Devayani Development and Key - Part 21 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | देवयानी विकास आणि किल्ली - भाग २१

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २१

       देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंदराव                       देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

 

भाग   २१

भाग  २० वरून  पुढे  वाचा ................

 

“हॅलो बाबा, मी काय म्हणतो, उद्या लग्न झाल्यावर तुम्ही आमच्याच कडे येणार, मग आता काय हरकत आहे? परिस्थितीत काहीच फरक पडणार नाहीये, आणि दुसरं म्हणजे सुप्रियाचा फ्लॅट खूप छोटा आहे तिथे सर्वांनाच अडचण होईल. इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि तसंही, तुम्ही नागपूरला आमच्याकडे चार दिवस होताच की.”

“तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. मान्य आहे. पण थोडा संकोच वाटतो आहे.” – बाबा.

“बाबा, संकोच वाटून घेऊ नका. जसा सुरेश तसाच मी असं समजा.” – विकास.

तिकडून सुरेशचा आवाज ऐकू आला. तो म्हणत होता की विकास म्हणतोय ते ठीकच आहे. तुम्ही त्याच्याच कडे उतरा. तो एवढा प्रेमाने बोलावतोय तर नाही म्हणू नका.

“ठीक आहे विकास तुझ्याकडे उतरू. पण देवयांनीला आवडेल का ते विचार.”– बाबा.

विकासने देवयानीच्या हाता फोन दिला. बाबांना तुझ्याशी बोलायचं आहे.

“काय बाबा ?” – देवयानीनी फोन घेतला.

“तुला आवडेल का आम्ही विकास कडे राहिलो. तर? तुला काय वाटतं? सुप्रिया की विकास?” – बाबा.

“बाबा, लग्न व्हायला अजून थोडे दिवस आहेत पण बाबा, हे आता माझं घर आहे. माझ्या घरी यायला तुम्ही संकोच करू नका. मला पण खूप आनंद होईल.” देवयानीनी बाबांचा संकोच मोडून काढला.

“ठीक आहे. आम्ही उद्या पोचतो आहे. तुम्ही असणार ना घरी ?”- बाबा.

“बाबा हे काय विचारणं झालं ? आम्ही आहोतच. फक्त तुम्ही निघाले की फोन करा.”- देवयानी.

“ठीक आहे. बस मधे बसलो की तुला फोन करतो” – बाबा.

“विकास, ऐकलं ना. इथेच उतरणार आहेत आई आणि बाबा.” देवयानी म्हणाली.

“ठीकच आहे मग. मीच बोलावलं आहे  ना. काय प्रॉब्लेम आहे ? तू आहेसच. काय

कमी काय जास्त आहे, हे उद्या बघून घे. आणि सांग मी व्यवस्था करतो.” विकासनी सांगितलं.

“म्हणजे उद्या सुट्टी घ्यावी लागणार. बॉस चिडणार.” – देवयानी.

“बॉस ला नीट समजावून सांग की प्रश्न लग्नाचा आहे. जीवनात लग्न एकदाच होतं. म्हणून सांग. हवं तर वर्क फ्रॉम होम करण्याची विनंती कर.” – विकास.

“हं. असच काही तरी करावं लागणार आहे. अरे पण माझी नवीन नोकरी आहे. असं सारखं सारखं रजा कशी मागणार ? आणि बॉस तरी कसा ऐकेल ?” -देवयानी.

“मी काय सांगू ? Try कर. नाही तर काय बघू आणि काय करू, हे मला सांगून जा. मी करेन.” – विकासनी आश्वासन दिलं.

“मी असं करते आत्ताच नजर फिरवते मग ठरवते.” – देवयानी

आणि मग देवयानीने घर भर फिरून काय काय जरुरीचं आहे त्याची एक यादीच  बनवली. आणि विकासला सांगितलं की उद्या ह्या गोष्टी घेऊन ये.

