करायला तयार आहे. पण मी मालकीण आहे हे कोणाला कळू नये अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय लोक माझ्याशी मोकळे पणाने बोलणार नाहीत. आणि  प्रोजेक्ट चा बोजवारा उडेल. तुम्हाला काय वाटत ?”

अवघड होत. पण जे काही राजे मॅडम बोलल्या त्यात अर्थ होता. तथ्य होत. थोडी  चर्चा होऊन सर्वांनीच ते मान्य केलं.

“आणि हो मला मॅडम म्हणू नका मला राजे म्हणूनच ट्रीट करा. कुठलीही एक्स्ट्रा फॅसिलिटी मला देवू नका. माझ चुकलं  तर रागवा, जेणेकरून, मी कोणीतरी वेगळी आहे अस कोणाला वाटू नये.”

आम्ही सगळ्यांनीच मान्य केल. मग मीटिंग चा नूरच बदलून गेला. चहा समोसा झाल्यावर मीटिंग च विसर्जन झाल. राजे आता अर्थातच नितीन बरोबर गेली. दिवस भराचं आलेल दडपण निघून गेल होत. आम्ही पण निश्चिंत मनाने घरी जायला निघालो.

बाहेर आल्यावर वाटवे मॅडम म्हणाल्या

“एक नवीन बॉस आलाय, पण तो बॉस नाहीये अस वागायचं आहे. काय चोरघडे जमणार आहे का ?”

“मॅडम हे काही तरी नवीनच आहे. मालकीण बाईंनाच अरे तुरे करायचं आणि वर अधून मधून रागावायचं पण, कठीणच आहे सगळं. अहो जो पर्यन्त माहीत नव्हत तोवर ठीकच होत पण आता जरा अवघडच आहे. आणि कोणी त्यांच्याशी वादा वादी केली तरी आपण लक्ष द्यायच नाही, कस काय होणार कळत नाही.”

“हो खरंय काहीही झाल तरी त्यांची आयडेंटीटी  उघड करायची नाही. डोक्यावरचा ताण वाढणार आहे हे नक्की. पुन्हा उद्या काही गडबड झाली तर साहेब आपल्यालाच म्हणणार, की तुम्ही काय करत होतात म्हणून.” – वाटवे मॅडम

“मॅडम काही वर्षांपूर्वी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन चा नमकहराम नावाचा सिनेमा येऊन गेला तो थोड्या फार फरकांनी असाच होता.”

“हो पण साम्य कमी आहे. कारण त्यात राजेश खन्ना यूनियन चे प्रॉब्लेम्स संपवण्यासाठी सगळं करतो. यूनियन तोडणे हा मुख्य कार्यभाग असतो. त्या उलट ही मुलगी कर्मचाऱ्याचा विकास कसा होईल हेच प्रामुख्याने बघणार आहे. हेतु फार वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे कंपनी ला खर्चही खूप येणार आहे. पण ही मुलगी कोण आहे, हे माहीत नसतांनाच साहेबांनी या प्रोजेक्ट ला हिरवा कंदील दिला आहे. त्यांनाही ही कल्पना फार आवडली आहे. चला आता निघूया. बराच उशीर झाला आहे. घरी वाट बघत असतील. गुड नाइट” – वाटवे मॅडम.

“ओके गुड नाइट.” आणि दिसल की नितीन सर आणि राजे काही बोलत होते. मग नितीन सर एकटेच कार मध्ये बसून निघून गेलेत. राजे नेहमी प्रमाणे बस स्टॉप कडे चालत निघाली. मी आवाज दिला राजे बराच उशीर झाला आहे मी सोडू का ? ती वळली, हसली,  मानेनेच  नको म्हणाली आणि चालू पडली.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com  

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.