Devayani Development and Key - Part 27 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग २७

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २७

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   २७  

भाग  २६   वरून  पुढे  वाचा ................

 

“देवयानी, तू अगदी देवाच्या कृपेनेच वाचलीस. जर माझ्या आधी राजूची आणि तुझी भेट झाली असती तर त्यानी कसल्या कसल्या भुलथापा देऊन तुला आपलसं केलं असतं. तू खूप भोळी आहेस, चटकन त्याच्या कह्यात गेली असतीस, आणि नंतर त्यानी तुझा असाच चोळा मोळा केला असता, आणि कार्यभाग साधल्यावर तुला खड्या  सारखं बाजूला फेकलं असतं.” - विकास.

“हो रे विकास. त्याच्या आधी तू भेटलास ही त्या परमेश्वराचीच कृपा. नाही तर काय झालं असतं माझं देव जाणे.” – देवयानी.

“हो. देवांनीच त्या दिवशी तुला खोलीत कोंडून ठेवलं असं म्हणायचं.” – विकास.

“हो आणि नेमका तुलाच फोन लागला. मी तर कुठला तरी नंबर लावला होता.”

“ठीकच आहे. उशिरा का होईना आपल्याला त्याचं खरं स्वरूप कळलं हे छान झालं. आता तू त्यांच्या वाऱ्याला पण उभी राहू नकोस.” – विकास.

“एवढं सगळं कळल्यावर? शक्यच  नाही.” – देवयानी.

“चल, मला ऑफिस ला जायला उशीर होतो आहे ठेवतो मी आता. बाय.” – विकास.

दुसऱ्या दिवसांपासून सर्वांचंच रुटीन सुरू झालं. साधारण अजून एक महिना उलटला फेब्रुवारी सुरू झाला. अजून रिलीवर  येण्याचं काहीच चिन्ह दिसत नव्हतं. देवयानी खूपच हिरमुसली झाली होती. विकास तिला फोन वरून धीर देत होता. पण आता तो ही वैतागला होता.

एक दिवस दुपारीच सुप्रियाचा फोन आला.

“विकास, आज संध्याकाळी जेवायला यायचं आहे.”

“काय खास आहे?” – विकास.

“खासच आहे.” – सुप्रिया.

“सांगशील का जरा.” – विकास.

“तू ये तर खरं, मग कळेलच.” – सुप्रिया.

“ठीक आहे साडे आठ पर्यन्त चालेल?” – विकास.

“चालेल.” – सुप्रिया.

“कुठे यायचं? आणि कोण कोण येणार आहेत?” – विकासनी विचारलं.

“आमच्या घरी. आणि तू, मी आणि लक्ष्मी बस आपण तिघंच.” – सुप्रिया.

“ओके.” – विकास.

विकास वेळेवर पोचला.

“काय ग काय खास आहे? आता तरी सांग. उगाच माझी उत्सुकता ताणू  नकोस.”

“अरे जरा बस तरी. सांगते सर्व.” – सुप्रिया.

“अरे सेलीब्रेशन आहे.” – सुप्रिया. 

“कशा  बद्दल? पुन्हा प्रमोशन मिळालं? अभिनंदन.” – विकास.  

“नाही नाही, लक्ष्मी चं लग्न ठरलं आहे, ती कोईमतूर ला जात आहे परवा.”-सुप्रिया.

“ए, काही तरीच काय सांगते आहेस? नाही रे विकास लग्न ठरलं नाहीये, मुलगा येणार आहे पहायला. ही आपली सुपरफास्ट एक्सप्रेस सोडते आहे.” – लक्ष्मी

“विकास हिच्या आई, बाबांनी पाहून पसंत करून ठेवला आहे. आता फक्त लक्ष्मी पसंत पडली की झालं. फोटोवरून पसंती तर झालीच आहे. मग आता काय शिंग राहिली आहेत? लक्ष्मी सारख्या सुंदर टिपिकल मद्रासी मुलीला कोण नाकारणार?” सुप्रियानी बाजू मांडली.

“अग पण मला तो पटायला हवा न?” – लक्ष्मीची लाडीक तक्रार.

“तुला तो पटलाच आहे, उगाच नाही तास तास भर त्याचा फोटो बघत असते.” सुप्रिया म्हणाली आणि मग सुप्रियाने विकासला फोटो दाखवला. मुलगा खरंच स्मार्ट होता. विकास ने अंगठा आणि तर्जनी जुळवून छान अशी खूण  केली.

रात्री त्यानीच देवयांनीला फोन केला. देवयानी त्यावेळी नुकतीच  उठली होती आणि चहाच पित होती. इतक्यात विकासचा फोन आला. तिला जरा आश्चर्यच वाटलं.

सकाळी, सकाळी?

मग विकासने सुप्रियाच्या घरी काय घडलं ते सांगितलं आणि म्हणाला की

“देवयानी, लक्ष्मीला पाहायला मुलगा येणार, माझा काय संबंध? मला कशाला जेवायला बोलावलं? मला तर काहीच लिंक लागत नाहीये.” 

