Mauli - Horror Story in Marathi Short Stories by jayesh zomate books and stories PDF | माऊली - भयकथा

Featured Books
  • एक कब्र का रहस्य

    **“एक कब्र का रहस्य”** एक स्कूल का मासूम लड़का, एक रहस्यमय क...

  • Kurbaan Hua - Chapter 45

    अधूरी नफ़रत और अनचाहा खिंचावबारिश अब पूरी तरह थम चुकी थी, ले...

  • Nafrat e Ishq - Part 24

    फ्लैट की धुंधली रोशनी मानो रहस्यों की गवाही दे रही थी। दीवार...

  • हैप्पी बर्थडे!!

    आज नेहा अपने जन्मदिन पर बेहद खुश थी और चहक रही थी क्योंकि आज...

  • तेरा लाल इश्क - 11

    आशना और कृषभ गन लोड किए आगे बढ़ने ही वाले थे की पीछे से आवाज...

Categories
Share

माऊली - भयकथा






.मी जय 🙏🏾सादर करीत आहे एक सत्यकथा ..!
जी ह्या कलियुगात सुद्धा भुत- प्रेत असतात ह्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडेल! सदर कथेत मी जे काही नाव आणि स्थळ लिहिले आहेत ! ते काल्पनिक आहेत कारण मला कुठल्या जागेची अथवा नावांची बदनामी करायची नाही ये..! त्यामूळे ह्या सत्यकथेचा पुरेपूर लाभ घ्या ! आणि ही सत्यकथा मी माझ्या भयाने नटवलेलीये.....😈!
ही सत्यकथा मला माझ्या सख्या मामानी सांगितली आहे ! मामाचा एक राजन नावाचा मित्र होता त्यासोबत ही सत्यघटना 2005 ह्या साली घडली होती, आणि होता म्हणजेच ते आता ह्या जगात नाहीयेत...!
मित्रांनो .....माऊली हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर 3 चित्र ऊभी राहतात ..! एक आपले आई- वडिल आणि दूसर म्हणजेच विठू माऊली ! आपल्या आई- वडिलांशी मुलांनी कितीही वाईट वागल, तरीही आपले आई- बाप कधीच आपल्या मुलांचा राग मनात धरत नाहीत , त्याच प्रकारे माझ्या माऊलीशी तुम्ही कितीही वाईट वागलात, तरीही तो तुमची साथ कधीच सोडणार नाही! जर तुम्ही संकट समयी त्याचा एक शब्द उच्चारलात किंवा त्याचा धावा केलात तर मी पुर्णत विश्वासाने सांगेल की आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी माऊली कोणतेही रुप धारण करुन येतील व आपल्या भक्ताच्या संकटाच निरुसरण करतील.

तर चला मित्रांनो जास्त काही न बोलता आपल्या सत्यकथेला सुरुवात करुयात ....!

सत्यअनुभव देव कथा ... 1


कथेचे नाव - ! माऊली !



