Sumantanchya Vaadyaat - 1 in Marathi Detective stories by Dilip Bhide books and stories PDF | सुमंतांच्या वाड्यात - भाग १

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

सुमंतांच्या वाड्यात - भाग १

सुमंतांच्या वाड्यात

पात्र परिचय

दिनेश सुमंत                               मोठा भाऊ .

विशाल सुमंत                 धाकटा भाऊ.

शलाका                      दिनेशची बायको.

विदिशा                      विशालची बायको.

आश्विन आणि विशाखा          दिनेशची मुलं

प्रिया                       विशालची मुलगी

केशवराव                    शेजारी.

प्रदीप                       केशवरावांचा मुलगा. 

गोविंदराव                    विदिशाचे वडील. (वकील)

प्रभावतीबाई.                  विदिशाची  आई.

भाग 1

शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे दिनेश, विशाल आणि त्यांचे कुटुंब सहलीची आंखणी करत होते. दोन दिवस कोकणात घालवण्याचा बेत  पक्का करून त्याची पूर्ण आंखणी केली आणि शनिवारी सकाळी इनोव्हा मधून सर्व म्हणजे दिनेश, त्याची बायको शलाका, त्यांची दोन मुलं आश्विन आणि विशाखा, विशाल, त्याची बायको विदिशा आणि त्यांची मुलगी प्रिया निघाले. संपूर्ण ट्रीप खूपच आनंदात पार पडली, आणि आता सगळे परतीच्या प्रवासाला लागले होते. रात्र झाली होती आणि सर्व जण सुस्तावले होते. घरी पोचायला जवळ जवळ रात्रीचे ११ वाजले.

घरासमोर गाडी उभी राहिली आणि विशालच्या तोंडून “अरे! हे काय? हा काय प्रकार आहे?” असे उद्गार बाहेर पडले. तो आ वासून समोरच्या दृश्याकडे बघतच राहिला. त्याचा आवाज ऐकून आणि गाडी थांबल्यामुळे सर्वच जागे झाले होते आणि ते पण आश्चर्याने घराकडे पाहत होते. संपूर्ण घरातले आणि अंगणातले सर्वच लाइट चालू होते. झगझगीत प्रकाश पडला होता.

“विदिशा, काल सर्वात शेवटी तूच आलीस न घर बंद करून? मग दिवे बंद करायला विसरलीस कशी?” विशालने त्याच्या बायकोला, विदिशाला विचारलं.

“विशाल भाऊजी आपण काल सकाळी आठ वाजता निघालो. दिवे लावण्याचा किंवा मालवण्याचा प्रश्न येतो कुठे? आणि ती एकटीच नव्हती, मी पण तिच्याच बरोबर होते.” शलाकाने विदिशाची बाजू सांभाळून घेतली. किती झालं तरी विदिशा तिची धाकटी जाऊ होती.

“तुझं म्हणण बरोबर आहे, पण मग एवढे सगळे दिवे कसे चालू आहेत? चोर तर शिरला नसेल ना?” विशाल असं म्हणाला आणि सर्व महिला मंडळ  एकदम घाबरलं आणि गप्प बसलं. आता दिनेश समोर आला. म्हणाला, “तुम्ही सर्व गाडीतच बसून रहा. बाहेर पडू नका. आम्ही जाऊन बघतो काय प्रकार आहे ते.”

यांच्या गाडीचा आवाज ऐकून शेजारच्या घरात पण जाग आली. केशवराव आणि त्यांचा मुलगा प्रदीप बाहेर आले. त्यांना पाहून, नाही म्हंटलं तरी निशांतला जरा हायसं वाटलं. केशवराव बाहेर आले आणि दिनेशला  म्हणाले,

“काय दिनेश दिवे घालवायला विसरले का तुम्ही? कालपासून जळताहेत.”

“नाही हो काका, काल सकाळी निघालो आम्ही. चोर असतील का? तुम्हाला काही संशयास्पद हालचाल जाणवली का?” – दिनेश

“नाही, सगळं तर ठीक आहे. म्हणजे, आमच्या नजरेस काही आलं नाही. पण तसं कशाला? आपण आतमधे जाऊनच बघू. जे काही असेल ते कळूनच येईल.” – केशवराव.

घर उघडून चौघं जण अत्यंत सावधगिरी बाळगत घरात शिरले. कुठेही कसलीही उलथापालथ दिसली नाही. सर्व वस्तु जागच्या जागी होत्या. चोरा चा कसलाही मागमूस नव्हता. मग दिनेशने सर्वांना गाडीतून बाहेर या असं सांगीतलं. बराच वेळ घराचा काना कोपरा सर्वांनी पुन्हा पुन्हा तपासला. मग सर्वांचं समाधान झाल्यावर शलाकाने सर्वांसाठी कॉफी केली. आता साथीला केशवरावांची आणि प्रदीपची बायको आल्या होत्या. बऱच चर्वित चर्वण झाल्यावर अशा निष्कर्षाला सर्व पोचले, की विदिशाने सकाळ असल्याने फारसं लक्ष दिलं नाही आणि लाइट चालू राहिले. अर्थात हे शलाका  आणि विदिशाला मान्य नव्हतं, पण दुसरं कुठलंही सय्युक्तिक कारण न सापडल्याने त्यांनी हार मानली.

