God's existence and miracles in Marathi Motivational Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अस्तित्व इश्वराचे आणि चमत्कार

Featured Books
Categories
Share

अस्तित्व इश्वराचे आणि चमत्कार

नमस्कार मित्रांनो, मी जर असा प्रश्न केला कि इश्वर आहे काय? कुणी इश्वराला पाहिले काय? तर ९९% लोकांकडून उत्तर येईल नाही पाहिले तर १% असा लोकांचा वर्ग असेल जो म्हणेल की होय आम्ही अनुभवले आहे. सभोवतालची परिस्थिती पाहता कि जूने लोक जे म्हणायचे कि कलीयुग येणार आहे. तर हा काळ म्हणजेच कलीयुग समझावे काय. घरचा सर्वात वयस्क मंडळींपासून एैकत आलो कि आधी सतयूग होतं. त्यात देवी देवता तात्काळ दिसायचे. पशू, पक्षी, पाने, फुले, वृक्ष, वगैरे वगैरे मानवाशी बोलायचे. सगळीकडे आनंदच आनंद म्हणजे राम राज्य होते. आज परिस्थिती फारच उलट म्हणावी लागेल कारण कि पुर्वी प्राणी, पक्षी सोबत दगडं सुद्धा मानवासोबत बोलायचा आणि आज माणसासारखा माणुस दगड बनून बसलाय. त्याचा स्वार्थ असेल तेथेच हा माणुस बोलतो. सगळीकडं अराजकता, भय, छल, कपट, भ्रष्टाचाराचे वातावरण दिसते आनंद कुठेच दिसत नाही. तर काय कलीयुग आलाय काय?
आज आपण सुशिक्षित अशा आधुनिक २१ व्या शतकात आहोत. आपल्यातील काही मनुष्य अत्याधिक शिक्षित होऊन वैज्ञानिक बनले आहेत. दैवीशक्ती वर नव्हे तर विज्ञाना वर अधिक भर देऊन राहिले आहेत. आज स्व:ताचा मनाप्रमाणे निसर्गाला बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे सर्वात मोठा बदल घडून येतोय, तो आहे आस्थेचा. सरळ सरळ मनुष्याने ज्या इश्वराचा वरदानामूळे या धरतीवर जन्म घेतला. त्या इश्वराचे अस्तित्वच तो नाकारत आहे. त्या इश्वराचा कृपेने त्याला लाभलेल्या मेंदुचा जोरावर आजचा मनुष्य स्वत:ला देवाचा ठिकाणी नेऊन ठेवायला बघतो आहे. स्वत:चा या क्षणभंगुर अशा यशाचा गर्वात इतका डूबून गेलेला आहे कि काय सत्य आणी काय असत्य आहे याची जाण विसरत चालला आहे. मनुष्य कितीही प्रयत्न करुन घेईल तरी इश्वराचा अस्तित्वाला धक्का पोहचवू शकत नाही. पुर्वीचा काळात इश्वर संपूर्ण रुपी होते. आता ते क्षणिक पण मुर्ती रूप आहेत आणि वेळोवेळी याची जाणीव इश्वर आपल्याला करुन देत असतो ते अचंभीत करणार्‍या अशा चमत्काराद्वारे.
मित्रांनो, माझा जन्म नागपूरचा आहे म्हणून मी काही दुरवर जाणार नाही. कारण कि मी जास्त फिरलो वगैरे नाही. परंतु जे मी स्वत:चा डोळ्यांनी बघितले आहे. म्हणून त्याचा उल्लेख येथे करतोय. प्रथम सांगतोय नागपूर स्थित कोराडी या देवस्थाना बद्दल. माझा जन्माचा आधीपासून हे मंदिर आहे. जूने लोक सांगायचे कि एका शेतकर्‍याला खणकाम करताना हि चमत्कारीक मूर्ती सापडली होती. ती मूर्ति आहे महालक्ष्मीची. त्याने तीला छोट्याशा मंदिरात स्थापन केले. तेव्हा पासून तर आता एक भव्य असे प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यात इश्वरीय चमत्कार हा आहे कि जी महालक्ष्मीची मूर्ति आहे तीला भक्तांनी चांदीचा मूखोटा, डोळे अर्पण केलेले आहेत. तर दर नवरात्रीचा नऊ दिवस हि मूर्ति दिवसातून तिन वेळा रुप बदलते. पहाटे ५.