A cup without love tea and that - 07. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०७.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०७.












आजी : "माझी पिल्लू ग कुठे होतीस......🥺🥺 आजीची काळजी नाही तुला.....? जीव काढून टाकलास तू माझा..... कुठे होतीस....😟🥺 कुठे लागलं तरीही तू कस सांगणार ना ग छोटीशी जान माझी.....😭😭 आजीला इतकं नसतं रडवाययचं ना बाळा.....🥺🥺"

आजींना भान नसतो की, समोर एक पोलिस इन्स्पेक्टर आहे ज्याने आपल्या सुकुला परत आणून दिलं...... नशीब आपल्या सुकूला काहीही झालं नाही...... ती तशीच क्यूटी होती जशी ती हरवली होती...... आणि आता तर ती आजीकडे बघून आजी नको ना ग रडू अस तिच्या अबोल हावभावांतून सांगत होती...... आजीने अजूनच तिला कवटाळले......🤗🤗 काही वेळ ती आपल्या पिल्लू सोबत हरवून गेली.......🥰🤗🥰🤗🥰

सचिन : "आई...... ओ आई...... मी ही इथेच आहे म्हटलं....😉"

त्याने हलवून आजींना भानावर आणलं.......☺️☺️

आजी : "अरे बाळा किती उपकार तुझे आम्हावर..... आमची लेक परत मिळवून दिलीस......😘😘😘"

सचिन : "आपलं कुणी हरवलं की, कस वाटतं ना याची झड सोसलिय मी....😒😒"

आजी : "बाळा काय झालं.... कोणी हरवलं का तुझं....🥺🥺"

सचिन डोळ्यांच्या काठा पुसत......🥺

सचिन : "आई अहो असूद्या ना.....😒"

आजी : "हे बघ आज मला सांगणार आहेस तू..... तू एका अधिकाऱ्या पेक्षाही पुढे जाऊन आमची मदत केलीस... कोणीही इतकं नसतं करत बाळा..... सांग मला मन हलकं होईल तुझं.....🙂"

सचिन सांगायला सुरुवात करतो.....

सचिन : "आई, जेव्हा मी सुकन्याची माहिती घेतली होती तेव्हा मी संजयला त्याच्या बाबांचं नावही विचारलं होतं..... तेव्हा तर माझा तुम्हा सगळ्यांविषयी असणारा आदर अजूनच वाढला..... आई तुम्हाला आठवतं ना काही वर्षापूर्वीचा तो सचिन जो तुमच्या कुशीत आल्याशिवाय त्याला गमत नव्हते आणि कुशीत घेतल्याशिवाय तुम्हाला.... तोच मी सचिन ठेंग....🥺🥺"

आजी : "बाळा कधी इतका मोठा झाला रे...... आणि अनाथाश्रमातून बाहेर पडल्यावर कस काय स्वतःला सावरून आज एक अधिकारी.....🥺 त्यादिवशी नातीच्या काळजीत तुझं नावही ध्यानात आलं नाही माफ कर मला....😒😕"

हो तुम्ही बरोबर गेस केलं सुकन्याचे आजोबा एक अनाथालय चालवतात..... खूप प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं.... त्याच अनाथालयात मोठा झालेला आणि नियमानुसार अठरा वर्षांनी बाहेर पडलेला सचिन..... लहानपणी पोरकंपण सोसलं...... नंतर कुणीतरी त्याला आश्रमात आणून सोडलं....... पण, तिथली वेळेची मर्यादा संपली आणि नंतर त्याने स्वतःच्या मेहनतीने पुढे जाऊन हे यश गाठलं....... अतिशय गुणाचा असा सचिन, आज एक अधिकारी आणि त्याहीपेक्षा आज तो त्यांच्याच कुटुंबाचा एक भाग बनला.....💞

सचिन : "अनाथालयातून बाहेर पडून मी ओपन युनिव्हर्सिटी कला शाखेतून पदवी पूर्ण करता - करताच सारथी (राज्य शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाच्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्याच हेतूने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सारथीतर्फे एक वर्षाच्या मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते. उमेदवारांसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे चाचणी परीक्षा घेण्यात येते. उमेदवारांना त्यासाठी ई-प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाते. त्यातून निवड होणाऱ्या उमेदवारांना सारथीने निवडलेल्या प्रथितयश प्रशिक्षण संस्थेमार्फत एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते. या उमेदवारांच्या निवास, भोजन, प्रवासासाठी दरमहा नऊ हजार रुपयांचे विद्यावेतनही दिले जाते) सारख्या समजघटकांसाठी काम करणाऱ्या संस्थेतून, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मिळवलं..... त्यानंतर प्रयत्न आणि संघर्षाने, तुमचं आणि बाबांचं आदर्श समोर ठेऊन, हे यश मला लाभल्याच मी मानतो......☺️☺️ मनापासून आभार आई की, तुम्ही माझ्यावर इतके चांगले संस्कार केलेत....😘"