राजन हे व्यवसायाने एका मेडिकलचे मालक होते,घरात पैस्यांची बिल्कुल कमी नव्हती , घरात सर्व काही सुरळीत चालू होत, परंतू राजन हे एक नास्तिक होते, देवाधर्मांवर त्यांचा बिल्कुल विश्वास नव्हता, परंतु राजन यांच्या पत्नी म्हणजेच सविता यांची देवावर खुप श्रद्धा होती, त्या विठूरायाच्या असीम भक्त होत्या , ही सत्यघटना तेव्हा घडली जेव्हा राजन यांच नुकतच लग्न झाल होत. आणि ज्यावेळेस ही घटना त्यांच्यासोबत घडून गेली त्यानंतर मात्र राजन यांचा देवावर पुर्ण विश्वास बसला गेला , ......
वर्ष 2005
राजन यांच नुकतच लग्न झाल होत , लग्ना च्या वेळेस राजन यांच वय 25 होत .आणि त्यांच्या पत्नीच वय 22 होत , ह्या अशा तरुन वयातल्या मुलांना भटक्ंतीचा खुप वेड असत, तसच वेड माझ्या मामा आणि त्यांच्या मित्र राजनला सुद्धा होत ,एन हिवाळा सुरु झाला होता,
राजन आणि मामा व त्यांचे अजून 3-4 मित्र, असा हा ग्रुप एका, घाटातल्या धबधब्यावर पार्टीसाठी गेला होता, धबधबा जंगलाच्या आत होता , म्हणुनच 30- 40 मिनीट तरी चालायला लागायच . असच सर्व जन आप- आप्ल्या हातात थोडफार सामान घेऊन गप्पा गोष्टी करत धबधब्याच्या दिशेने चालले होते , सामान म्हणजेच चटई, मद्य असलेला बॉक्स , चाखणा इत्यादी. असच काहीसा 20 - 25 मिनिट चालून झाल्यावर त्यांना समोर एक वेगळच दृश्य दिसल .
" hey guys....! हे काय आहे ....?" ग्रुप मधलाच एक तरुन युवक पुढे पाहत म्हणाला. समोर एक टाचण्याने भरलेला पिवळा लिंबु होता, व त्यावर हळद कुंकू लावल होत, व बाजुलाच एक बिनधडाचा कोंबडा मरुन पडला होता , जणु कोणीतरी त्याचा बळी दिला असावा.
" अरे मला माहितीये...ना..! हा भुत उतरवण्यासाठी वापरतात, ह्याला उतारा म्हणजेच नैवेद्य म्हणतात ...मी माझ्या आजोबांकडून ऐकलय...!" एक जाणकार युवक म्हणाला
" ए काय तु पन ह्या असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवतो..." अस म्हणतच राजनने तो लिंबू आपल्या हातात ऊचलला, आणि तो बिनधडाचा कोंबडा दुर झुडपांत भिरकावुन दिला , आणि तो पिवळा लिंबू आपल्या खिशव्यात ठेवला .व म्हणाला .
" चला लवकर ...? ऊशीर होतोय..." राजन अस म्हणतच सर्व निघुन गेले .
" राजन ...! तू तस नको करायला हव होत ...?" माझा मामा राजनला म्हणाला.
" ए दिनेश...! तुला माहीतीयेना ..? मी ह्या अशा गोष्टिंवर विश्वास ठेवत नाही...! आता गप्प पार्टी enjoy कर " माझ्या मामाच नाव दीनेश होत , त्यांनाच राजन म्हणाला. ब्रेंडेड दारु , चिकन लॉलीपॉप, बिर्याणी ह्या अशा शाही थाटात सर्वांची पार्टी धमाक्यात सुरु झाली होती,
" अरे काय चव आहे... बिर्याणीची ....झक्कास बोलेतो...! लिंबू आणलय कारे कोणी.." दारुच्या नशेतच राजन म्हणाला .
" आर नाय रे...." ग्रुप मधलाच एकजण म्हणाला.
" आर काय तुम्हीलोक . .? लिंबू नाय आणु शकत सादा..?" राजन पुन्हा आपल्या दारुच्या नशेतच म्हणाला . की तोच राजन ला एक आतिसूक्ष्म घोगरा आवाज आला .
" तुझ्या खिशात आहे लिंबू ...तो खा ....!" "
