A cup without love tea and that - 23. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २३.

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २३.



काही दिवस असेच जातात..... सचिन & जॉली विथ फॅमिली त्यांचं गेट - टू - गेदर नेहमीच होत असतं...... कधी - कधी ते दोघेच फिरायला सुद्धा जातात...... त्यांचं प्रेम दिवसेंदिवस खुलत असतं.....❣️❣️

काही महिन्यांनी, आज नंदिनी समुपदेशन केंद्रातून घरी येणार असते..... तिच्या स्वागताची तयारी म्हणून, सगळे जमले असतात...... घरी परतल्यावर तिची रिस्पॉन्सिबिलिटी आजी आणि जयावर असते.....

नंदिनीला घेऊन, सचिन आणि सल्लू गाडीतून उतरतात आणि येऊन दारावर उभे होतात.... त्यांचं ओक्षण केलं जातं..... नंतर सगळे आत येतात.... सगळ्यांचा प्रेमळ स्वभाव बघून नंदिनिला भरून येतं..... तिचं रडू कोसळतं.....

आजी जाऊन तिला जवळ घेते.....

आजी : "बाळा आता रडायचं नाही..... इथून पुढे मी तुला ट्रेन करेल..... प्रत्येक परिस्थितीला समोर जाणं शिकायचं.... कोणी त्रास दिलाच तर, स्वतः न रडता त्यांना रडवायचं..... आता तुला खंबीर होऊन राहायचं आहे.... समाज कधीच साध्या माणसाला आपलं म्हणत नसतो.... म्हणून, आपणही त्याच्याशी तसच वागायचं जसं तो आपल्याशी वागेल..... या सगळ्यात आम्ही आहोतच नेहमी तुझ्या सोबत.....😘😘"

नंदिनी : "आई.....🥺🥺 खरंय.... आता रडून काही साध्य नाही...... कारण, मनावर इतक्या इजा झाल्या आहेत की, मन त्या घावांनी बोथळ झालंय...... सचिन दादा तुझे खूप आभार...... जगण्याची नवीन दिशा दिलीस तू....🙏 इथून पुढे मला स्वावलंबी व्हायचंय..... आजवर दुसऱ्या कोणावर अवलंबून असल्याचे काय नुकसान असू शकतात हे चांगलंच समजलंय....😒""

सचिन : "नक्कीच आम्ही आहोत नंदू तुझ्या सोबत...."

आजी : "बेटा नंदिनी तुझं एज्युकेशन किती झालंय??"

नंदिनी : "आई मी पोस्ट ग्रज्युएट आहे...... नोकरीच्या शोधात होते..... मामाच्या मुलाने लग्नाचं वचन दिलं बोलला की, इतकी माझी प्रॉपर्टी असल्यावर तू जॉब करून काय करणार...... म्हणून, त्याच्यावर विश्वास ठेऊन, मोठी चूक करून बसले......🥺 आणि आज माझ्या बाबतीत अस घडलं.... अस होईल हे वाटलं नव्हतं...."

आजी : "बेटा नंदिनी..... काही चुका आयुष्यात आपल्याला धडा शिकवण्यासाठीच होत असतात..... तुला आधी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती पण, आज तुला स्वावलंबी व्हायचंय..... कदाचित त्याच अस्तित्वाला जागवण्यासाठी हा प्रकार तुझ्यासोबत घडला असावा..... हे बघ जे होतं चांगल्यासाठीच.... म्हणून, त्यातून काहीतरी शिकून, आपण मार्ग काढला पाहिजे..... बेटा तू हिम्मत घे आम्ही आहोतच तुझ्या मदतीला.....🙂"

नंदिनी : "सगळ्यांचे खूप आभार.....🙂 मला तुम्ही जगण्याची उमेद दिलीत... 🙂"

तिचे आभार प्रदर्शन बघून सल्लू......

सल्लू : "नक्को रे थँक्यू सॉरी का लोड..... नहीं तो लोड लेकर हो जाएगी तू बोर..... बस फॅमिली मेंबर्स रहे हमेशा साथ..... सब रहे खुश, लेकर हाथो में हाथ.....😍😍"

सगळे : "......😍😍 ये बात...."

सगळे सोबत लंच करतात.......

