garbage in Marathi Magazine by Gajendra Kudmate books and stories PDF | कचरा

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 75

    નિતુ : ૭૫ (નવીન તુક્કા) નિતુએ નવીનની વાતને અવગણતા પોતાની કેબ...

  • ભાગવત રહસ્ય - 179

    ભાગવત રહસ્ય-૧૭૯   કશ્યપ ઋષિ મધ્યાહ્ન સમયે ગંગા કિનારે સંધ્યા...

  • ફરે તે ફરફરે - 67

    ફરે તે ફરફરે - ૬૭   હું  મારા ધરવાળા સાથે આંખ મિલા...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 16

    ૧૬ પૃથ્વીદેવ   અરધી રાત થઇ ત્યાં ઉદા મહેતાના પ્રખ્યાત વ...

  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

Categories
Share

कचरा

नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपली भेट होत आहे. आजवरचा आपला प्रवास म्हणजे तुमचा आणि माझ्या नात्याचा अर्थात मैत्रीचा नात्याचा प्रवास हा फारच उत्तम आणि हवाहवासा वाटणारा असा होत आहे. ईश्वराकडे एकच मागणे मागतो कि तो असाच निरंतर प्रेम रसाने भरलेला असो. तर मित्रांनो, आजचा विषय मी निवडलेला आहे, तो आहे कचरा. कचरा या शब्दाशी आपण सगळेच नीगडीत आहोच. हा शब्द तर आपल्या दैनंदिन जीवनातील एक अवीभाज्य असा भाग म्हणून झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा विषय हा नात्यांचा नीगडीत असा आहे तो कसा ते तुम्हाला पुढे वाचल्यावर कळेलच.
मित्रांनो, आपले मनुष्य जीवन हे अनगीनत नात्यांनी भरलेले आहे. त्यात प्रेमाचे नाते आहेत, तर घृणेचे नाते ही आहेत. तसेच मित्रतेचे नाते आहेत तर शत्रुतेचे नाते ही आहेत. आज नवीन युगात अनगीनत असे नाते निर्माण झाले आहेत, ते फक्त आणि फक्त नावापुरतेच अस्तित्वात आहेत. मित्रहो, नाते ते कुठलेही किंवा कसलेही का नाही असोत, त्या नात्यात गोडी आपलेपण आणि सर्वात महत्वाचे तर त्यात प्रेम असणे हे फारच आवश्यक असते. प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते हे सर्वात श्रेष्ठ असे नाते असते. मी असे नाही म्हणत कि मित्रता हे नात श्रेष्ठ नाही, आहेच १०१ टक्के आहे, परंतु बाकी सर्व नात्यांप्रमाणे यातूनही प्रेम हा कधीच लोप पावलेला म्हणजे संपलेला आहे. या नात्यातील प्रेमाची जागा आता आपलपोटेपणा आणि स्वार्थाने घेतलेली आहे. आज सर्वत्र बघावे तर या अशा निष्काम आणि निष्क्रिय नात्यांचा भला मोठा डोंगर उभा राहून गेला आहे. ज्याला त्या कचऱ्याची ही किंमत राहिली नाही आहे. याला जबाबदार आणि याचे जन्मदाते आपण मनुष्यच आहोत. आपण मनुष्यानेच आपल्या स्वार्थासाठी या अशा खोट्यानाट्या, असंवेदनशील आणि मुख्य म्हणजे विकाऊ अशा नात्यांना जन्माला घातलेले आहे.
