Chukiche Paaul - 6 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - ०६

Featured Books
  • Operation Mirror - 5

    जहां एक तरफ raw के लिए एक समस्या जन्म ले चुकी थी । वहीं दूसर...

  • मुर्दा दिल

    कहानी : दीपक शर्मा            ...

  • अनजाना साया

    अनजाना साया लेखक: विजय शर्मा एरी(लगभग १५०० शब्द)गाँव का नाम...

  • नेहरू फाइल्स - भूल-83-84

    भूल-83 मुफ्तखोर वामपंथी—‘फिबरल’ (फर्जी उदारवादी) वर्ग का उदय...

  • The Professor

    अध्याय 1: मैकियावेली और एक ठंडी चायस्थान: दिल्ली यूनिवर्सिटी...

Categories
Share

चुकीचे पाऊल! - ०६

आता पर्यंत आपण बघीतले.

भितीपोटी मी माझ्या वेदना दाबल्या. पण, लैंगिकता शिक्षण गटाच्या माहितीवरून माझ्यासोबत चुकीचे घडले असल्याची खात्री मला पटली आणि मी प्रियंका गावडे यांच्या समोर हंबरडा फोडला!

आता पुढे..!

त्यांनी मला जवळ घेत शांत केले.

"बेटा, आता तू ठीक आहेस ना?" : प्रियांका गावडे यांनी आपुलकीने विचारपूस केली.

त्यांच्या या प्रश्नावर मी होकारार्थी मान हलवली. त्या मायेच्या स्पर्शाने मला सुरक्षित वाटले आणि माझ्या ओठांवरील हास्याने याची ग्वाही दिली. कदाचित ते इतक्या दिवसांतून मिळालेल्या सुरक्षिततेची साक्षच देत असावे! कारण, माझ्या घरी आजवर कोणी मला समजावून सांगण्याच्या भानगडीतंच पडले नव्हते. ना भितीपोटी मी कधी या विषयी आईसोबत बोलण्याचे धाडस केले! त्या पुढे बोलू लागल्या,

"बेटा, हे बघ आम्ही इथे तुमची मदत करायलाच आलोय. तू आम्हाला सगळं खरं सांगू शकतेस. काळजी करू नकोस, तुला कोणीही काहीही बोलणार नाही, विश्वास ठेव." : प्रियांका गावडे.

त्यांच्या इतक्या प्रेमळ, आपुलकीपुर्ण शब्दांनी माझ्या ओठांचा अबोला शेवटी संपवलाच.

मी बोलण्याचे धाडस केले आणि बोलायला सुरुवात केली.

"मॅडम, मी शाळेत बस ने ये - जा करते. आमच्या बस मध्ये ड्रायव्हर काकांसोबत एक मुलगा असतो. ओंकार नाव आहे त्याचं!" : मी दबक्या आवाजातंच बोलायला सुरुवात केली.

माझ्या चेहऱ्यावरचे भितीपूर्ण भाव पाहून प्रियांका गावडे यांनी मला मायेने जवळ घेतले.

"सांग बाळा, त्याने काय केले? हे बघ, घाबरू नकोस. आम्ही आहोत ना, शांतपणे सांग. काहीही होणार नाही." : प्रियांका गावडे.

मी मोठा श्वास घेत सांगायला सुरुवात केली.

"ओंकार माझ्यापेक्षा वयाने मोठा म्हणून, भाऊ समजून मी त्याच्याकडे बघून हसायचे, कधी - तरी आम्ही बोलायचो. पण, नंतर त्याने मला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली. मला समजत नव्हते, माझ्या बाबतीत जे घडले ते चूक की बरोबर! नंतर त्याने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना मुद्दाम स्पर्श केला! पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाचा तो स्पर्श मला मोहून टाकणारा वाटला. जेव्हा ते घडले त्याच्या काही वेळाने मी भानावर आले. तोवर उशीर झाला होता!" : मी, सुस्कारा सोडला.

"ओंकारने तुझ्यासोबत काही चुकीचे तर?" : प्रियांका गावडे आश्चर्याने!

"आजवर त्याने जे काही केले तेच तो आताही अधून मधून करत असतो! पण, ते चूक की, बरोबर हे कधीच मला समजले नाही!" : मी, लटक्या सुरात!

"तुझ्या बाबतीत घडलेला प्रकार किती घृणास्पद याची कल्पना ही तू करू शकत नाहीस! त्या निर्लज्ज ओंकारला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी स्वतः या प्रकरणात जातीने लक्ष घालणार आहे. त्या ओंकारची व्यवस्था तर आम्ही चांगलीच करू! कारण, त्याने तुझ्यासोबत जे काही केले ते क्षमापात्र मुळीच नाही! आपल्या शरीराच्या कुठल्याही भागाला हात लावण्याचा अधिकार आपण अल्पवयीन असताना कोणालाच नाही!" : प्रियांका गावडे चांगल्याच चिडल्या!

"हे सर्व मला कधीच कोणी सांगीतले नव्हते!" : मी, घाबरतंच!

"हे बघ बाळा, तू आता काळजी करू नकोस. आमचा पूर्ण गट तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुझं स्टेटमेंट घेण्यात येईल तेव्हा शांत राहून मला जे काही सांगितलंस ते त्यांना सांग." : मला धीर देत त्या बोलल्या.

"हो!" : मी होकारार्थी मान हलवली.

इतकं सर्व बोलून सुद्धा माझ्या मनात भीतीची भावना होतीच! ज्यामुळे भीतीचे भाव माझ्या वागण्यातून स्पष्टपणे व्यक्त होत होते. प्रियांका गावडे यांनी ते हेरले आणि मला परत विचारणा केली.

"तुझ्या मनात काही आहे का? जे तुला सांगावंस वाटतंय? तू घाबरू नको बाळा, बिनधास्त बोल. मी आहे ना." : प्रियांका गावडे यांनी मला जवळ घेत विचारणा केली.

"मॅडम, आपण जाऊयात का?" : मी जागेवरून उठत त्यांना प्रश्न केला.

मी नजर लपवत बोलत होते आणि हे प्रियांका गावडे यांच्या नजरेस पडले! पण, माझ्या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि आम्ही वर्गाच्या दिशेने निघालो.

मी पुढे निघाले आणि मागे प्रियांका गावडे माझ्या हालचाली बारकाईने टिपत उठल्या. साधारण तीन पावलं पुढे टाकलेच होते की, पोटात एक जोरदार कळ उठली आणि मी भोवळ येऊन तिथेच कोसळले!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.