" अरे हो ...! विसरलोच ....मी... thank you...भाई ! राजनने आवाज आलेल्या दिशेने पाहिल व म्हणाला .परंतू त्या दिशेला कोणिही नव्हत .
" राज्या कुणाशी बोलतोय...???!" दिनेश म्हणजेच माझा मामा म्हणाला .
" काय नाय रे ..! लिंबू ..?" दारुच्या नशेत राजन इतकेच म्हणाला .
" अरे नाय रे आणल लिंबू...! दिनेश मामा म्हणाला .
" अरे आहे रे माझ्याकडे....! अस म्हणतच राजन ने आपल्या खिशात हात घातला , व तो उता-यावर ठेवलेला पिवळ्या रंगाचा लिंबू बाहेर काढला . व दाखवत म्हणाला .
" हा बघ लिंबू....! " राजन तो टाचण्या टोचलेला लिंबू दाखवत म्हणाला .
तस त्या लिंबूकडे पाहताच दोन-तीन जनांची एका झटक्यात ऊतरली व ते म्हणाले .
" एय ...राजन....! फेक तो लिंबू उगाच वाट लागल तुझी..."
ग्रुप मधलाच एक युवक म्हणाला.
" राजन फ़ेक तो लिंबू ...? वाटलस तर मी तुला टपरी वरुण आणुन देतो...? " माझा दिनेश मामा म्हणाला .
" श्ह्ह्ह्ह्ह तुम्ही दोघे गप्प बसा रे ? "
राजनच्या शरीरात दारुची नशा विशासारखि पसरली होती , आपण काय करत आहोत , आपण काय बोलत आहोत ह्यावर त्याच नियंत्रण नव्हत. राजनने एक एक करत लिंबूवरच्या सर्व टाचण्या काढल्या आणि लिंबू कापुन त्याने आपल्या चाखण्यात मिक्स केल. व दारु सोबत तो चाखना खावू लागला , चार तासां नंतर पार्टी संपली व सर्व आप-आपल्या घरी निघुन गेले ,त्याच पार्टीच्या दिवशी राजनला घरी आल्यावर रात्री काही चित्र- विचित्र अनुभव आले , परंतु आपण खुप प्रमाणात दारु पेलो आहोत ,व त्याच कारणाने हे सर्व घडत आहे अस समजुन राजन झोपी गेला , दुस-या दिवशी पहाटे राजनला एका भयानक स्वप्नासरशी जाग आली, एक मोकले केस सोडलेली बाई , जिने काळ्या रंगाची मेक्सि घातली होती , आणि ती एकटक राजन कडेच पाहत होती , तिचा चेहरा चुना पोतल्या सारखा पांढ-या रंगाचा होता, आणि आपले काळ्या रंगाचे दात दाखवत ती राजन कडे पाहत हसत होती, न जाणे कस पन तिच्या हाती एक कोंबडा आला , तस त्या अमानविय आकृतीने एकवेळ राजन कडे मग त्या कोंबड्या कडे पाहिल, आणि क्षणात त्याच डोक आपल्या तोंडात घालून उपटल व राजन कडे पाहत खावू लागली . ते स्वप्न इतक आतिभयानक होत, की राजन च्या अंगावर सर्र्कन काटा येऊन गेला.
" अहो उठलात तुम्ही..?" राजन ची बायको सविता म्हणाली .
" हो ..." राजन इतकेच म्हणाला .
" अहो आपण आज माझ्या माहेरी चाललोय... ! आमच्या गावात दरवर्षीप्रमाणे माऊलींची पालखि आहे उद्या ...! "
" श्ह्ह्ह बस्स...! पुढे काय बोलू नको ..? तुला जायचय ना ये तू जाऊन .." राजन इतकेच म्हणाले.
" बाबांनी तुम्हाला सुद्धा बोलावलय...!" सविता म्हणाली . बाबा म्हणजेच राजनचे सासरे होते आणि नविनच लग्न झाल होत म्हणुन त्यांच शब्द अस वाया जाऊ देन चांगल दिसल नसत म्हणुनच राजनने जाण्यासाठी होकार दिला. व म्हणाला .
" हे बघ सविता मला मेडिकल मध्ये आज खुप काम आहे ! तर मी रात्री येईण ...तू टेक्सी कर आणि जा...!" राजन म्हणाला .
" हो ठीके ...!" सविता इतकेच म्हणाली.
