Ekapeksha - 7 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 7

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

एकापेक्षा - 7

आता एक तीसरा अधिक रंजक आणि हास्यासपद असा प्रसंग तुम्हाला सांगतो आणि मंग तुमची पुन्हा रजा घेतो. तर हा प्रसंग आहे डालू याचा, गोंधळून जाऊ नका. हा प्रसंग संदीप या मुलाचा आहे ज्याला आम्ही सगळे डालू म्हणून ओळखत होतो. तर मी आधीच सांगितले आहे की माझे वडील हे ऑर्डनेन्स फैक्टरी अम्बाझरी नागपुर येथे कामाला होते तेथील सरकारी कर्मचारी होते. तर माझा बाबांनी एक घर बनवले होते तर आम्हाला तेथे त्या घरात जावे लागले होते रहायला सरकारी क्वार्टर सोडून, तेथे गेले असतांना आम्हाला सहा महिन्यातच जाणवले होते की तो परिसर आमचा राहण्याचासाठी उपयुक्त नाही आहे. कारण की तेथे कसलीच व्यवस्था नव्हती, तेथे वीज नव्हती, तेथे पाणी दुरून एका
विहिरीवरून आणावे लागत होते. त्याच बरोबर तेथे मोजुन दहा घरे होती ती सुद्धा मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची. खर तर माझा वडिलांनी फार मोठी चुक केलेली होती तेथे घर बांधून, तेथे गेल्यावर आमचा सगळ्यांची प्रकृती ही ख़राब झाली होती म्हणून माझा वडिलांनी पुन्हा क्वार्टर मध्ये रहायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला पुन्हा क्वार्टरवर लागले मात्र यावेळेस आम्हाला सेक्टर ६ चे क्वार्टर मिळाले होते. तेथे आम्ही रहायला गेलेले होतो. तेथे त्या क्वार्टरमध्ये आम्हाला संदीप उर्फ डालू हा भेटला. संदीप हा लहान अवघ्या ५ते ६ वर्षांचा मुलगा होता. त्याचे बाबा त्यांचे नाव देवराव चौधरी असे होते आणि ते सुद्धा ऑर्डनेन्स फैक्टरीचे कर्मचारी होते माझ्या वडिलांचा सारखे. तर आमचे शेजारी चौधरी काकांचा घरी त्यांची पत्नी आणि तीन मुले म्हणजे, दोन मोठ्या मुली एक दहा वर्षाची, दुसरी मुलगी आठ वर्षाची आणि शेवटचा संदीप तो सहा वर्षाचा असा त्यांचा छोटासा परिवार होता. तर ते चौधरी काका दारू खुप प्यायचे म्हणून संदीप हा लहान असल्यामुळे आणि वरुन तो तोतळा बोलत असल्यामुळे त्याला कुणी विचारले की तुझे बाबा कुठे गेले. तर तो सांगायचा माझे बाबा डालू प्यायला गेले. अशामुळे संदिपचे नाव डालू असे पडले आणि सगळे त्याला डालू म्हणून ओळखत होते. चौधरी काका फार दारू प्यायचे आणि दारूमुळे ते कधी कधी त्यांचा महिन्याचा पगार सुद्धा घरी नाही आणायचे ते तेथेच दुकानात उडवून टाकायचे त्यामुळे संदीपची आई फार वैतागली होती. तर आता तुम्हाला तो प्रसंग सांगण्याची सुरुवात करतो. एके दिवशी रवीवारी संदिपचे बाबा रोजचा प्रमाणे दारू प्यायला गेले होते.

