Julun yetil Reshimgathi - 2 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | जुळून येतील रेशीमगाठी - 2

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

जुळून येतील रेशीमगाठी - 2

भाग - २


(काही महिन्यांनी.....)







{विजया सहकारी बँक}
.
.
.
.

अर्जुन सकाळी लवकर बँकेत आला........अजून कुणी आलं नव्हतं........वेळ होता म्हणून तो त्याच्या केबिन मध्ये गेला.....त्याच कामं करू लागला.....






अर्जुन - अम्म्म नंदू दादा....नंदू दादा.....नंदू दादा मला एक कडक चहा आना जरा......कुठे गेले दादा?
(बाहेर आवाज देताना म्हणाला.........)






सावी - आत येऊ?
(नॉक करून.....)






अर्जुन - या दादा.....
तं तुम्ही? मिस पेडणेकर....






सावी - तुमचा आवाज आला म्हणून आत आले सर.. काही हवंय कां??







अर्जुन - अ अ नंदू दादा आहे कां बाहेर त्यांना पाठवा जरा आत....







सावी - सर ते आज आलेले नाहीत...त्यांच्या वाइफ ची तब्बेत खराब आहे म्हणून....तुम्हाला काही हवं आहे कां?






अर्जुन - ओह अच्छा ठीके...
अ अ काही नाही फक्कड चहा हवा होता.....






सावी - मग मी आणला तर चालेल??






अर्जुन - हो पण तुम्ही?






सावी - काही हरकत नाही सर आपला बँकेचा स्टाफ म्हणजे परिवारा प्रमाणे राहतो मग बँक ही आपलं घरं आहे घरात कामं करायला आपण लाजतो कां? मग इकडे कां लाजाव?






अर्जुन - ग्रेट...
प्लिज थोडं घेऊन येता कां?







सावी - हो नक्कीच आले...






अर्जुन तिला पाठमोरा जाताना पाहत राहिला........कां कुणास ठाऊक त्याला पाहावंसं वाटायचं.....तो उठून पॅन्ट्री रूम कडे गेला, बाहेर उभा राहून तिला पाहतच बसला........आज सावीने गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला.....खूप उठून दिसत होती......अर्जुनची तर नजर हटेना.....





🎵 🎹🎻🎺🎸📻



बेसुरे दिल ने सुर खनका दिये......
इश्क के मोती हैँ छनका दिये.....
अब उड रहा हूँ जैसे रंगीन बुलबुला.......
नाद खुळा नाद खुळा......
हाये हाये लग गया रे इश्क का नाद खुळा......







अर्जुन - हा गाणी कुठून ऐकायला येतोय....? आणि मी इथे कां आलोय?? 🙄 अरे देवा....






काहीवेळाने सावी चहा घेऊन आली.....चहा चा एक घोट घेताच अर्जुन तिच्या चहाचा प्रेमी झाला.....अर्जुन ने जस तिच्याकडे पाहिलं तो पुन्हा हरवला.....पुन्हा ती काय बोलतेय हे त्याला ऐकूच येतं नव्हतं.....







हो आज़मा आ ज़रा करने गुलामी मैँ खडा.......
बंदीशे तोडके राहमें तेरी मैं बढा......
अनकहे उलझे सवालोंसे तेरे.....
खयालोंसे मैं मिल रहा....
नाद खुळा नाद खुळा.....
हाये हाये लग गया रे इश्क का नाद खुळा.....






इश्काची रीत माझी मौलाची प्रीत माझी....
तुच रे तुच रे जीवा माझा तुझातं रे.... ❤️🦋








सावी - सर....सर...





अर्जुन - अ हा हा बोला ना....






सावी - कुठे हरवलात?





अर्जुन - ते तुम्हाला पण गाणी ऐकू येतात कां? आता ही आलं कां ऐकू?





सावी - नाही तर..आपल्या बँकेत कां कुणी गाणी लावेल.....






अर्जुन - मग मला कां ऐकू येतोय गाणं.....?






सावी - सर चहा आवडला कां???






अर्जुन - हो मग......वाह पेडणेकर अहो उत्तम बनवलायत...मी असा चहा आताच पितोय....वाह!!







