Devayani Development and Key - Part 26 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग २६

Featured Books
  • Safar e Raigah - 10

     منظر ۔ سلطان مرزا کے اس ایک فیصلے نے گھر کی فضا کو جیسے ہمی...

  • Safar e Raigah - 9

     باب ۔کشمیر کی برفیلی اور سرد شام تھی۔ باہر چنار کے درختوں س...

  • قلم کا قیدی

                     انتساب اُن کے نام...میرے 'استادِ محترم&...

  • صبح ہو گئی چچا

    خفیہ میں نے اپنے دل میں کیا راز چھپا رکھا ہے؟ میں نے تعلق کو...

  • لفافہ

    تصویر آج پھر میرا دل ملاقات کے لیے تڑپ رہا ہے۔ ایک بار پھر،...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २६

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   २६

भाग  २५  वरून  पुढे  वाचा ................

“कुठे  चालली आहेस? आत्ता पिझ्झा येईल. मग थंड पिझ्झा चांगला लागत नाही. जाऊ नकोस बस. आणि हा पूर्णिमाचा मित्र आहे ना, फार इंट्रेस्टिंग पर्सनॅलिटी आहे. बघ तुझी ओळख करून देते. तुला पण त्याची कंपनी आवडेल.” देवयानीचा नाईलाज झाला. ती उठली होती ते पुन्हा बसली. विचारात पडली की राजू इथे काय करतोय? केंव्हा आला?

राजू जवळ आला. म्हणाला.

“हाय पूर्णिमा, शॉपिंग चाललंय? मजा आहे तुम्हा लोकांची.” 

“तू काय करतो आहेस मॉल मधे शॉपिंगच ना? मग?” – पूर्णिमा.

“मी पिक्चर बघायला आलो आहे. रिव्यू खूपच चांगला आहे. तुम्ही चलता?” आणि त्यानी पूर्णिमाच्या मैत्रिणींकडे नजर वळवली. देवयानीला पाहून दचकलाच. त्याचा चेहरा पडला.

“देवयानी, तू इथे कशी?” – राजू.

“राजू, तुम्ही ओळखता एकमेकांना?” पूर्णिमा ने विचारलं.

“हो पुण्याला मी होतो तेंव्हा देवयानी माझ्या मैत्रिणीची रूम मेट होती.” – राजू 

“असं आहे होय.” – पूर्णिमा.

“बरं माझा शो सुरू होतो आहे, मी निघतो. तुम्ही करा मजा.” – राजू.

“ए राजू, थांब, आम्ही पण येतो. काय सेजल, देवयानी, चलूया का?” – पूर्णिमा.

“मी नाही येत. गेले कीती तरी तास आपण नुसतेच फिर फिर फिरतोय माझं डोकं आता भणभणायला लागलंय, तुम्ही जा.” देवयानी म्हणाली.

“ओके. चल सेजल.” – पूर्णिमा.

देवयानी फ्लॅट वर एकटीच परतली. राजूला अचानक तिथे पाहून तिला काही सुचेनास  झालं होतं. आता पुढे काय होणार याचीच चिंता तिला भेडसावत होती.

तिला वाटलं की आत्ताच्या आत्ता विकासला फोन लावावा, पण त्या वेळी भारतात रात्र होती. रात्री बघू. असं म्हणून तिने हा विचार बाजूला सारला.

पण मनाला आलेली बेचैनी काही दूर होत नव्हती. रात्री पर्यन्त ती राजूचाचं  विचार करत होती. या परक्या देशात त्यांनी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं याच विचाराने ती फार अस्वस्थ झाली होती. जेवायची पण तिला इच्छा झाली नाही. सेजल आणि पूर्णिमाला यायला रात्र होईल याचा अंदाज होताच तिला.

त्यामुळे अजूनच एकटं एकटं वाटायला लागलं होतं.

रात्रीचे  दहा वाजले आणि तिने विकासला फोन लावला.

“हॅलो, काय ग आज एवढ्या सकाळी, सकाळी? म्हणजे आमच्या सकाळी.” – विकास 

“विकास एक गडबड झाली आहे.” – देवयानी.

“आता काय झालं आहे? आणि ते ही अमेरिकेत? रिलीवर तर इतक्यात येणार नाहीये हे तू मला सांगितलं आहेस मग आता नवीन काय झालं - विकास

“मला बोलू देशील का ? की  तूच अंदाज बांधत राहशील?” देवयानी चिडली होती.

“बोल. तू बोल. मी ऐकतोय.” – विकास.

“राजू इथे आलाय.” – देवयानी.

“राजू? कसा काय?” विकासनी आश्चर्यानी विचारलं.

“माहीत नाही पण आम्ही मॉल मधे गेलो होतो तेंव्हा तो आम्हाला अचानक भेटला. माझ्या रूम मेटचा तो जुना मित्र आहे. ते लोक सिनेमाला गेले. मी मात्र घरी वापस आले.” देवयानीनी वैतागून सांगितलं.

“अरे देवा! काय म्हणत होता तो?” – विकास.

“काही म्हणायची हिम्मत, आज तरी झाली नाही त्याची. पण उद्याचा काय भरवसा देता येईल?” – देवयानी.

विकास विचारात पडला. त्याच्या जवळ पण सध्या तरी यावर सोल्यूशन नव्हतं.

रात्री बारा वाजता सेजल आली. देवयानी जागीच होती. विकासशी बोलणं झालं होतं. तो ही काही मत प्रदर्शन करू शकला नाही. काळजी घे एवढंच बोलला. ती विचार करत होती, विकास तरी इतक्या दुरून काय सल्ला  देणार होता? इथली परिस्थिती नेमकी काय आहे ते देवयानीलाच कळत नव्हतं तर ती विकासला काय सांगणार आणि विकास तरी काय सुचवणार. परिस्थितीला देवयानीलाच तोंड द्यायचं होतं. ती आपल्याच विचारात गढून गेली होती.

“काय ग अशी काय बसलीस? कसला विचार करते आहेस?” सेजल नी विचारले.

“काही नाही ग असच. विकासला फोन केला होता म्हणून. आणि हे काय ? पूर्णिमा कुठे आहे? तू एकटीच? – देवयानी.

“पूर्णिमा गेली राजू बरोबर. येईल ती उद्या सकाळी काळजी करू नको.” – सेजल.

“राजू बरोबर गेली? म्हणजे?” देवयानीनी विचारलं.

“काय देवयानी ! आता ती राजू बरोबर रात्र घालवणार म्हणजे काय, ते तुला सांगावं लागणार का? कशी ग तू? अजून इतिहासात जगतेस का?” – सेजल.

“नाही सेजल, पण खरंच अश्या विचारांना मी पचवू शकेन असं वाटत नाही. मला तर हे सगळं भयंकर वाटतंय.” – देवयानीनी आपली व्यथा बोलून दाखवली.

“हे बघ, आपण परदेशात आहोत. भरपूर पगाराची नोकरी आहे. स्वतंत्र आहोत. तिकडे भारतात आपले आई वडील मुलं बघतात पण आपल्या तोडीचं त्यांना कोणीच मिळत नाही. पुन्हा समाज, जात, शैक्षणिक आणि आर्थिक लेवल, सगळंच बघितल्या जातं. त्यांच्यात वर्षं कशी निघून जातात ते कळतच नाही. खूप उशीर होतो. लग्नाला. आमचं वय आज ३० आहे. कधी लग्न होणार आणि कधी एंजॉय करणार आम्ही? बरं इथे आपल्याला आपल्याशी एकनिष्ठ असेल असा मुलगा मिळण्याची मारामार मग अश्या स्थितीत आपण काय करायचं? आनंदापासून वंचित कशा करता राहायचं?” सेजल म्हणाली.

“सेजल, तुझ्या कडे पाहून तुझे विचार असे असतील याची मुळीच कल्पना येत

नाही. धन्य आहेस तू.” देवयानीने हात जोडले.

मी कुठे म्हंटलं की हे माझे विचार आहेत म्हणून. आत्ता आपण पूर्णिमा बद्दल बोलत होतो. हे तिचेच  विचार आहेत. आणि त्या प्रमाणेच ती वागते.” – सेजल.

“तुझे पण बॉय फ्रेंड आहेत?” -देवयानी.

“नाही. पूर्णिमाचे विचार मला थोडे थोडे पटतात पण तिच्या सारखं वागायचं धाडस मा‍झ्यात नाहीये. त्यामुळे मी फक्त तिच्या आनंदात मी सहभागी होत असते. माझ्या घरचे म्हणताहेत की भारतात परत ये, म्हणजे मुलं बघण्याला वेग येईल. पण देवयानी, इथल्या लाइफ स्टाइल ची आता इतकी सवय झाली आहे की परत जाण्याचा विचार पण करवत  नाही. तुझी गोष्ट एकदम वेगळी आहे. तुझं लग्न ठरलं आहे आणि तुला इथे राहायची इच्छा पण नाहीये. माझं तसं नाहीये. मला इथेच राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आमच्या सारख्या मुलींचा हा प्रॉब्लेम आहेच. इथे राहायचं असतं पण इथली लाइफ स्टाइल आत्मसात करता येत नाही. आणि इंडियात तर जायचं नसतं. मग काय करणार तरी काय?” सेजलनी तिची घुसमट सांगितली.

“अग पण इथेच राहण्याचा विचार पक्का केलेला, अशी  कितीतरी मुलं असतील की. तू सांग तुझ्या घरच्यांना की असाच मुलगा बघा म्हणून. नाही तर तू भारतात परत जा. अन्यथा  तुझं लग्न होणार कसं?” – देवयानी.

“इथे सुद्धा देवयानी, तुझी गोष्ट वेगळी आहे.” – सेजल 

“आता आणखी काय वेगळं सांगणार आहेस तू?” – देवयानी.

अग बघ ना, इथे जी मुलं असतात त्यांना खूप पगार असतो. मग एक तर ते भारतात जाऊन साधी सोज्वळ आणि दिसायला गोरी, आणि सुंदर मुलगी पाहतात. आता तू, देखणी आहेस, पण माझं काय? मी हुशार आहे पण दिसण्याच्या बाबतीत आपली अॅवरेज मुलगी आहे. प्लस माझं पॅकेज इतकं सॉलिड आहे की ते पण अडचणीचं ठरतंय. मी जरी तयार असले तरी नाका पेक्षा मोती जड, असं कोणालाच नको असतं. हुशार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी, तारीफ करायला ठीक असते पण बायको म्हणून कोणालाच नको असते.” सेजल आता थोडी भाव विवश झाली होती.

“असा विचार का करतेस तू सेजल? बी पॉझिटिव.” – देवयानी.

“हे माझे विचार नाहीयेत, हे गेली तीन चार वर्षांत  मला आलेले अनुभव बोलताहेत.”

गेल्या काही वर्षातले आलेले अनुभव आठवून सेजल चा चेहरा काळवंडला. सुर जरा रडवेला झाला. देवयांनीला खूप वाईट वाटलं. आपण हा विषय काढायला नको होता असं वाटून ती जरा गप्पच बसली. थोडा वेळ तसाच गेला. पण मग देवयानीलाच राहवेना. तिने शेवटी विचारलंच

“आता? हा तिढा सोडवणार कसा तू?”

“बघू. जसं ठाकूरजी च्या मनात असेल तसं होईल.” – सेजल.

“हे ठाकूरजी कोण? तुझे वडील? की काका?” – देवयानी.

सेजल ला हसू आवरेना. ती हसतच सुटली.

“अग सांग ना.” – देवयानी.

“ठाकूरजी म्हणजे श्रीकृष्ण भगवान.” – सेजल.

“अरे देवा! हे मला माहीत नव्हतं.” – देवयानी.

एक मात्र बरं झालं. सेजलला हसू आल्यामुळे वातावरण पुन्हा पहिल्यासारखं  झालं. जी निराशेची छटा सेजल च्या चेहऱ्यावर आली होती ती निघून गेली.

दुसऱ्या दिवशी रविवार होता. सुट्टीचा दिवस. सगळेच उशिरा उठले. रविवारची बरीच आठवड्या भराची कामं होती त्यामुळे सकाळचा वेळ पाहता पाहता निघून गेला. मग संध्याकाळी बाहेर जाऊन जेवण.

पूर्णिमा सकाळी अकरा वाजता उगवली. आणि बेडरूम मधे जाऊन जे पसरली ते संध्याकाळीच उठली.

देवयानी म्हणाली सुद्धा

“काय ग सेजल, किती झोपली आहे ही. बरं वाटत नाहीये का पूर्णिमाला?”

“अग रात्रीचं जागरण झालं असेल. रात्रभर धुडगूस घालते ही पोरगी. दर वेळी आली की अशीच  झोपते.” – सेजल.

“देवयानीनी कपाळाला हात लावला. म्हणाली “लक्षण काही ठीक दिसत नाही पूर्णिमेच”

“अग तू लक्ष देऊ नकोस. तुला नाही झेपणार.” – सेजल.

“खरं आहे. आणि अवघड पण.”- देवयानी.

रात्री विकासचाच फोन आला.

“काय देवयानी, काय खबर?”

मग देवयानीनी सेजल काय बोलली ते आणि पूर्णिमा कशी रात्रभर राजूकडे होती ते सांगितलं.

“देवयानी, तू अगदी देवाच्या कृपेनेच वाचलीस. जर माझ्या आधी राजूची आणि तुझी भेट झाली असती तर त्यानी कसल्या कसल्या भुलथापा देऊन तुला आपलसं केलं असतं. तू खूप भोळी आहेस, चटकन त्याच्या कह्यात गेली असतीस, आणि नंतर त्यानी तुझा असाच चोळा मोळा केला असता, आणि कार्यभाग साधल्यावर तुला खड्या  सारखं बाजूला फेकलं असतं.” - विकास.

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.