असेच दिवस जातात..... आपली सर्वांची लाडकी सूक्कू, पिल्लू चांगल्या संस्कारात वाढत असेल यात काही वादच नाही..... सचिन सध्या लग्न न करता जोपर्यंत नंदिनिच्या आरोपींना शिक्षा होणार नाही..... तोपर्यंत, लग्नाचा विचारच करणार नाही..... अस घरी सांगून टाकतो.... कोणाला काहीच प्रॉब्लेम नसतो..... उलट त्याच्या निर्णयाचा सर्वांना आदरच असतो......

नंदिनीला सेल्फ डिफेन्सचे क्लासेस लावून देण्यात येतात सोबतच ती एका फर्ममध्ये अॅपॉइंट झालेली असते...... सगळं व्यवस्थित सुरू असतं.... सगळेच त्यांच्या - त्यांच्या कामात व्यस्त असतात.....

दोन वर्षानंतर......

एकदाचा तो दिवस उजाडतो.... सचिन आज खूप खुश असतो.... अहो कारणही तसच असतं ना....!! आज नंदिनीच्या आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा सुनावली जाणार असते..... सचिन आणि सगळे न्यायालयात हजर होतात..... आरोपींना आय. पी. सी. कलम ३७६ डी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा शिक्षा सुनावली जाते.... आरोपींना फक्त करावास देऊन उपयोग होणार नाही तर, त्यांना जन्मठेपच झाली पाहिजे.... हा मुद्दा सामाजिक संस्था तसेच नेटकऱ्यांनी उचलून धरल्यामुळे, नंदिनीला न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो.....

बलात्कार झाल्यास फाशीची तरतूद करणारा कायदा केवळ विचाराधीन असून चालणार नाही तर, त्यासाठी पाऊल उचललं गेलं पाहिजे..... आजची वास्तविकता तर हीच आहे, "ज्या गोष्टीला जास्त मागणी असते ती गोष्ट विकते...." बलात्काराच्या विषयावर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा कायदा करण्याचा विचार कुठेतरी लुप्त झालेला बघायला मिळतो.... खरं तर, बलात्कारासारख्या मुद्द्यांना ट्रेण्ड बनवू पाहणारे राजकारणी कुठवर खपवून घेतले पाहिजेत हा खरा मुद्दा आहे..... स्त्रिया सक्षम व्हायला आधी सुरक्षित असाव्या लागतात आणि तीच ग्वाही आज कोणी देऊ शकत नाही हीच पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला लाजवणारी बाब!....

न्यायालयीन निकालाने जो - तो आज खूप खुश असतो...... सगळे त्या निकालानंतर घरी जाण्याआधी गणपती दर्शन घ्यायला मंदिरात जाण्याचं ठरवून, गाडी तिकडे वळते..... दर्शन संपवून सगळे बाहेर पडणार की, नंदिनीचा हात एक वृद्ध धरतात..... नंदिनी त्यांना बघून खूप रागात येते.... आणि जोर - जोरात ओरडून बोलत असते......

नंदिनी : "लाज कशी वाटत नाही माझा हात धरण्याची तुम्हाला....😡😡 हिम्मत झालीच कशी तुमची.....🤬🤬 अरे पोटच्या पोरीची इज्जत चव्हाट्यावर असताना, सोडून दिलं तुम्ही तिच्या भारोस्यावर एकटीला.... हीच होती का तुमची माया...?? सांगा ना.... आणि आज कशापाई आलाय....🥺🥺"

नंदिनी रडवेली होऊन त्यांच्या सोबत बोलत असते.... सगळ्यांना आता इतकं तर लक्षात आलंच असतं की, ते दुसरे - तिसरे कोणी नसुन नंदिनीचे आई - बाबाच आहेत..... सगळे जवळ जाऊन नंदिनीला शांत करतात... पण, आज ती जिवाच्या आकांताने रडते.....😒😒

आजी : "शांत हो नंदिनी बाळा.....🥺"