तसे राजन फ्रेश होण्यासाठी निघाला , फ्रेश झाल्यानंतर चहा, नाश्ता करत राजन मेडिकल मध्ये आला काम करता करता राजन त्या भयानक स्वप्नाबदल सर्व काही विसरला होता, आठ - साडेआठ वाजता राजन आपल्या मारुती सूजूकी alto ह्या गाडीने सासूर वाडीला जाण्यासाठी निघाले. सासूर वाडीला पोहचायला 1:30 तास तरी लागणार होता, राजन मस्त पैकी गाणे गुणगुणत ड्राइव्ह करत जात होता, रस्ता तस म्हणायला जंगली भागातला , सुनसान होता, त्या काली जास्त कोणाकडे गाड़या नव्हत्या म्हणूनच जंगलातल्या रस्त्यावर जास्त गाड्यांची वर्दळ नव्हती. राजनने आपल्या खिशात हात घातला व एक सिगारेट बाहेर काढली, आणि तोंडात ठेवली,लाईटर चालू करत राजनने सिगारेट पेटवण्यासाठी तो जवळ आणला. तस गाडीला एक हादरा बसला आणि त्या धक्क्याने राजनच्या हातून लाईटर खाली पडली,
तस एका हाताने स्टेरिंग पकडत राजनने आपल शरीर थोड खाली झुकवल आणि दुस-या हाताने लाईटर चाचपडू लागला,
राजन कधी पुढे तर कधी खाली पाहत होता, अशातच काहिवेळाने त्याच्या हाती लाईटर लागल,तस त्याने एक नजर पुढे रसत्यावर टाकली , आणि त्याचक्षणी राजनला रस्त्यावर खाली मान घालून उभी असलेली एक स्त्री दिसली . जी गाडीच्या मधोमध ऊभी होती , त्या अनोलखी स्त्रीला पाहताच राजनने करकचून ब्रेक मारला, परंतू गाडीचा वेग जास्त होता , त्या स्त्रीला राजन च्या गाडीने धडक दिली आणि मगच गाडी थोड दुर जात थांबली गेली . आपण एका माणसाला उडवल, आता आपल्यावर पोलिस केस होईल:, मग फाशी सुद्धा , हे अशे भयानक विचार मनात येताच राजन गाडीतून खाली ऊतरला, आणि आजूबाजूला पाहु लागला, परंतू राजन च्या नजरेस ते प्रेत किंवा अपघाती माणूस अस काहीहि सापडल नाही, तिथे होती ती फक्त रातकिड्यांची किर्रकिर्र ... आणि जिवखाणारी स्मशान शांतता , त्याशिवाय त्या निर्मनुष्य रस्त्यावर अस काहीही नव्हत .
" काय भास झाल यार...!" स्व्त:शीच अस म्हणतच राजन पुन्हा गाडीत बसला,
आणि गाडी स्टार्ट करू लागला , परंतू गाडी काही केल्या स्टार्ट होइना,
की तोच राजन ची नजर ड्राइव्ह सीटच्या वर असलेल्या आरशावर गेली , तस त्याच्या नजरेस एक भयानक दृश्य दिसल. पाठीमागच्या सीटवर एक बाई बसली होती , जिच्या अंगात एक काळ्या रंगाची मेक्सि होती .
आणि तिचा चेहरा पूर्ण पांढ-या रंगाचा होता, तिने आपली मान खाली केली होती , परंतू ज्याक्षणी राजनने आरशात पाहील, तस तीने आपली मान वर करायला सुरुवात केली, आणि त्याचक्षणी राजनला तिचा विद्रूप चेहरा दिसला ,
" मला भूक लागलीये..! खायला...दे ! कच्चा मांस खायला दे ! हिहिही हिहि हिहि " त्या भयानक स्त्रीच्या तोंडून एक घोगरा आवाज निघाला, आणि ह्या शेवटच्या वाक्यासरशी ती जोरात किंचाळी,
