Sumantanchya Vaadyaat - 4 in Marathi Detective stories by Dilip Bhide books and stories PDF | सुमंतांच्या वाड्यात - भाग ४

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सुमंतांच्या वाड्यात - भाग ४

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची  बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची  मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा.  

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई                  विदिशाची आई.

राधास्वामी                   मंत्र तंत्रा मधे अधिकारी माणूस.

भाग  ४

भाग ३  वरुन  पुढे  वाचा .......

“ठीकच आहे. पण मी काय म्हणतो की मी आत्ता तिथे येतो आणि बघतो काय परिस्थिती आहे ते. मग तुम्ही तुमच्या योजने प्रमाणे करा. कारण मी तुमच्या घराचं बंधन केलं होतं, ते तोडून जर कोणी आत येत असेल तर यांचा अर्थ मोठी शक्ति यात गुंतली आहे आणि मला ती बघाविच लागेल.”

“ठीक आहे या तुम्ही. पण लवकर या. म्हणजे आम्हाला उशीर होणार नाही. कसंही करून आजच्या आज  घर बदलणं जरुरीचं आहे.” – दिनेश

स्वामी आले आणि त्यांनी काय झालं ते बघितलं. मग थोडा वेळ ध्यान लावून बसले आणि मग म्हणाले, “असं बघा, मी घराचं पक्क बंधन केलं होतं. मला बघायचं होतं की ते तोडणारी शक्ति कोणची आहे ते. पण ते बंधन तुटलं नाहीये. यांचा अर्थ घर झपाटण्याचा हा प्रयत्न नाहीये.”

“स्वामीजी तुम्ही काय बोलत आहात ते आम्हाला काही समजत नाहीये. आम्हाला त्रास होतो आहे हेच खरं.” – विशाल.

“बरोबर आहे तुमचं म्हणण,” स्वामी म्हणाले “मी ही तेच सांगतो आहे. घर बदलून काहीही उपयोग होणार नाही कारण ही जी कोणची शक्ति आहे, तिचं लक्ष्य तुम्ही आहात. घर नाही. दुसऱ्या घरात जाऊन देखील जर असंच सुरू राहीलं, तर तो घरमालक तुम्हाला एक दिवस सुद्धा राहू देणार नाही. तेंव्हा घर बदलणं हा काही यावर उपाय होऊ शकत नाही.”

दिनेश आता जाम वैतागला. “मग आता आम्ही काय करायचं?

“मी तुमची परवानगी असेल, तर तुमच्या भोवती एक रक्षा बंधन करतो. हे बंधन तोंडणं इतकं सहज शक्य होणार नाही, पण जर तसं झालंच, तर मात्र मला माझ्या गुरूंना बोलवावं लागेल. बाकी तुम्ही म्हणाल तसं. निर्णय शेवटी तुमचाच असणार आहे. मी फक्त उपाय सुचवला.” – स्वामी.

स्वामी हे बोलल्यावर सर्वच जण घोटाळ्यात पडले. हे करावं का ते अश्या द्विधा मनस्थितीत अडकले. “काय करायचं? कोणाला काही सुचताय का?” दिनेश सर्वांना उद्देशून म्हणाला. स्वामी मात्र शांत बसून होते. शलाका आणि विदिशा शलाकाच्या रूम मधे गेल्या. दिनेश विशाल कडे पाहून म्हणाला “तुला काय वाटतं?”

“अरे या बायका कुठे गेल्या? त्यांचही मत घ्यावं लागेल.” असं म्हणून तो आणि त्यांच्या पाठोपाठ दिनेश पण बेडरूम मधे गेला. ती दोघं आल्यावर विदिशा म्हणाली “आपण बाबांना फोन करून त्यांचा विचार घ्यायला हवा.”

“विदिशा,” दिनेश म्हणाला “त्यांना फोन करायला हरकत नाही, पण त्यांना इथे किती गंभीर प्रसंग आहे, यांची कल्पनाच येत नाहीये, त्यामुळे यावेळी देखील त्यांनी जर सगळं थट्टेवारी नेलं, तर काय करायचं? ते आपल्याला मूर्ख समजताहेत. आणि हे त्या दिवशीच आपल्याला जाणवलं होतं. होय ना विशाल?”  