नंदिनी : "कशी शांत होणार आई... सांगा ना.... तुम्हा सगळ्यांशी माझं रक्ताचं नातं नसताना, तुम्ही मला पोटच्या पोरिसारखं जपलं..... ह्या, ह्या सचिन दादाने मला स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त जीव लावला..... आणि हे, जे माझेच जन्मदात्रे होते त्यांनी बलात्कार सारख्या गुन्ह्यात, ज्यात माझी काहीच चूक नव्हती हो, त्यात मलाच दोषी मानून स्वतःपासून दूर केलं.... हीच असते का हो माया.... सांगा ना आई.....😭😭"

आजी : "बाळा रडू नकोस.... तू स्ट्रोंग आहेस....😘😘"

सचिन : "हे बघा तुम्ही नंदीनीचे आई - बाबा आहात म्हणून, तुमचा मान ठेऊन सांगतो.... शांतपणे निघून जा..... मला काहीही बोलायला भाग पाडू नका..... प्लीज....🙏"

नंदिनीची आई : "साहेब अहो चूक झाली आमची पोटच्या पोरीला पैशासाठी दूर सारलं.... आणि आज आम्हास्नीच आमच्या पोटच्या पोरानं घरातून हाकलून लावलं....."

सगळे : "....😲😲"

नंदिनी : "आई, अग किती खोटं बोलशील.... बस कर आता.... मला तुमच्या खोटेपणात काहीच इंटरेस्ट नाही...😡😡"

सचिन : "नंदू शांत हो बाळा..... त्यांचं ऐकून घेऊ आपण.... त्यांनी जी चूक केली ती माफ करण्यासारखी तर नाहीच पण, म्हणून आपणही माणुसकी विसरून, चूक करू हे तर चुकीचं आहे ना बाळा... शांत हो.... आई सांभाळा नंदुला...😒"

नंदिनी जाऊन आजी जवळ बसते..... आजी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून, तिला शांत करते.......

सचिन : "सांगा तुमच्या बाबतीत काय घडलं......🤨🤨"

नंदीनीची आई : "साहेब..... ज्या दिवशी नंदिनी सोबत हे समदं झालं.... त्यादिवशी माझा भाचा घरी आला आणि त्यानं आम्हास्नी समदं सांगितलं..... त्यो बोलला, मी पैसं दितू.... तुम्ही तुमची तोंड बंद ठेवायची.... आणि नंदिनी, तिला हाकलून लावायचं.... नाय तर तुम्हास्नी जिता सोडत नसतू..... साहेब गोर - गरीब आम्ही.... अम्हास्नी जीवापरीस अजुन काय पाईजेल सांगा....😭 माझा पोरानं पैसं घेतलं साहिब आणि अम्हास्नी गप केलं...... बोलला त्या कुल्टेला घरात घेणार नाही.... तोंड काळं केलं तिनं..... भितीपोटी व्हतू साहिब तिथं...... पण, काही दिसानी त्यानं अम्हास्नी हाकलून लावलं साहीब तेव्हापासनं फिरतूया भाकरीसाठी....😭😭"

खरं तर सगळ्यांनाच त्यांच्या विषयी वाईट वाटत असतं.... पण, त्यांनीही नंदिनीची चूक नसताना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तिला स्वतःपासून दूर केलं होतं.... आणि ते म्हणतात ना जे आपण करतो त्याची फळं इथच चाखायला मिळतात.... मग चांगलं करायचं की वाईट हे आपल्यावर असतं...🤨 जैसी करनी वैसी भरनी.....

सचिन : "तुम्ही चूक केलीत म्हणूनच आज तुम्हाला भोगावं लागतंय..... मी तुमच्या मुलावर गुन्हा दाखल करून, तुमची सोय वृद्धाश्रमात करू शकतो.... त्याच्यावर मी तुमची काहीच मदत करू शकत नाही..... कारण, जितकं माझ्या बहिणीने सहन केलंय त्या तुलनेत तुमचं दुःख काहीच नाही...... मी तुमची सोय करतो.... तुम्ही इथेच थांबा गाडी येईल.... तेव्हा त्यांच्यासोबत आश्रमात निघून जा... आणि तिथे तरी माणुसकी ठेवाल अशी अपेक्षा करतो..... चला आपण निघुया आता..... सल्लू चल ताई, आई को लेकर आ....😣😣😣"

सगळे गाडीत बसून, निघून जातात...... इथे नंदिनीचे आई - बाबा त्यांच्याकडे एका सकारात्मक भावाने बघून, सुखावतात की, आम्ही जो सुख नंदिनीला देऊ शकलो नाही तो आज तिला मिळतोय.... त्याच दिवशी त्यांची सोय आश्रमात करून देण्यात येते..... आता ते तिथे समाधानाने जगतील अशी त्यांनाही खात्री असते....

