Chukiche Paaul - 12 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - १२

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

चुकीचे पाऊल! - १२

आता पर्यंत आपण बघीतले.

ओंकार आणि शामल यांच्यावर कायद्यांच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मला प्रियांका गावडे यांनी दिली. सोबतंच माझ्या चुकीच्या पावलांमुळे पोटात वाढत असलेल्या निष्पाप जीवाला जन्म घेण्याआधी जीव गमवावा लागला होता. प्रियांका गावडे यांनी माझ्यासाठी इतकी धडपड का केली? ह्या प्रश्नाच्या शोधात मी होते.

आता पुढे..!

प्रियांका गावडे यांचे नाव गूगल वर सर्च करताच त्यांच्या नावाची एक हायपरलिंक मला दिसली. त्यावर क्लीक करताच एका ब्लॉगस्पॉटचे नवीन पेज समोर उघडले. ज्यात त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले असल्याचे मला समजले. त्यातंच "#Black_Side" या शीर्षकाखाली एक ब्लॉग मला सापडला. ज्यात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या काळ्या बाजूचा उल्लेख त्यांनी अशाप्रकारे केला होता.

"माझ्या आयुष्यातील काळी बाजू, इतकी काळी असेल याची तुम्ही कल्पना ही करू शकणार नाही. आज मी माझ्या आयुष्यातील 'चुकीचे पाऊल' कुठले आणि त्यातून सावरत आज मी महिलांसाठी झटणारी अशासकीय सामाजिक कार्यकर्ती कशी झाले हे मांडणार आहे. त्यासाठी साधारण तीन वर्षे मागे जावे लागेल; जेव्हा मी एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी होते. शिक्षण घेत असता एका मुलाच्या प्रेमात मी पडले आणि त्यातंच सर्वस्व पणाला लावले. त्याचेही माझ्यावर तेवढेच प्रेम असावे या भ्रमात मी होते. आपण जो विचार करतो; तसेच घडेल असे कुठे लिहिले असते? माझ्या बाबतीत तेच घडले. आमच्यात असणाऱ्या प्रेमाला नवे अंकुर फुटले आणि ती बातमी कळताच त्याच्या वागणुकीचा मला धक्का बसला. त्याला जाब विचारताच त्याने माझा गळा आवळला. प्रतिकार करताना माझ्या हातात लोखंडी जड वस्तू लागली आणि मी ती त्याच्या डोक्यात घातली! जोरदार बसलेल्या माराने तो जागीच थंडावला! काय करावे काहीच सुचत नव्हते. त्याच गोंधळात मी पोलिसांना फोन लावून बोलावले आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण घटना रीतसर ऐकून घेत माझ्याकडून घडलेला गुन्हा हा आत्मसंरक्षण करण्याच्या हेतूने घडला असल्याचे पुरावे सादर केले. त्यावेळी माझ्या पोटात वाढत असलेल्या गर्भामुळे मी सर्वाना नकोशी झाले होते. सक्षम असल्यामुळे मी कुटुंबाचा त्याग केला आणि स्वतः मनाशी एकच निश्चय केला. इथून पुढे मी त्या महिलांसाठी झटणार होते, ज्यांच्या भावनांशी खेळून पुरुष वर्ग त्यांचा फायदा घेतात. पुढे माझी ओळख एका अशा अशासकीय गटाशी झाली; जिथे या विषयावर काम सुरू होते. मी सुद्धा पूर्ण इच्छेने त्यांच्याशी जोडले गेले. आजवर अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. या अनुभवांवरून खूप काही शिकलो…….!"

वाचनाची कमी सवय! त्यामुळे तो लेख वाचायला मला दीड तास वेळ लागला. आणखी खूप काही त्या लेखात लिहिले होते. जे मनाला हादवणारे होते. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटना त्यांनी त्यात मांडल्या होत्या. माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारापेक्षा जास्त घृणास्पद घटना घडल्या असल्याचे उल्लेख त्यात केस स्टडीच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. पण, त्या लेखात जे काही वर्णन केले गेले; ते वाचून जणू मी माझीच कथा वाचते आहे, असा भास झाला! ते सर्व वाचून डोळ्यांतील अश्रूंची भाषा सर्व काही सांगून गेली.