विदिशा काही बोलली नाही. दिनेश म्हणाला ते खरंच होतं. तिलाही त्यावेळी, रागच आला होता,  ती गप्पच बसली. पण मग करायचं तरी काय? तिला प्रश्न पडला. तसा तो सर्वांनाच पडला होता. थोडी चर्चा झाली आणि नंतर स्वामींना होकार द्यायचं ठरलं. त्याप्रमाणे दिनेशने स्वामींना सांगीतलं.

“ठीक आहे मी बरोबर उद्या सकाळी ७ वाजता येतो. तुम्ही सर्व आंघोळ आटोपून तयार रहा. एक छोटासा यज्ञ करावा लागेल. बाकी सामग्री मी घेऊन येईल पण तुम्ही वाटीभर भात शिजवून ठेवा. आणखी मला काही विचारायचं आहे. हे घर बांधतांना कोणाला काही अपघात होऊन मृत्यू झाला होता का?

“नाही, तसं काही कोणाच्या बोलण्यात आलं नाही. हे घर खूप जून आहे. आमचा जन्मच इथला आहे.” – दिनेश.

दुसऱ्या दिवशी स्वामीजी आले, त्यांनी बरोबर ७-८ लाल कोऱ्या कापडाचे झेंडे आणले होते. ते त्यांनी गच्चीवर प्रत्येक कोपऱ्यात लावले. यज्ञ पण झाला. सर्वांच्या अंगावर पवित्र झालेलं पाणी  पण शिंपडून झालं. विभूति पण कपाळाला लावून झाली.

“आता तुम्हाला काही भीती नाही.” स्वामी बोलले. जी शक्ति तुम्हाला त्रास देते आहे, तिच्या मधे हे बंधन तोडण्याचं सामर्थ्य असेल, असं मला वाटत नाही. पण जर ती शक्ति खूपच प्रबळ असेल, तर मात्र माझा इलाज चालणार नाही, त्या परिस्थितीत मला माझ्या गुरूंना बोलवावं लागेल.” – स्वामी म्हणाले.

संध्याकाळी विशालने त्यांच्या सासऱ्यांना फोन लावला आणि काय घडलं ते सविस्तर सांगीतलं. या वेळेस ते जरा गंभीर झाले, पण तरी सुद्धा त्यांचं हेच म्हणण होतं की भूत, चेटूक, करणी, भानामती वगैरे असं काहीही नसतं उगाच तुम्ही वारेमाप पैसे खर्च करता आहात. म्हणाले, “त्यापेक्षा तुम्ही पोलिसांत तक्रार द्या. ते व्यवस्थित तपास करतील. नक्कीच कोणीतरी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.”

“बाबा,” विशाल म्हणाला, “कोणी कशाला आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल? आमचं कोणाशीच शत्रुत्व नाहीये.”

“तुम्ही कोणाला डुपलीकेट किल्ली दिली आहे का? कोणी तुम्ही गाढ झोपेत असतांना हळूच दरवाजा दुसऱ्या किल्लीने उघडून हे प्रकार करत असले तर? याचा शोध घेतला का?” – गोविंदराव.

“बाबा एक तर आम्ही कोणालाही किल्ली दिली नाहीये. दुसरं एक वेळ धरून चालू की तुम्ही म्हणता, तसं दुसऱ्या किल्लीने दार कोणीतरी उघडलं, पण तो आतला कडी कोंडा आणि दाराच्या वरच्या बाजूला लावलेला बोल्ट कसा उघडेल? आणि आम्ही प्रत्येक वेळी ही खात्री करून घेतली आहे की कडीकोंडा आणि बोल्ट व्यवस्थित बंद होते म्हणून.” – विशाल.

“मग आता काय करायचं ठरवलं आहे तुम्ही?” – गोविंदराव.