“मलाही समजत नाहीये. तसा तुझा आणि सुप्रियाचा सुद्धा कुठे फार संबंध आहे? लक्ष्मी तर दूरची गोष्ट आहे.” – देवयानी.

“तेच म्हणतो मी. मी जरा गोंधळलोच आहे.” – विकास.

“माहीत नाही. आज रात्री सुप्रियाला फोन करेन तेंव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करते. आणि मग तुला अपडेट देते.” – देवयानी.

“ओके.” – विकास.

रात्री देवयानीनी फोन केला तेंव्हा सुप्रियाने उडवा उडवी ची उत्तरं दिली. देवयानीचं काही समाधान झालं नाही. तिने मग विकासला सांगितलं पण त्याचेही समाधान  झालं नाही. शेवटी कोड्यांचं उत्तर मिळालच नाही. मग त्यांनी तो विषय सोडून दिला.

पंधरा  दिवस गेले  आणि एक दिवस सुप्रियाचा फोन आला.

“तुला सांगितलं होतं ना लक्ष्मी कोईमतूर ला जाणार आहे म्हणून.”

“हो मग? ठरलं का?” – विकास।

“हो ठरलं. कालच तिचा फोन आला होता.” – सुप्रिया.

“अरे वा छान. माझ्याकडून तिला अभिनंदन दे.” – विकास.

“आज आपण डिनर ला जाऊया का?” – सुप्रिया.

“अरे! आता काय? कशाबद्दल?” – विकास.

“एकटं एकटं वाटतंय, खूप कंटाळा आला आहे. ज्यांच्या बरोबर डिनर ला जावं असं  तुझ्या शिवाय कोणीच नाहीये. चल ना. तेवढाच टाइम पास. प्लीज प्लीज प्लीज.

ओके. पोचतो मी आठ, साडे आठ पर्यन्त.” – सुप्रिया.

“चल, सी यू.” – विकास.

 

विकास सुप्रियाला पीक अप करण्या साठी तिच्या फ्लॅट वर पोचला तेंव्हा नऊ वाजत आले होते. त्यानी सुप्रियाला फोन करून खालीच यायला सांगितलं. सुप्रिया जेंव्हा खाली आली तेंव्हा विकास बघतच राहिला. विकास ने असंच बघत राहावं या साठी सुप्रियानी विशेषच मेहनत घेतली होती. ती आज कुठल्याही हिरॉईन पेक्षा तसू भर सुद्धा कमी सुंदर दिसत नव्हती. उगाच नाही दुपारी जवळ जवळ  पांच तास तिने ब्युटि पार्लर मधे घालवले होते. एकदम स्टनिंग ब्युटी. विकास ला साडीच आवडते म्हणून तिने खास शिफॉन ची ऑरेंज कलर ची डिजायनर साडी खरेदी केली होती. तसंही तिच्या  गोऱ्या रंगावर ही साडी फार खुलून दिसत होती. हलकासा मेक अप आणि साडीला साजेशी  मोकळ्या केसांची हेअर स्टाइल करून घेतली होती. उंच टाचांचे सँडल आणि चेहऱ्यावर मादक स्मित. ब्युटि पार्लर मधे मिळालेल्या सर्व टिप्स ती आज वापरत होती. काय विचार होता तिच्या मनात? विकास तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघत होता आणि तिला मनोमन समाधान होत होतं. लढाई जिंकण्याकडे पहिलं पाऊल पडलं होतं.

नेहमी जीन्स आणि टॉप मधे दिसणारी लांब सडक केस कसे बसे  गुंडाळून टॉम बॉय सारखी फिरणाऱ्या सुप्रियाचं  आजचं रूप वेगळंच होतं. ती आज विकासला तर  अप्सराच भासली.

“चल मी तयार आहे.” सुप्रिया म्हणाली.

“अं, हो चल.” – विकास.

“कशी दिसते आहे मी?” विकासनी नुसतंच चल असं म्हंटलं काहीच कौतुक केलं नाही म्हणून तिने जरा नाखुषीनेच विकास विचारलं.

“त्या मोनालीसाने जर आज तुला पाहीलं तर, ती फोटो फ्रेम मधून पळून जाईल.” विकासनी उस्फूर्त अशी तिची तारीफ केली. आणि ती सुप्रियाला फारच आवडली.

“काय विकास इतकी पण तारीफ नको. खरं सांग ना.” सुप्रियाचा लटका विनय.

“अग  खरंच. तू नेहमी जीन्स मधे असतेस आणि स्वत:च्या रूपाची  कधीच काळजी घेत नाहीस, म्हणून तू सुद्धा इतकी लावण्यवती आहेस हे कधी लक्षातच आलं नाही.” विकासनी आपलं प्रांजल मत दिलं.

सुप्रिया लाजली. एक झकास स्माइल दिलं. आणि विकासच्या मागे बाइक वर बसली. तिने लावलेल्या परफ्यूम चा मंद सुगंध विकासला जाणवला. हॉटेल मधे पोचल्यावर सुद्धा विकासला अजून एक धक्का बसला. नेहमी तडक फडक आणि रोख ठोक बोलणारी सुप्रिया, आज एकदम मृदु, मुलायम आणि मधाळ स्वरात बोलत होती. प्रत्येक गोष्ट विकासला विचारून करत होती आणि मान डोलावत होती. हे काय चाललं आहे, विकासला कळेना. तो पूर्ण पणे तिच्या काह्यात गेला होता.

नेहमी मेनू कार्ड आपल्या हातात घेऊन आपल्याला हवी तशी ऑर्डर देणारी, आज विकास च्या आवडीचे पदार्थ मागवत  होती. विकास विचार करत होता की हिला कसं माहीत, मला नेमकं काय आवडतं आणि काय नाही? कदाचित देवयानीने सांगितलं असेल. असा विचार करून गप्प बसला.

जेवण करतांना विकास तिच्याकडेच बघत होता. तो तिच्यातला बदल आश्चर्याने निरखून बघत होता. पण सुप्रियानी या त्याच्या एकटक पहाण्याचा वेगळाच अर्थ घेतला. ती अजूनच खुलली आता तिच्या स्वरात एक प्रकारचा लाडिक पणा आला.

तिचं लाडिकपणे बोलणं विकासला सुखावून गेलं. तो खुळ्या  सारखा तिच्या कडे टक लावून पहातच राहिला. त्याला असच खिळवून ठेवण्यासाठी सुप्रिया हर तर्‍हेचे प्रयत्न करत होती आणि यशस्वी होत होती. जेवण संपलं, आइस क्रीम पण झालं आता निघायची वेळ आली. बिल अर्थातच विकास देत होता पण सुप्रियानी त्याला देऊ नाही दिलं. ती म्हणाली

“आमंत्रण माझं होतं आणि म्हणून बिल मीच देणार.” – सुप्रिया.

मग सुप्रियानी वेटर ला थोडं थांबायला सांगितलं आणि दोघांचा हॉटेलच्या बॅक ग्राउंड वर फोटो काढायला सांगितलं. आणि तो फोटो काढत असतांना सुप्रिया विकासला अशी काही बिलगली की जणू काही तिला विकासनी मिठीतच घेतलं आहे असा समज, तो फोटो पहाणार्‍याचा व्हावा. पण विकासनी तिला विचारलंच,

“सुप्रिया हे काय ?”

“अरे उंच टाचांच्या सॅंडल ची सवय नाहीये न म्हणून पाय थोडा लचकला. अजून काही नाही.” असं तिरप्या  नजरेने त्यांच्याकडे पहात सुप्रिया बोलली. आणि एक मधाळ स्माइल दिलं.

कुठलाही तरुण अश्या वेळी थोडा विरघळणारच, तसंच विकास पण विरघळला.

“तुला मी जवळ आले म्हणून त्रास झाला का?” – सुप्रिया.

“न, नाही. त्रास कसला व्हायचाय? छानच वाटलं की.” – विकास.

खरं म्हणजे विकास आता भानावर आला होता. पण सुप्रियाला वाईट वाटू नये आणि संध्याकाळचा विचका होऊ नये म्हणून तो असं म्हणाला. पण देवयांनीला कळलं तर तिची काय रिएक्शन असेल याचाच विचार डोक्यात होता. आणि त्याच वेळी त्यांनी ठरवलं की देवयांनीला सगळं सांगून टाकायचं म्हणून.

आणि रात्री देवयानीचा विकासला फोन आला. ती जरा चिडलेलीच होती. तिला ऑफिस ला जायला उशीर होत होता पण तिला सुप्रियानी फोटो पाठवला होता, त्यामुळे खूप अस्वस्थ झाली होती. आता तिला सुप्रियानी इतक्या घाई घाईने फोटो का पाठवला हे सुप्रियाच जाणे. काय होतं तिच्या मनात?

विकासनी फोन उचलला. त्याला, शनिवार असून सुद्धा, देवयानी इतक्या लवकर उठली याचं त्याला जरा आश्चर्यच वाटलं. मग लक्षात आलं की तिथे आज शुक्रवार आहे.

“हॅलो विकास, मी तुला एक फोटो पाठवते तो पहा मग  आपण बोलू.”

विकासनी whatsapp उघडून फोटो पाहीला आणि आपसूकच तोंडातून निघून गेलं की “अरे वा ! मस्त आलाय की फोटो.” आणि त्यानी जीभ चावली. क्षणातच केवढी मोठी घोडचूक त्याच्या हातून झाली, हे त्याच्या लक्षात आलं. पुढच्या वादळाची कल्पना येऊन,  तो काही सारवा सारव करणार होता, पण देवयानीनी त्याला वेळच दिला नाही. म्हणाली.

“मस्त आहे ना फोटो! वाटलंच होतं मला.” आणि तिने फोन कट केला.

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.