Mala Space havi parv 1 - 40 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४०

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४०

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४०

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाचं पहिलं समुपदेशनाचं सेशन झालं.
आता हिची काही केमोथेरपी झाल्या आहेत.समुपदेशनाची काही सिटींग झाली आहेत. आता पुढे


प्रियंका कितीतरी वेळ आरशासमोर उभी राहून स्वतःला निरखत होती. केमोथेरपीमुळे तिचे बरेच केस गेले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. त्वचेचा रंग काहीसा भुरकट झाला होता. त्वचा निस्तेज दिसत होती. रोज स्वतःचं रूप आरशात बघून प्रियंकाला रोज आपल्या चेहऱ्यावर नवीन बदल दिसायचा आणि तिला धक्का बसायचा. तिचे डोळे वाहू लागायचे पण त्याबरोबर तिचं दुःख वाहून जात नसे उलट अजून तीव्र होत असे.

खोलीत येता येता निरंजनने प्रियंकाला आरशासमोर ऊदासपणे उभी राहून रडताना बघीतलं तशी त्याच्या हृदयात एक कळ उठली.

आपले डोळे पुसून तो प्रियंका जवळ आला. निरंजनला आपल्या मागे उभा बघून प्रियंका एकदम जोरात किंचाळली. क्षणभर काय झालं हेच निरंजनला कळलं नाही. त्याचे आईवडील प्रियंकाची किंकाळी ऐकून धावत त्याच्या खोलीत आले.

प्रियंका दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा लपवून हमसून हमसून रडत होती. घरातल्या घरातच पण एवढ्या घाई घाईने चालत नाही तर जवळपास धावतच आल्याने निरंजनच्या आईबाबांना धाप लागली.

"काय झालं?"

त्याच्या घाबरलेल्या आवाजातील प्रश्न ऐकून निरंजन भानावर आला.

"अं!"
निरंजन गोंधळलेला होता.

"अरे असा काय बघतोय? काय झालं ?एवढ्या जोरात प्रियंका किंचाळली?"

"माहिती नाही."

"माहिती नाही? अरे मग विचार नं तिला?"

बाबांनी हे म्हटल्यावर निरंजनला आपण काय करायला हवं हे लक्षात आलं.तो प्रियंकाजवळ पलंगावर बसला

"प्रियंका काय झालं का एवढ्यांदा किंचाळली?"

आपल्या चेहऱ्यावरील हात बाजूला करून प्रियंका रडत म्हणाली,

"बघीतलं मी कशी दिसतेय.भेसूर दिसतेय. माझा चेहरा आता अजून भेसूर होत जाणार. मी आत्ताच का नाही मरून जात?"

असं म्हणून प्रियंका रडतच निरंजनच्या मांडीवर कोसळली. निरंजनही तिचं बोलणं ऐकून घाबरला.त्याला काय बोलावं कळेना.

निरंजनचे आईबाबा अजूनही ते सावरले नव्हते. त्यात प्रियंकाचं हे बोलणं ऐकून अजून धास्तावले. निरंजनच्या आईच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.त्यांचं मन प्रियंकासाठी कळवळून उठलं.

प्रियंकाला निरंजन हळुवारपणे थोपटत होता. हळुहळू तिचं रडणं आटोक्यात येऊ लागलं.

"निरंजन घरातले सगळे आरसे काढून टाक. कारण या आरशासमोर उभी राहिल्यावर प्रियंका फक्त तिचं दर्शनी रूप बघतेय.जे आता भेसूर होत जाणार आहे.पण तिचं आंतरिक रूप आपल्या सगळ्यांच्या मनात आहे जे खूप सुंदर आहे. "

निरंजनचे बाबा म्हणाले.

"प्रियंका …
प्रियंकाच्या खांद्यावर हात ठेवून आई म्हणाली,

"बेटा हा आरसा आपलं खोटं रूप दाखवतो. ते बघून तू घाबरलीस. बाळा तुझं खरं रूप तुला बघायचं असेल तर आमच्या डोळ्यात बघ.आमच्या डोळ्यांचा आरसा तुझं खरं रूप दाखवेल. "

"खरय ग पोरी. या आरशातील खोटं रूप बघून तुझी हिम्मत खचेल. आमच्या डोळ्यात तुला तुझं खरं रूप बघून जगण्याची हिंमत मिळेल. आपण सगळ्यांनी आता कॅंन्सरला स्विकारलय. मग कशाला खोट्या रूपात अडकतएस?"

"प्रियंका तू आमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे. तुझं खरं रूप या आरशात नाही ग आमच्या मनात आहे, डोळ्यात आहे. तू आमची आहेस नं. मग एवढं एक नं?"

