Cyber Suraksha - 2 in Marathi Anything by क्षितिजा जाधव books and stories PDF | सायबर सुरक्षा - भाग 2

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

सायबर सुरक्षा - भाग 2

सायबर सुरक्षा म्हणजे काय ?

इंटरनेट सुरक्षा किंवा सायबर सुरक्षा म्हणजे इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्यन करणे. इंटरनेट चा वापर करताना खाजगी आणि वयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे त्या संबंधित नवीन नवीन जोखिमबद्दल स्वतःला जागरूक ठेवणे, सायबर गुन्हेगारी पासून स्वतःला सुरक्षित ठेवणे म्हणजेच सायबर सुरक्षा.

सायबर सुरक्षा महत्वाची का आहे :

सायबर गुन्हेगारी हि काही एक प्रकारची नाही ऑनलाईन फसवणूक म्हणा, हॅकिंग म्हणा किंवा आयडेंटिटी थेफ्ट म्हणजेच आपली ऑनलाईन ओळख चोरणे. असे अनेक प्रकार होतात.  ज्यासाठी स्वतःची  माहिती सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. सायबर सुरक्षितते बद्द्ल जागरूक राहून तुम्ही तुमचे पैसे आणि वयक्तिक माहिती चोरण्या पासून रोखू शकता.

स्वतःची आर्थिक माहिती, सुरक्षा क्रमांक आणि वैद्यकीय नोंदी, आधार नंबर, पॅन नंबर  यासारख्या संवेदनशील डेटाचा वापर हा सायबर गुन्हेगारी मध्ये सर्रास होतो. चांगल्या सायबर सुरक्षे च्या सवयी लावून हि माहिती सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. कळत नकळत रोजच्या मोबाइलच्या वापरात आपण अशा काही चुका करत आहोत. ज्यामुळे आपण स्वतःच सायबर गुन्हेगारीची कुऱ्हाड स्वतःच्या पायावर मारून घेत आहोत. या साठी उपाय करणे जरुरी आहे जस कि मजबूत आणि अवघड असा पासवर्ड वापरणे संशयास्पद ईमेल आणि वेबसाइट वापरणे टाळणे., त्यात बरोबर आणि चुकीची वेबसाइटची  लिंक कशी ओळखायची ? मजबूत आणि हॅकर्सना कळणार नाही असा पासवर्ड  कसा ठेवायचा?. आपण जर ऑनलाईन बँकिंग चा वापर करत असू तर स्वतःचा  मोबाइल सुरक्षित कसा ठेवायचा हे आपण पुढे बघणारच  आहोत.

 

आतासाठी सायबर सुरक्षे साठी काही सूचना :

१) मजबूत पासवर्ड वापरा :

तुमच्या प्रत्येक ऑनलाइन खात्यासाठी बँकेचे असू किंवा सोशल मीडिया - फेसबुक, इंस्टाग्राम साठी  मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी अप्पर आणि लोअर केस अक्षरे (a-z,A-Z), संख्या (0-9) आणि चिन्हे(*<>/?-_&^%$#@) यांचे मिश्रण वापरा. तुमचे नाव, जन्मतारीख किंवा फोन नंबर यासारखी सहज अंदाज लावता येणारी माहिती वापरणे टाळा.

२) टू फॅक्टर ऑथेंटीकेशन:

ऑनलाइन खाती सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर म्हणून द्वि-घटक प्रमाणीकरणचा वापर करा. ज्यात आपण पासवर्ड व्यतिरिक्त मोबाइल वर ओटीपी द्वारे अकाउंट सुरक्षित करू शकतो. म्हणजे जेव्हा पण आपण पासवर्ड वापरू त्यावेळी आपल्याला ओटीपी येईल आणि ओटीपी टाकल्या नंतरच आपले ऑनलाईन अकाउंट उघडेल आणि तो मर्यादित काळासाठीच  वैध असतो. सोबतच फिंगर प्रिंट सारख्या गोष्टीचा हि आपण वापर करू शकतो.

३) संशयास्पद ईमेलपासून सुरक्षा :

फिशिंग ईमेल हे सायबर हल्याचा एक सामान्य प्रकार आहे.  ज्यात हॅकर्स तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देण्यास किंवा बनावट लिंक वर क्लिक करण्याचा प्रयत्न करतात. अज्ञात व्यक्ती कढून आलेले ईमेल किंवा संवेदनशील माहिती विचारणाऱ्या ईमेलपासून सावध रहा.

४) सुरक्षित नेटवर्क वापरा:

सार्वजनिक वाय-फाय वापरताना, तुम्ही वापरणाऱ्या माहीतीबद्दल सावधगिरी बाळगा. शक्यतो  बस मधील ओपन  चार्जिंगचे पॉईंट आणि सार्वजनिक वाय -फाय देखील वापरणे टाळा

५) सुरक्षित सोशल मीडिया सवयींचा सराव करा:

तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असलेल्या माहितीबाबत सावध रहा. तुमचा घरचा पत्ता किंवा फोन नंबर यासारखी वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा आणि अनोळखी व्यक्तीच्या  फ्रेंड रिक्वेस्टपासून सावध रहा.

६) फोन घोटाळ्यांपासून सावध रहा: स्कॅमर अनेकदा फोनवर वृद्ध प्रौढांना लक्ष्य करतात, वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी कंपनी किंवा सरकारी एजन्सीचे प्रतिनिधी असल्याचे भासवतात. अनपेक्षित कॉल्सपासून सावध रहा आणि फोनवर कधीही वैयक्तिक माहिती देऊ नका.

५) वैयक्तिक माहिती ओव्हरशेअर करणे टाळा: वृद्ध प्रौढ लोक इतरांवर अधिक विश्वास ठेवू शकतात आणि वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करण्याची अधिक शक्यता असते. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असलेल्या माहितीबद्दल सावधगिरी बाळगा आणि तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि घराचा पत्ता यासारखी वैयक्तिक माहिती ओव्हरशेअर करणे टाळा.