Mala Space havi parv 1 - 22 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २२

Featured Books
  • એઠો ગોળ

    એઠો ગોળ धेनुं धीराः सूनृतां वाचमाहुः, यथा धेनु सहस्त्रेषु वत...

  • પહેલી નજર નો પ્રેમ!!

    સવાર નો સમય! જે.કે. માર્ટસવાર નો સમય હોવા થી માર્ટ માં ગણતરી...

  • એક મર્ડર

    'ઓગણીસ તારીખે તારી અને આકાશની વચ્ચે રાણકી વાવમાં ઝઘડો થય...

  • વિશ્વનાં ખતરનાક આદમખોર

     આમ તો વિશ્વમાં સૌથી ખતરનાક પ્રાણી જો કોઇ હોય તો તે માનવી જ...

  • રડવું

             *“રડવુ પડે તો એક ઈશ્વર પાસે રડજો...             ”*જ...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २२

मला स्पेस हवी पर्व १ भाग २२

मागील भागात आपण बघीतलं की ताम्हाणे सरांनी नेहाच्या मांडलेल्या कल्पना संचालक मंडळाला आवडल्या आहेत. नेहाला आज मिटींगमध्ये तिच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. बघू आजच्या भागात काय होईल.


नेहा सकाळी ऑफिसला पोचली.ती जेमतेम आपल्या जागेवर येऊन बसली आणि इंटरकाॅम वाजला.नेहाने घाईने आपली पर्स टेबलवर ठेवून फोन उचलला.

" गुड मॉर्निंग सर

गुड मॉर्निंग आज तुम्हाला संचालक मंडळासमोर तुमच्या कल्पना सविस्तर मांडायच्या आहेत. लक्षात आहे नं?

"हो सर."

"तयारी झाली का?"
" हो सर."

"तुमची ही पहिलीच वेळ आहे संचालक मंडळासमोर जाण्याची. तुम्ही सगळी तयारी व्यवस्थीत करून त्यांच्या समोर तुमच्या कल्पना मांडल्या तर तुमचही चांगलं इम्प्रेशन पडेल."

"हो सर. किती वाजताची वेळ ठरली?"

"अकरा वाजता सगळे येतील. ते आले की तुम्हाला काॅल करतो तुम्ही या."

"ठीक आहे सर."

****

नेहाने फाईल मध्ये सगळे पेपर व्यवस्थित आहेत नं हे एकदा बघत असताना अपर्णा आली.

"गुड मॉर्निंग मॅडम"

फाईल मधून नजर काढून नेहाने वर बघीतलं.

"गुड मॉर्निंग."

"मॅडम किती वाजता आहे मिटींग?"

"आत्ताच ताम्हाणे सरांचा फोन येऊन गेला. अकरा वाजता मिटींग आहे असं म्हणाले."

"बेस्ट ऑफ लक."

"थॅंक्यू.मला शुभेच्छांची खूप गरज आहे."

"मॅडम तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या कल्पना संचालक मंडळासमोर ठेवाल यांची मला खात्री आहे."

"थॅंक्यू. माझ्या कल्पना आहेत चांगल्या आहेत हे मलाही माहिती आहे पण आज संचालक मंडळाला त्या पूर्ण पणे आवडतील असं मला बोलायला हवं."

"येईल मॅडम. तुम्ही त्यादिवशी मला आणि राजेश सरांना किती छान समजावून सांगितलं. तसंच संचालक मंडळालाही सांगू शकाल."

"हं. तुझ्या या बोलण्याने मी छान मोटीवेट झाले."

"पुन्हा एकदा खूप शुभेच्छा."

"धन्यवाद."

हे म्हणून नेहा हसली तशी अपर्णाही हसली आणि ती तिच्या जागेवर गेली.

****

अकरा वाजता बरोबर मिटींग सुरू झाली. ताम्हाणे सरांनी नेहाची सगळ्यांना ओळख करून दिली.
ताम्हाणे सर पुढे म्हणाले,

" नेहा मॅडम त्यांच्या काही कल्पना मांडणार आहेत.त्यासाठी सर्वांच्या सोयीने ही मिटींग बोलवली आहे.फक्त दातार सर त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे आजच्या मिटींगला हजर राहू शकले नाहीत.