तिथूनच माझ्या आयुष्याला नवी दिशा गवसली.

खऱ्या अर्थाने आज मला समजले होते की, एक "चुकीचे पाऊल" स्वतःचे आयुष्य हिरावून घेतेच! पण सोबतंच पुढील किती तरी आयुष्य संपण्यापासून वाचवते!

प्रियांका गावडे जशा माझ्या मदतीला धावून आल्या होत्या; भविष्यात मी सुद्धा या घटनेतून शिकवण घेत कोणाचे तरी आयुष्य नक्की वाचवेन या उमेदित स्वतःशीच एक निश्चय केला.


निश्चय होता पुढे कोणीही चुकीच्या पावलांवर जाताना दिसल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा!

असेच दिवस गेले…..!

माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकरणानंतर घरच्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला होता. आई-बाबांसाठी मी ओझे झाले होते. सामाजिक दबाव अधिकाधिक वाढू लागला होता.

नातेवाईकांमध्ये माझ्याविषयी द्वेषाची भावना निर्माण व्हायला सुरुवात झाली. स्वतःच्या मुलींना माझ्यापासून लांब ठेवलं जायचं! इतकंच काय तर या वागणुकीमुळे मी सामाजिक जीवनाचा पूर्णपणे त्याग केला होता.

दिवस जात होते. मी माझं बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. वय वर्षे १८ पुर्ण होताच घरच्यांनी लग्नाची घाई केली आणि एक स्थळ सांगून आले.

नकार देण्याचे कारण नव्हतेच! कारण झालेल्या प्रकरणानंतर माझ्याकडून तो हक्क हिरावून घेण्यात आला होता. त्यामुळे विरोध न करता मी लग्नाला तयार झाले.

काहीच महिन्यात थोडक्यात लग्न उरकण्यात आले. लग्न होऊन नवीन आयुष्याची सुरुवात ही अपेक्षेपेक्षा जास्त चांगली झाली. कारण मुलगा प्रियांका गावडे यांनी शोधून दिला होता. जो एका शासकीय विभागात चांगल्या पदावर कार्यरत होता.

लग्न झाल्यावर मुलाच्या प्रगल्भ विचारांची ओळख मला झाली आणि त्याच्या प्रेमात पडायला मला वेळ लागला नाही. प्रियांका गावडे या नेहमीच माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या. लग्ना नंतर आई पेक्षा जास्त त्यांच्या आधारामुळे मला मानसिक स्थैर्य प्राप्त झाले.

लग्ना नंतर जरी मी नवऱ्याच्या प्रेमात पडले असले; तरी शारीरिक संबंधावेळी माझे मन मानत नव्हते!

एके दिवशी प्रियांका गावडे घरी आल्या. माझ्या मनाची घालमेल त्यांनी ओळखली होती आणि त्याचसंबंधी बोलायला त्या माझ्या घरी आल्या होत्या. त्यांना बघताक्षणी मी हंबरडा फोडला!

"अरे! रडायला काय झाले?"

"काही नाही मॅडम! ते…..!"

"दिशू, मिसळ पाव कुठेय?"

मला रडताना बघून त्यांनी मस्करी केली आणि त्यांच्या या प्रश्नावर माञ मी हसून उत्तरले.

"हो, आलेच!"

इतक्या वर्षांपासून मी बनवलेल्या मिसळ पाव शिवाय आमच्यात संभाषणाला सुरुवातंच होत नव्हती. याची पूर्वकल्पना असल्यामुळे ती मी आधीच बनवून घेतलेली.

आम्ही जेवणं आटोपली आणि गप्पा रंगल्या.

"कसं चाललंय मॅडम? त्या विराली केसचे काय झाले?"

"हो, काही दिवसात न्यायालय निर्णय सूनावेलंच!"

"वाईट झाले ना!"