विकास चा थ्री BHK फ्लॅट होता त्यामुळे झोपण्याचा काहीच प्रश्न नव्हता. तो देवयांनीला म्हणाला –

“देवयानी, तू पण उद्या इथेच ये आई बाबा असे पर्यन्त. तुझ्यासाठी एक बेडरूम आहेच.”

“तू त्रास देणार नसलास तर मी येईन. नाही तर आई बाबांच्या समोर माझी उगाच शोभा व्हायची.” देवयानीनी तक्रार केली.

“मी त्रास देतो ? मी ? देवयानी काटे गुलाबाला असतात आणि my dear dewayaani, काटे बोचवण्याचं व्रत कोणाचं आहे ? आणि बोचतात कोणाला? आता बोल.” विकासनी तिच्याच पदरात माप घातलं.

देवयानीने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि अश्या नजरेने पाहीलं की विकास विरघळूनच गेला. सर्व भांडण संपलं होतं. देवयानीचा होकार मिळाला होता. विकासला अजून काय हवं होतं. ? थोडा वेळ तसाच  गेला. विकास धुंदीतच होता पण देवयानी भानावर आली. थोडा विचार करून म्हणाली-

“विकास जर मी इथे राहिली तर मला लवकर उठून स्वयंपाक करावा लागणार.”

“ते परवा. आधी उद्या संध्याकाळी करावा लागणार आहे. येतो ना करता ? का मी करू ? नाही, म्हणजे तुला टेंशन येत असेल तर मी करतो.” विकासनी चिमटा काढला.

“तुला काय काय करता येतं ?” – देवयानी.

“तसं पाहीलं तर काहीच नाही. पण त्याच्यात काय ? U-TUBE आहे ना ! त्यात पाहून पाहून करायचं. आहे काय, अन नाही काय.” विकासनी नो प्रॉब्लेम अश्या अर्थांनी मान हलवली.

“असं म्हणतोस ? मग आपण असं करू, उद्या माझे आई, बाबा येताहेत म्हणून मी करेन. चालेल ?” – देवयानी.

“वा चालेल.” – विकास.

“जेंव्हा तुझे आई, बाबा येतील तेंव्हा तू कर बरोबर आहे ना ?” – देवयानी.

“कसली सेलफिश आहेस ग तू. आमच्या विदर्भातल्या लोकांचं काही तसं नसतं, आम्ही सगळ्यांना समान ट्रीटमेंट देतो.” – विकास. 

“आता गुलाब म्हंटला की काटे आलेच, नाही का. आणि सगळ्यांच्याच वाट्याला गुलाब येत नाहीत. Sunflower आलं असतं वाट्याला, मग ? मिस्टर, तुम्हारी किस्मत अच्छी हैं. गुलाबाचं फूल अलगद पदरात येऊन पडलं, मुळीच कष्ट न करता. अब प्राइस का EMI तो देना पडेगा.” – देवयानीनी खिजवलं.

“चलो भैय्या ठीक ही हैं. जो तुम कहो. हमारा क्या हैं ? कौन सुनता हैं हमारी.” -विकासची शरणागती.

“अरे ! एकदम माघार ? surrender ?” – देवयानी.

“मला कळलं आहे की माघार घेण्यातच शहाणपणा आहे. नाहीतर तुला रुसायला  वेळ लागत नाही. ब्लॅक मेल करतेस. माहीत आहे न की मी किती व्याकुळ  असतो तुझ्या सहवासाला, म्हणून सगळ्या ट्रिक्स करतेस.” – विकास.

हे ऐकल्यावर देवयांनीला त्यांची दया आली. ती त्याला बिलगली.

“असं नको म्हणुस रे. मला तरी कुठे हौस आहे सुप्रियाच्या फ्लॅट वर राहण्याची ? मी तुला तेंव्हाच म्हंटलं होतं की मला सुप्रिया कडे राहायचं नाही म्हणून पण सगळ्या लोकांनी डिसेंबर मधला मुहूर्त काढला आता त्याला काय करायचं ? तू असं काही बोलतोस मग मलाही धीर धरवत नाही. जरा कळ काढ न. मग सगळं सव्याज फेडून घे.” देवयानी आता भावनाविवश झाली होती. 