प्रियंकाचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन अत्यंत केविलवाण्या आवाजात निरंजन प्रियंकाला म्हणाला. निरंजनचा केविलवाणा चेहरा आणि आईबाबांचं प्रेम बघून प्रियंकाला पुन्हा हुंदका फुटला.

"आईबाबा, निरंजन मी नाही आता कधी माझा चेहरा आरशात बघणार. मी नाही आता माझ्या संपून जाणा-या दिखाऊ चेहे-याच्या प्रेमात पडणार. मला नेहमीसाठी तुमच्या मनाच्या आरशात बघायचय."

"बाळा ते तर तू आहेसच. तू आमच्या मनात आहेसच. या मनाच्या आरशात अजून कोणा दुसऱ्याचा चेहरा येऊच शकणार नाही. एवढी खास आहेस तू आमच्यासाठी."

आई खूप प्रेमळ आवाजात म्हणाली.

"निरंजन आता जेवायची वेळ झाली आहे. या तुम्ही दोघं बाहेर. प्रियंका तू लढवय्या आहेस. रडायचं नाही."

एवढं बाबा म्हणाले आणि आई बाबा दोघंही खोलीबाहेर गेले.

"निरंजन किती तुम्ही सगळे छान समजूतदार आहात. माझच नशीब खोटं की खूप कमी काळ देवाने मला तुमचा सहवास दिला."

"हे बघ प्रियंका एवढे दिवस आपल्या हातात आहेत हेही नसे थोडके. जर एवढेही नसते मिळाले तर… असा विचार कर. आता दिवसातील प्रत्येक क्षण आपण एकमेकांसोबत जगायचं. बाकी कोणताही विचार करायचा नाही.आलं लक्षात?"

"हो."

"चल जेवायला.तुझी जेवणाची वेळ टळायल नको. "

"हं"

असं म्हणून प्रियंका निरंजन कडे बघून छान हसली तसा
निरंजनपण हसला.


***

याच दिवशी संध्याकाळी प्रियंकाचे आईबाबा, सुधीर आणि नेहा प्रियंकाला भेटायला तिच्या सासरी आले.

सकाळी प्रियंका आरशात बघून रडली हे बघून निरंजनच्या बाबांनी प्रियंकाच्या बाबांना फोन करून सगळा प्रसंग सांगितला आणि संध्याकाळी प्रियंकाला भेटायला सगळ्यांनी यावं पण सकाळचा प्रसंग त्यांना माहीत आहे असं दाखवून नये अशी विनंती केली. म्हणून आत्ता सगळे आले.

"या बरं झालं आलात बरेच दिवस झाले तुमची चक्कर नाही झाली."

निरंजनचे बाबा हसत प्रियंकाच्या बाबांना म्हणाले.

"हो खरंच बरेच दिवस झाले."

"काका आज अनायसे सुट्टी असल्याने मीच म्हटलं आपण सगळे जाऊ प्रियंकाकडे"

सुधीर म्हणाला.

"बरं झालं सगळेच आलात आता जेऊनच जा."
निरंजनची आई म्हणाली.

"नको हो थोडावेळ बसून आणि निघू."
प्रियंकाची आई संकोचून म्हणाली.

"अहो त्यात काय झालं. नेहमीचंच जेवायला करणार आहे. आमच्या बाई येतीलच एवढ्यात"

सगळे जण वातावरण नाॅर्मल असल्याचे दाखवत गप्पा मारत होते. तेवढ्यात बाहेर बोलण्याचा आवाज ऐकून प्रिय़का तिथे आली.

"अगं बाई आज सगळे एकत्र आले?"

"हो. तूच म्हणतेस नेहमी एकटे येता म्हणून आज मीच बाबांना म्हटलं आज आपण सगळे जाऊ."

सुधीर म्हणाला.

"खरच का की थाप मारतोय?"

"नाही ग बाई मी कशाला थाप मारेन. आईला विचार जर माझ्या वर विश्वास नाही तर."

"नाही रे तुझ्या वर कशाला अविश्वास असेल. पण आज सगळे आलात म्हणून छान वाटलं. असं वाटतं आहे की आपलं आज गेट टूगेदर आहे."

"प्रियंका तूच सांग आता तुझ्या आईला. मी रात्री इथेच जेवा म्हटलं तर नाही म्हणतात.आज जमलोच आहोत तर करू या गेटटुगेदर."

निरंजनची आई प्रियंकाला म्हणाली.

"आमची बायको म्हणते ते बरोबर आहे बरं नाहीतर ठरवून सुद्धा कधी एकत्र जमता येत नाही."

"बरं ठीक आहे थांबतो आम्ही जेवायला. "

प्रियंकाच्या बाबांनी हसत निरंजनच्या आईच्या जेवणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

सगळेजण सकाळचा प्रसंग आपल्याला माहीत असल्याचं जरासुद्धा जाणवू न देता गप्पा करत होते.

"काकू काय मदत करू सांगा?"

नेहा निरंजनच्या आईला म्हणाली.

"अगं मदत कशाला हवी. येतीलच एवढ्यात स्वयंपाकाच्या बाई."

निरंजनच्या आईने नेहाला एकाबाजूला घेऊन सांगितले.

"नेहा स्वयंपाकाला बाई येतील. तू हातपाय धुवून प्रियंकाशी आतल्या खोलीत गप्पा कर. ऊगीचच बाहेरचा संसर्ग नको."

"हो काकू."

असं म्हणत नेहा हातपाय धुवून प्रियंका बरोबर तिच्या खोलीत गेली.


"नेहा माझ्या सासरचे लोक खूप देवमाणसं आहेत ग."

"हो प्रियंका खर्च खूप साधी आणि प्रेमळ लोकं आहेत."

"मला सांग प्रियंका तू आता ऑडी बुक्स ऐकतेस नं?"

"हो. खूप छान वाटतं. पुस्तकं आता हातात धरता येत नाहीत फार वेळ हात भरून येतात. हेडफोन लावून सहज झोपल्या झोपल्या कथा ऐकता येतात."

"आणखी कोणाच्या कथा सर्च केल्यात?"

"सध्या मी प्रदीप यांच्या विनोदी कथा ऐकतेय. खूप छान साध्या भाषेत विनोद असतात त्यांचे. इतकं हसायला येतं की तुला काय सांगू"

"मीपण कधी कधी ऐकते. ऋषी बरेचदा लवकर झोपत नाही. मांडीवर त्याला घेऊन पाय दुखतात. ते दु:ख कळू नाही म्हणून मी ऑडिओ बुक ऐकते."

"मीपण माझं दुःख विसरायला ऑडिओ बुक ऐकते."

तत्क्षणी नेहाला वाटलं आपण दु:ख हा शब्द उगीच वापरला. नेहा एकदम कावरीबावरी झाली. तिने प्रियंका कडे बघितलं. प्रियंका आपल्याच धुंदीत होती.

"नेहा कधीतरी व्हिडिओ काॅल करून ऋषीला दाखवत जा."

"हो अगं ऊद्याच करेन."

"तू ऋषीला तुझ्या आईकडे ठेवून आलीस का?"

"हो. काग?"

"माझ्या मुळे ऊगीचच सगळ्यांना ॲडजेस्टमेंट करावी लागते."

"अगं ॲडजेस्टमेंट कसली आली.नेहमी आम्ही मनात आलं की येतो. आज आईबाबांना पण आणलय त्यामुळे त्याला माझ्या आईकडे ठेवलंय. ती पण खूप मागे लागत असते ऋषीला माझ्याकडे सोड पण मीच नाही ठेवत."

"ऋषीला जवळ घेऊन तर मला आता नाही खेळता येणार पण निदान व्हिडिओ काॅल केला की बघता तरी येईल."

"हो. प्रियंका अगदी आठवणीने आमच्या पैकी कोणीही व्हिडिओ काॅल करत जाऊ. आता रडका चेहरा ठेवायचा नाही. ऋषीला अशी रडक्या चेहे-याची आत्या बघायला नाही आवडणार. आता हस आम्ही सगळे आलोय नं"

"तुमचाच सगळ्यांचा मला भक्कम आधार आहे."

"प्रियंका तुला गाणं म्हणायला, कविता म्हणायला आवडतं नं?"

"हो खूप आवडतं. काग?"

"तू हळू आवाजात तुला हवी ती गाणी, कविता रेकाॅर्ड करत जा. तुझी कवितांची वही काढ.मी शोधून देऊ का?"

"नको मी शोधेन.तू माझ्याशी गप्पा मार.तू बोलायला लागलीस की माझ्या मनातली अस्वस्थता दूर पळते."
प्रियंका आपल्या थकलेल्या डोळ्यांनी नेहाच्या टपो-या डोळ्यात खोलवर बघत म्हणाली.

"बरं."

असं हसून म्हणत नेहाने तिचा हात थोपटला. तेवढ्यात निरंजनच्या आईने प्रियंका आणि नेहाला जेवायला हाक मारली.
_________________________________
पुढे प्रियंकाच्या तब्येतीत कितपत सुधारणा होते बघूया.