Sir comes and goes - 8 in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 8

The Author
Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 8

घरी प्रथमाची आई तिची वाट पाहत होती. तिची घरी येण्याची नेहमीची वेळ केव्हाच टळून गेली होती. काही फोन देखील आला नव्हता. आईला आधी वाटले की ऑफिसमध्ये काही ज्यादाचे काम निघाले असेल, कदाचित त्यामुळे तिला आज घरी यायला उशीर झाला असेल. पण असे असते तर तिने फोन करून किंवा मेसेज करून कळविले असते. शेवटी न राहवून आईने तिला फोन लावला. पण छे, आईचा फोन देखील ती उचलत नव्हती. काही कळण्यास मार्ग नव्हता की प्रथमा गेली तरी कुठे. असे न कळविता ती कधीही घराबाहेर इतका वेळ राहिली नव्हती. आता मात्र आईच्या काळजाची धडधड वाढू लागली होती. काय करावे असा विचार करत करत फोन चाळत असतानाच तिच्या आईला धराचा फोन नंबर दिसला. आईला प्रथमाचे रुटीन माहित होते. ती ऑफिस सुटल्यानंतर धराला भेटूनच घरी येत असे. आईने विचार करत करतच धराला फोन लावला. पण आज ती धरालाही न भेटता, न काही सांगता तशीच ऑफिस मधून निघून आली होती. जर ती ऑफिस मधून निघाली होती तर मग ती घरी का आली नव्हती. आईचे डोके विचार करून करून भणभण करू लागले होते. आईने शेजारील टेबलवरील पाण्याचा ग्लास उचलला आणि त्याच टेन्शनच्या भरात गटागटा पाणी प्यायली.

तितक्यात दाराची बेल वाजली. घड्याळाचे ९ चे ठोके सुरु झाले. आईने आधी जाऊन दार उघडले. प्रथमा अगदी चिंब भिजलेल्या अवस्थेत, मातकट कपड्यांनिशी बाहेर उभी होती. आईने तिचे टेन्शन, तिची धडधड तिला जाणवू दिली नाही. प्रथमा घरात आली आणि आईला त्याच मातकट कपड्यांनिशी घट्ट मिठी मारली. आईला काही कळायच्या आतच ती ढसाढसा रडू लागली. आईला प्रथमा मधील बदल ती सहलीवरून आल्यापासूनच जाणवत होता. कदाचित तिलाही तो बदल आज लक्षात आला असेल कि काय असा विचार क्षणभर तिच्या डोक्यात झळकून गेला. पण अगदी क्षणभरच... नंतर ती फक्त प्रथमाला तशीच जवळ घेऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. ती तशीच बराच वेळ आईच्या कुशीत रडत होती. तशीच रडत रडत आई तिला तिच्या खोलीत घेऊन गेली. आईने आग्रह केल्यावर प्रथमा फ्रेश झाली. पण तिचा मूड अजूनही तसाच होता. आईशी एक शब्दही न बोलता आईच्या मांडीवर डोके ठेऊन ती तशीच झोपी गेली. आई फक्त तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघून तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला थोपटत होती.

प्रथमा दिवसभराचा क्षीण आल्यामुळे झोपी गेली होती. पण आईला मात्र तिची फार काळजी वाटत होती. नानातऱ्हेचे विचार तिच्या डोक्यात थैमान घालत होते. प्रथमाशी मोकळेपणाने बोलण्याची वेळ कदाचित आली होती. ती सकाळी उठल्यानंतर या विषयावर तिच्याशी सविस्तर बोलावे असा विचार करून आई देखील प्रथमाच्या शेजारीच आडवी झाली. उद्याची सकाळ नक्की काय बातमी घेऊन येणार असा विचार करत करत आईने डोळे मिटले.

सकाळी उठून आईने नेहमीप्रमाणे आपली सगळी कामे आटपली. नेहमीच्या वेळेला ब्रेकफास्ट टेबलवर ती प्रथमाची वाट पाहत होती. पण प्रथमा बाहेर आलीच नाही. थोडावेळ वाट पाहून आई तिच्या खोलीत गेली. ती अजूनही झोपलेलीच होती. आईने तिच्या कपाळाला हात लावून पहिले, प्रथमाला चांगलाच ताप भरला होता. आईने थर्मामिटर आणून प्रथमाचा ताप चेक केला. बराच ताप होता. आईने तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण प्रथमा उठली नाही. आईने पांघरूण नेटनेटके केले आणि प्रथमाच्या शेजारीच बसून राहिली. खरंच काल अचानक असे काय झाले , काय नाही हे कळण्याआधीच प्रथमा आजारी पडली होती. आई यावेळेला फक्त अंदाज बांधू शकत होती. प्रथमा उठल्याशिवाय तिला काहीच कळण्यास मार्ग नव्हता. तिच्या मातकट कपड्यांकडे बघून आई विचार करत होती कि प्रथमा अखेर गेली कुठे होती?...