आवाज इतका मोठा होता , की गाडीच्या काचा एक -एक करत फुटल्या गेल्या. राजन कानावर हात ठेवलेल्या अवस्थेत सीटवर बसला होता,काहीठराविक वेळाने आवाज थांबला गेला आणि पुन्हा स्मशान शांतता पसरली. तस राजनने आपल्या कानांवरुन हात काढले , आणि पुन्हा मागे पाहिल परंतु मागच्या सीटवर कोणीही नव्हत, मग भित - भितच राजन गाडी स्टार्ट करु लागला, परंतू गाडी काही केल्या स्टार्ट होत नव्हती, की अचानक वातावरणातली शांतता पुन्हा एका ट्रकच्या हॉर्नने मोडली गेली , तस राजनने पुढच्या आरशातुन पाठीमागे पाहिल, आणि पुन्हा त्याला एक भयानक दृश्य दिसल, पाठीमागुन एक पिवळ्या रंगाची ट्रक राजनच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती, आणि सर्वात भयानक होत ते म्हणजे ड्राइव्हर दुसरा कोणि नसून तीच स्त्री होती, राजनने क्षणाचाहीविलंब न लावता कारचा दरवाजा उघडला आणि जंगलातल्या रसत्याने पळू लागला , 10- 12 मिनीट पळून झाल्यावर तो एका झाडापाशी थांबला , आपल्या सोबत जे काही घडत
आहे , ते नक्कीच काहीतरी अमानविय, क्रुर , आहे , व हे सर्व त्या उता-या मुळे होत आहे आणि ह्या सर्वांना दोषी आपणच आहोत, हे सुद्धा राजनला आतापर्यंत समजल होत ,
" अहो दादा.! " राजनच्या पाठीमागुन आवाज आला , त्या आवाजासरशी राजनने थोड भीत- भितच पाठीमागे पाहील,
समोर एक 10 - 12 वर्षांचा मुलगा आपले दोन्ही हात कमरेवर ठेऊन उभा होता, त्याच्या अंगात सफेद रंगाचे वस्त्र होते , जसे वारकरी घालतात, व त्याच्या मस्तकावर माऊलींच्या सारखा चंदनाचा टिळा होता
" कोण रे तू.? आणि इतक्या रात्री ह्या जंगलात काय करतोयस...?
राजनने त्या मुलाला विचारल .
" अहो दादा...! मी माझ्या गाईला चरायला घेऊन आलो होतो..! "
तो मुलगा म्हणाला .
" इतक्या रात्री...? भिती नाही वाटत का...? " राजन म्हणाला .
" हो !आमच गाव जवळच आहे ना...म्हणुन आणि तसही विठ्ठल भक्ताला कसली आली भिती "
" काय .! .नाव काय तुमच्या गावाच ....? " राजन म्हणाला.
तस त्या मुलाने आपल्या गावाच नाव सांगितल...! जे राजनच्या बायकोच्या माहेरचच गाव होत..
" अरे काय सांगतोस ...! मला पन त्याच गावाला जायचय..! चल लवकर..!" राजन खूश होत म्हणाला .
आणी ते दोघेही एकसाथ चालू लागले, 15 -20 मिनीटांमध्ये त्या दोघांच्यात ज्या काही गप्पा -गोष्टी झाल्या , त्या गप्पांमधुन राजनला त्या मुलाच नाव व त्याच्या बदल काही माहिती मिळाली . त्या मुलाच नाव माऊली होत, व तो अनाथ होता , पन स्वाभावाने तो खुपच चांगला मनमिळाऊ होता, त्याच्या बोलण्यात माऊलीं सारखा गोडवा होता , मुखातून निघणा-या प्रत्येक शब्दात तथ्य होत, त्याच्या चेह-यावर पसरणार मंद निर्मळ हास्य माऊलींच्या सारख भासून येत होत जणू राजनला वाचवण्यासाठी खुद माऊली अवतरले होते,
" एक विचारु माऊली?" राजन माऊली कडे पाहत म्हणाला. आतापर्यंत वाटणारी त्या स्त्री ची भिती राजनच्या मनामधुन थोडीफार कमी झाली होती .
" हा बोलाना ! " एक मंद स्मित हास्य करत माऊली म्हणाला.
" अरे बाळा..! तू मला म्हणालास की तू अनाथ आहेस .पन गावामध्ये तू राहतोस कुठे .?"
तस माऊली ने पुन्हा एकदा राजन कडे हसून पाहिल. व तो पुढे म्हणाला .
" दादा कुणाला सांगू नको हा...? मी ना पंढरपूरचा आहे...पन मी सगळीकडे भटकत असतो...! आणि ह्या गावात सुद्धा भटकतोय " माऊली थोड हसतच म्हणाला .
" बर बाबा..! खुप मस्ती करतोस तू..! अस खोट सांगून " राजन सुद्धा हसतच म्हणाला .
