Night Games - Part 5 in Marathi Horror Stories by prajakta panari books and stories PDF | रात्र खेळीते खेळ - भाग 5

Featured Books
  • રૂપિયા management

    પુરુષ ની પાસે રૂપિયા હોય તો સ્ત્રી નગ્ન થઈ જાય અને પુરુષ પાસ...

  • આપણા ધર્મગ્રંથો - ભાગ 1

    વાંચક મિત્રો સહજ સાહિત્ય ટીમ ધાર્મિક બાબતો વિશે માહિતી લઈ અવ...

  • સેક્સ: it's Normal! (Book Summary)

                                જાણીતા સેકસોલોજિસ્ટ ડોક્ટર મહેન્...

  • મેક - અપ

    ( સત્ય ઘટના પર આધારિત )                                    ...

  • સોલમેટસ - 11

    આરવ અને રુશીને પોલીસસ્ટેશન આવવા માટે ફોન આવે છે. આરવ જયારે ક...

Categories
Share

रात्र खेळीते खेळ - भाग 5


त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.........
खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लागले. राजला त्या वाऱ्यामुळे शहारा येवू लागला. तो अंगावरच पांघरूण वर घेवू लागला. पण तरीही थंडी वाजतच होती. त्याला तो बाहेरून येणारा वारा असह्य होवू लागला. तो खिडकी लावण्यासाठी वरती उठला आणि जागीच खिळला. बाहेरच्या गर्द अंधारातून दोन डोळे त्याच्यावर नजर रोखून होते रागाने लाल झाल्यासारखे ती समोरची व्यक्ती तर दिसत नव्हती पण ते डोळे मात्र चांगलीच भिती भरत होते मनात. राजला पुढे जायच धाडस होईना तरीही काय माहिती अचानक काय झाले तो त्या डोळ्यांमध्ये हरवून गेला आणि यंत्रवतच पुढे चालू लागला ते डोळे त्याला त्याच्याही नकळत बाहेर घेऊन जावू लागले आणि राज तसाच चालत पुढे पुढे जावू लागला.....

आजोबा आज एका वेगळ्याच आनंदात होते खूप वर्षांपासून ते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस समोर आला होता. मागच्या वेळी त्यांचे जे काम चालू होते ते या मुलांमुळे कायमचे बंद पडले होते त्याचाच बदला त्यांना घ्यायचा होता.............

कावेरी आणि वीर बोलत होते तितक्यात एक स्त्री धावत धावत तेथे आली आणि त्यांना सांगू लागली. का? का? का? आलात पोरांनो तुम्ही इथ जावा जावा इथून लवकर इथे तुम्हाला धोका आहे. आधीच बाकिच्या मित्रांचा जीव धोक्यात आलाय जावा जावा तुम्ही इथून नाहीतर तुमचा पण जीव धोक्यात येईल.... आणि अचानक एक माणूस नकाब घातलेला समोर आला आणि म्हणू लागला नाही आता कोणाचीच सुटका नाही तुम्ही सगळेच अडकलात. हा हा हा हा......
आणि कावेरीला जाग आली. हे देवा काय होत हे सगळ. आज असल कसल स्वप्न पडल आपल्याला. या आधी इतक भयानक स्वप्न नाही पडल कधी मग आजच अस काय झाल. आणि ती बाई कोण होती तीला बघितल्यासारख पण वाटत नाही. पण तीचा आवाज मात्र ओळखीचा वाटत होता पण कोण होती ती आणि ती अस का म्हणत होती कि बाकिचे धोक्यात आलेत तुम्ही जावा आणि तो माणूस कोण होता जो तुम्ही अडकून बसलात आता अस म्हणत होता तो..
आपल्याला हे पटकन बाकिच्यांना सांगितले पाहिजे असे म्हणत ती अनुश्रीला आवाज देवू लागली.
ये अनू उठ ना ये अनू .....
काय ग कावेरी काय झाल एकतर किती वेळाने झोप लागले आणि तू काय उठवालेस झोप गप...
अग ऐक तर आधी मगाशी मला एक स्वप्न पडलेल ज्यात एक बाई म्हणालती तुमचा जीव धोक्यात आहे.....
काय हा ती तर खरच म्हणली तुम्ही तर वाचणार नाही आता अनुश्री एका वेगळ्याच आवाजात अस बोलू लागली ते ऐकून तर कावेरीच्या मनात धडकीच भरली..
ये अनू तु काय काय म्हणालीस...
अग काय नाही ग तुझी मस्करी केली मी. झोप ग तु जास्तच विचार करतेस बाकिचे पण झोपलेतच कि मग कोणाचा जीव धोक्यात आलाय इथे....
अग पण आपल्याला आजूबाजूचे काहीच का दिसेना जास्तच अंधार वाटालाय तू शेजारीच आहेस म्हणून दिसलेस तरी पण बाकिचे कोण दिसतच नाही आहे ना खरच ते खोलीत आहेत ना ते आपल्या कि ती बाई म्हणली तस मोठ्या संकटात आहेत...
ये कावेरी आता गप्प झोप हा तू जरा जास्तच विचार करालेस.
अग मगाशीच राज उठलेला त्याच्या आवाजाने मी उठलेले त्याला आवाज दिल्यावर तो तहान लागलेली पाणी पिवून आलो अस म्हणून परत झोपला.... म्हणून जास्त नको विचार करू फक्त स्वप्न होत ते झोप आता गप्प.... आणि अनूश्री झोपी गेली....