“काही नाही. आज स्वामींनी यज्ञ केलाच आहे, आता बघायचं यांचा काही परिणाम होतो का? नाहीतर त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्यांच्या गुरु कडे जावं लागेल. पण बाबा तुम्ही येणार होता त्याचं काय झालं? केंव्हा येता? तुम्ही आलात तर तुम्हाला खरी परिस्थिती कळेल.” – विशाल.

“अरे इथे सध्या काही महत्त्वाच्या केसेस च्या तारखा लागल्या आहेत. त्या सोडून चालणार नाही. कोर्ट एक्स-पार्टी निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. त्या निपटल्या की आलोच पुढच्या आठवड्यात. अगदी नक्की.” गोविंदराव.

“बाबा, तुम्ही म्हणता पोलिसांत तक्रार नोंदवा, पण कोणाच्या विरुद्ध? त्यांनी जर विचारलं की कोणावर तुमचा संशय आहे का? तर आम्ही काय उत्तर देणार.”– विशाल.

“नाही त्याची काही जरूर नसते. ते तुमची NC नोंदवून घेतील. तुम्हाला कोणीतरी त्रास देत आहे याचा तो एक पुरावा राहील.” – गोविंदराव.

“ठीक आहे. आजच जातो.” – विशाल.

गोविंदराव म्हणाले त्या प्रमाणे पोलिसांत तक्रार नोंदवून झाली. दोन चार दिवस जरा भीतीच्या छायेत गेले पण नंतर वातावरण निवळू लागलं. काहीही न घडता महिना उलटून गेला. सर्वांना आता खात्री पटायला लागली होती की स्वामींच्या यज्ञा मुळे खरंच रक्षा कवच निर्माण झालं आहे, आणि आता त्या वाईट शक्ति पुन्हा त्रास देणार नाहीत. पण असं काही झालं नाही. अजून पंधरा दिवस उलटल्या नंतर एक दिवस, रात्री कोणाच्या तरी भेसूर रडण्याच्या आवाजाने सर्वांनाच जाग आली. आवाज हॉल मधून येत होता. विशाल आणि विदिशा प्रियाला घेऊन दिनेशच्या खोलीत धावले. सर्व जण एकमेकांना घट्ट पकडून बसले होते. हॉल मधे जाऊन बघण्याचा एकाचाही धीर होईना. रडण्याचा आवाज येताच होता. एखादं लहान मूल जिवाच्या आकांताने रडेल, असा तो आवाज होता. विदिशाने तिच्या बाबांना फोन लावला.

“काय झालं विदिशा एवढ्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे न? आणि रडण्याचा आवाज कोणाचा आहे? काय झालं?” – गोविंदराव.

“बाबा हा रडण्याचा आवाज ऐकलात ना? हा हॉल मधून येतो आहे. याच आवाजाने आम्हाला जाग आली. विदिशा रडत होती आणि बोलत होती. तुम्हाला सगळी चेष्टा  वाटते आणि आम्ही इथे मारायला टेकलो आहोत.” – विदिशा.

“अग हॉल मधे जाऊन बघितलं का? नेमकी काय परिस्थिती आहे ते?” – गोविंदराव

“कोण जाणार? मी विशालला आणि शलाका दिनेशला जाऊ देणार नाही.” – विदिशा.

हे बोलणं चालूच होतं तेंव्हाच विशाल चिडून बोलला. “अग बंद कर तो फोन नुसते उंटांवरून शेळ्या हाकताहेत तुझे बाबा. इथे या म्हंटलं तर घाबरतात. जाऊ दे, तो फोन बंद कर अगोदर.” विदिशाला सुद्धा बाबांचा रागच आला होता. तिने फोन बंद केला.

“अहो, तुम्ही असे विचित्र का वागत आहात?” विदिशाच्या आईने गोविंदरावांना विचारलं? “तिकडे आपली मुलगी संकटात सापडली आहे आणि तुम्ही इथे नागपुरात बसून फुकटचे सल्ले देता आहात. काही हृदय नावाची चीज आहे की नाही या माणसाच्या शरीरात?” विदीशाची आई खूप संतापली होती. “उद्याच्या उद्या आपण बार्शीला जातो आहोत. सगळी कामं बाजूला सारा.” प्रभावतीबाईंनी निर्वाणीचं सांगीतलं.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.