सावी - थँक्यु सर... बरं आता जाऊ मी? सगळे आलेत बाहेर कामं स्टार्ट करतो....






अर्जुन - हो नक्कीच...मी आलोच...माझं कामं आहे....






सावी - ओके....या सर...






विदुला - गुड मॉर्निंग सर...






राहुल - गुड मॉर्निंग






प्रशांत - मॉर्निंग सर..






अर्जुन - मॉर्निंग ऑल....
बसा...बरं आज सगळ्या डिपार्टमेंट मधल्यानी एक कामं करायचंय...आता पर्यंतच्या सगळ्या फाईल्स लॉस प्रॉफिट सगळं टॅली करून शीट बनवून मला दाखवायची.....मला बघायचंय.....नेमका किती प्रगती आहे आपल्या बँकेची....समजलं आता वाजलेत नऊ मला चार वर्षाच्या फाईल्स पाहिजेत सगळ्या ते ही अकरा वाजे पर्यन्त.....You're Time Starts Now......






सगळे - Yes सर....






केबिन मधून अर्जुनच लक्ष मधेच सावी कडे जायचं......नजर थांबावी कुठे तर तिच्या लांब सडक केसांवर.......चेहऱ्यावर येणाऱ्या बटांवर....





अकरा वाजले.......तस अर्जुन केबिन बाहेर आला.....
घड्याळ पाहिलं......






अर्जुन - Stopssssss
कोना कोणाचं कामं पूर्ण झालंय त्याने पुढे या....







सावी - सर..या माझ्या डिपार्टमेंट च्या फाईल्स....






अर्जुन - हम्म गुड....
काय हे? हा फक्त पेडणेकर पुढे आल्यात....त्यांचच झालं फक्त.....तुम्ही सगळ्यांनी काय केला मग? वेळ त्यांना पण सारखीच दिलेली ना? मग कां नाही झालं तुमचं पण....? स्पीड नाही माहित कां तुम्हाला...You All Know about Speed??? स्पीड हवी की नको???







सगळे - हो...







अर्जुन - मी इकडे शाळा चालवायला आलोय कां? सांगा.....शेम....आता लवकरात लवकर फाईल तयार करा आणि झालं की बाकीची कामं करा....
गुड मिस पेडणेकर....नाईस वर्क....






सावी - थँक्यु सर....







अर्जुन - तुम्ही कामं करून घ्या पुढचं....







सावी - हो सर...
अ सर काही चूक असेल फाईल मध्ये तर आधीच सॉरी हू...काही असेल तर नक्की सांगा मी करेक्शन करेन.....







अर्जुन - ओके... फाईन...
.
.
.
.
.

विदुला - सावे चल लंचं ब्रेक झालाय....??





सावी - अअअ नको तुम्ही जा आज मला भूक नाही....





प्रशांत - ए कां गं?? चल ना जेवायला....





राहुल - डब्बा नाही आणलास कां??





सावी - आणलाय पण मन नाही......





विदुला - कां गं??





सावी - ताप आल्यासारखं वाटतय मी येते नंतर प्लिज तुम्ही जा....





राहुल - बरं ठीके





विदुला - ओके





सावी - कां आज मनात भीती दाटून येतेय पुन्हा...आजच्या दिवशी ती घटना....💔आठवली तरी अंगावर काटा मारतो......काय होतीस तू काय झालीस तू??? आठवून आठवून घाम फुटतोय......बीपी लो झाली असावी बहुतेक माझी......अरे देवा.... काय करावं आता....






अर्जुन - अरे पेडणेकर गेला नाहीत तुम्ही लंच टाइम आहे.....कामं किती करणार......






सावी - अ अ स सर ते मी करतं नव्हते....जरा बसलेले.....मला....





अर्जुन - पेडणेकर काय होतंय तुम्हाला? अहो घाम कां येतोय? ए सी मध्ये घाम? बरं नाही कां?






सावी - अ सर नाही असं काही नाही....मी ओके आहे....






अर्जुन - Sure??





सावी - yes sir...





अर्जुन - ओके...







संध्याकाळी बँकेतून निघाल्यावर सावी ला अजूनच चक्कर येऊ लागली........तिचा तोल जाऊ लागला.......समोरच दृश्य दिसेनास झालं....अर्जुन सुद्धा घरी जायला निघाला होता.....सावी चा तोल जायला लागला होता......







