Karamati Thami - 1 in Marathi Comedy stories by Kalyani Deshpande books and stories PDF | करामती ठमी - 1

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

करामती ठमी - 1

ठमी ही माझी आत्ये बहीण आहे आणि आम्ही एकाच वयाचे असल्याने एकाच वर्गात शिकतो, एकाच बाकावर बसतो. माझ्यात आणि ठमी मध्ये जमीन अस्मान चा फरक आहे मी उंच रोड सावळी स्वभावाने शांत आहे तर ठमी अगदी त्याच्या विरुद्ध ठेंगणी सुदृढ गोरी आणि चळवळी आहे. एवढ्या विरुद्ध स्वभावाच्या असलो तरी आम्ही कशा काय न भांडता सतत एकत्र असतो असा मलाच काय आमच्या दोघींच्या आईवडिलांसकट सगळ्या नातेवाईकांना शेजारच्या पाजारच्यांना आजपर्यंत उलघडा झाला नाही.

तिच्या आणि माझ्या स्वभावात कसा फरक आहे हे ह्या उदाहरणावरून कळेल.

शाळेतून येताना रस्त्यात आम्हाला एक खोकडं पडलेलं दिसलं. मी पायाने ते रस्त्याच्या कडेला लावून ठेवलं. ठमीच्या डोक्यात मात्र काय आलं कोणास ठाऊक तिने ते पायाने ढकलत ढकलत आमच्या घराजवळच्या चौकात आणलं आणि त्यावर मी कचरा खातो असं लिहिलेलं पेंग्विन चं चित्र आणि त्याच्यावर एक ऍरो काढून टाकला. त्यामुळे आपोआपच रस्त्याने जाणारे लोकं कचरा खाली न टाकता त्यात खोक्यात टाकू लागले. चौकातल्या पाणीपुरी वाल्या कडचे लोकं सुद्धा त्या खोक्यात कचरा टाकू लागले.

तो पाणी पुरी वाला म्हणाला सुद्धा "व्वा ठमी जे तुला ह्या लहान वयात सुचलं ते मला आत्तापर्यंत सुचलं नव्हतं." आणि त्याने आम्हाला त्यादिवशी फ्री पाणीपुरी खायला दिली. तर अशी आहे आमची ठमी. त्या प्रसंगानंतर ठमी मध्ये कमालीचा कॉन्फिडन्स आला.

उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा ठमी रिकामी बसत नसे काही न काही तिचे उपद्व्याप सुरूच असायचे. बरेचदा तिच्या करामतीं मधून काही विचित्रच घडायचं.
एकदा असंच शाळेला सुट्ट्या असल्याने आमच्या आईवडिलांनी आम्हाला टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या क्लास मध्ये पाठवलं.

जुन्या कापडांपासून पिशव्या बनवणे. वापरलेल्या उदबत्तीच्या आगपेटीच्या काड्यांपासून वॉल पीस बनवणे. कान तुटलेले कप मग घेऊन त्यावर पेंटिंग करणे. असे अनेक आर्ट अँड क्राफ्ट ऍक्टिव्हिटी शिकवल्या. ठमीवर त्याचा एवढा परिणाम झाला की तिची नजर सतत चहुकडे टाकाऊ वस्तूंचा शोध घेऊ लागली. एकदा असाच तिने प्रयोग केला त्यावरून तिला नंतर खूप बोलणे खावे लागले ती गोष्ट वेगळी.

त्याचं झालं असं की तिच्या आजीच्या कवलीतले काही दात तुटले होते तर ठमीला वाटलं ह्या टाकाऊ कवळीला आपण छान डेकोरेट करावं आणि आजीला मस्त सरप्राईज द्यावं म्हणून बिचारीने आर जी बी म्हणजे रेड ग्रीन आणि ब्लु अश्या क्रमाने कवलीतले एकूण एक दात पेंट केले आणि जागेवर गुपचुप ठेवून दिली. दुसऱ्यादिवशी आजीने सकाळी नेहमीप्रमाणे कराग्रे वसती लक्ष्मी म्हंटल्यावर कवळी लावली आणि सहज आरशात पाहिलं आणि ते कवळीचं डेकोरेशन बघून आजी जोरात किंकाळी फोडून पलंगावर पडली.
आजीचा आवाज ऐकून तिची आई म्हणजे माझी आत्या आली आणि ठमीचा प्रताप बघून "ठमे!! वात्रटे!! काय केला हा उपद्व्याप!" जोरात तिच्या अंगावर ओरडली पण ठमी तापलेलं वातावरण बघून कधीच पसार झाली होती.

काही वेळाने वातावरण निवळल्यावर ती घरी आली.
तेव्हा तिच्या आईने यापुढे ती अशी फालतू गिरी करणार नाही असं तिच्याकडून वचन मागितलं.

तिनेही अगदी ताठ उभं राहून हात पुढेकरून तिच्या आईला वचन दिलं

"मातोश्री आम्ही आपणास वचन देतो की यापुढे अशी आगळीक कदापि होणे नाही"
तिचा अविर्भाव बघून आत्याने तिला एक टपली मारून "चल निघ इथून चहाटळ कुठली" असं म्हणून बाहेर पिटाळलं.

दोन तीन दिवस गेले चांगले शांतपणे पण पुन्हा ठमी तिचं वचन विसरली आणि तिच्या च्याने आगळीक घडलीच.
टाकाऊ पासून टिकाऊ हा आमचा क्लास सुरूच होता त्यामुळे काहीतरी प्रयोग करून बघायची नसेल जिला खुमखुमी ती कसली ठमी! ह्यावेळेस तिने असा प्रयोग केला की आम्ही हादरूनच गेलो.

त्याचं ऍकच्युअली झालं काय! की आत्या नेहमीप्रमाणे दिवेलागणी ला अंगणात तुळशीजवळ दिवा ठेवायला गेली आणि दिवा ठेवून समोर बघते तर काय? तिला काय दिसलं कोणास ठाऊक पण ती जोरात किंचाळली आणि तिची दातखीळ च बसली. ती सारखा तुळशी कडे बोट दाखवत होती. मग ठमीच्या बाबांनी अंगणात जाऊन बघितल्यावर त्यांना ठमीचे प्रताप कळले. नुकतीच संक्रांत झाल्याने बरेच सुगडे जमले होते त्याच्यावर ठमीने आपली कलाकुसर जीव तोडून ओतली होती. तिने सहा सुगड्यांना डोळे नाक मिश्या कान केस असं सगळं काढलं होतं. कोणाचे डोळे मोठे लाल काढले होते तर कोणाची जीभ लोम्बती काढली होती. कोणाचे दाता ऐवजी सुळेच काढले होते. आणि छानपैकी हे सहा सुगडे तिने भिंतीवर एका रांगेत मांडून ठेवले. ते बघूनच आत्याची अशी अवस्था झाली होती. आत्याला जेव्हा तिचे हे प्रताप कळले तेव्हा तिच्या दणक्यांपासून वाचण्यासाठी ठमी आमच्याच कडे कॉटखाली लपून बसली होती.

नाही कोणापेक्षा कमी
आणि हमखास गोंधळाची हमी
अशी आहे आमची करामती ठमी

★☆★☆★☆★☆★☆★☆★