सकाळीच तो रवीवारचा दिवस होता आणि सुट्टी होती म्हणून, तर संदिपचे बाबा काहीच कामात मदत करत नाही म्हणून त्याची आई ही वैतागुन
चिढली होती. तर त्या दिवशी त्याचे बाबा थोड़ी पिउन आले आणि सोबत देशी दारूचा बम्फर घेऊन आले. त्या दारुसाठी त्याचे बाबा ५ किलोमीटर
पायपीट करत गेले आणि दारु घेउन आले. मग नेहमीप्रमाने ते घरी दारु पिण्यासाठी बसले तर तेव्हा त्यांचा लक्षात आले की चकणा तर त्यांनी
आणलाच नाही तर ते चकणा आणण्यासाठी ते तोलानी चौक येथे गेले. तेव्हा संदीपची आई ही घरी नव्हती ती शेजारचा क्वार्टर मध्ये गेलेली होती.
तर तेवढ्यात ती परत घरी आली आणि तिने संदीपला विचारले, " बाबु तुझे बाबा कुठे गेले." तेव्हा संदीपने निरागसपणे उत्तर दिले, " आई बाबा
डालू आणायला गेले." संदिपचा आईचे नाव कलाबाई होते. ती आणि चौधरी काका हे दोघेही अडाणी आणि अशिक्षित होते. तर कलावती बाई
चिढली आणि म्हणाली, " भडव्या मूत आनाले गेला का." तेव्हा तीची मोठी मुलगी बोलली, " आई बाबा चकणा आणाले गेले आहे." तेव्हा कलाबाईने बघीतले तर तेथे देशी दारूचा बम्फर ठेवला होता. तो बम्फर बघून कलावती बाईचा पारा चढला आणि तीने तो बम्फर उचलला आणि त्याचे झाकण उघडून सरळ संडासात नेवून ओतला. बम्फर सम्पूर्ण रिकामा झाला त्यानंतर तीने तो आणून तेथे ठेवून दिला. तेवढ्यात कलाबाईची लहान मुलगी बोलली, " आई तू दारू फेकून दिली आता ही रिकामी शीशी बघून बाबा खुप ओरडतील." मग कलावतीबाईचा लक्षात आले आणि तीने मग असे काही केले त्यामुळे हा प्रसंग अधिक रंजक आणि हास्यासपद झाला. तर मग कलावतीबाईने संदीपला त्यानंतर मोठ्या मुलीला, मग लहान मुलीला आणि मग तीने स्वतः संडासाचा डब्यात सु केली आणि
ती सगळ्यांची सु तीने मग त्या शिशीत भरून ठेवली. मग पंधरा मिनिटात चौधरी काका चकणा घेउन आले होते. तेव्हा संदिपचा आईने सगळ्यांना सांगितले होते की कुणीही काहीही सांगायचे नाही. मग ते सगळे गप्प रहुन मज्जा बघू लागले आणि चौधरी काका आपले दारू पिण्याचा कार्यक्रम सुरु करू लागले. त्यांनी ग्लास घेतला आणि त्याचात दारु ओतली त्यात त्यांनी थोड़े पाणी सुद्धा घातले. त्यानंतर त्यांनी एका घोटात तो ग्लास संपवला आणि चकणा खाल्ला. पाच मिनिट थांबल्यावर काकांना जाणवले की काहीतरी घोळ आहे. मग ते म्हणाले, साली दारू चढून काऊन नाही राहिली, नकली दारू तर नाही दिली दुकानवाल्याने आता दुसरा ग्लास पिऊन बघतो. " म्हणून त्यांनी दुसरा ग्लास भरला
आणि तो पाणी न मिळवता तसाच कोरा कोरा घशात रिकामा केला. आता त्यांनी चकणा नाही खाल्ला. मग काही मिनिटांनी ते म्हणू लागले
साली है दारु तर खरच चढून नाही राहिली, तो दुकानवाला पैसे पूर्ण घेते अन नकली दारु विकते थांब त्याची माय बहिण घेउन येतो. असे म्हणत
ते शिविगाड़ी करू लागले होते त्या दुकानवाल्याला. परन्तु इकडे ते सगळे कलावतीबाई आणि तिची मुले जोराने हसू लागली होती. आता चौधरी काका शिव्या देत घराचा बाहेर निघतील तेवढ्यात आमचा संदीपने घोळ केला. तो अनयास आणि निरागसपणे त्याचा बाबाचा जवळ गेला आणि म्हणाला, " बाबा तुम्ही जे डालू प्याले ती डालू नव्हती आमचा सगळ्यांची सु होती. " हो गोष्ट कळताच काका कलावतीबाईला शिव्या देऊ लागले होते.

मग कलावतीबाई सुद्धा त्या दिवशी चंडिका बनुन गेलेल्या होत्या. मग त्यांनीही काकांना शिव्या दिल्या त्या म्हणात्या, भडव्या, बेवडया नुसता दारू पीते, घरी पैसे आणत नाही, लेकरांचा कड़े लक्ष देत नाही अन मले शिवा देते. थांब भडव्या तुई वरात काढतो." असे म्हणुन कलावतीबाईने हातात काठी घेतली. तिला बघून मोठ्या मुलीने बेलन घेतला, मग लहान मुलीने चप्पल घेतली आणि आमचा डालू म्हणजे संदीपने स्केल घेतली आणि ते सगळे काकांची धूलाई करू लागले होते. त्या धुलाईत आम्हाला फक्त अणि फक्त संदीपचा आवाज छान वाटत होता, तो म्हणत होता, " डालू पीतो डालू पीतो. " असे म्हणून तो त्याचा बाबांना मारत होता. तर आशा प्रकारे तो हास्यासपद प्रसंग माइया जीवनात घडलेला होता जो अमचा सगळ्यांचा ओठावर हसू सोडून गेला, तर मित्रांनो, आता रजा घेतो पुन्हा असे प्रसंग अठवून तुमचा समोर आणण्यासाठी.
धन्यवाद.