ती त्यांच्याकडे मधाळ नजरेने बघत होती आणि विकास क्षणा क्षणाला विरघळत होता. तो त्याचा राहिलाच नाही. दोघांचेही मन  भरलं नव्हतं पण घड्याळा कडे लक्ष गेलं आणि दोघंही भानावर आली.

“महाशय जेवणाचं काय ?” – देवयानी.

“आज माझा मूड खिचडी आणि कढी  खाण्याचा आहे. मस्त पापड कुरड्या तळू. आहाहा काय मस्त बेत आहे. मजा आयेगा.” विकासनी आपल्या मनातलं मेनू सांगितला.

“मी करू ?” – देवयानी.

“सोनेपे सुहागा. पण तुला वऱ्हाडी खिचडी करणं जमेल ?” विकासनी शंका काढली.

“काही वेगळी असते का ?” – देवयानी.

“मुगाच्या ऐवजी तुरीची डाळ असते. आणि तुपाच्या ऐवजी वरुन मोहरीची फोडणी घेतात. जमेल ?” – विकास.

देवयानी फोन लावत होती.

“अग तुम्ही लोकं बेळगाव चेss, तुझ्या आईला पण माहीत नसेल. वऱ्हाडी खिचडी कशी करतात ते. फोन लावून काय करतेस ?” – विकासनी चिडवलं.

“हॅलो वहिनी, मी देवयानी.”

“काय ग इतक्या रात्री फोन केलास ? सगळं ठीक आहे ना ?” – अश्विनी वहिनी.

“हो हो सगळं ठीक आहे. विकासला खिचडी खायची आहे. मला मुगाची येते पण त्याला वऱ्हाडी खिचडी खायचा मूड आहे म्हणतो. सांगता का जरा. ?”- देवयानी.

“थेट अश्विनी वहिनींना फोन लावलास ? कमाल आहे.” विकास आश्चर्यानी म्हणाला.

“मग ! आमचं नेटवर्क सॉलिड आहे.” देवयानीनी मुद्दा निकालात काढला.

विकासला खिचडी अर्थातच खूप आवडली. प्रश्नच नव्हता. देवयानीच्या हाताची गोडी उतरली होती की त्यात. मग विकासने तिला तिच्या फ्लॅट वर सोडलं. दिवस मस्तच गेला.

दुसऱ्या दिवशी देवयानीनी बॉस ला पटवून हाफ डे घेतला आणि दोन दिवसांची सुट्टी पण. मग ती सरळ विकासच्या फ्लॅट वर आली व्यवस्थेवर शेवटचा हात फिरवायला. आई बाबांना कसलीच अडचण होऊ नये म्हणून खूप कष्ट घेत होती.

विकास ऑफिस ला गेला होता आणि संध्याकाळी जरा लवकर निघाला. मित्राची गाडी घेतली आणि घरी आला. देवयांनीला बरोबर घेतलं आणि दोघेही बस स्टँड वर पोचले. बस  १५ मिनिटे उशिरा आली. टाइम पास करायचा म्हणून त्यांनी चहा घेतला.

“विकास राव, काय सुंदर सजवला  आहे तुम्ही फ्लॅट.” घरी आल्यावर फ्लॅट च निरीक्षण करतांना देवयानीची आई म्हणाली

“आई, तुम्ही मला राव वगैरे म्हणू नका. विकासच म्हणा . आणि हे सगळं क्रेडिट देवयानीचं आहे तिनेच खूप मेहनत घेतली आहे. तिने तिला हवा तसा, तिच्या स्वप्नातला फ्लॅट सजवला  आहे. माझी मदत फक्त ती सांगेल ते आणून द्यायची एवढीच आहे.”

देवयानीच्या आई, बाबांना विकास चा फ्लॅट खूपच आवडला.

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.