अर्जुन - अरे ह्यांना काय झालं अशा कां चालत आहेत या???
(तिला पाहताना....)





सावीचा तोल गेला आणि ती धडमकनsss खाली पडली......





अर्जुन - अअअ पेडणेकर.....
पेडणेकर अहो काय झालं??? उठा? पेडणेकर...अरे बापरे यांना चक्कर आली.....काय करू?? हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हवं....
(तिला उचलून घेताना....)
.
.
.
.

अर्जुन - डॉक्टर काही सिरीयस????






डॉक्टर - नाही नाही काही नाही जरा त्यांची बीपी लो झाली म्हणून त्यांना चक्कर आली.....जरा स्ट्रेस कमी घेतला तर बऱ्या होतील तुमच्या वाइफ.....






अर्जुन - हा.... अ अ माझ्या वाइफ????






सावी - अअअअ अरे सर सर तुम्ही इकडे कां आणलयत मला....? क काय झालं??






अर्जुन - शांत व्हा पेडणेकर बीपी लो झाल्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडलात.....अहो कसलं इतकं स्ट्रेस घेता की बीपी लो. होईल....नका घेऊ.....






सावी - अ हो हो सर थँक्यु सर म मला आता निघावं लागेल माझ्या घरातले वाट पाहत असतील...






अर्जुन - आ अ तुम्ही एकट्या नका जाऊ मी सोडतो तुम्हाला....मला पत्ता सांगा...






सावी - नको सर तुम्हाला कशाला त्रास....






अर्जुन - अहो त्रास काय त्यात आजारी असताना तुम्हाला असं एकटं पाठवण मला पटत नाही....






सावी - खरंच गरज नाही पण सर...





अर्जुन - हो पण मी येतोय चला....
.
.
.
.
अर्जुन ने सावी ला घरी पोहोचवलं.....सावीने अर्जुनला तिच्या घरात बोलावलं......घरी सविचे वडील आणि बहीण काळजीत होते.....सावीला पाहताच साची येऊन तिच्या गळ्यात पडली...सावीने तिला शांत केले.....





सावी - शुईईई पिंकी शांत हो पिंकी....मी. आलेय ना बाळा.....






साची - तायडे किती घाबरलो माहिते आम्ही...काय झालं होतं गं तुला?





सतीश - काय झालेलं तुला बाळा? असं अचानक?





सावी - सांगते बाबा....सर आत या ना....
बाबा पिंकी हे माझे बॉस आहेत अर्जुन कुलकर्णी सर....यांनीच मला दवाखान्यात नेलं आणि आता सोडल.....






अर्जुन - नमस्कार! ते पेडणेकरांना अचानक चक्कर आलेली डॉक्टरांनी सांगितलं की बीपी लो. मुळे झालं.....






सतीश - थँक्यु सर तुमचे कसे आभार मानू....





अर्जुन - काका प्लिज प्लिज असं नका करू...आणि सर कां म्हणता अर्जुन म्हणा चालेल मला.....माझं कर्तव्य होतं ते मी केल काका....






साची - थँक्यु सर






अर्जुन - वेलकम....मी येतो आता.....






सतीश - हो या या....






सावी - सर थँक्यु परत....






अर्जुन - ठीके अहो...अराम करा....






साची - किती चांगले आहेत तुझे बॉस....





सावी - हो आहेत तर खरं....






सतीश - चल जेवून घे आधी...आणि अराम कर टेन्शन कां घेतेस बाळा.....बीपी लो व्हावं इतकं.....






सावी - काय करू बाबा भूतकाळाच्या जखमा जात नाहीत......आजची तारीख आठवते कां बाबा? हाच तो दिवस होता......आठवला ना की अंगावर काटा मारतो..... आज पुन्हा भीती दाटली मनात....आणि काय बाहेर आली तशी चक्कर येऊन पडले....






साची - नशीब अर्जुन सर होते म्हणून.....






सावी - खरय बाबा.....