मित्रांनो, आपण सगळ्यांना स्वच्छता आवडते आणि ती असायलाच पाहिजे. तर त्या स्वच्छते साठी आपण दररोज झटतो म्हणा कि सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी आपण आपले घर आणि त्या सभोवतालचा परिसर ही स्वच्छ ठेवण्यास आपल्या घरात आणि घराचा बाहेर नितारोजचा झाडू मारतो. तेथे पडलेला केर कचरा सावडून उचलून बाहेर नेऊन फेकतो. कशासाठी तर आपले घर आणि परिसर हे स्वच्छ रहावे म्हणून, तेथे कसलीही घाण न रहावी म्हणून. परंतु आपल्या मनातील आणि वागणुकीतील घाणेच निवारण कसे बर करावे याचा आपण कधी विचार करतो काय. आपल्या मनात स्वार्थ हा ठासून ठासून भरलेला आहे आणि असतो, ज्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त आपली स्वार्थ पूर्तीच सर्वथा दिसते. हीच स्वार्थ पूर्ती करण्यासाठी आपण मनुष्य अशा खोट्यानाट्या फसवेगिरी करणाऱ्या नात्यांचा आसरा घेतो. हिंदीत एक हास्यास्पद अशी म्हण आहे ना कि , “ मतलब पडे तो गधे को भी बाप बनाना पडता है.” या म्हणीचा अर्थ आणि याचा स्वरूप हा फक्त हास्यास्पद का नाही असोत, परंतु जेव्हा कुणी दुसरा असे वर्तन आपल्यासोबत करतो तेव्हा जी आपल्या मनाला ठेस पोहोचते तेव्हा खरच या म्हणीचा गांभीर्याने अर्थ न म्हणता उचित अर्थ आपणास कळतो. तेव्हा आपणास कळते कि त्या दुसऱ्या व्यक्तीने त्याचा हेतू साध्य करण्यास आपल्याशी छल केला आहे आणि तो ही अशा खोट्यानाट्या, असंवेदनशील आणि मुख्य म्हणजे विकाऊ अशा नात्याचा नावावर.
मी आजवर आपल्या जन्माचा पासुन एकच गोष्ट ऐकत आलो आणि शिकत आलो, कि प्रेमात प्रेम आणि नात्यात नात म्हणजे माय लेकराच प्रेम आणि नात. ती एक मनुष्यरूपी माता असोत कि जनावर रुपी माता असोत तीच प्रेम तीचे वात्सल्य हे तीचा लेकारांचा प्रती सर्वथा निस्वार्थ आणि भेदभाव रहित अशी असते. परंतु आजचा या कलियुगात या अशा पवीत्र आणि निस्वार्थ अशा नात्याला ही स्वार्थाचा रंग चढू लागला आहे. आपण कित्येक असे उदाहरण ऐकतो कि अलाण्याने त्याचा आईशी दगा केला. फलाण्याने त्याचा आईला वृद्धाश्रमात नेवून टाकले किंवा तीचा छळ केला. यासारखे अनेक आहेत जे इथे लिहिण्यासारखे नाही आहेत. अशा या उदाहरणा पासून एकच सार नीघतो कि मुलाने किंवा मुलीने माय लेकराचा पवीत्र आणि निस्वार्थ अशा नात्याला काळीमा फासली आहे. या उदाहरणात लेकरांनी धनाचा लोभात येऊन, मुलाने त्याचा पत्नीचा तर मुलीने तीचा पतीचा कुवीचाराना बळी पडून असे कुकृत्य केले आहे आणि असेल. परंतु याउलट मी एक अशी घटना मागील काही वर्षात ऐकली कि अनुभवली होती कि, पर पुरुषाचा वासनामय प्रेमासाठी जन्मदेत्या आईनेच आपल्या लेकरांना वाऱ्यावर सोडून दिले, अथवा विष देऊन त्याचे प्राण घेतले. याचप्रमाणे हिंदीत