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं कवी यशवंत यांनी मायेचं महत्त्व जीवनात स्पष्ट करताना, त्यांच्या कवितेतून मांडलं... पण, अशा काही स्वार्थी बायका या निस्वार्थी भावाला अपवाद ठरतात.....😡

आज सचिन खूप खुश असतो कारण, एकतर नंदिनी बद्दल त्याच्या मनात जी काळजी असते ती मिटलेली असते.... दुसरं म्हणजे, ती आता आधीपेक्षा बऱ्यापैकी सावरली असते आणि स्वतःचं कमावून, जगण्यासाठी समर्थ असते.....

असेच दिवस जातात...... नंदिनी आता सुकन्याच्या फॅमीलीचा एक अविभाज्य भाग बनलेली असते आणि याचा तिला खूप जास्त अभिमान असतो......

नंदिनी काम करत असलेली फर्म सुद्धा मोठी असल्याने तिच्या प्रमोशनचे जास्त स्कोप असतात..... स्वतःच्या बुद्धीची छाप तिने सगळ्यांवर पाडलेली असतेच..... अशातच आज नंदीनीच्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरची टीम येणार असते..... त्यासाठी प्रेझेंटेशनची पूर्ण जबाबदारी सरांनी तिच्यावर टाकलेली असते..... पुढील पाच वर्षांत कंपनीचे काय प्लॅन्स असतील हे ती मांडणार असते....... टीम येते आणि प्रेझेंटेशन सुरू होतं..... नंदिनीची हुशारी बघून सगळेच खूप खुश होतात..... त्यातल्या त्यात एक जण असा असतो की, जो नंदिनीला ओळखत असतो.....☺️ मीटिंग संपवून जेव्हा सगळे बाहेर जात असतात तो व्यक्ती नंदिनीला थांबवून घेतो.....

वैभव : "हे..... नंदू.....🙂"

आपल्याला सचिन दादा शिवाय नंदू दुसरं कोणीच बोलत नाही म्हणून, ती मागे वळून बघते आणि......

नंदिनी : "वैभव......😳😳 तू इथे... म्हणजे, तू...."

वैभव : "हो सांगतो.....🙉 किती ओरडशिल......😂"

नंदिनी : "अरे पण इतक्या वर्षांनी...... 😂😂"

वैभव : "बस इथे.... आणि एकदम चूप..🤫.. बिलकुल नाही चेंज तुझ्यात.... आताही तितकीच बडबड....😁😁😂"

नंदिनी : "...🤫🤫🤫🤫"

वैभव : "अग मी बिझी होतो..... न्यू कंपनी टाकायला ट्रेनिंगची गरज म्हणून, कोर्स करायला अॅब्रॉड गेलेलो.... तिकडे पाच ते सहा वर्ष राहून आलो..... नंतर आपली कंपनी सुरू केली..... तुझं काय मग तू तर स्वतःचा बिझनेस करणार होतीस आणि त्याचं काय झालं तुझा तो सो कॉल्ड नवरा..... तो तर बोलत होता तुला जॉब करू देणार नाही मग आता कस काय....🤨"

नंदिनी : "................................... 🥺🥺"

वैभव : "नंदू सो सॉरी..... मला काहीच आयडिया नव्हती तुझ्या बाबतीत इतकं सगळं घडलं आणि तू मला साधा कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाहीस..... मला वाटलं त्याला जेलेस नको म्हणून, तू कॉन्टॅक्ट करत नसणार पण,.....😓😓 मला किळस येतो अशा मानसिकतेचा...... साला ब्लडी....🤬🤬 किती प्रेम करायची तू त्याच्यावर आणि त्याने काय केले..... आणि तुझे पॅरेन्ट्स.... त्यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती.....😡😡"

नंदिनी : "जाऊदे रे मी सोडलं सगळं आता... कोणाच कडून मला अपेक्षा नाही.....😒"

वैभव : "नंदू... पण, मी आजही तुझ्या होकाराची वाट बघतोय हे विसरलीस का....??🥺"

नंदिनी : "..🥺🥺 इतक्या जखमा मनावर झाल्या की, कोणावर विश्वास ठेवायची हिम्मत सुद्धा होत नाही रे.....😭"

वैभव : "नंदू..... डोन्ट क्राय..... प्लीज.... हवं तेव्हा होकार दे...... पण, रडू नकोस.....😘"

नंदिनी : "..🙂"

वैभव : ".. दॅट्स लाईक माय गर्ल..... 😘"

नंदिनी : "चल..... सी यू..... निघते मी....🙂"

ती जायला निघणार की, मागून वैभव.......🤭🤭

वैभव : "माझ्याकडे कबुतर नाहीये अग......😕"

ती त्याच्या अशा बोलण्यावर मागे वळून, खांदे उंचावत काय बोललास अस विचारते.....🤷

वैभव : "कबुतर जा - जा - जा.... कबुतर जा...... ... कबुतर जा - जा - जा.... कबुतर जा...... पहिले प्यार की दुसरी पोचपावती साजन को दे आ.... अस म्हणायला म्हणून तुझा नंबर हवा होता.....🙉😂😂"

नंदिनी : "....😂😂😂😂😂😂😂🤣 पहिले प्यार की दुसरी पोचपावती साजन को दे आ.... काय आहे हे पागल"

वैभव : "अग वेडे याआधी एकदा मी प्रपोज केला होता.... ही दुसरी वेळ आहे... म्हणून....😅"

नंदिनी : "आणि पोचपावती..😂😂🙄🙄 ते काय?"

वैभव : "कारण, माझं तुझ्यावरच प्रेम कन्फर्म आहे ना...😍😍😘😘"

नंदिनी : "पक्का वेडा रे वेडा...😂😂😂 तू नाय सुधारणार..😅"

नंदिनी हसून वेडी होते..... वैभव तिच्या जवळ जाऊन.....

वैभव : "अशीच लाईफ टाईम तुझं हसण्याचं कारण मला बनवशिल ना नंदू......😍"

दोघांची काही वेळ नजरानजर होते.....😍🥰 ती त्याला फाईल एक साईड हलकेच मारून, लाजत पळते.....😌😌

नंदिनी : "बाय...😌😌😌😌"

वैभव : "....🤭🤭हाय.....😘😘"

नंदिनी आवरून घरी निघून येते...... लगेच सचिनला कॉल करून, घरी बोलावून घेते..... तो सुद्धा डायरेक्ट नंदिनिकडे येतो...... सचिन आलेला बघून सगळे खुश होतात..... कारण, आज तो अचानक आलेला असतो.... नंदिनी सुद्धा हॉलमध्ये येऊन बसते.....

सचिन : "बोल ना नंदू काय बोलायचं होतं बाळा...."

नंदिनी : "दादा मला सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे.....😕"

आजी : "घाबरु नकोस बाळा..... बिनधास्त सांग..... नवीन बॉय फ्रेंड असेल तर मला ऐकायला अजुन इंटरेस्ट येईल....😜😜"

सल्लू : "लगा ही मुझे..... क्या रे आम्मिजी.... शर्मा जाएगी रे मेरी प्यारी बेहणा.....😂😂 तू तो बस मजे लिया कर....😅"

नंदिनी : ".....😌😌😌😌"

सगळे : "....😂😂"

आजी : "सांग बाळा बिनधास्त सांग.... आम्ही तुझेच आहोत......😘"

नंदिनी तिच्या कॉलेज डेज पासून आजवर सगळं सांगते..... आणि वैभव आणि तिच्या फ्रेंडशिप विषयी सुद्धा सगळ्यांना सांगते आणि आज जे काही तो तिला बोलला ते सुद्धा ती सगळ्यांना सांगून टाकते.....☺️

नंदिनी : "जर त्याला खरच माझ्या सोबत लग्न करायचं असेल तर मी त्याला होकार द्यावा का.... मी गोंधळात आहे..... मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मला सजेस्ट करावं....😣😣"

सचिन : "नंदू.....🥺"

नंदिनी : "दादा काय झालं रे.....🥺"

सचिन : "बाळा माझा होकार आहे पण, आधी सगळ्यांना वैभवशी बोलून निर्णय घेऊ देत...."