सतीश - हो बाळा पण आता या सगळ्या गोष्टी कां आठवतेस चिऊ....अग त्या गोष्टीला घडून किती वर्ष झाली......आता पुन्हा पुन्हा तेच आठवत बसणं म्हणजे आयुष्यातला मूर्खपणा......अग मागे झालेलं मागे सोडायचं सोबत घेतलं तर ते आपल्याला जगू देतं नाही......भूतकाळात जगत राहिलो तर वर्तमान आणि भविष्य दोन्ही बिघडत लक्षात ठेव......किती वर्ष झाले तुला समजवतो पण तुला समजतं नाही.....मूव्ह ऑन हो बाळा.....अग तुम्ही दोघीच माझा सहारा आहात असं वागलात तर कस होईल? जावई म्हणजे माझीच मुलं आणि आता तू लग्न नाही करणार म्हणतेस......तुझं झाल्याशिवाय पिंकी नाही करणार म्हणते....मग मी कस जगू? तुमच्या आनंदात माझा आनंद आहे...कस समजतं नाही बाळांनो..... 😔






साची - बाबा रडू नका..... 😔






सावी - सॉरी बाबा 😔रडू नका ना...






सतीश - चला चला जेवून घ्या आधी....मग बोलू....






सावी - ह्म्म्म....

.
.
.
.
.

संगीता - अरे देवा काय सांगतोस?? बिचारी तिला फार लागलं कां पडली तर....






भागीरथी (आज्जी) - हो ना, काय गं त्या पोरीला झालं??






अर्जुन - काही नाही बीपी लो झाली.....कदाचित कसलं तरी घरगुती टेन्शन असावं...
डॉक्टर म्हणाले सुद्धा हा त्रास त्यांना बऱ्याचदा होतं असावा,स्ट्रेस घेतलं की चक्कर बीपी लो होणं असं...म्हणजे त्यांना बीपी चा प्रॉब्लेम आहे असं नाही...






भाऊसाहेब - अरे देवा, वय किती असावं तीच??






अर्जुन - अम्म्म, पंचवीस....





अपूर्व - दादा तुला इतकं ठामपने कस माहित 😂





अर्जुन - अप्पू मुर्खा आमच्याकडे रिकॉर्ड्स असतात त्यात सगळ्या डिटेल असतात.....जन्म तारीख पण लक्षात आहे माझ्या सगळ्यांचीच बरं कां.....मेंदू शार्प आहे माझं......






अपूर्व - हा हा लहानपणी बदाम जास्त खायचास ना म्हणून...... 😏मी काय काजू खायचो म्हणून असं 😂






संगीता - अप्पू, शांत हो थोडं....






आजोबा - अरे इतक्या लहान वयात बीपी वैगेरा...अवघड आहे.....






अर्जुन - हो ना मी अठ्ठावीस वर्षाचा असून मला अजून काही नव्हे....






संगीता - बाळा ती कसल्या तरी दबावात असणार मनात दडपण असेल कसले तरी म्हणून.....






अर्जुन - असावं बहुतेक.....






आज्जी - काय बाई आजकालच्या पोरी...भरपूर नाजूक ना.....






संगीता - हो ना...






अर्जुन - चला माझे झाले जेवून...मी चाललो झोपायला.....उद्या संडे आहे सुट्टी आहे सो आरामात उठणार मी....... तर गुड नाईट सगळ्यांना.....






संगीता - गुड नाईट....






आज्जी - गुड नाईट....





आजोबा - गुड नाईट....बाय....
.
.
.
.

संडे म्हणून अप्पू अर्जुन बाहेर फिरायला गेले......अप्पूला खरेदी करायची म्हणून ते मॉल ला आले.....अप्पू खरेदी करण्यात व्यस्त होता......अर्जुन एकटा कंटाळला......तो बाल्कनी मध्ये उभा असताना, काही माणसांचा आवाज आला......





"चोर चोर पकडा त्याला पकडाssss"




समोरूनच एक माणूस पळत आला, त्याच्या हातात महिलेचा पर्स होता, अर्जुनला प्रकार कळला त्याने लगेचच पाय मधे घालून त्याला खाली पाडलं आणि पकडलं.....तो पळून जायचा प्रयत्न करतं होता अर्जुन ने त्याच्या एक कानाखाली मारली....