अध्यक्षांची परवानगी असेल तर नेहा मॅडम त्यांच्या कल्पना संचालक मंडळासमोर मांडतील."

"मिटींगचं कामकाज सुरू करा."

असं अध्यक्षांनी म्हणताच अध्यक्षांच्या परवानगीने नेहा बोलायला ऊभी राहीली.

"नमस्कार. मी नेहा स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या पुण्याच्या शाखेतून इकडे बंगलोरच्या शाखेत प्रमोशनवर आलेय. माझ्याकडे टूरप्लॅनींगबरोबर जाहीरात विभाग पण आहे.

सर आपण ज्या टूर आखतो त्याला बुकींग कसं मिळेल हे टूर प्लॅन करण्यावर अवलंबून आहे तसंच त्याची जाहिरात कशी केल्या जाते यावरही अवलंबून आहे.

आपण थंडीच्या दिवसात चार टूर काढतो दोन मोठ्या पल्ल्याच्या आणि लहान पल्ल्याच्या दोन टूर काढतो. पावसाळ्यात आपल्या टूर या पावसाच्या प्रमाणात आखत असतो. उन्हाळ्यात आपण फक्त दोनच टूर घेतो. मला असं सुचवावस वाटतं की उन्हाळ्यात मोठ्या टूरबरोबर लहान पल्ल्याच्या टूर पण आखाव्यात. बरेचजण उन्हाळ्यात दोन किंवा तीन दिवसांचा टूर असेल तर जाणं प्रिफर करतात.

हिवाळ्यात दोन किंवा चार दिवसांचा टूर आणखी वाढवता येऊ शकतात. धंडीचा सिझन लोकांना फिरण्याने थकवा आणणारा सिझन नाही. त्यामुळे आपल्याला बुकींग मिळू शकतं."

"हा मुद्दा तुमचा बरोबर आहे."

मुदलियार म्हणाले.

"माझंही हेच म्हणणं आहे"

ताम्हाणेंनी री ओढली

"थॅंक्यू सर."

नेहा सुहास्य वदनाने पुढे बोलू लागली.

" सर या टूरप्लॅनींगबरोबर त्याची जाहिरात कशी होते हेही महत्त्वाचे आहे."

एक क्षण थांबून नेहा म्हणाली,

"सर जाहीरात करण्यासाठी आपल्या कडे दोन माध्यमं आहेत एक टिव्ही आणि दुसरं माध्यम आहे न्यूजपेपर.

टिव्हीवर जाहिरातींसाठी वेगवेगळे स्लाॅट असतात. काही स्लाॅट उदाहरणार्थ सकाळी ५ ते ७, तसंच रात्री ११ ते २ या वेळेस व्ह्यूज कमी मिळतात म्हणून चार्जेस कमी असतात. प्राईम टाईम म्हणजे ८ते१० या वेळेसाठी चार्जेस जास्तीत जास्त असतात.

काही चॅनल वर प्राईमस्लाॅट नसला तरी व्ह्यूज जास्त असतील तर चार्जेस जास्त असतात.

मला वाटतं आपण आपल्या टूरच्या जाहिराती सकाळी ५-७ या वेळेत दाखवावी. यावेळेस सिनियर सिटीझन ऊठलेले असतात. ते योगा किंवा अध्यात्मिक चॅनल लावतात. इथे व्ह्यूज असले तरी प्राईम टाईम सारखे नसतात. त्यामुळे आपल्याला मध्यम रेंज मध्ये चार्जेस लागतील.

आपण आपल्या जाहिराती सेलिब्रिटींकडून न करता आपल्या टूरबरोबर जाणा-या काही प्रवाश्यांना घेऊन शूट कराव्यात असं मला वाटतं."

" का? आजपर्यंत आपण सेलीब्रिटींकडूनच जाहिराती करत आलो आहोत."

गोपालनने विचारल.

" सर सेलिब्रिटींना कधी मोकळा वेळ आहे तो बघून आपल्याला जाहिराती शूट कराव्या लागतात तसंच त्यांचं मानधनही लाखांच्या वर असतं त्याचबरोबर आपल्याला टिव्ही चॅनलला त्यांच्या चार्जेस प्रमाणे पैसे द्यावे लागतात. हे बरंच महाग पडतं त्या ऐवजी आपल्या प्रवाशांपैकी कोणाकडून जर या जाहिराती शूट केल्या तर कमी खर्च येईल.

आपण टिव्ही स्क्रीनवर दिसणार आहोत याचा आनंद वेगळाच असतो. त्यासाठी प्रवासी‌नक्कीच तयार होतील असं मला वाटतं."

"त्याने काय होईल?"

अध्यक्षांनी विचारलं.

"सर मी या तीन याद्या केल्या आहेत. तरूण प्रवासी, मध्यम वयाचे प्रवासी, वयस्कर प्रवासी. या यादीतून जे प्रवासी जवळपास राहणारे असतील तर त्यांना एकत्र घेऊन जाहीरात करता येईल. आपण ही जाहिरात कौटुंबिक करूया"

"एकच जाहिरात?"

गोपालन यांनी विचारलंं.

"नाही सर समजा आपण चार टूर साऊथ साईडला घेणार असलो तरी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊ तर प्रत्येकाची कौटुंबिक जाहिरात वेगळी असेल.

या जाहीरातीत तरुण, मध्यम आणि वयस्कर लोकांसाठी खूप मनोरंजक, असेल. या टूरमध्ये प्रवाशांची योग्य काळजी घेतली जाईल. राहणं, जेवणखाण चांगलं असेल असं या जाहिराती मधून आपण सांगणार. एखादं कुटुंब आपल्या ओळखीच्या दुसऱ्या कुटूंबाला ही माहिती देतोय अशा पद्धतीनेच ही जाहिरात लिहील्या जाईल. जाहिरातीसाठी एक योजना आहे."

"बोला मॅडम.तुमच्या कल्पना खरच छान आहेत."

"थॅंक्यू सर. मला चांगल्या जाहिराती लिहून देणारा आणि आऊट ऑफ द बाॅक्स जाऊन विचार करणारा लेखक हवाय. तो आपल्याला मुलाखत घेऊन सापडणार नाही तर आपण जर स्पर्धा घेतली तर यातून असा लेखक आपल्याला मिळू शकतो."

"स्पर्धा घेणार कशी?"

"सर आपण चार, पाच विषय द्यायचे. त्यापैकी कोणत्याही एका विषयावर हटके जाहीरात लिहून मेल करायला सांगायचं. किती शब्दांत जाहिरात हवी ते सांगायचं. "

"स्पर्धा जाहीर करू तर त्याला बक्षीसं ठेवावी लागणार?"

मुदलियार म्हणाले.

"ते ठरवू नंतर. पण या जाहिरातींचं परीक्षण कोण करणार?"
अध्यक्षांनी विचारलं.

"सर आपल्याच जाहिरात विभागातील लोकं. दुसरी कडे परिक्षणासाठी पाठवलं तर आपल्याला ज्या जाहिराती आवडल्या आहेत त्या व्यतिरिक्त असणाऱ्या जाहिराती बाहेर कळतील. जर आपणच परीक्षण केलं तर सगळ्या जाहिराती आपल्याकडेच राहतील."

"हां हे बरोबर आहे तुमचं म्हणणं."
राव म्हणाले.

"बक्षीसं किती रकमेची ठेवायची ते सर तुम्ही ठरवा."

"हो ते आम्हीच ठरवणार."
गोपालन म्हणाले.

"आणखी काही."

"सर झालं मला एवढंच बोलायचं होतं."

"ठीक आहे. मॅडम तुम्ही चांगला आणि वेगळा विचार करता. छान आवडल्या तुमच्या कल्पना. "
गोपालन म्हणाले.

" थॅंक्यू सर "

"मॅडम स्पर्धेची जाहिरात तुम्ही कशी करणार?"

रावांनी विचारलंं.

"सर मी लिहीन जाहिरात."

"गुड. मग करा काम चालू. बक्षिसाची रक्कम आम्ही ठरवतो."

"ठीक आहे सर. "

यानंतर अध्यक्ष समारोपाचं बोलायला लागले.

"आपल्या स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या पुण्याच्या शाखेतून प्रमोशनवर बंगलोरच्या शाखेत काही दिवसांपूर्वीच नेहा मॅडम आल्या आहेत.

आत्ताच त्यांनी तुमच्या समोर टूर प्लानिंग आणि जाहीरातींबद्दल त्यांच्या वेगळ्या आऊट ऑफ द बाॅक्स जाऊन विचार करणा-या कल्पना मांडल्या आहेत. त्या आपल्या सगळ्यांनाच आवडल्या आहेत. त्यामुळे या त्यांच्या कल्पना आपण सर्वानुमते पास करत आहोत. त्यासाठी मॅडमचं सगळे अभिनंदन करू.पुढेही अशाच नवीन वेगळ्या कल्पना त्यांनी मांडतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आता पुढची सूत्र ताम्हाणे सरांना देतो."

अध्यक्षांचं बोलून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.

नेहाने उठून उभी राहून सगळ्यांना धन्यवाद दिले.

यानंतर ताम्हाणे सर म्हणाले,

"नेहा मॅडमनी त्यांच्या कल्पना आपल्याला सांगीतल्या आहेत.आपल्याला त्यांच्या कल्पना आवडलेल्या आहेत. आता आजची आपली मिटींग इथेच संपली असं अध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करतो."

यानंतर सगळ्यांच्या अवांतर गप्पा सुरू झाल्या. हे बघताच नेहा समजली की आपण इथून जायला हवं ती ताम्हाणे सरांना म्हणाली,

"सर मी निघाले तर चालेल का?"

"हो. चालेल."

नेहा आपली फाईल घेऊन काॅन्फरन्स रूमच्या बाहेर आली.

***
नेहा काॅन्फरन्स रूमच्या बाहेर आल्यावर खूप खूष होती. सगळ्यांना आपलं बोलणं आवडलं आहे. हे तिला कळलं होतं. तिने आनंदाने अपर्णाला फोन लावला. अपर्णा लगेच आली.

" अभिनंदन मॅडम."

"खूप धन्यवाद. अपर्णा शेवटच्या क्षणी येऊन तू मला जे मोटीवेट केलंस नं त्याने सगळी कमाल केली."

" काही तरी का या! मी निमित्त होते. सगळे कष्ट तुमचे होते.

" हो पण मी शेवटच्या क्षणी जरा नर्व्हस झाले होते तेव्हाच तू आलीस आणि मला मोटीवेट करून गेली.त्यामुळे तुझं क्रेडिट मी तुला द्यायला हवं आणि तू ते घ्यायला हवं."

नेहा हसत म्हणाली.

" ठीक आहे."

" अपर्णा पाच मिनिटे वेळ असेल तर चहा बोलावते. सेलीब्रेशन तो बनता है. राजेश सरांना पण बोलावते. एक छान आपली मिटींग झाली की मग कामाला लागायचं आहे."

नेहाने अपर्णाशी बोलता बोलता राजेशला फोन लावला.
तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.

" मॅडम तुम्ही फोन घ्या मी सरांना सांगते"

" ओके"

नेहाने फोन अपर्णाला दिला. अपर्णा समोर असल्याने नाईलाजाने नेहाने सुधीरचा फोन घेतला.

" हॅलो "

" बिझी आहेस?"

" हो माझ्या डिपार्टमेंटची मिटींग चालू आहे.

" ठीक आहे. ऋषीला तुझ्याशी बोलायचं होतं."

" आत्ता?"

" नाही तो शाळेतून आल्यावर बाबा फोन करतील."

" ठीक आहे."

सुधीर पुढे काही बोलतोय का हे न बघताच नेहाने फोन ठेवला तोवर राजेश आला होता.

" अपर्णा चहा बरोबर काय बोलावू?"

" मॅडम आत्ता?"

" सेलीब्रेशन आहे सरं."

यावर तिघही हसले.

नेहाला सुधीरशी बोलताना आणि अपर्णा आणि राजेशशी बोलताना आपल्या आवाजातील फरक जाणवला.
_________________________________
नेहाच्या आयुष्यात आता पुढे काय घडेल बघू .