Kisse Choriche - 4 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | किस्से चोरीचे - भाग 4

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

किस्से चोरीचे - भाग 4


त्या काळी मी पुण्यातल्या वडगावशेरी गावात रुके चाळीत रहायला होतो आणि माझा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता.
मी पुण्यात रहात असलो तरी वेगवेगळ्या निमित्ताने पुण्याहून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या गावी अधूनमधून अगदी सह कुटुंबं जात असे.
हा प्रसंग घडला तेव्हा अशाच एका कौटुंबिक कार्यक्रमसाठी मला माझ्या गावाकडच्या भावाकडून बोलावणे आले होते.घरातला अत्यंत महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असल्याने तो अटेंड करणे मला आवश्यक होते.त्या काळी गावाकडे जायला एस टी अर्थात आपल्या लालपरी शिवाय दुसरा पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता आणि त्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर जायला लागलायचे.
गावाकडच्या त्या कार्यक्रमाला मी माझी पत्नी आणि माझा दोन वर्षे वयाचा मुलगा असे आम्ही तिघे जाणार होतो;पण नेमके विधानसभा अधिवेशन चालू असल्याने माझ्या पत्नीला ऑफिसमधून सुट्टी मिळेना.तोपर्यंत मी मुलाला घेऊन एकटा कुठेही बाहेरगावी गेलेलो नव्हतो.
मी एकटाच गावाला जाण्याऐवजी मुलालाही माझ्याबरोबर न्यायचे ठरवले...त्या काळी खांद्याला शबनम बॅग अडकवायची फॅशन लोकप्रिय होती.
 मी मुलाला कडेवर घेऊन आणि हात रिकामे रहावेत म्हणून खांद्याला शबनम बॅग अडकवून वडगावहून स्वारगेटला आलो. बॅगेत एक दिवसाच्या मुक्कामाच्या दृष्टीने आवश्यक असलेले कपडे घेतले होते.
मी स्वारगेट एस टी स्टँडवर आलो आणि माझ्या गावाकडे जाणाऱ्या बस जेथे लागतात त्या सहा नंबरच्या फलाटावर थांबलो.तेथे फारशी गर्दी नव्हती.फलाटावर कुणी ओळखीचे गाववाले भेटतात का पाहिले;पण त्यात कुणीही ओळखीचा चेहरा नव्हता.गाडी यायला अजून पंधरावीस मिनिटे होती म्हणून तेथील बाकावर मी माझ्या लहान मुलाला घेऊन टेकलो.
थोड्या वेळात गाडी फलाटावर लागली आणि कडेवरचा मुलगा आणि खांद्यावरची शबनम सांभाळत मी बसमध्ये चढू लागलो...
खरं तर आधी तेथे अजिबात गर्दी नव्हती;पण का कुणास ठाऊक मी बसमध्ये चढू लागलो तशी अचानक दरवाजात खूपच गर्दी झाली.अक्षरशः रेटारेटी सुरु झाली. कडेवर लहान मुलगा आणि खांद्यावर लोंबणारी माझी शबनम बॅग सांभाळत त्या ढकलाढकलीत तोल सावरत मी कसाबसा गाडीत शिरण्याचा प्रयत्न करू लागलो.
मी अक्षरशः घामाघूम होऊन एकदाचा गाडीत शिरलो...
मी आत गेलो तर मला याचे आश्चर्य वाटले की बसमध्ये चढताना एवढी गर्दी, एवढी ढकलाढकली होती तरीसुद्धा आतमध्ये मात्र अर्धी गाडी रिकामी कशी काय होती?
मग ती गर्दी कुठे गेली?
मी एका रिकाम्या सीटवर मुलाला बसवले आणि त्याच्या बाजूला बसलो.गाडी सुटायला अजून वेळ होती.
तेव्हढ्यात गाडीत आलेपाक वेफर्स बिस्किटे गोळ्या इत्यादी विकणारा पोऱ्या आवाज देत आला. त्याच्याकडचे लिमलेट गोळ्यांचे पाकिट बघून मुलगा ते हवे म्हणून खुणेनेच हट्ट करायला लागला.
मी पोऱ्याला जवळ बोलावले आणि पॅन्टच्या खिशातून पैसे काढायला खिशात हात घातला तर खिसा रिकामा!
बाप रे, मी खिशात साडेचारशे रुपये घेऊन निघालो होतो आणि आता खिशातल्या सगळ्या नोटा गायब झाल्या होत्या.मी फलाटावर असताना एकदा खिशात पैसे आहेत याची खात्रीही केली होती.
ते एकोणीसशे एकोन्नवद साल होते आणि साडेचारशे रुपये ही रक्कम माझ्यासाठी खूप मोठी होती.
गाडीच्या दरवाजात मी वर चढत असताना माझे दोन्ही हात अडकलेले आहेत हे पाहून माझ्यावर आधीच नजर ठेऊन असलेल्या खिसेकापू टोळीने अचानक गर्दी करून माझ्या खिशावर डल्ला मारला असावा...मला दरदरून घाम फुटला होता...आता... आज गावाला जायचा बेत रद्द करून परत घरी जावे लागणार होते...
एक पर्याय म्हणून मी गाडीत कुणी ओळखीचा गाववाला दिसतो का म्हणून नजर मारली...नशिबाने नेमका माझा सासवडला राहणारा एक नातेवाईक गाडीत बसलेला सापडला.मी त्याच्या जवळ जाऊन घडलेली घटना सांगितली त्याला शंभर रुपये उसने द्यायची विनंती केली. त्याने मला पैसे दिले. मी बसचे तिकीट काढले....
स्वारगेट एस टी स्टॅन्डवर पाकेटमारांचा सुळसुळाट असतो आणि ते गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे खिसे कापतात हे खूप लोकांकडून ऐकले होते;पण तोपर्यंत मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नव्हता.तो अनुभव मी पहिल्यांदाच त्या दिवशी घेतला होता!
©प्रल्हाद दुधाळ.
9423012020