Night Games - Part 6 in Marathi Thriller by prajakta panari books and stories PDF | रात्र खेळीते खेळ - भाग 6

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

रात्र खेळीते खेळ - भाग 6

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड्याळात तर सकाळचे दहा वाजलेले ती ने परत टाईम झोन चेक केला. पण टाइम झोन बरोबर भारतातलाच होता. तस तर तीचा मोबाईल न स्वीच आॅफ झालेला आधी न बंद पडलेला मग टाईमींग बदलू कस शकत. क्षणभर तर या विचारात गेली आणि लगेच भानावर आली. व स्वतः शीच म्हणाली असो कावू आता या सगळ्याचा विचार करण्याचा वेळ नाही आधी आपल्याला त्या झुंबराकडे गेल पाहिजे. तिथेच आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल आणि जाता जाता बॅटरीच्या सहाय्याने बाकिचे इथेच आहेत का ते पण बघता येईल...
ती ने मोबाईलची बॅटरी लावली आणि आजूबाजूला पाहू लागली पण तिला तीच्या आणि अनूश्रीच्या व्यतिरिक्त खोलीत कोणीच दिसेना ते पाहूनच तिला प्रचंड घाम फुटला.. म्हणजे आपल्या स्वप्नात आलेली ती स्त्री खर बोलत होती सगळेजण मोठ्या संकटात अडकलेत.. आता आपल्याला थांबून नाही चालणार लवकर बाहेर जावून त्या झुंबराकडे जावून काय मार्ग मिळतो का ते बघितले पाहिजे व तसेच आपले मित्र कोठे आहेत हे पण शोधल पाहिजे हे म्हणत ती पुढे जाणार तोच अनुश्रीने तिचा हात घट्ट पकडला. आणि तिच्यावर जोरात खेकासू लागली काय ग कावेरी कोठे चाललीस आणि परत नॉर्मल होत अग सकाळी जावू ना आपण खाली झोप आता..... मला ना एकटीला खूप भिती वाटते ग इथे...... अनुश्री म्हणाली...
अग अनू पण बाकिचे कसे असतील ते पण बघितले पाहिजेच कि मी थोड्या वेळातच येते अग........ कावेरी म्हणाली....
ते काय नाही कावेरी तू थांब इथेच नको जावूस . ....... अनूश्री परत विनवणीच्या सूरात म्हणाली......कावेरीला काय कराव कळेना शेवटी थोडावेळ थांबण्याचा निर्णय ती ने घेतला ती झोपेपर्यंत...... थोड्या वेळात अनुश्रीला झोप लागल्याची कावेरीला जाणीव झाली आणि ती पुढे जावू लागली... आणि मागून परत अनूश्रीने मागे उठत तीचा हात धरला आणि पिरंगळायला सुरूवात केली आणि घोगऱ्या आवाजात म्हणू लागली काय ग तुला कळत नाही का? जावू नको म्हणल ते इथून आमच्या परवानगीशिवाय कोणीच बाहेर नाही पडू शकत आणि विचित्र आवाजात हसू लागली.......... कावेरी प्रचंड घाबरली‌. तीला आजच अनूश्रीच वागण आधीच्या वागण्यापेक्षा जास्तच विचित्र वाटू लागल. पण तरीही ती विनवणीच्या सूरात अनूश्रीला समजवू लागली. ये अनू अग काय झाले आहे तुला मी तुझी मैत्रीण आहे ना मग माझ्याशी अस का वागत आहेस. प्लीज सोड ना मला अग आपल्या मित्रांचे जीव धोक्यात आहेत..... प्लीज.... प्लीज.... सोड ना मला....... हो का अग पण हे ऐकायला तुझी अनू थोडीच जिवंत आहे ती तर कधीच अशा ठिकाणी पोहोचले जिथून परतनच अशक्य आहे..... हे ऐकून तर अनूश्री जागीच खोळंबली तिला खूप मोठा धक्का बसल्यासारख झाल... पण तरीही स्वतः ला कस बस सावरत. ती तिला विचारू लागली... काय काय बोलतेस तू अनू अग चेष्टा करण्याची पण लिमिट असते तू तर माझ्या समोरच आहेस कि......ते ऐकून जोरात कावेरीला बाजूला ढकलत अनूश्री म्हणाली ये चल मी काय तुझी अनू नाही मी राणी आहे राणी या जंगलातल्या परिसराची आणि या घराची मालकीण अस सांगत मुळ रूपात येवू लागली तीचे केस पायापर्यंत वाढले तीचा चेहरा पूर्णपणे बदलू लागला ती चे डोळे पांढरे झाले त्यातील बुब्बुळच दिसेनाशी झाली तीच्या हातांची नखे खूपच मोठी झाली जणू काय एखाद्याचा गळा चिरू शकतील इतकी तीचा चेहरा सुरकुत्यांनी भरला तीच्या हातातून तर रक्ताची धार गळत होती अशा अवतारात तीला पाहून कावेरी जागीच बेशुद्ध पडली... याचा फायदा घेत ती स्त्री तिच्या कानाजवळ जात आधी पुटपुटली या जंगलात जो अडकतो आम्ही त्यांना सोडत नाही आणि मग तसच पुढे जात जोर जोरात विचित्र हसत तिला ओढत ओढत कोठेतरी घेवून जावू लागली...............

