The uncertainty of the drizzle... in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | सर येते आणिक जाते - 9

The Author
Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सर येते आणिक जाते - 9

 

 


प्रथमाला अचानक जाग आली. तिचे डोके अतिशय जड झाले होते. अंग अगदी तापाने फणफणत होते. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण लगेच काही तिला डोळे उघडता आले नाही. तापाने फणफणल्यामुळे तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. बेडवरुन उठण्याचा प्रयत्न केला. पण शरीरात अवसान नसल्यामुळे तोही प्रयत्न फसला. नाईलाजाने ती थोडावेळ तशीच पडून राहिली. आता ती जागीच होती. फक्त थोडे अवसान एकवटून डोळे उघडण्याचा प्रयत्न करत पडून राहिली होती. तेवढ्याच पाच ते दहा मिनिटांत कालचा आख्खा दिवस तिच्या डोळ्यांसमोरून गेला.

 

 

अस्वस्थपणा, उद्विग्नता, पहिल्यांदांच कामावर असूनही काहीही काम न करता चाल ढकल करत मार्गी लावलेला दिवस, घरी न परतण्याची झालेली इच्छा आणि समुद्रावर जाऊन एकांतात बसून लाभलेला स्वस्थपणा... सगळेच सध्या तरी तिच्या आकलना पलीकडचे होते. प्रथमाच्या हृदयरुपी समुद्रात कोणत्या सुनामीने थैमान घातले होते याचा थांग तिलाही नव्हता... असे आपल्याला का आणि काय होत आहे याचा विचार करत तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. अखेर थोड्या फार प्रयत्नाने तिने अखेर डोळे उघडले. अर्थात डोके अजूनही जड वाटत होते. तिने अंगावरील पांघरूण बाजूला केले. अंग तापामुळे अगदीच कमकुवत वाटत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. ती उठून बसली. तिने पाहिले तर आई तिच्या डोक्याशीच बसून होती. तिला प्रथमाला या अवस्थेत बघून किती त्रास होत होता हे प्रथमाला तिच्या चेहऱ्यावरून चांगले कळत होते.

 

 

आईने मायेने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवला. पण प्रथमाला परत रडू आले. आईला मिठी मारून ती परत तशीच रडू लागली जशी रात्री रडत होती. आईला तिला काय होते आहे आणि काल नक्की काय घडले, ती कुठे होती आणि यायला एवढा उशीर का झाला हे सर्व विचारण्याची फार इच्छा होत होती. कारण तिची अवस्था बघून तिला या घडीला आपल्या आधाराची आणि मार्गदर्शनाची किती गरज आहे हे तिच्या आईला चांगलेच कळत होते. पण प्रथमाचा ताप आणि आजारपण हे बरे होणे या सगळयापॆक्षा जास्त गरजेचे होते. आईने तिला सावरले आणि फ्रेश होऊन ब्रेकफास्ट टेबलवर येण्यास सांगितले. 

 

 

प्रथमा फ्रेश होऊन ब्रेकफास्ट टेबल वर आली. अर्थात तिला ताप आल्यामुळे तिच्या तोंडाला काहीही चव नव्हती. प्रथमा फ्रेश होऊन ब्रेकफास्ट टेबल वर आली. अर्थात तिला ताप आल्यामुळे तिच्या तोंडाला काहीही चव नव्हती. तिला काहीही खाण्यापिण्याची इच्छा नव्हती. पण आईने खिचडी करून ठेवली होती. तापात तोंडाला चव नसल्यामुळे हलके फुलके काहीतरी थोडे खायला हवे म्हणून खिचडी. नाहीतर गोळ्या घेता येणार नाहीत. हा सगळा विचार करून प्रथमा नको म्हणत असतानाही, आईने तिला थोडे फार जाईल तेवढे खायला लावले. आज ऑफिसमधूनही सुट्टी घेण्यास सांगितले. प्रथमाचे अवसान अजूनही पूर्ववत झाले नव्हते. त्यामुळे तिने ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. तिने तिच्या ऑफीसच्या पद्धतीला अनुसरून लिव्ह टाकली. तसेच कॉल करून मॅनेजरला देखील कळविले. कमीत कमी तीन ते चार दिवस तिला लिव्ह घ्यावी लागणार होती. त्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार तिने पार पडले. तिने औषध घेतले. आईला तिची अवस्था बघून तिने सध्या आराम करणे जास्त महत्वाचे वाटत होते. बोलण्यासाठी आणि विचार करण्यासाठी शरीरात जी तल्लखता हवी असते ती सध्या तरी तिच्या अंगात दिसत नव्हती. त्यामुळे आईच्या सल्ल्यानुसार प्रथमा आराम करण्यासाठी तिच्या खोलीत जाऊन बेडवर पडली. औषधाच्या परिणामामुळे तिला अगदी पाच मिनिटांतच झोप लागली.

 

 

 स्वप्नांतही तिला फक्त समुद्र, त्याचा किनारा, लाटांचा खळखळाट, घोंघावणारा वारा, अस्ताला चाललेला सूर्य, घरी परतत असलेले पक्ष्यांचे स्वछंद थवे आणि शांतता एवढेच काय ते जाणवत आणि दिसत होते.

 

 

स्वप्नांना खरंच अर्थ असतात का? की ती म्हणजे आपल्या मनात आणि हृदयात चाललेल्या विचारांचे नितळ प्रतिबिंब असतात... !!