एक महिला - अरे लाज नाही वाटतं कां? असं चोरी करताना......मी तर म्हणते मारा याला....अशी लोक सुधारणार नाहीत.....






दुसरा व्यक्ती - हो ना मारा याला....मारा.....






सगळे त्या माणसाला मारायला येतं होते, तेवढ्यात जिची पर्स ती होती,ती सावी तिकडे आली...
अर्जुन आणि सावी एकमेकांना बघून जरा चकितच झाले......
सावी गर्दीतून पुढे आली.....सगळ्यांना थांबवलं....







सावी - थांबा थांबा....मारू नका त्यांना.....थांबा.....






अर्जुन - पेडणेकर तुम्ही???
ही पर्स???
(तिला पर्स देताना........)






सावी - हो सर माझी आहे.....थँक्यु....
आणि प्लिज यांना अजून नका मारू हे सुद्धा माणूसच आहेत ना.....







अर्जुन - अहो ha चोर आहे पेडणेकर..... गुन्हा केलाय त्यांनी......








सावी - मला ठाऊक आहे यांनी चोरी केली पण मुद्दाम नसेल ना केली.......कारण असतं काहीतरी तेव्हाच गुन्हा घडतो माणसांकडून......असच कुणी गुन्हेगार नाही बनत ना.....








महिला - हो पोरी पण तुझी पर्स घेऊन गेला उद्या मोठा गुन्हा पण करेल.....








सावी - ते तर काकू, नंतर ही करेलच ना....मोठं मोठे गुन्हे करणारे आहेतच की......पण आपण एखाद्याला बदलण्याचा प्रयत्न करायचा त्याला शिक्षा देऊन अजून बिघडण्याचा नाही......शिक्षा देऊन कुणी सुधरत नाही......
दादा उठा.....कां चोरी केलात माझा पर्स?? असं नका करू.....काम करा कष्ट करा पण चोरी नका करू....







तो व्यक्ती - ताई बरोबर बोलत पण मी मुद्दाम नाही केल.........चोरी कुणी अशीच नाही करतं.......मला नोकरीं धंदा मिळत नाही शिकलेलो आहे तरी......घरं गेलं सगळं गेलं कर्जा मध्ये..........माझ्या लहान मुलीची तब्बेत ठीक नाही तिला दवाखान्यात घेऊन जाता येईल इतकंच पैसे पाहिजे होते.........ज्यांच्याकडं असतय त्यांना नाही कळत ताई पैसे नसल्यावर काय होतंय ते......ज्याच्याकडं नसतंय त्याला समजतं काय हाल होतात.....म्हणून मी असं केल.....मी आणि. माझी बायको उपाशी राहू पण लेकराला कस उपाशी ठेऊ साहेब.......त्या लेकराला तर अजून भूक काय असती हे पण ठाव नाही........😔








अर्जुन - बापरे....पण मग चोरी केलीत कशाला मदत मागायची ना......









व्यक्ती - कुणाकडून??? आपली माणसं माझ्या माणसानीच मला फसवलंय......आणि बाहेरच्या जगातील माणसांकडून काय मदतं मागू?? जे फक्त स्वार्थी असतात......स्वार्थी आहे हे जग......आपलं झालं की झालं दुसऱ्यांसाठी कोणी जगत नाही साहेब.....प्रत्येकजण किळस करतो आमच्यासारख्या माणसांची......मदत कुणी नाही करतं......त्यांना वाटतं इतर गरीबासारखं आम्ही बी फसवणार त्यांना आम्ही पण नाटकं करतोय पण ज्याच्यावर परिस्थिती येते ना त्यालाच माहिती कस वाटतय......







सावी - आई गं....😔अअअ
दादा हे घ्या पैसे....तुमच्या मुलीला दवाखान्यात घेऊन जा कायतरी खा...आणि जी मिळेल ती नोकरीं करा पण कष्टच खा दादा......लबाडीच नको.....
आणि हे घ्या माझा नंबर, पत्ता लिहिलंय यावर काही लागलं मला कुठून पण कस पण फोन लावा....मी. हजर असेन मदत करायला पण चोरी नका करू....लबाडीच खाल्लं की देव पण माफ नाही करतं दादा...