वीरला जाग आली तस तो आजूबाजूला बघू लागला. त्याच त्यालाच कळेना की नेमक आपण कोठे आलोय समोर तर दाट अंधारच दिसत होता आणि मध्येच एक कर्णकर्कश किंकाळी कानावर आली त्याच्या जीवाच घाबरून पाणी पाणी झाल तो त्या किंकाळीचा वेध घेत पुढे पुढे चालला तर समोर त्याला ज्या आजोबांनी आसरा दिलेला ते दिसले ते त्याला म्हणाले चांगल अडकवल ना तुम्हाला आता तुमची सुटका नाही आणि जोरजोरात हसू लागले व वीर काही विचारायला आला तोवर ते जागच्या जागीच गायब झाले.... तोवर त्याला त्याच्या समोर एक दहा वर्षाचा मुलगा दिसला तो त्याला म्हणू लागला ये दादा आमच्या वाड्यात चल ना माझ्यासोबत खेळायला. तुला माहिती आहे माझे कोणीच मित्र नाहीत रे चल ना तु प्लीज.... वीर तर भांबावून गेला होता त्याला आपण कोठे आलोय हेच कळेना आणि त्यात त्या आजोबांचे समोर आलेल ते नव रूप आणि नंतर अचानकच समोर आलेला हा मुलगा त्याला कळेना या मुलावर विश्वास ठेवावा कि नको ... पण त्याच्या मनात परत विचार आला नाही हा मुलगा कोणी दुष्ट शक्ती नक्कीच असू शकत नाही किती निरागस आहे हा..... अगदी अधिराज सारखा त्याला त्या मुलाकडे पाहून अधिराजची आठवण झाली. अरे आपला आधी पण असाच बोलायचा ना खेळायची इच्छा झाल्यावर ... तो मुलगा परत म्हणाला ये दादा चल ना रे माझ्या सोबत खेळायला आमच्या वाड्यात.. माझ खेळून झाल कि परत तू तुझ्या घरी जा...... वीरच्या डोळ्यात त्या वाक्यानेच पाणी तरळल त्याला कळतच नव्हते आपण नेमक कोठे पोहोचलोय आणि परत कस जायच......
तो मुलगा परत म्हणाला ये दादा काय झाल रडायला. अरे काय नाही चल ना मी येतो आधी तुझ्यासोबत खेळायला आणि नंतर जातो माझ्या घरी...
वीर त्या मुलासोबत त्याच्या वाड्यात गेला तो वाडा तसा खूपच भव्य होता. त्याच्या भिंतीवर आधीच्या काळातील राजा, महाराजांची उठावदार अशी चित्रे कोरलेली तसच त्या वाड्यात अनेक दालने होती. एके ठिकाणी राजाच राजसिंहासन होत जे सोन्याचा वापर करून बनवल होत... पण तो ते बघतच होता कि त्याच्यासमोरच त्या सिंहासनाच्या बाजूच्या भिंतींना आग लागू लागली... त्यासोबतच त्या मुलग्याच्या शरीराने पेट घेतला. वीर ओरडत त्या मुलाला वाचवण्यासाठी पळू लागला पण तो मुलगा म्हणू लागला दादा तू जे पाहतोयस ते आधीच घडलय मी तुझी मदत करायला म्हणून तुला इथे घेवून आलो. हा वाडा जेव्हा इथे होता तेव्हाच हि जागा पवित्र होती. तिथून पुढे हि जागा नको तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिंनी हस्तगत केली व इथे अनेक कत्तली करून अशुद्धता निर्माण केली व अंधाराच राज्य निर्माण केले तू परवा जे पुस्तक पाहिलेस ते तुला याच जागी मिळेल. पण एक लक्षात ठेव हा वाडा फक्त एक तासच दिसतो व पुन्हा जमीनदोस्त होतो त्यामुळे तुला लवकरात लवकर ते पुस्तक शोधाव लागेल. आणि हो अर्धा तास तरी या वाड्यात कुठलीही दुष्ट शक्ती प्रवेश नाही करू शकत कारण या वाड्यातली अर्ध्या तासाची वेळ ही अतिशय पवित्र शक्तींची असते पण अर्ध्या तासानंतर इथे अपवित्र शक्तींचा शिरकाव होतो व नंतर हळूहळू वाडा जमीनदोस्त होवू लागतो... त्या वाईट शक्तींनी प्रवेश करण्याआधीच तुला ते पुस्तक शोधाव लागेल नाहीतर खूप मोठ्या वाईट शक्तींशी सामना करत करत नंतर खूप अवघड झालेल्या परिस्थितीतून ते पुस्तक शोधाव लागेल पण तेव्हाही अर्धा तासच असेल जर त्याही अर्ध्या तासात तू बाहेर पडला नाहीस तर मात्र तुझा अंत निश्चित आहे....
अस म्हणून तो मुलगा हळूहळू गायब झाला......