नंदिनी : "ते आहेच दादा म्हणून मी सांगितलं आज सर्वांना..... पण, तुझ्या डोळ्यात पाणी?"

आजी : "इतकी लाडाची बहीण सोडून जाणार म्हटल्यावर.....🥺🥺"

सल्लू : "आम्मिजी....... अरे..... तू रोने का नहीं अब.... नहीं तो मैं भी रो दूगा...🥺🥺"

सूक्कु : "निन्नी......🥺"

आजी : "हो ग राणी नाही रडत तू नको इवलूश्या डोळ्यांत पाणी आणुस.....🙂 माझं शहाणं पिल्लू....🥰"

सुक्कु : "....☺️☺️निन्नी...😘"

आजी : "माझं पिल्लू ग....😘😘"

सचिन : "नंदू उद्या तू वैभव आणि त्याच्या फॅमिलीला घरी घेऊन यायला सांग...... मी जॉली आणि पिटर अंकल यांना सांगतो..... जॉलीची कसिन सिस्टर आलीय असं ती सांगत होती..... आणि बाबांनाही कळवतो.... ओके ना आई....🙄"

आजी : "परफेक्ट बाळा.... चलो सल्लू तयारीला लागा..... उद्याचं अरेंजमेंट तुझ्यावर.... ऊर्वीला सुद्धा बोलावून घेऊ खूप दिवस झाले तिला भेटून..... सल्लू बता दे उसे...."

सल्लू : "टेन्शन नक्को रे आम्मिजी....🤩🤩"

आजी : "जा नंदू...... अग लाजत का बसलीस अशी...... कॉल कर तुझ्या बॉय फ्रेंडला....🤭🤭"

नंदिनी लाजतच रूममध्ये पळून जाते...

सगळे : "....😂😂😂😂😂"

आजी : "..🥺 नंदू दूर जाणार विचार करवत नाही... आजवर तिने सगळ्यांना किती प्रेम दिलं..... कधीच परके आहोत असं वागली नाही....🥺"

सल्लू : "मत ना यार तु....🥺"

पिल्लू : "... निन्नी... सन्नु....🥺🥺"

सल्लू : "अरे सलमा.... तू भी शुरू..... एसां नहीं करते बच्चा.....😘😘"

पिल्लू : "निन्नी.....🤫"

आजी : "हो ग राणी....😘"

तिकडे नंदू, वैभवला कॉल करते......

वैभव : "हे....😍 बोल ना.... नंदू"

नंदिनी : "तुझी पोचपावती मंजूर झाली आहे.....😜 कधी घेऊन जातोय.....😂"

वैभव : "नंदू....😍😍😍😍 काय सांगतेस..... तू बोल आता येतो लगेच......🕺🕺"

नंदिनी : "ये उतावळ्या नवऱ्या थांब जरा.... उद्या आई - बाबांना घेऊनच ये....☺️"

वैभव : "कस डिंपल येतेय गालावरी......😍😘 दिवाना मनाला करतय.....🥰 माझ काळीज 💘 रूतलय तुझ्यामंधी.....🤩🤩🤩 तुझ्याच माग पळतय🏃🏃🏃....."

नंदिनी : "एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान.... एक हाैस माझी पुरवाल का ?....माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ?"

वैभव : "तू हो बोललीस.... बस आता तुला एकवीरा काय पूर्ण साडेतीन शक्तिपीठ घडवतो ग राणी..... 😘😘😘😘😘 सो हॅप्पी रे मी आज.... किती वर्षाचा वाट बघतोय ह्या दिवसाची.....😍😍😍😍"

नंदिनी : "ये उद्या मग.....😌😌😌"

वैभव : "हो ग.....😘"

नंदिनी : "बाय.....🤭"

वैभव : "हाय....🤩💘"


सगळे खुश असतात...... नंदिनी इतक्या दुःखातून बाहेर आली असते.... आणि आता तिच्या आयुष्यात नवीन सुखाचे क्षण प्रवेश करण्याची परवानगी मागत असतात.....🥰

भेटू पुढील भागात......🥰

@खुशी ढोके..🌹