Kisse Choriche - 5 in Marathi Anything by Pralhad K Dudhal books and stories PDF | किस्से चोरीचे - भाग 5

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

किस्से चोरीचे - भाग 5

किस्से चोरीचे

आम्ही पती पत्नी नोकरी करत असूनही बरीच वर्षे घरातल्या कामासाठी कोणी मोलकरीण ठेवलेली नव्हती. खरे तर घरची कामे आणि नोकरीची धावपळ यात आमची दोघांचीही खूप दमछाक व्हायची;पण सुरुवातीच्या काळात आर्थिक दृष्टया परवडत नव्हते म्हणून आणि पुढे स्थिरता येऊनही घरकामासाठी मोलकरीण ठेवणे फारसे मनावर घेतले नव्हते. याचे कारण म्हणजे आमच्या वेळेत घरी येऊन काम करू शकणारी कामवाली मिळवणे सोपे नव्हते.शिवाय आमच्या गैर हजेरीत कुणा अनोळखी कामवालीवर घर सोपवणे आमच्या दोघांच्याही मनाला पटत नव्हते.
माझ्या मुलाचे लग्न झाल्यावर मात्र वाढलेली घरातली कामे उरकणे आवाक्यबाहेर वाटल्याने आमच्या शेजारच्या वस्तीतली एक मावशी,(आम्ही घरात सगळे त्यांना ताई म्हणायचो) स्वयंपाक आणि साफ सफाईसाठी ठेवल्या.
तोपर्यंत आमच्या घरातल्या माणसांच्या व्यतिरिक्त इत्तर कुणाचाही घरात वावर नसल्यामुळे असेल आमच्याकडे असलेली रोख रक्कम,महत्वाचे पेपर्स अथवा नेहमी वापरण्याचे सोन्याचांदीचे दागिने घरात वाटेल तसे ठेवले जायचे. या बाबतीतला आमचा गलथानपणा चांगलाच अंगाशी आला...
तर या कामवाल्या मावशी आमच्या घरी नियमितपणे कामाला येऊ लागल्या आणि काही दिवसांतच आमचे आणि त्यांचे अगदी कौटुंबिक नाते तयार झाले.घरात निष्काळजीपणे पडलेल्या किमती वस्तू पाहून बऱ्याचदा या मावशी आम्हाला प्रेमाने दटावून 'नीट कपाटात ठेवा की ' म्हणून बजावत असत.
नेहमीच्या सवयीने माझा मुलगा ऑफिसातून आला की हातातले घड्याळ, गळ्यातली चेन आणि बोटातली अंगठी टेबलावर काढून ठेवायचा.त्याला बऱ्याचदा 'या वस्तू कपाटात ठेवत जा' असे समजावूनही त्याच्या या सवयी बदललेल्या नव्हत्या.
अशाच नेहमीच्या सवयीने त्याने त्या दिवशीही टी पॉय वर हातातली अंगठी काढून ठेवली.बारा ग्रॅम वजनाची सोन्याची शिवाय वर गुरुचा खडा असलेली ती अंगठी त्याने त्या शुक्रवारी संध्याकाळी हॉलमधल्या टी पॉयवर ठेवली.त्या नंतर पुढचे दोन दिवस शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने घरातल्या कुणीही तिकडे पाहायचा प्रश्नच आला नाही.
सोमवारी सकाळी सकाळी मुलगा ऑफिसला निघताना टी पॉयवर ठेवलेली अंगठी घालण्यासाठी जेथे ठेवली होती त्या जागेवर शोधू लागला. तिथे ती जाग्यावर नसल्याचे त्याच्या लक्षात आले.त्याने आम्हाला सर्वांना कुणी उचलून ठेवली का म्हणून विचारले; घरातल्या इत्तर तिघांनी तिकडे बघितलेही नव्हते. सर्वांनी मिळून तिथे आजूबाजूला अंगठी शोधायचा प्रयत्न केला;पण सापडली नाही.
कदाचित घाईत कोपऱ्यात कुठे तरी पडली असेल, शोधून काढू नंतर.... असे म्हणत म्हणत तो आठवडा संपला.खरे तर अशी किंमती अंगठी घरातून हरवणे ही गंभीर बाब होती; पण प्रत्येकाला आपल्या आपल्या कामावर जायची घाई होती त्यामुळे नाही म्हटले तरी आमचे त्याकडे दुर्लक्ष झाले.
नंतरच्या रविवारी मात्र आम्ही सर्वांनी मिळून अंगठी शोधून काढण्यासाठी सगळे घर पिंजून काढले;पण अंगठी काही सापडली नाही.
आता एकच शक्यता होती; पण...
घरात येणाऱ्या कामवाल्या मावशी बरोबर एवढे जिव्हाळ्याचे संबंध झाले होते की तिच्यावर अविश्वास दाखवून अंगठीबाबत काही विचारणेही अवघड झाले होते.
तरीही घाबरत घाबरत तिला अंगठीबद्दल कल्पना दिली.
घरातून अंगठी गायब झाल्याचे समजल्यावर तिनेही ती शोधायला मदत केली. पुन्हा सगळ्यांनी मिळून घरातले सगळे सांदी कोपरे शोधले;पण अंगठी जणू हवा होऊन उडून गेली होती! वरवर आम्ही सगळ्यांनी ही घटना फार मनावर घेतली नाही असे जरी एकमेकांना दाखवत असलो तरी त्या अंगठीचे हरवणे (का चोरीला जाणे?) मनावर खूपच आघात करून गेले.
माणसाची आशा वाईट असते असे म्हणतात ते काही खोटे नाही,कारण पुढे दरवर्षी दिवाळीच्या साफ सफाईत तरी चुकून का होईना गायब झालेली ती अंगठी समोर येईल अशा आशेने शोधक नजर सर्वत्र फिरत असते ...
मध्यंतरी मी ते घर विकून नवे घर घेतले.जुन्या घरातून नव्या घरी सामान हलवताना आवराआवर करतानाही माझी नजर ती अंगठी शोधत होती ...
आता मात्र त्यावेळी अंगठी हरवली नसून ती चोरीला गेल्याचे सत्य आम्ही स्वीकारले आहे...
©प्रल्हाद दुधाळ
9423012020