आणखी एक छान अशी म्हण होती, होती यासाठी म्हणत आहो कि ती म्हण आता सर्वथा बदलून गेलेली आहे. तर ती म्हण होती, कि “ पूत कपूत कहलाये पर न माता कहे कुमाता ” ही म्हण शब्दशा अचूक नाही आहे परंतु याचा अर्थ आणि सार तुम्ही विद्वान असे माझे भाऊ बंध आणि आया बहिणी आहात त्या अचूक अशा समजू घ्याल. आजचा कलियुगात या म्हणीला सर्वथा उलट करून दिलेले आहे. आधी लेकरच माय लेकराचा पवीत्र आणि निस्वार्थ नात्याला काळीमा फासायचे, परंतु आता जन्मदेती माता ही या पवीत्र नात्याला काळीमा फासण्यात मागे नाही राहिली.
आज इतरत्र बघावे तर प्रत्येक मनुष्य एकमेकांशी स्वार्थ रुपी नात्याचा वशीभूत होऊन एकमेकांशी अक्षम असे वर्तन करतात. सगळ्यांचा कृत्यात आणि वर्तनात एक स्वार्थ लपलेला आसतो. स्वार्थ या एकाच नात्यासाठी मनुष्य परक्यांचा काय तर आपल्याच रक्ताचा नात्यांचा खुन करण्यास मागे पुढे काही बघत नाही. पती आपल्या पत्नीसोबत, तर पत्नी तिचा पतीसोबत, शेजारी त्याचा शेजाऱ्यासोब्त, मीत्र त्यांचा मीत्रांसोबत, लेकर त्यांचा आईवडीलासोबत, आणि धर्तीवरील प्रत्येक व्यक्ती इतरा सोबत या स्वार्थ रुपी नात्याचे संबंध ठेवतो. या स्वर्थामुळे पृथ्वी वरील प्रत्येक नाते संबंधातील आत्मा आणि गोडी मरून गेलेली आहे. या मुळे हे सगळे नाते निर्जीव होऊन गेलेले आहेत आणि म्हणूनच मी या निष्क्रीय निर्जीव नात्यांचा पसाऱ्याला कचरा म्हणून संभोदतो आहे. आपल्या संपूर्ण मानवी जीवनात जीतका भौतीक, डोळ्यांनी दिसणारा कचरा म्हणा कि कचऱ्याचे डोंगर दिसतात त्यापेक्षाही जास्त हे न दिसणारे स्वार्थरूपी नाते संबंधांचा कचरा सर्वत्र पसरलेला आहे. आज प्रत्येक दुसरा मनुष्य स्वतःला स्वच्छ आणि सज्जन म्हणून सगळीकडे मीरवत असतो त्याच मनुष्याचा मनात आणि अंत करणात या न दिसणाऱ्या स्वार्थ रुपी कचऱ्याचा सर्वात जास्त साठा साचलेला असतो. तो लाख अवतीभवतीच्या लोकांना मूर्ख बनवत असेल परंतु त्याचे स्वतःचे मन आणि अंत करण त्याचा हा धूर्तपणा जाणते.
या स्वार्थ रुपी कचऱ्याचा सर्वात जास्त नुकसान किंवा हानी ही झाली आहे ती माणुसकी या नात्याची. माणसा सारख्या माणसात माणुसकी राहिलीच नाही, तो एका जनावरात परिवर्तीत होऊन गेला आहे. यामुळे मनुष्य पाप करतो तरी त्यात त्याचा स्वार्थ असतो, पुण्य करतो तरी त्यात त्याचा स्वार्थ असतोच. त्याचप्रमाणे प्रेम, राग, मदत, शत्रुता यासारखे अनेक कृत्य करतांना मनुष्य निस्वार्थ असा विचार करतच नाही. त्याची निस्वार्थ अशी प्रवृत्ती आणि सवय ही लोप पावून गेली आहे. मनुष्य आपल्या गरजेनुसार नाते बंध बनवतो आणि आपल्या गरजेपुर्ती पर्यंत ते स्वार्थरूपी नाते पाळतो. यातील आणखी एक गंमत आपणास सांगू इच्छितो कि आपण मनुष्य दिवसंदिवस नवनवीन क्षेत्रात प्रगती करून राहिलो आहेच. त्याच बरोबर नाते बंध नीभवण्याचे नवनवीन प्रकार शोधण्यास प्रवीण होऊन राहिला आहे. मनुष्य उच्च आणि त्यापेक्षा ही उच्च शिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्तेचे उदाहरण आणि त्याची महती ही सगळ्या जगाला दाखवून राहिले आहेत ही सर्वथा चांगलीच बाब आहे. परंतु याचबरोबर याच प्रवीणता पूर्ण बुद्धीनेच मनुष्य नवनवीन नाते बनवू आणि नष्ट करू लागला आहे. मुख्य म्हणजे मनुष्याला इतकी जास्त समझ आलेली आहे कि कुठले आणि कसले नाते किती वेळ आणि कसे नीभवायचे किंवा पाळायचे याबद्दलचे दुर्मिळ ज्ञान त्याला जास्त प्रमाणात उमजू लागले आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि मनुष्याला नात्याची अवधी ठरवण्याची उत्तम अशी संधी लाभली आहे. पूर्वीसारखा आजचा मनुष्य जन्मोजन्मी एकाच नात्याचा दडपणाखाली येऊन ते नात पाळणे सोडून एका निश्चित अशा काळानंतर त्या नात्यापासून स्वतःची सुटका म्हणा कि स्वतःला मुक्त करण्यास सक्षम झालेला आहे. या मुक्त होण्याचा नादात तीकडे कितीही प्रेमाचे ऋणानुबंध असतील तरीही ते तोडण्यास आजचा मनुष्य मागचा आणि पुढचा कसलाच विचार करत नाही. ते करणे त्याला सहजच सोपे होते कारण कि आजचा मनुष्य इतका विद्वान होऊन गेलेला आहे कि तो कुठल्याही नवीन उगवलेल्या नात्यात आणि बंधात हृदयातून नव्हे तर दिमाखाने आणि डोक्याने सामील होतो. तो असल्या नात्याची हद्द आधीच ठरवून ठेवतो, त्यात आपल्याला किती खोल जायचे आहे आणि किती लवकर पळ काढायचा आहे.
अशाच नात्यांना आजचा मनुष्याने temprory नाते असे नाव ठेवले आहे. माझी ही बाब १०१% बरोबर आहे, तुम्हीच बघून घ्या ना आज वर्तमान पीढीतील तरुणाईचे अर्थात आजचा पीढीतील लवबर्डसचे प्रेम म्हणा कि मित्र मैत्रिणीचे प्रेम एवढेच नाही तर सख्या जन्मदेत्या आई वडिलासोबतचे प्रेम हे फक्त आणि फक्त क्षणभरासाठीच असते. आजचा पीढीला हे नाते बंध डोक्यावरील एका भल्यामोठ्या ओझ्या सारखे वाटते. जीतक्या लवकर हे ओझ आपल्या डोक्यावरून उतरेल त्या क्षणाची वाट ही आजची वर्तमान पीढी मोठ्या आतुरतेने बघत असते. याचे एक उत्तम आणि नवीन पीढीतील एक नवीन क्रांती म्हणून मी त्याचे संभोदन करतो. ते म्हणजे लीव इन रीलेशन, आजचा पीढीने हे नवीनच अस्त्र हो मी अस्त्रच म्हणणार याला, नुसते अस्त्रच नव्हे तर त्यांचा चैनीचे अस्त्र. आपल्या भारतीयांची संस्कृती ही आपण सगळ्यांनाच माहित आहे. त्याच प्रमाणे लहान मोठ्यांबद्दल आदरभाव मानसन्मान आणि सर्वात महत्वपूर्ण अशी गोष्ट म्हणजे लाज लज्जा. पूर्वीचा पीढीतील मनुष्य ते पुरुष