असच काहीसा वेळ चालुन झाला असेल , की माऊली म्हणाला .
" दादा तू आता सरळ जा...पाहु ...? मी नंतर येतो.."
" का रे तू कुठे चाललास..?" राजन म्हणाला .
" दादा मला ना थोड काम लक्षात आल, तर मला आता जाव लागेल..."
माऊली आजुबाजूला पाहत म्हणाला .त्याला कसली तरी अनामिक चाहूल लागली होती ,
" अरे पन...?" राजन इतकेच म्हणाला.
" नाही तू जा म्हंटल ना मी ! माऊली थोड रागावतच म्हणाला.
" बर बाबा लवकर ये तू...!" राजन म्हणाला .
" आणि हो पाठीमागून कसलाही आवाज आला तरी मागे वळुन पाहु नकोस .आणि हे घे " अस म्हणतच माऊली ने राजनला एक मूर्ती दिली " तस राजन आपल्या हातातल्या मूर्तीकडे प्पाहत म्हणाला.
" ही विठ्ठलाची मूर्ती..! अरे पन मी तर नास्तिक आहे ना..." राजनने ह्या वाक्यासरशी समोर पाहिल , परंतु त्याच्या पुढ्यात कोणीही नव्हत..
" अरे कुठे गेला..हा ! अस म्हणतच राजनने आजुबाजुला पाहिल परंतु जवळपास कोणीही नव्हत , तस राजन
पुढे -पुढे जाऊ लागला , आणि 20 पावल चालल्या नंतर त्याने पुन्हा मागे वळुन पाहिल, पन मागे आता सुद्धा कोणीही नव्ह्त , होती ती फक्त स्मशान शांतता, आणि रातकीड्यांचा भयपद्य संगीत, जे राजनच्या मनात पुन्हा भिती निर्माण करु लागली होती , राजनने पुन्हा समोरची वाट धरली, तस पाठीमागून कोणीतरी आपला पिच्छा करत आहे अस त्याला वाटू लागल, कारन झाडांची सुखलेली पान खाली जमिनीवर पडली होती, त्यांचा चरचर ...आवाज होत होता,
" रा.....ज ..न ! कोणीतरी आपल्याला प्रेमाने हाकमाराव तस हा आवाज
होता, ह्या आवाजावर राजनने मागे वळुन पाहिल नाही , कारण माऊलीने सांगितल होत,
" ए राजन..! पाठिमागे...बघ ....! ...नाय तर ...तुझ्या सविताला मारुन टाकिन मी ... ! " ह्या अगोदर आलेल्या लाडीगोडी आवाजापेक्षा हा आवाज खुपच रागीट व घोगरा होता ,
" अहो .....! वाचवा ...मला..!" ह्यावेळेस मात्र राजनच्या बायकोचा आवाज आला तस राजनने एका झटक्यात मागे वळुन पाहिल, आणि त्याच क्षणी राजनला ते अमानविय ध्यान पहिल्यापेक्षा विद्रूप- आविदृप रुपात दिसल .पांढरा फट्ट चेहरा, पिवळ्या रंगाचे डोळे, अंगावर काळ्या रंगाचे वस्त्र , आणि दात विचकतच ती राजन कडे पाहत होती ,
" हिहिहिही, खिखिखी फसला जाळ्यात .....आता कुठे जाशील "
अस म्हणतच त्या उपद्रवाने राजन कडे चाल केली , त्याच वेग अफाट अमानविय होत, एका सामान्य मणुष्याच्या बुद्धीला न पटण्याच्या आवाक्याबाहेरच होत , त्या अमानविय ध्यानाने हवेत एक झेप घेतली,
कोणत्याही क्षणी ते राजनला संपवणार होत, पुढच दृश्य इतके भयंकर होते , की राजनने आपले दोन्ही हात चेह-यासमोर धरले , आणि त्याच