दुसऱ्या दिवशी सोमवार होता, आणि आठवड्याचं वेळापत्रक सुरू झालं. नंतरचा शनिवार पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वर्षाला जाग आली, तिने दिनेशला उठवलं. “अहो, काहीतरी खुडबुड असा आवाज आला आणि माझी झोप उघडली.” दिनेशने कानोसा घेतला, पण त्याला काही ऐकू आले नाही. तो म्हणाला “तुला भास झाला असेल, झोप शनिवार आहे. सुट्टी आहे.” आणि कूस बदलून तो झोपला सुद्धा. वर्षाला काही चैन पडेना, पण उठून बाहेर जाऊन बघण्याची हिम्मत पण होत नव्हती. सकाळ होईपर्यंत काही तिला झोप लागली नाही. सकाळी सहा वाजता घंटी वाजली. बहुधा दूधवाला आला असेल, म्हणून शलाका  धीर करून उठली. दूधवाला होताच, पण त्याच्या बाजूला केशवराव पण उभे होते. “काका, एवढ्या सकाळी सकाळी? काय विशेष?” शलाका  म्हणाली.

“अग विशेषच आहे. आज पुन्हा तुमच्या अंगणातले लाइट चालू आहेत. काय प्रकार आहे हा?” – केशवराव

वर्षाने बघितलं बाहेरचे सर्वच लाइट चालू होते.

“मी चार वाजता नेहमी प्रमाणे उठलो तेंव्हा सर्व काही आलबेल होतं, पण नंतर थोड्याच वेळात बाहेरचे सर्व लाइट लागले. मला वाटलं की मागच्या प्रमाणे यावेळी सुद्धा तुमचा बाहेर गावी जाण्याचा विचार असेल म्हणून सगळे उठला असाल. म्हणून मी फारसं लक्ष दिलं नाही. पण जेंव्हा तुमच्याकडे काहीच हालचाल दिसेना तेंव्हा आलो.” – केशवराव

वर्षाने दिनेश आणि विशाल ला आवाज दिला. दोघे बाहेर आले आणि त्यांना झालेला प्रकार समजला. “तरी मी म्हणत होते की कसला तरी आवाज येतो आहे, पण तुम्ही लक्षच दिलं नाही. तेंव्हा चारच वाजले होते.” शलाका  आता चिडली होती.

“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? पहाटे चार वाजता कोणीतरी आपल्या घरात घुसला आणि त्याने लाइट लावले? आणि चुपचाप काहीही न चोरता निघून गेला?” दिनेश आता चिडला होता. बाजू त्याच्यावर उलटली होती ना. “अग पण घरात कोणी शिरले असते तर त्यांच्या किमान पाऊलखुणा तरी दिसल्या असत्या. तसं काहीच दिसत नाहीये.”

“साहेब,” इतका वेळ शांतपणे उभा असलेला दुधवाला बोलला. “साहेब, मला तरी हा भानामतीचा प्रकार वाटतो आहे.”

“ए बाबा तू तुझी अक्कल तुझ्याजवळच ठेव, असं काहीही नसतं. उगाच काहीतरी बडबडू नकोस. तू जा तूझ्या कामाला.” – दिनेश आता चवताळला होता. त्याने दूधवाल्याला जवळ जवळ बाहेर ढकललंच. केशवरावांनी चिघळणारी परिस्थिती पाहून हळूच काढता पाया घेतला. विशाल खांदे उडवून आपलं आवरायला गेला. दिनेश पण गेला. शलाका  आणि विदिशा दोघीही गोंधळल्या होत्या.

“ही भानामती काय भानगड आहे?” विदिशाने वर्षाला विचारलं. तिच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा होती.

“काहीच कल्पना नाही, पण तो दुधवाला ज्या पद्धतीने बोलला त्यावरून काही तरी भुता खेताची भानगड असल्याचा संशय येतो आहे.” – शलाका  म्हणाली. आता ती पण घाबरली होती.

“मग आता?” मला तर ही संकटाची चाहुल वाटतेय” – विदिशा.

“पण आपल्या वाइटावर कोण असेल? आपण कोणाचं वाईट केलंय? देवा, परमेश्वरा तूच निभावून ने रे बाबा.” – शलाका .