३० वाजता काकळ आरती असते त्यावेळेस तीचे रुप नवजात बालिकेप्रमाणे कोमल असे असते. दुपारी १२.३० वाजता सुंदर अशा नवयूवतीप्रमाणे असते. तर रात्री ७.३० वाजता वृद्ध अशा म्हातारीप्रमाणे रुप बदलते. अशाप्रकारे महालक्ष्मी आपल्या अस्तित्वाचे प्रमाण दाखवीत असते. हा चमत्कार फक्त नऊरात्रीचा नऊ दिवसातच बघायला मीळतो.
दुसर्‍या क्रमांक नागपूरातील टेकडी गणेश मंदिर. नागपूरला जर रेल्वेने आले तर स्टेशनला लागूनच हे मंदिर आहे. म्हणतात हे देवस्थान आजही जागृत आहे.जून्या लोकांप्रमाणे खणकाम करताना नारळाचा आकाराचा एक दगड शेतकर्‍याला सापडला होता. त्यावर गणेश प्रमाणे डोळे आणि सोंड सारखे होते. लोकांनी त्याला तेथेच स्थापीत केले. आज जवळ जवळ ९० वर्ष होत असतील. तर तो नारळाचा आकाराचा दगळ हल्ली १० फूट रुंदीत तर ५ फूट उंचीत असा वाढला आहे. आणि तो सततचं वाढत आहे. या काळात कमीत कमी दोनदा तरी ते मंदिर तोडून मंदिरचा व्यास आणि उंची वाढवीली आहे. याबरोबर तो भक्तांचा नवसाला सुद्धा पावतो. श्रद्धालूंची सारखी गर्दी जमलेली असते आणि एक चमत्कारीक असे प्रेक्षणीय स्थळ झालेले आहे.
यानंतर तिसरा आणि खुपच जवळून अनुभवलेलं स्थळ आहे ते जामसावाली. हे ठिकाण सावनेर पासून छिंदवाडा जाताना रोडवर लागते. येथे चमत्कारीक असे मारुतीचे मंदिर आहे. त्याचा नावाप्रमाणेच खरेच हे संकट मोचन आहे. जुन्या काळात शेतात काम करताना जमीनीचा खाली मारुतीची छोटीशी मुर्ती सापडली. तीला लोकांनी तेथेच स्थापन केली. सापडली होती तेव्हा ती फक्त १ फूट लांबीची होती. आज ती मुर्ती २० फुट पर्यंत वाढली आहे आणि वर्षानुवर्षं वाढतच आहे. भक्तगण सतत दूर दूरून दर्शणाला आणि नवस फेडायला येत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात. हे देवस्थान हि जागृत आणि नवसाला पावणारे आहे.
अशाप्रकारे दैवीय चमत्कार बघून मनात वारंवार हेच प्रश्न उद्भवतात. इश्वर वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो कि बाबांनो मी अजूनही आहे. सगळी अंधश्रद्धा म्हणून कित्येकदाय़ा चमत्कारांची उलट तपासनी करण्यात आली आहे. तरीही या चमत्कारामागील सत्य काय कूणीच जाणू शकले नाही. हल्ली काय तरी नवीनच ऐकतोय कि मनुष्य मरन पावल्यानंतर कूठे जातो, कसा जातो. याचा शोध लावण्याचा प्रयत्न सूरु आहे. आपल्या स्वत:चे अस्तित्व एक क्षणभंगुर अशा स्वप्नासारखे आहे. एका हलक्याशा हवेचा झोक्याने ते कधीही तूटू शकते. तो मनुष्य स्वत:ला इश्वरापेक्षा मोठा समजून त्या जन्म देणार्‍या इश्वराचा अस्तित्वाला नाकारण्याचे प्रयत्न करीत आहे. देवा तूच त्यांना चांगली अक्कल दे हि प्रार्थना करतोय. धन्यवाद 🙏🙏

स्वलीखित

गजेंद्र गोविंदराव कूडमाते