असोत कि स्त्री असोत. त्यांनी आपली लाज लज्जा राखण्यासाठी क्षणोक्षणी आपले प्राण ही गमावले होते. परंतु आपल्या लाज लज्जेला आणि संस्कृतीला क्षणिकसा धक्का ही लागू दिला नाही. त्यावेळेचा पुरुष आणि स्त्री ने एकमेकांशी संबंध ठेवले ते ९९ % विवाहानंतर १ % ची मी मुभा त्यांना देतो. तर त्यावेळेस विवाह्पुर्वीचे संबंध सर्वथा अश्लील आणि आपल्या संस्कृतीला न शोभणारे असे वर्तन समझले जायचे आणि आजही पुष्कळ मनुष्य जे आजचा नवीन पीढीतील आहेत ते आजही या गोष्टीला प्रधान्य देतात. मी जे १% ची मुभा दिली त्यात असे लज्जास्पद संबंध जरी असतील ते ही फारच लपून छपून होत असतील. परंतु आज वर्तमानात या पीढीने जे अस्त्र शोधून काढले आहे त्यानुसार तर परपुरुष आणि परस्त्री हे विवाहाचा आधीच पती पत्नीसारखे स्वच्छंद एकाच छताचा खाली राहू शकतात कि पती पत्नीसारखे वागू शकतात. यात एक आणखी कायदा आहे कि एक वर्ष दोघेही सोबत असतांना दोघांत शारीरिक संबंध होऊ शकतात किंवा ते दोघेही आपसात सहमतीने करू शकतात याचा कायदेशीर दोघांना अधिकार आहे. एक वर्षाचा अवधीनंतर जर दोघांनाही असे जाणवले कि ते दोघे संपूर्ण आयुष एकमेकांसोबत आनंदात जगू शकत नाही, तर त्याच वेळेस ते कुठल्याही अतीरिक्त डोकेमारी शिवाय वेगळे होऊ शकतात आणि त्यानंतर पुन्हा कुठल्या नवीन जोडीदार सोबत पुन्हा एका नवीन करारानुसार एक वर्षाचा अवधी सोबत राहू शकतात. या अस्त्रामुळे त्यांना उघळ उघळ त्यांची ऐयाशी करण्यास परवाना म्हणा कि परवानगी मीळून जाते. पुरुष तर सर्वथा निर्लज्ज आणि वासनेने हापापलेला असतोच परंतु या नवीन अस्त्राचा उपयोग आजचा नवीन पीढीतील स्त्री ही फारच जोमाने करून राहिली आहे. तर मित्रांनो, वरील कथन सांगण्याचा माझ्या हा उद्देश होता कि या पीढीतील स्त्री आणि पुरुष यांचात मन आणि हृदयाचे नव्हे तर वेळ काळ कालावधी आणि सर्वात जास्त महत्वपूर्ण म्हणजे शरीराचे संबंध आणि नाते दोघांत असते कि घडते. त्या नात्यात फक्त आणि फक्त स्वार्थ असतो तो शरीर सुखाचा. त्यात कसलाच ऋणानुबंध आपुलकी मुख्य म्हणजे त्या नात्याबद्दल गोडी आणि आत्मा हा नसतोच. अशा खोट्यानाट्या, असंवेदनशील आणि मुख्य म्हणजे विकाऊ अशा नात्यात असतो एक करार. म्हणून मी अशा अशा खोट्यानाट्या, असंवेदनशील आणि मुख्य म्हणजे विकाऊ नात्याचा डोंगराला कचरा म्हणतो.
तर मित्रहो, मला जे काही बोलायचे होते ते मी तुमचा पुढे ठेवले याबद्दलचा तुमचा चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया मला तुमचं कमेंट्स चा रूपाने जरूर कळवा. पुन्हा तुमचा निरोप घेतो पुन्हा नव्याने तुमचा पुढे हाजीर होण्यासाठी.

धन्यवाद
गजेंद्र गोविंदराव कुडमाते