Mala Space havi parv 1 - 41 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४१

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ४१

मला स्पेस हवी पर्व १ भाग ४१

प्रियंकाचं समुपदेशन चालू होतं, केमोथेरपी पण चालू होती तिचे छंद ओळखून विद्ध्वंस मॅडम तिला ॲक्टीव्हिटीज सांगत. ध्यान आणि व्यायाम पण सुरू झाला होता.

आता काय घडतंय या सगळ्यांच्या आयुष्यात बघू.

प्रियंकाचं आजारपण आता तीव्र रूप धारण करू लागलं होतं. दिवसेंदिवस तिचा थकवा वाढत चालला होता. चेहरा निस्तेज वाटायला लागला होता. पुर्विसारखी कोणत्याही गोष्टीला ती चटकन प्रतिसाद देत नसे कारण तिच्या मेंदूपर्यंत विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ समजायला वेळ लागत असे.

निरंजनची पण अवस्था खूप कठीण झाली होती. त्याच्या कंपनीत त्यांचं नाव चांगलं असल्याने कंपनीने प्रियंकाच्या आजारपणामुळे आणि त्याचे आईबाबा वयस्कर असल्याने वर्क फ्रॉम होमची सवलत त्याला दिली होती त्यामुळे तो जरा घरातून काम करत प्रियंकाकडे लक्ष देऊ शकत असे.


प्रियंका आता पूर्वीसारखी बडबड करत नसे. प्रियंकाला कॅंन्सर होऊन आता दीड वर्ष होत आलं होतं. या दीड वर्षात हळूहळू सगळ्यांचीच मानसिक आणि शारीरिक शक्ती क्षीण व्हायला लागली होती. निरंजनला कधी खूपच महत्वाची मिटींग आहे असं आधी कळलं तर निरंजन नेहाला सांगत असे. तेव्हा नेहा वर्क फ्रॉम होम घेऊन निरंजनच्या घरून काम करत असे. असं असेल तेव्हा नेहा ऋषीला आपल्या आईकडे सोडत असे.

निरंजन मिटींग मध्ये असताना नेहा प्रियंकाच्या खोलीत तिच्याकडे लक्ष देत काम करत असे. ही सगळी काय धावपळ करतात याचं काहीही ज्ञान आजकाल प्रियंकाला होत नसे कारण बराच वेळ ती औषधांच्या प्रभावाखाली असे.

प्रियंकाला वेळच्या वेळी जेवण देणे पण आता कठीण झालं होतं कारण ती आता पूर्वीसारखी जेवायला स्वयंपाक घरात येत नसे. अंथरुणावर तिला मागे बॅकरेस्ट लावून बसावं लागेल. अत्यंत हळूहळू तिला एकेक चमचा जेवण भरावं लागे. आता पातळ स्वरूपातील जेवण द्यावं लागे.

केमो आणि औषधं इतकी गरम पडायची की प्रियंकाला आतून आग व्हायची. ती कळवळून ओरडायची. अंगभर तेल चोपडून घ्यायची. तिला वाटायचं की अंगाला तेल आलं की अंगाची होणारी आग थांबेल. पण ही आग शरीराच्या आतून होत असल्याने वरून लावलेल्या तेलाचा काही उपयोग होत नसे.


आज निरंजन आलेल्या मेल चेक करत होता तेव्हाच प्रियंका ओरडायला लागली.

आग आग आग होतेय सगळ्या अंगाची.
मांडीवरचं लॅपटॉप चटकन बाजूच्या खुर्चीवर ठेवत निरंजन घाईने उठून प्रियंका जवळ गेला. हल्ली तिचे शब्दोच्चार पण स्पष्ट कळत नसत.

"ए निरंजन"

प्रियंका ओरडली.

"हे बघ मी तेल लावतोय प्रियंका."

निरंजनने तिच्या अंगावरची चादर बाजूला करून सगळ्या अंगाला तेल लावायला सुरुवात केली. आजकाल प्रियंकाच्या अंगाला कपडापण सहन होत नसे. त्यामुळे तिच्या अंगावर फक्त पांघरूण म्हणून पातळ साडीच घालत असत. प्रियंका आपली कूसपण स्वतःहून बदलू शकत नसे.

रोज सकाळी एक नर्स प्रियंकाला स्पंजीग करायला येत असे. दुपारभर मधून मधून प्रियंकाला कधी डाव्या तर कधी उजव्या कडावर झोपवावं लागे नाहीतर बेडसोर्स होण्याची भिती होती.