थोड्याच वेळात दिनेश आणि विशाल फ्रेश होऊन आले. चहा पितांना कोणीच बोलत नव्हतं. सर्व आपापल्या विचारात गढले होते. दुधवाला जे बोलला त्याचा नाही म्हंटलं तरी परिणाम झालाच होता. शेवटी विशालने कोंडी फोडली. “दिनेश, मला तो दुधवाला जे  बोलला त्यात तथ्य आहे असं वाटतंय. पहा न बाहेरून कोणी आल्याच्या खुणा नाहीत, आणि आपण कोणीही लाइट लावले नाहीत. तरी सुद्धा आठ दिवसांपूर्वी आणि आज अचानक दिवे लागले. याचा काय अर्थ लावायचा?”

“विशाल, अरे भानामती म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. आपल्याला घाबरवण्यात कोणाचा काय हेतु असणार आहे? आपण साधी माणसं आहोत, आपली कोणाशीच दुष्मनी नाहीये. मग?” – दिनेश.

“मी विदिशाच्या बाबांना विचारू का? ते वकील आहेत, त्यांना बराच अनुभव आहे.” – विशाल.

“हो हो, आत्ताच विचार. लगेच फोन लाव. आज शनिवार आहे, म्हणजे कोर्ट नाही, बाबा मोकळे असतील.” विदिशा अधीर होऊन म्हणाली.

“विशाल, आपल्यालाच अजून नीट कळलेलं नसतांना, त्यांना सांगून त्यांच्या टेंशन मध्ये वाढ करू नकोस. मला विदिशाच्या बाबांची चिंता नाहीये, पण आई? त्यांचं काय? नको जरा थांब. आपण विचार करू. घाई घाईने काही कळवू नकोस. म्हणजे मला असं वाटतं.” – दिनेश.

“विशाल, दिनेश जे बोलला त्यात मला तथ्य वाटतंय. आत्ता इतक्यात नको त्यांना सांगायला.” शलाका  म्हणाली.  विदिशाला पण ते पटलं.

मग सगळे घराची तपासणी करायच्या मागे लागले. अगदी काना कोपरा, इंच नी इंच डोळ्याखालून घातला, पण कुठे संशयास्पद काहीही आढळलं नाही. पुन्हा सगळे थकून भागून टेबल वर येऊन बसले. मुलांना काहीच काळात नव्हतं पण त्यांना एवढंच कळलं की काही तरी वेगळंच चाललं आहे, म्हणून तिघेही एका ठिकाणी चूप चाप बसून होते.

“मला असं वाटतं की मी आणि विशाल आज पासून हॉल मध्ये झोपायला सुरवात करतो. शलाका, तू मुलांना घेऊन आपल्या बेडरूम मध्ये झोप. विदिशा आणि प्रिया त्यांच्या रूम मधे, विशाल काय म्हणतोस?” – निशांत.

“करेक्ट आहे. कळेल तरी कोणी घरात शिरतंय का ते. आणि जर कोणी आलंच तर बघून घेऊ.” – विशाल.

“नाही, तुम्ही तिकडे आणि आम्ही रूम मधे असं नको. मला भीती वाटते. तुम्हाला काही झालं तर?” – विदिशा. शलाकाने सुद्धा मान डोलावली.

“अग आम्हाला काय होणार आहे? चांगले मजबूत आहोत आम्ही दोघं. आणि तुम्ही रूम ची दारं उघडी ठेवा. ” – दिनेश

“नको, आपण सर्वच हॉल मध्ये झोपू. चालेल आम्हाला.” – विदिशा.

“नाही तर असं करू. जुनं घर असल्याने आपल्या खोल्या खूप मोठ्या आहेत. आपण मुलांचा पलंग आपल्या खोलीत शिफ्ट करू, विदिशा आणि विशाल त्यांच्या खोलीत. दारं उघडी. मग प्रश्नच मिटला.” – शलाका 

ही कल्पना सर्वांनाच मान्य झाली. मग निशांतने सुताराला बोलावून, रूमच्या  दारांना बाहेरून असलेल्या कड्या काढून टाकल्या, जेणेकरून बाहेरून दरवाजा बंद करता येणार नाही. एवढी जय्यत तयारी झाल्यावर, सर्वांना जरा बरं वाटलं. हे रुटीन चालू असतांना पुढचे १०-१२ दिवस काहीच घडलं नाही. हळू हळू मागच्या घटना मनातून पुसल्या जात होत्या, पण नंतर एक दिवस तो प्रकार घडला आणि सर्वांचीच पाचावर धारण बसली त्या दिवशी सकाळी उठल्यावर वर्षांने जे पाहिलं त्यामुळे तिच्या तोंडून एक किंचाळी निघाली. दिनेश आणि विशाल धडपडत उठले आणि त्यांनी जे पाहिलं त्याने सर्वांची वाचाच बसली.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.