Chukiche Paaul - 11 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - ११

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

चुकीचे पाऊल! - ११



आता पर्यंत आपण बघीतले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना काहीच तासांत यश आले. ओंकारचा छडा लागताच त्यांनी त्याची तुरुंगात रवानगी केली. ओंकार पाठोपाठ शामलची देखील विचारपूस करण्यात आली. घडलेल्या प्रकारामुळे घरच्यांच्या वागणुकीत पडलेला फरक मी सहन न करू शकल्याने स्वतःला संपवण्याचा विचार केला.

आता पुढे..!

सकाळी १० च्या सुमारास मी माझ्या खोलीत शिरले आणि आतून दार लावून घेतला. पंख्याला गळफास बांधला आणि एका स्टूल वर उभे राहिले. नको ते विचार डोक्यात येत होते. त्यातंच मी दोन्ही हातानी गळफास गळ्यात टाकला आणि स्टूल सरकवणार तोच खिडकीतून प्रियांका गावडे यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसेच मी त्यांच्या दिशेने बघितले आणि पाय स्टूल वरून घसरला! स्टूल घसरल्याने माझा तोल गेला आणि गळफास आवळला गेला!
.
.
.
.
चार तासांनी मी शुद्धीवर आले; तेव्हा मी रुग्णालयात असल्याचे मला समजले. माझ्या शेजारी प्रियांका गावडे बसून होत्या. आई-बाबा चेहऱ्यावर राग आणून लांबच उभे होते.

मी प्रियांका गावडे यांना रडतंच घट्ट मिठी मारली. त्यांनी मला छातीशी कवटाळले आणि डोक्यावरून हात फिरवत शांत केले. मी शांत झाले आणि पोटावर हात ठेवला. मला हलके जाणवले. मी आश्चर्याने प्रियांका गावडे यांच्याकडे बघितले! त्यांनी डोळ्यांनीच सर्व काही ठीक असल्याचे सांगितले.

त्यांचे आभार कसे मानावे, हेच मला समजत नव्हते. मी खूप वेळ त्यांच्या छातीशी तसेच चिकटून बसून राहिले. अश्रू धारा न थांबता वाहत होत्या. त्यांनीही मला स्वतःच्या मायेची ऊब दिली. आई-बाबा माझ्यापासून खूप लांब उभे राहिले. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रियांका गावडे मला आपल्या वाटल्या.

खूप वेळ रडून झाल्यावर मी शांत झाले.

प्रियांका गावडे माझ्यासाठी देवरूप होत्या. माझ्यावर आलेल्या संकटाला समोर जाण्याचे धाडस त्यांच्याचमुळे थोड्या प्रमाणात का होईना माझ्यात आले होते.

शांत होताच मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि मी तो त्यांना विचारलाच.

"मॅडम, ओंकार आणि शामल? त्यांचे काय झाले?"

"बेटा, त्यांना न्यायालयीन आदेशानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर आय. पी. सी. (भारतीय दंड संहिता) आणि पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बरं झालं आज मी वेळात आले. नाहीतर देव न करो काही चुकीचे घडले असते; तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते! तू काळजी करू नकोस. इथून पुढे स्वतःची काळजी घे." प्रियांका गावडे यांनी मला या प्रकरणाची थोडक्यात तांत्रिक माहिती दिली.

"मॅडम….?" पोटावर हात ठेवत मी त्यांना गोंधळलेल्या मन:स्थितीत परत एक प्रश्न केला.

"बेटा, न्यायालयीन आदेशानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करून आम्ही डॉक्टरांच्या शिफारशीनुसार गर्भपात केला आहे. यासाठी आम्ही न्यायालयीन आदेशानुसार डॉक्टरांकडून सुद्धा परवानगी घेतली होती. तुला आठवत असेल, आपल्या सेमिनार मधून आम्ही तुम्हा विद्यार्थांना याविषयी इत्तंभूत माहिती दिली होतीच?" शाळेत झालेल्या कार्यक्रमाची आठवण करून देत प्रियांका गावडे म्हणाल्या.

"हो आठवलं." मी मोठा श्वास घेत बोलले.

"चल बाळा, आता मी येते. माझे काम इथे संपले आहे!"

त्या जायला निघणार, तोच मी त्यांचा हात धरला.

"मॅडम, तुम्ही हे सर्व माझ्यासाठी?" माझ्या मनात असंख्य प्रश्नांनी घर केले. त्यातलाच हा एक प्रश्न मी त्यांना विचारला.

"कसं असतं बाळ, जोपर्यंत एखाद्या घटनेतून आपण जात नाही; तोपर्यंत त्याची तीव्रता आपल्याला समजत नाही. असंच काहीसं माझ्याबाबतीत ही घडलं होतं." : एवढं बोलून त्या निघून गेल्या! माञ त्यांच्या डोळ्यांच्या कडा भरलेल्या मी हेरले!

त्या निघून गेल्या. माञ अजूनही त्यांच्या विषयी जाणून घेण्याचे कुतूहल माझ्या मनात होतेच! म्हणून मी जवळंच उभ्या परिचारिकेचा फोन मागून घेतला आणि प्रियांका गावडे यांचे नाव गूगल वर सर्च केले.

सर्च करताच जी माहिती माझ्यासमोर आली; ती माझ्यासाठी धक्कादायक होती!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.