"हो ना! सामूहिक बलात्कार हा मुद्दा दिवसेंदिवस चिघळतंच चाललाय!"

"ही पाशवी वृत्ती कधी संपेल? देवंच जाणे!"

"कठोर शिक्षेची तरतूद जोवर शासन करत नाही; तोवर काहीही शक्य नाही! इतर देशांप्रमाणे भारतात सुद्धा हे होणे काळाची गरज आहे."

"बरोबर!"

"हा विषय खूप संवेदनशील आहे. असो....! दिशू, मी काही दिवसांपासून बघतेय! काही प्रॉब्लेम आहे का?"

त्यांच्या या प्रश्नावर मी मान खाली घातली आणि शांत बसून राहिले.

"......!"

मला शांत बघून,

"हे बघ, तू मला मनमोकळेपणाने सांगू शकतेस; जर मी काही मदत करू शकले?"

"मॅडम, तुमच्यापासून काय लपवायचे! तुम्हाला तर माहितीये, माझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारामुळे मी आजवर त्यातून सावरू शकलेले नाही! कितीही प्रयत्न केले; तरी, मन त्या गोष्टीला स्वीकारायला तयार नाही. श्रेयस खूप समजूतदार आहे. माझ्या बाबतीत घडलेला प्रकार माहिती असून देखील त्याने माझ्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याला हवं असणारं सुख मी त्याला देऊच शकणार नसेल तर?"

"दिशू, तुझी मनःस्थिती मी समजू शकते. मला वाटतं तुला स्वतःच्या मनाची तयारी करावीच लागेल. मान्य, तुझ्या बाबतीत घडलेल्या प्रकारातून तू सावरू शकली नाहीस. पण, त्यात श्रेयसचा काय दोष? त्याने तुला पूर्णपणे स्वीकारले आहे ना? मग त्यालाच ही शिक्षा का?"

"पण, माझं मन ते स्वीकारायला तयारंच नाहीये मॅडम!"

"अशाने कसं चालायचं बाळा! तू स्वतःला त्याच्या जागी ठेवून विचार करून बघ. तुला तुझी उत्तरं मिळतील आणि या मनःस्थितीतून बाहेर पडण्यास मदतंही मिळेल."

"प्रतत्न करेल मॅडम!"

प्रियांका गावडे यांनी माझी समजूत काढली आणि त्या निघून गेल्या. त्या दिवसानंतर मी श्रेयसच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच्या प्रत्येक वागणुकीत माझ्याविषयी असलेली काळजी दिसून येत होती. दिवस सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तो माझ्याच विचारात असल्याचे जाणवले.

ऑफिसला जाऊन सुद्धा न चुकता दुपारच्या वेळेस माझ्या काळजीत केलेल्या फोनकडे आजवर मी त्या उद्देशाने कधीच बघीतले नव्हते! त्यामुळे मला त्याचे मन आजवर कळलेच नाही.

हळू हळू त्याच्या बारीक सारीक गोष्टींतून त्याचे माझ्याविषयीचे प्रेम उलगडले आणि मी त्याच्यात हरवत गेले. शेवटी मला त्याला सहन कराव्या लागणाऱ्या दुःखाची जाणीव झाली.

एके दिवशी मी माझ्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवले आणि आमची खोली सजवून घेतली. रात्री ८:०० वाजता तो घरी परतला आणि सजावट पाहून खूप खुश झाला. सोबतंच मी केलेले त्याच्या पसंतीचे जेवण बघून त्याने मला घट्ट कवटाळले!

इतक्या प्रतीक्षेनंतर शेवटी त्या रात्री आम्ही एक झालो होतो.

काहीच वर्षांनी एका गोंडस मुलीला मी जन्म दिला आणि तिचे नाव आम्ही ईशा ठेवले.

ईशाच्या बाबतीत मी खूप जास्त पजेसिव्ह होते. माझ्या बाबतीत घडलेल्या घटना मला तिच्या बाबतीत घडू द्यायच्या नव्हत्या! त्यातंच एके दिवशी तिचे मुलाकडे बघून हसणे माझ्या डोळ्यास पडले!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.