Arya ... 2 in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | आर्या... 2

Featured Books
  • द्वारावती - 73

    73नदी के प्रवाह में बहता हुआ उत्सव किसी अज्ञात स्थल पर पहुँच...

  • जंगल - भाग 10

    बात खत्म नहीं हुई थी। कौन कहता है, ज़िन्दगी कितने नुकिले सिरे...

  • My Devil Hubby Rebirth Love - 53

    अब आगे रूही ने रूद्र को शर्ट उतारते हुए देखा उसने अपनी नजर र...

  • बैरी पिया.... - 56

    अब तक : सीमा " पता नही मैम... । कई बार बेचारे को मारा पीटा भ...

  • साथिया - 127

    नेहा और आनंद के जाने  के बादसांझ तुरंत अपने कमरे में चली गई...

Categories
Share

आर्या... 2

आर्या घरी आली ....येताना भाजी मार्केट मधे जाऊन भाजी घेऊन आली. आज घरी लवकर आल्यामुळे, तिने थोडा आराम करायचा ठरवला . ती बेड वर जाऊन पहुड्नार ऐत्क्यात आई आई करत तिची मुलगी तिथे आली .ती ला भूक लागली असेल .म्हणून, आर्या ती खायला देण्यासाठी उठली . पुन्हा तिला चक्कर आल्यासारखी जाहली .तरीही स्वतःला सावरात तिने तिला दूध बिस्कीट दिले . चुणचुणीत रेवानी थोडे खाली सांड वत थोडे तोंडात घालत ते दूध बिस्किट संपवले . चिमुकल्या रेवा कडे आर्या कवतुकें पाहत होती, आणि तिच्या पोटावरून हात फिरवत होती . आई ला तिच्या मुलाचे कवतुक असतच . त्या प्रमाणे अर्याला ही होत . पण तिच्या ह्या दोन्ही मुलाच्या भविष्याची तिला काळजी ही होतीच .....पुढे आपले कसे होणार ....आपण आपल्या मुलाना चांगले भविष्य देऊ शकू ना .... ते उद्या जाऊन ह्या देशाचे चांगले नागरिक होतील ना .....आर्याला राहून राहून सारखी ह्या सगळ्याची काळजी वाटायची. कारण आजूबाजूचा परिसर आणि घरातील वातावरण ..... आर्या मुंबई त जिथे राहत होती ....त्यच्या आजूबाजूचा परिसर हा सगळा झोपडपट्टी होता ...त्याचा परिणाम अमन वर जाहला होता ...एवढे शिक्षण घेऊन सूध्हा नोकरी न करता घरात लोळत पडत होता ....आणि कुठे नोकरी लागलीच ...तर महिनाभर काम करायचे ...मग पगार झल्यावर पुढे कितेक दिवस दारू पायची ...मग त्यातून काही पैसे वाचले तर अर्याला घर खर्चा साठी दाय्चे. आणि ती काही बोललीच तर, तिला मारहाण करायची . आर्यांच्या सासूला आर्या पहिल्यापासूनच आवडत नव्हती . कारण अमन आणि आर्या ने प्रेमविवाह केला होता ....आर्यांच्या लग्ना नंतर आर्यांच्या सासूला आणि अमन ला पोलीस स्टेशन च्या वाऱ्या सूध्हा कराव्या लागल्या होत्या .त्याचा राग ही तिच्या डोक्यात होता ..त्यामुळे ह्या न त्या करणाने ती आर्या शी सारखी भांडाय्चि... तिला सतत पाण्यात बघायची. रेवाला ही काही बाही बोलायची. स्वत धून भांडी करून पैसा कम्वय्ची .....आणि येणारा सगळा पैसा लेकीला देऊन टाकायची ..... आर्या स्वत काम करून पैसे कम्वय्ची .आणि घर चालवायची .....पण ....तिला उद्याची काळजी होतीच ..... हे सगळ तिला आवडत नसले ...तरी जगाचे हसू नको ...म्हणून ती तिथेच राहत होती ....
असेच काही दिवस निघून गेले .....आर्यांच्या खूप पोटात दुखायला लागले ....बाहेर धो धो पाऊस पडत होता ....अमन तर दारू पियून फुल्ल टाइट होता ....त्याला कसलीच शुध्द नव्हती ... आर्यांच्या बाजूला रेवा शांत झोप्ली होती ....अर्याला आता काही सहन होईना ....तिने मोबाईल घेतला ...आणि तिच्या मैत्रिणी ला फोन केला .....तिची मैत्रीण ही फार वेळ न लावता ...तिच्या तिथे आली ...तोपर्यंत आर्या राधा आजी ला घेऊन हॉस्पिटल मधे जायला निघाली .... आर्यची मैत्रीण भेटल्यावर ती तिला घेऊन हॉस्पिटल मधे आली ... अर्याला वेळेवर हॉस्पिटल मधे आणल्यामुळे तिची सुखरूप सुटका जाहली ...आणि ती पुन्हा एक सुंदर गोंडस अशी मुलगी जाहली ....मुली पाहून आर्या खूप खुश जाहली ...पण हॉस्पिटल मधे अमन आणि तिच्या सासूबाई ना न पाहून मात्र तिला खूप दुःख जाहले . परत मुलगी जाहली ...म्हणून ते तिला आणि तिच्या मुलीला पहायला सूध्हा आले नाही ....