व्यक्ती - होय ताई......धन्यवाद ताई....मी नाही परत असं करणार नोकरीं करणं मी.....😭समजवणारा लई मिळतात पण समज देऊन मार्ग दाखवणारे लई कमी असतात....तुम्ही माणसातल्या देव आहात.....






सावी - हात नका जोडू, आणि मी देव नाही दादा बस्स चांगल व्हावं तुमचं इतकंच माझं मतं...... बरं जा आता तुम्ही......आणि भेटा मला काहीही लागलं तर......








दुसरी महिला - वाह पोरी वाह! छान केलंस हो.....माया खूप आहे तुझ्यात.......आणि त्याला समज पण चांगली दिलीस......








सगळे - वाह छान.....
(टाळ्या वाजवत....)






सावी - हम्म....असं काही नाही काकू प्रेमाने समजवळ की समजतं समोरच्याला......कुणी उगाच गुन्हा नाही करतं परिस्थिती भाग पाडत असते.....








अर्जुन - पेडणेकर अहो छान बोलता तुम्ही...खरच एखाद्याच परिवर्तन होईल असं.....







सावी - असं काही नाही हू सर....







अर्जुन - आवडल मला जे तुम्ही केलंत.....







सावी - थँक्यु....कस आहे सर पैसा हा सुद्धा देवानेच बनवलंय माणसाने फक्त नोटा छापल्यात.....कष्ट केल्यावर जे फळ मिळत ते सुद्धा देव देतो...... आपलं काही नसतं सगळं त्याने दिलेला असतं मग त्यानेच दिलेल्या गोष्टीतला अर्धा वाटा गरजू माणसाला दिल तर काय फरक पडतो.....आपलं आपलं करतं आपण किती करणार.......शेवटच्या क्षणात पैसा जवळ नसणार आहे.....








अर्जुन - खरय....कुठून बोलता हो इतकं छान......









साची - माझी दीदी अशीच आहे सर, असे कामं ती करतच असते.......खूप Inspiration भेटे मला हिच्याकडून......निःस्वार्थ मनाची आहे माझी बहीण.....








अर्जुन - हो ना....खरच अशाच आहेत त्या......







सावी - गप हू पिंकी...








अर्जुनच नीट लक्ष तिच्याकडे गेलं.........रोज ड्रेसेज घालून येणारी सावी आज वेगळ्याच लूक मध्ये होती......लाल रंगाचा फ्लोरलं प्रिंटेड वनपीस, त्यावर शूज.....केसं मोकळी सोडलेली......




अर्जुन सुद्धा फॉर्मल लूक मधून आज causal लुक मध्ये आलेला........कमाळीचा हँडसम दिसत होता......काहीक्षण दोघ एकमेकांना बघतच बसली.......
ती अचानक झालेली नजरानजर 👀💕
काहीतरी वेगळंच जाणवलं त्यांना आज.......
न कळणारी भावना काय म्हणतात ते.....??!






डोळ्यातून होणारा अबोल संवाद काय म्हणतात ते हाच असावा कां???? 💘
ज्यात न बोलता येणाऱ्या गोष्टी,नकळत मनात आलेल्या भावना समजतात?? 💕...
असावा!










साची - अअअअ काय झालं?? दोघ गप्प कां??








सावी - अअअअ हं








अर्जुन - अअअ नाही गं..... अ By The Way तुम्ही आज इकडे??







सावी - हो बहिणी सोबत शॉपिंग.....थोडं चेंज....







अर्जुन - छान केलंत......आता बरं वाटतय ना???








सावी - हो एकदम....







साची - तुम्ही एकटे आलयात कां सर??







अर्जुन - नाही माझा.....







अपूर्व - अरे भाऊ काय झालं इकडे आता???
(मागून येताना......)







अर्जुन - अरे ते.......








साची / अपूर्व - तू sssss इकडे????? 🤨🙁
(एका सुरात......)








सावी - बापरे....म्हणजे तुम्ही दोघ एकाच कॉलेज मध्ये आहात...?😂








अर्जुन - आणि बेस्ट फ्रेंड्स आहात?😂








साची / अपूर्व - हो ssssss🙄







सावी - बापरे भयंकर योगायोग 😂








अर्जुन - हो ना....चला चांगल आहे ओळख आहे ते.....