क्षणी राजनच्या हातात असलेल्या त्या मूर्तीमधुन एक प्रखर तेज बाहेर निघाल, जे थेट त्या कालोखाच्या सैतानावर जाउन पडल, माचिसच्या जलत्या कांडीच कागदास स्पर्श होताच क्षणार्धात पेटून जात त्या कागदाची राख उरली जाते, त्याच प्रकारे ते अमानविय पिशाच्च हवेतच जळुन राख राख झाल, एवढ वेळ आपण सुखरुप आहोत हे पाहुन राजनने आपल्या चेह-यावरचे हात बाजुला काढले, व आजुबाजुला पाहायला सुरुवात केली, तस राजनला खाली जमिनीवर काळ्या कोळशाचा ढिग दिसला, आणि आपल्या हाता मध्ये चमकणारी ती मूर्ती सुद्धा, त्या मूर्तीला पाहताक्षणीच राजनला समजल की आपण ह्या मूर्ती मुळेच वाचलो नाही तर आपल काही खर नव्हत . राजनने दुस-या दिवशी सविताच्या माहेरी ही सर्व घटना जशीच्या तशी कळवली , सविताच्या वडिलांना ह्या अशा भुत- प्रेतां बदल थोडीफार माहीती होती , जी त्यानी थोड़क्यात वर्तवळी
" जावई बापू..! तुम्ही ज्या नैवेद्या ला मज्जा म्हणुन फेकून दिलत
.. तो एका जखीणीचा नैवेद्य होता , कारन तुम्ही जे काही त्या भुताच वर्णन केल त्यानुसार मी हेच सांगू शकतो , की ती जखीणच होती , आणि काल अमावास्या असल्याने ती तुम्हाला मारुन तिच्या बरोबर घेऊन जाण्यासाठी आली होती, पन साक्षात देव तुमच्या बरोबर होता म्हणुन तुम्ही वाचलात, पन एक सांगू जावई बापु ...? तुम्हाला विश्वास नाही बसणार , पन माझी पोर विठ्ठलाची खुप मोठी भक्त आहे..! आणि तुम्हाला रात्री यायला ऊशीर झाला म्हणुन ती रात्रभर देव्हा-यात बसून पुजा उपासना करत होती , आणि म्हणुनच साक्षात पांडूरंग तूमच्या मदतीला धावून आला होता , आणि शेवटच म्हणजे आमच्या पुर्ण गावात माऊली नावाचा एकही मुलगा नाहीये..!
" काय..!" आश्चार्यकारक नजरेने पाहत राजन म्हणाला .
" होय जावई बापु...! आणि मी हेच सांगेल...... की साक्षात पांडूरंग तुम्हाला वाचवून गेला .! " सविताचे वडिल म्हणाले
" अहो ! तुम्ही पन मंदिरात पाया पडायला चला ना आमच्याबरोबर .. मी माऊलींना नवस केल होत ! की तुम्ही सुखरुप घरी आलात तर आम्ही दोघेही एकत्र दर्शनाला येऊ ..! " सविता राजनला म्हणाली .तिच्या ह्या वाक्यावर नास्तिक अस्लेला राजन ज्याने देव हा शब्द नाकारला होता , ज्याने आजपर्यंत कधीही देवाच्या म्ंदिराची एक पायरी चढली नव्हती तो तिच्या एका वाक्यावर तैयार झाला , सायंकाळी दोघे सुद्धा गावातल्या माऊलीच्या देवळा पाशी आले , हजारोने पब्लिक होती ,जिकडे नजर जाईल तिकडे मांणसच मांणसच ,टालांचे आवाज येत होते, माऊलींचा गजर सुरु होता ,लहान - मोठी सर्व टालांच्या घोषात माऊलींना साद घालत होते , हे सर्व दृश्य पाहुन राजनला भरुन आल होत, त्याला अस झाल होत की कधी आपन माऊलींचा चेहरा पाहतोय , एक आस लागुन राहीली होती त्याला , काहीवेळाने त्या दोघांना सुद्धा दर्शन करण्याचा
चान्स भेटला , राजनने ज्याक्षणी माऊलींच्या मूर्तीकडे पाहिल त्याक्षणी नास्तिक असलेल्या राजनचे हात आपोआप जोडले गेले , आणि डोळ्यांतुन आसवांची धार लागली , व त्याच्या मनात एक आवाज घूमला

"सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरुप होसी
जन्मो जन्मीचे दु:ख विसरसी"

"! माऊली......!

कारण जंगलातल्या भेटलेल्या माऊलीचा चेहरा हुबेहुब विठ्ठला सारखा दिसत होता,,,,,

देव आहे त्याच अस्थीत्व जरी दिसत नसल तरी तो आहे ह्यावर राजनचा विश्वास बसला होता ,
Writer: jayesh zomate ✍
समाप्त: