A benevolence to smile in Marathi Motivational Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | हसवीणे एक परोपकार

Featured Books
Categories
Share

हसवीणे एक परोपकार

नमस्कार मीत्र हो, आज पुनः एका नवीन विषयासोबत तुमच्यापुढे उपस्थित झालेलो आहे. मित्र हो हसने हे सर्वांनाच माहीत है. अर्थातच हसण्याविणा असा एकही मनुष्य आपल्याला भेटणार नाही. ज्याने हसणे या सुखद आनंदाला अनुभवले नसेल. हसण बरं एक मौल्यवान अशी औषधि आहे. जी आपल्या जिवनातून अनगिनत अशा रोगांना दूर पळवते. हसण्यासारखे एकदम सोप्पे काम कुठलेच नाही, पण याला एक अट आहे. जर तुमचे मन प्रसन्न असेल तरच सहज हास्य ओठंतून बाहेर येते.
तर मित्र हो, हसण्यापेक्षा हसवीणे हे एक श्रेष्ठ कार्य आहे. वरती मी जे काही बोललो कि हसणे सुद्धा कठीण काम आहे. आता तुम्ही म्हणाल एकदा म्हणता कि हसणे सोप्पे असते आणि चटकन म्हणता कि हसणे कठीण कार्य आहे कसे? तर मित्र हो मी आपल्या कथनावरती ठाम आहे. तुम्हाला सविस्तर सांगतो, दुसर्‍या कुणावर हसणे सोप्पे असते आणि
स्वत:वर हसणे फारच कठीण असते. समजा चार व्यक्ती एकाच ठिकाणी गोळा झाले आहेत. ते मित्र आहेत, नाही आहेत. त्यांचा गप्पा गोष्टी रंगल्या आहेत. त्यात चारही जण एका पाचव्या माणसाकडे बोट दाखवून काहितरी व्यंग करीत असतील. तर ती चारही व्यक्ती मोठमोठ्याने हसतात. देवाने आपल्या तोंडात ३२ दात दिलेले असतात. कुणाकडे जर त्यांपेक्षा जास्त दात असतील तर ते पण दाखवून खीद खीद करुन हसतात. परंतु त्या चारमधून एका व्यक्तीवर व्यंग होऊन राहिला तर त्याला सोडून बाकी तीन जण हसतात. पण एका व्यक्तीला राग येतो. अखेर भांडण होतात अवजारे निघतात. म्हणून म्हणतो दुसऱ्यांवर हसणे सोप्पे असते, पण स्वतःवर हसण्यासाठी वाघाप्रमाणे जिगरा लागतो.
असाच जिगरा घेऊन काही व्यक्ती या धरतीवर जन्माला आली. आवर्जून त्या व्यक्तीचे नाव घेऊ इच्छितो. कारण
त्याच्या शीवाय कुणाला मी बघितले नाही. तो व्यक्ती होता चार्ली चॅपलीन. हा व्यक्ती बाहेर देशातील एक नट होता. त्याने अनेक मूकचित्रपटांत काम केले. त्या चित्रपटात स्वत:वर वेगवेगळे व्यंग करून त्याने सर्व श्रोत्यांच्या ओठावर हसू आणले. त्या शूटिंगच्या दरम्यान त्याला स्वत:ला कित्येक वेळा इजा झाली असेल. ते त्यालाच माहित. आपण हसताना त्याचा विचार करत नाही. त्या वेळेस त्या व्यक्तीने खरंच एक परोपकाराचं मानव जातीवर केले होते. नाहीतर आता वर्तमानमध्ये टीव्हीवर काही कार्यक्रम सुरू आहेत. त्या कार्यक्रमात नुसते को स्टार्स आणि जे प्रेक्षक म्हणून पैसे देऊन बसवलेले लोक असतात. त्यांचा अपमान केला जातो, तिथे कुणाला काहीच बोलण्याची मुभा नसते. तेथे फक्त तोच व्यक्ती बोलू शकतो जो मोठा सेलिब्रिटी असतो. पाहुणा म्हणून तेथे आलेला असतो. पैशासाठी ते कोस्टार्स आणि पैसे देऊन बसवीलेले लोक असतात अपमान सहन करतात व आपण त्या अपमानावर हसतो.
मित्र हो, आजकाल एक नवीन बीमारी म्हणतो बाहेर देशातील काही कार्यक्रम टिव्हिवर आणि मोबाइलवर तर आधीच दाखविताच. तर मी बोलतो PRANK या शोबद्दल. यामध्ये आपण रस्त्यावर चालत असताना, कुठे बसले असतांना त्यांना आपल्या आजूबाजूला कॅमेरे सेट करुन कुणी व्यक्ती तो पुरुष असोत वा स्त्री असोत अनपेक्षित आपल्याकडे येऊन आपल्या बरोबर तशी काही वागणूक न म्हणता तसे कृत्य करतात. या कृत्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील हावभाव अचूक हे कॅमेरे टिपत असतात. संबंधित व्यक्तीला काहीच माहीत नसतं. इकडे सर्व रेकॉर्ड होत असतो उघड उघड त्या व्यक्तीच्या भावनेशी खेळ सुरु असतो, ते त्याला आवडो कि न आवडो. मित्र हो आपल्याला दाखविण्यात आलेली व्हिडिओ १०० मधुन काही निवडक असतात. जे व्हिडिओ दाखविता त्यात संबंधित व्यक्तीने माहीत झाल्यावर हास्य चेहऱ्यावर आणून त्या व्यंगाच्या स्वीकार केलेला असेल तो असतो. मला सांगा आपली मानसिक स्थिती कुठल्या टेन्शनमध्ये आहे. आपण कुठे चाललोय तर अशा प्रकारची व्यंग कुणी सहन करेल काय? तो व्यक्ती त्या व्यक्तीची माय बहिण घेऊन व्यंग करणार्‍या च्या कानाखाली वाजवले. माझ्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे की ज्या व्हिडिओमध्ये स्वत:चा अपमान झाला तो व्हिडिओ का नाही दाखवत.
तर मित्र हो, हसविणे हि एक निरागस कला आहे आणि ती प्रत्येकाकडे नसतेच. कुणाकुणाला देवाकडून लाभलेले वरदान असते. जसे देवाने त्यांना याच कामाकरिता पाठविली आहे. कोणीतरी म्हटले आहे की खरं सुख त्यात आहे, की एका उदासलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू आणू शकता. यापेक्षा श्रेष्ठ पुण्यकर्म कुठलेच नाही. परंतु हसवीतांना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे, की आपण जे व्यंग करतोय त्यामुळे कोणत्याही मनुष्याची, प्राणी, धर्म यांच्या भावनेला ठेच न लागायला हवी. अलगद से निरागस हास्य जर तुम्ही एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणू शकत असाल तर तुमच्यासारखा जिगरबाज कुणीच नाही.
मित्र हो, आपल्याला खुणवायची जी प्रवृत्ती आहे तीला त्यागली पाहिजे. म्हणजे आपण ५ बोटांमधिल १ बोट कुणाकडे खुणावतो त्यावेळेस आपल्यालाचं बाकीची ४ बोटे आपल्या स्वत:ला पुन्हा खुणावत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. बाकी आपण सर्वच समजदार आहात.
धन्यवाद

स्वलिखित

गजेंद्र गोविंदराव कूडमाते