सावी - हो ना...








अपूर्व आणि साची एकमेकाकडे बघतात.......🙁








अर्जुन - चला शॉपिंग करूयात......आता आपण सगळे एकत्र भेटलोच आहोत तर एकत्र शॉपिंग करू?? चालेल ना??








सावी - अम्म हम्म ठीके सर....







अपूर्व - हो दादा....







साची - हो दीदी....









अर्जुन - अम्म्म मिस पेडणेकर मला थोडी हेल्प कराल कां???







सावी - बोला ना....







अर्जुन - अ माझ्या आईसाठी, आज्जी आजोबा यांच्यासाठी थोडी खरेदी करायची आहे तर मदत कराल.....आजोबांना घेतलंय मी. पण जनरली लेडीज चा चॉईस वेगळा असतो सो....








सावी - अ हो चालेल.....







अर्जुन - मग ह्यातली कोणती घेऊ साडी....? आई आणि आज्जी साठी......?








सावी - अम्म्म, ही मोरपीसी आज्जीना घ्या...आणि ही आकाशी आईना....
नक्की आवडेल त्यांना.....







अर्जुन - इतक्या लगेच निवडलंत...ग्रेट हू
पॅक करा.....







सावी - आपल्या आईसाठी काहीही घ्यायचं असेल तर विचार नाही करावा लागतं आईला आपल्या नजरे समोर आणायचं आणि ठरवायचं सोपं जात.....







अर्जुन - हो ते आहेच पण माझ्या आईला तर तुम्ही कधी बघितलंत पण नाही.......








सावी - त्यात काय सर,आई ही जगातली सर्वात सुंदर व्यक्ती असते....तिच्यावर काहीही घ्या शोभूनच दिसत.....💕








अर्जुन - खरय...







*********************








साची - अप्पू आता माझ्याशी भांडू नकोस, मला माहिती होता कां की तू पण आज तुझ्या ब्रदर सोबत इकडे येणार आहेस......तू साधं मला मेसेज तरी करून सांगितलंस कां इकडे जाणार आहेस म्हणून.....आणि माझ्यावर भडकतोयस...... 😡









अपूर्व - अरे हो पण मला तरी कुठे माहिती होता....खरंतर चूक आपल्या दोघांची नाही आपले भाऊ बहीण एकमेकांना आधीपासून ओळखत होते.....








साची - हो, दीदी ला बरं नव्हतं तेव्हा अर्जुन सरच घरी घेऊन आलेले तिला.....








अपूर्व - अरे देवा! घरं पण बघितलं.....म्हणजे दादा सांगत होता ती हुशार स्टाफ ती पोरगी हीच......म्हणजे सावी ताई.....बापरे......







साची - अवघड झालं रे अप्पू, आपलं ठरलेलं की आपल्या घरच्यांना कधीच भेटू नाही द्यायचं आणि इकडे बग ना.....😔








अपूर्व - ठीके ना जाऊदे फक्त हेच ओळखतात ना अजून पूर्ण फॅमिली नाही ओळखत नको टेन्शन घेऊस....







सावी - हो ए आले दोघ.....







अर्जुन - काय झालं दोघ असं गप्प उभे?







अपूर्व - काही नाही शॉपिंग करून झाली मग बसलो.....







सावी - अग पिंकी जरा हे घे.....
(सामान हातात देतं.....)







साची - हा....दे....







अपूर्व - साची तू पिंकी????🙄😂








साची - आई शपत! अग तू अप्पू समोर मला पिंकी कां बोलीस आता हा सगळ्यांना माझं निक नेम सांगेल...... तू पण ना गं चिऊ ताई......








सावी - अय्या 😅😅







अर्जुन - पेडणेकर तुम्ही चिऊ????







चौघा पण एकमेकांना बघतात, आणि जोरजोरात हसू लागतात......... 😂😂😂😂










क्रमश :

चला फायनली पुन्हा गाठभेट झाली........पण असं कोणतं सत्य आहे जे सावी मनातच दडून ठेवतेय.....ज्याचा तिला त्रास होतोय.....





अर्जुन - सावी एक होऊ शकतील कां????







©®Pratiksha Wagoskar