रोजचं ऑफिसचं काम, प्रियंकाची सेवा याने निरंजन थकून जात असे. रात्री जेव्हा त्याचा नेमका डोळा लागायचा तेव्हाच प्रियंका खूप वेदनेने विव्हळत असे. या सगळ्या मुळे निरंजनच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला.

त्या दिवशी सुधीरने निरंजनला बघून घाबरला.

"निरंजन तू कसा दिसतोय?आजारी पडशील अशाने"

"मला आजारी पडण्याची परवानगी नाही."

केविलवाणं हसत निरंजन म्हणाला.

"हे बघ हे बरोबर नाही.आपण आत्ता डाॅक्टरांशी बोलू. बारा बारा तासांच्या दोन नर्स ठेऊ. तुला नोकरी करायची आहे. इतकं इमोशनल नकोस होऊ. प्रॅक्टीकल हो. तू घरीच राहणार आहेस पण नर्स असेल तर ती अनुभवाने प्रियंकाला बरोबर हॅंडल करेल. कॅंन्सर पेशंटची सेवा करणं आपल्या सारख्या लोकांचं काम नाही. आता आणखी तिची परिस्थिती खराब होणार आहे हे सत्य स्विकार. "

"निरंजन सुधीर म्हणतो ते बरोबर आहे तू आजारी पडून चालणार नाही. तू जर असाच वागलास तर नक्की आजिरी पडशील. थकल्यामुळे तुला नीट जेवण जात नाही. ऑफिसच्या कामाच्या ताण असतो."
निरंजनचे बाबा म्हणाले.

"निरंजन प्लीज तू ऐक आमच्या सगळ्यांचं. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर पण कॅंन्सरच्या पेशंटना हाताळण्याची ज्ञान आपल्याला नाही."

नेहा पोटतिडकीने निरंजनला म्हणाली.

"निरंजन नेहा बरोबर बोलतेय. आता फार विचार न करता डाॅक्टरांना फोन लाव.‌ आजपासूनच नर्स मिळाली तर ठेव. केयरटेकर नको प्राॅपर नर्स ठेऊ म्हणजे तिचं डाॅक्टरांशीपण सतत काॅन्ट्याक्ट राहील"

शेवटी सगळ्यांचं म्हणणं ऐकून निरंजनने डाॅक्टरांना फोन लावला.

"हॅलो"

"नमस्कार डाॅक्टर मी निरंजन साठे बोलतो आहे."

"बोला."

"डाॅक्टर प्रियंकाचं बघून, ऑफिसचं काम करून मीच आजारी पडायची वेळ आली आहे."

"मग केयरटेकर ठेवा."

"डाॅक्टर जर दोन्ही वेळेस कॅंन्सर पेशंटना बघू शकेल अशी ट्रेन्ड नर्स मिळेल का?"

"हो मिळेल तुम्ही दवाखान्यात फोन करा ते सांगतील."

"बरं ठेवतो फोन."

निरंजनने फोन ठेवला .

डाॅक्टर काय म्हणाले ते निरंजनने सगळ्यांना सांगीतलं.

"लगेच दवाखान्यात फोन लाव."
बाबा म्हणाले

"हो लावतो."

निरंजनचा आवाज एकदम थकल्यासारखे येत होता.

निरंजनने दवाखान्यात फोन लावून विचारलं

दवाखान्यात त्याला प्रायव्हेट नर्सची नावं कळली. ज्या कॅंन्सर पेशंटसाठीच काम करतात. त्या दवाखान्याच्या नोकरदार नसून त्या प्रायव्हेट नर्स म्हणून काम करतात. त्यांचे बारा तासांचे चार्जेस ठरलेले असतात. बारा तासाचे सहाशे रूपयाप्रमाणे अठरा हजार आहेत.

ही सगळी माहिती निरंजनने घरातील लोकांना दिली.
सगळी चर्चा करून दोन चांगल्या कार्यक्षम आणि घरापासून फार लांब न राहणा-या दोन नर्सना आज संध्याकाळपासूनच बोलावलं. सगळं पक्क झाल्यावर सगळ्यांनी नि: श्वास सोडला.

**"

कालपासून डाॅक्टरांशी बोलून निरंजनने दिवसा आणि रात्रीची वेगवेगळी नर्स ठेवली.कारण प्रियंकाकडे आता पूर्ण पणे लक्ष देणं गरजेचं होतं जे निरंजन,त्याची आई, नेहा, आणि प्रियंकाची आई देऊ शकत नसत.

एका कॅंन्सर पेशंटला फक्त त्याचीच काळजी घेणारी व्यक्ती गरजेची असते कारण त्या पेशंटला काहीच कळत नसतं.

या दोन्ही नर्स तरूण आणि ट्रेन्ड होत्या. कालच त्या दोघींचा पहिला दिवस होता पण निरंजन आणि त्याच्या आईबाबांना एकदम ताण रहीत वाटलं. काल इतके दिवस थकल्यामुळे निरंजन गाढ झोपला. त्याचे आईबाबा मात्र आलटून पालटून झोपले.

नर्स नवीन असल्याने एकदम सगळं त्यांच्यावर सोपवून निर्धास्त झोपणं त्यांना जमलं नाही. निरंजनला मात्र त्यांनी झोपू दिलं.

मध्यरात्री रोजप्रमाणे प्रियंका वेदनेने विव्हळली. निरंजनच्या आई लगेच प्रियंकाच्या खोलीत आल्या. ही नर्स झोपली आहे की जागी आहे बघायला. त्या खोलीत आल्या तेव्हा नर्स हळूहळू प्रियंकाचं आंग चोळत होत्या.

"जागी झाली का प्रियंका?"
आईने नर्सला विचारलं.

"हो. जाग्या नाही तश्या. वेदना झाल्या की जाग येतेय."

"खूप वेदना होतात बघवत नाही. वेदनेने विव्हळणारा तिचा आवाज पण ऐकवत नाही."

"हो. कॅंन्सर पेशंटना खूप त्रास होतो."

"तुम्ही बरेच पेशंट हाताळले असतील नं?"

"हो. या सगळ्याची मला आता सवय झाली."

"आधी कुठल्या दवाखान्यात होता?"

"मी इथे पुण्यात नव्हते नागपूरला मेडीकल कॉलेज मध्ये नोकरीला होते. लग्नानंतर इकडे पुण्यात आले."

"तिथे काय नर्सिंगच ट्रेनिंग द्यायचाच?"

"नाही. ते खूप मोठं हाॅस्पीटल आहे. तिथे डाॅक्टरकीचा अभ्यास पण शिकवतात. मी तिथेच नर्सिंग शिकले आणि तिथेच नोकरीला पण लागले."

"आता का बरं नाही करत दवाखान्यात?"

'लग्नं झाल्यावर काही दिवसांनी माझ्या सासूबाई जवळ जवळ वर्षभर कॅंन्सरनीच आजारी होत्या. मी नर्स असल्याने डाॅक्टरांनी सगळी ट्रिटमेंट मला समजाऊन सांगीतली. मीच केलं सगळं आणि डाॅक्टरांशी सतत बोलणं असल्याने मला मदत झाली."

"ब-या झाल्या का त्यातून?"

"नाही. वर्षभरातच गेल्या."

"अरे! "

"मग नंतर माझं काम बघून खरं म्हणजे ही काही माझी नोकरी नव्हती. माझ्या सासूबाईंचच केलं मी पण मेडीकल कॉलेजची पार्श्वभूमी असल्याने डाॅक्टरांनी मला एक घरी असलेल्या पेशंटचीच केस दिली. मग त्यानंतर मला ही कामं मिळत गेली."

"तुमचा अनुभव कसा आहे या कामाचा?"

"पेशंट तर पूर्ण पणे आमच्या वरच अवलंबून असतात. त्यांचं मनापासून करायचं हेच माझं तत्व आहे.फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही एक ब्रिटिश परिचारिका होती.ती १८२०-१९१० या काळात होऊन गेली. मी शाळेत असताना मला हिचा धडा होता. तो मला इतका आवडला की मी लहान असतानाच मोठेपणी नर्स व्हायचं ठरवलं."

"अरे व्वा! खूपच लहान असताना तुम्ही ठरवलं."

"हो. म्हणून मला पेशंटचं करताना कंटाळा येत नाही. तुम्ही झोपा . मॅडमना पण झोप लागली आहे."

"हो झोपते."

निरंजनची आई झोपायला गेली.

प्रियंकाकडे एकदा नजर टाकून नर्स आरामखुर्चीत बसली.स्वत:चं अंग जरा सैलावून तिने डोळे मिटले. नर्सचे डोळे मिटले असले तरी तिचे कान मात्र सावध होते.
________________________________
यानंतर काय होईल ते बघू पुढील भागात.