आणि तिने प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या माहेरचे कोणी येतील ...अशी आशा करणे ही, चुकीचे होते . आर्याला खूप रडू आले ...हातातील अंगठी विकून तिने हॉस्पिटल चे बिल भरले ... राधा आजी तिच्या सोबत हॉस्पिटल मधे राहिल्या ..... तोपर्यंत अंजली अर्यची मैत्रिणी ने रेवाचा सांभाळ केला ... तिसऱ्या दिवशी आर्या रेवाला आणि त्या छोट्या बाळाला घेऊन घरी आली ...तिच्या सोबत तिला घरी सोडायला तिची मैत्रीण अंजली आणि राधा आजी आली . घरात त्यावेळी अमन नव्हता ..पण त्याची आई होती . दारात आर्या ला आणि तिच्या हातातल्या बाळाला बघून ती खूप चिढ्लि ... तिने आर्या ला आणि तिच्या त्या बाळाला तिने ढकलून दिले . आणि तिला काठीने मारू लागली ..आजूबाजूची सगळी माणसे गोळा जाहली .पण एकाचीही पुढे येण्याची हिंमत होईना . अर्याला तर उभ ही रहता येईना .. पण तेवढ्यात अमन तिथे आला ....त्याने आई ला आर्याला मारण्यापासून थांबवले .
अमन चे हे वागण बघून सगळ्याना आश्चर्याचा धक्काच बसला . पण ....आर्याने अमन ची बाजू घेतली ...हे पाहून सगळ्याना खूप आनंद जाहला ..आर्याला तर आकाशात उडते का काय? अस वाटत होते . अमन च प्रेम हाच तिच्या जगण्याचा सहारा होता ...पण जसे लग्न जाहले होते, तेव्हा पासून तो खूप बदलला होता ..त्याचे खरे रूप तिला समजले होते .... तिला थोड बरं नाही वाटल तरी, ह्याच्या जीवाची घालमेल व्हायची ...पण, लग्न झल्यापसून तो तिला मारहाण करायचा ... पण, आर्याला आशा होती ...कधीतरी अमन त्याच्या आणि आर्यांच्या प्रेमाची कदर होईल. आणि मग सगळ व्यव्स्तीथ होईल. तिने अमन सोबत सुखी आयुष्याची जी स्वप्न बघीत्लीत ती पूर्ण होतील ....अस तिला वाटत होते ...आणि आज जस आज अमन वागला ...आणि त्यावरून आता सगळे बदलेल ...अस तिला वाटले होते ...आणि तसच घडले .....त्यानंतर ची कितेक दिवस अमन अर्याची अजिबात भांडला नाही ...का तिला मारहाण सूध्हा केली नाही ...उलट तिच्याशी खूप प्रेमाने बोलू लागला ....वागू लागला ...रेवा आणि त्या लहानग्या बाळाचे खूप लाड करू लागला ... त्यानी दोघांनी त्याच्या दुसऱ्या बाळाचे बारसे मोठ थाटामाटात केले ...तिचे नाव आर्वी ठेवले .....
आता आर्वी सहा महिन्याची जाहली होती ...गोंडस, निरागस, सुंदर अशी आर्वी रांगांत रांगांत घराचा ताबा घेत होती .. तिचे ते कोड कौतुक पाहून आर्या मनोमन खूप सुखावली होती . तीच छोटसं कुटुंब आता पूर्ण आणि सुखी जाहले होते .आता ऑफीस मधे ती खूप आनंदी दिसत होती . नेहमी हसताना च दिसत होती ....रेडियो स्टेशन वर पण तिचा चेनेल खूप प्रसिध्द जाहला होता . त्यामुळे तीच प्रमोशन जाहले होते . त्या दिवशी ती खूप खुश होती ...त्यामुळे हाफ डे घेऊन ती घरी आली ... आजचा दिवस छान पैकी साजरा करावा म्हणून ती लवकर घरी आली होती ...पण ... तिने घरी आल्यावर जे पाहिले ...हे सगळ बगून तिला खूप मोठा धक्का बसला .... .....ती जोरात ओरडली ...अमन हे सगळ तू काय करतोस? तू .........तू मझ्या बाळा सोबत एवढे बोलून तिने त्याला ढकलून दिले ..आणि आर्वी ला जवळ ओढून घेतले ...आर्या ने अमन ला ढकलून दिल्यामुळे ....अमन खाली पड्ल्ला ...पण तो लगेच तिथून उठला ...आणि आर्यांच्या हातातून अर्विला ओढू लागला ...पण आर्या जोरजोराने त्याला प्रतिकार करत ....ह्या सगळ्यात मात्र आर्वी जोरजोरात रडत होती ..पण तिच्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते ....ऐत्क्यात अर्याची सासू आली ...आणि आता ते दोघे मिळून अर्याला मारहाण करू लागले ..आणि आर्वी ला तिच्या हातातून घेऊ लागले .पण आर्याने अर्विला छातीशी घट्ट कवटाळलं होत ....तिने शरीरातील सगळ बळ लावल .आणि अमन च्या जोरात कानाखाली मारली ...त्या दिवशी आर्या च रूप काही वेगळच दिसत होत ....ते रूप पाहून काही क्षण अर्याची सासू आणि अमन दोघे ही घाबरले ....आर्याने पटकन किचन मधून चाकू घेतला ... तो त्या दोघाना ही दाखवत ती तिथून बाहेर पडली .