कावेरीच्या मनात शंकेने जागा घेतली तीला अनूश्री च वागण वेगळ वाटत होते. आज ती कावेरीला तीच पूर्ण नाव घेऊन हाक मारत होती. अशी हाक ती ने पहिल्यांदा ऐकलेली लहानपणापासूनच अनू तिला कावूच म्हणायची चुकून पण तीच नाव घ्यायची नाही. आणि कधीच घोगऱ्या आवाजात बोलत नव्हती.
आज सगळच विचित्र वाटत होत तीला अगदी अधिराजच गायब होण, त्या माणसाकडून होणारा पाठलाग नंतर या घरात आजोबांकडून आसरा मिळण. या घरातल्या बाहेरच्या खोलीतल्या विचित्र भिंती मध्येच तो येणारा टक टक आवाज आणि समोर पाहिलेली त्यावेळची ती घटना. . ती घटना तर नंतर स्वप्न वाटली पण ती अनुभूती तर वास्तवात ते सगळ घडलय अशीच होती. आणि आता अनुश्रीच अस बदलेल वागण......
जस झोपेतून जाग व्हाव तस अनुश्री भानावर आली व आजूबाजूचा अंदाज घेवू लागली तिला कळेचना की आपण नेमक कोठे आलोय. आजूबाजूला तर नुसता अंधारच दिसत होता. तीच्या डोळ्यात आपोआपच पाणी येवू लागल. तसच ती बाकिच्या मित्रांना हाक मारू लागली पण कोणच तीच्या हाकेला ओ देईना.
ती स्वतः हाशीच म्हणू लागली. काय यार हे कोठे पोहोचलोय आपण आणि अस अचानक कस काय आलो आपण इथे आपण तर पाणी प्यायला जग घेवून बाहेरच्या खोलीत चाललेलो मग आपण इथे कोठे आलो.
ती स्वतः ला चिमटा काढून बघू लागली. तस जोरात कळ आली तीला आधी वाटलेल कि हे आपल वाईट स्वप्न असेल पण ते सत्य आहे हे समजल्यावर तिला जास्तच रडायला येवू लागल तरीही तीने स्वतः हाला कस बस सावरल आणि पुन्हा काही मार्ग मिळतो का? हे शोधू लागली..‌.....
अधिराजला पळून पळून धाप लागली होती त्याला कळेना आपण नेमक योग्य मार्गावर आहोत कि नाही तरीही तो जीवाच्या आकांताने पळत होता त्याला काहीही करून या जंगलातून बाहेर पडायचे होते आपल्या मित्रांना भेटायचे होते त्याला हे पण कळत नव्हत की हे आपल्यासोबत आजच घडत आहे कि आपल्याला खूप वर्ष झाल्यात येते येवून. मन तर हेच सांगत होत कि खूप वर्ष झालेत तुला इथे येवून तु प्रयत्न सोडून दे आता. पण त्याच्या समोरून त्याच्या मित्रांचे चेहरे हटत नव्हते. ते त्याला सतत हाक मारत होते. त्याचा त्याच्या मित्रांवर स्वतः हापेक्षाही जास्त जीव होता. त्याच्या मनाची अवस्था तर वाईट झालेली पण मित्रांना भेटण्याची इच्छा मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला शेवटच का असेना त्याच्या मित्रांना भेटायच होत त्यामुळे तो तसच धावत होता या आशेवर कि आपल्याला आपले मित्र नक्की भेटतील. .......
कावेरीच्या मनात शंका कुशंकांनी घेराव केला होता तिला सतत असच वाटत होत कि आपण मोठ्या अडचणीत सापडलोय आपल्याला काहीही करून या सगळ्या परिस्थितीमागचा अभ्यास करायला पाहिजे तोवर तिला अनू ने दाखवलेल्या फॅनवरील झुंबरावरच्या नंबर्स आणि अक्षरांची आठवण झाली आणि राहून राहून तिला असच वाटू लागले कि तिथूनच आपल्याला काहितरी मार्ग सापडेल. पण तीला बाहेर जायची खूप भिती वाटत होती एकतर खोलीत भरलेला अंधार आणि आतापर्यंत घडलेल्या विचित्र घटनांनी बाहेर जाव कि नाही हाच विचार पक्का होत नव्हता. पण थोड्या वेळात काय झाले काय माहिती तीच्या डोळ्यांसमोर अधिराज आणि बाकिचे मित्र वाचवा वाचवा म्हणत असल्याचे भास होवू लागले तस ती ने मनाचा निर्धार केला आता काहीही होवू दे आपण इथून बाहेर जायचच.
वीर समोर एक स्त्री उभी होती तिने त्याच्या हातात एक पुस्तक दिले आणि त्यातील मंत्रोच्चार करायला सांगू लागली. त्या पुस्तकातील भाषा काही वेगळीच होती वीरला काही केल्या ती समजेना पण ती स्त्री मात्र जोरात ओरडून सांगू लागली अरे वाच हेच तुझ्या मित्रांना आता वाचवू शकते. वाच वाच म्हणू लागली पण अचानकच ती गायब होवू लागली आणि ते पुस्तक पण अदृष्य झाल आणि वीरच्या डोक्यावर कोणीतरी जोरदार प्रहार केला व खालील जमिन विभंगून तो खाली फेकला गेला......
अशाप्रकारे सगळेच एकमेकांपासून विभक्त झाले....
ते आजोबा तर हसू लागले आता खरी सुरूवात झाली बदला घेण्याची.......