आजी : "बाळा आपल्या यशाचं श्रेय आपण दुसऱ्याला देणं हे योग्यच आहे...... पण, त्यांच्याचमुळे ते झालं, ते नसते तर आपण काहीच मिळवू शकलो नसतो हे चुकीचं..... तुझ्यात ती जिद्द ज्या परिस्थितीमुळे आली त्या परिस्थितीला तू नेहमी लक्षात ठेवावं..... अर्थात याची जाण तुला असेल यात काहीच वाद नाही बाळा...... खरंय तुझ्यावर रवीने (आजोबांनी) आधीपासून विश्वास ठेऊन, त्यांच्या जीवनाला सार्थकच केलं अस मी मानते...... समोरही तू एक कर्तबगार अधिकारी म्हणून समाजासाठी काम करशील.... असा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास असेल.....😎"

सचिन : "नक्कीच आई मी आपला विश्वास कायम असाच ठेवेल..... याची खात्री देतो....☺️"

आजी : "बाळा चल खाली जाऊया..... मी संजू सोबत कालपासून चुकीचं वागून, त्याला शिक्षा केली आहे..... मला माहिती आहे जर मी त्याला मारून राग काढला असता तर, त्याला इतकं वाईट वाटलं नसतं..... पण, आपल्या आईचा हा अबोला, त्याला कधीच सहन होत नाही..... कालपासून त्याची घुसमट बघतेय मी..... पण, बाळा मी काय करावं.... माझ्या ह्या पिल्लुत माझा जीव अडकलाय अरे.... ही आली तेव्हा पासून मी हिच्या हसण्यात स्वतःचं तारुण्य शोधतेय..... हिच्या असण्याने एक नवीन जगण्याची उमेद मी माझ्यात अनुभवत आहे.... मग कस मी त्याला माफ करणार अरे...... ही अशी चूक होती संजूची जी, आमचं काय घेऊन गेली असती याची कल्पनाही करवत नाही अरे......😒😒 असो.....😒 चल...."

सचिन : "आई एक बोलू....??🙄🙄"

आजी : "बोल ना बाळा.....🥺"

सचिन : "आई आपली सुकन्या किती नशीबवान आहे ना...... तिला तुमच्या सारखी काळजी करणारी माणसं मिळाली....... कुणाच्या नशिबात प्रेम असतं आणि कुणाचं प्रमे हे हरवलेलं असतं..... पण, आई मला तुमच्या रुपात मार्गदर्शक व्यक्तिमत्व मिळालं हे मी कधीच विसरणार नाही..... सुकन्याला शोधून मी काहीही उपकार केले अस मला तरी वाटत नाही आई.... आणि तुम्ही हे बोलून मला प्लीज परकं असण्याची जाणीव नका करून देऊ..... सुकन्या माझी ही कुणी तरी लागतेच ना आई..... आजपासुन हिला कुणी धक्काही लावू शकणार नाही.... याची मी पूर्ण जबाबदारी घेतो......😎😎"

आजी : "बापरे हिला तर सगळे बॉडीगार्ड जन्मतःच लाभले म्हणायचे.....😅🤗"

सचिन : "म्हणजे आई.... अजुन कुणी आहे का??🙄"

आजी : "अरे हीचा मामा..... तो जरी कुठला पोलीस इन्स्पेक्टर नसला ना तरीही, आपल्या भाचीजवळ कुणाला भिरकु देईल तर, सूर्य पश्चिमेकडून उगवला अस समजावं लागेल.....😅😅"

सचिन : "बापरे मग ही हरवली हे माहीत झालं असेल तर....!!?😯"

आजी : "नाही.... त्याला याची काहीच कल्पना नव्हती..... नाही तर घर डोक्यावर घेतलं असतं त्यानं.....😕"

सचिन : "बापरे सुकन्या तर फुल्ल प्रोटेक्शन वाली आहे....😁😄"

आजी : "सगळ्यात आधी ही आजी आहे तिच्या पाठीशी.... हो की नाही ग पिल्लुशी.....😘😘"

सचिन : "हे तर अगदी बरोबर बोलल्या आई....🤗🤗"

आजी : "चल सगळे वाट बघत असतील आपली.....🙂🙂"

सचिन : "हो आई चला......☺️"

दोघेही सुकन्याला घेऊन खाली हॉलमध्ये येतात..... संजय आईंकडे निराश होऊन बघत असतो..... जयाही विचार करते की, आता आई काय बोलणार..... म्हणून, सगळे तिकडे नजरा लावून असतात.....😕😕😟 आजी संजय जवळ जाऊन समोर उभी होते आणि बोलायला सुरुवात करते....

संजय : "आई...... सॉरी....... रिअली व्हेरी सॉरी..... मी खूप मोठी चूक केली...... त्या गोष्टीचा मला मरेपर्यंत पश्चाताप राहील..... पण, तू अस माझ्याशी न बोलता नको राहुस ग खूप दुःखतं मनात....🥺😩😫😭😭"

बोलता - बोलता त्याचे अश्रू अनावर होतात.... आणि तो गुडघ्यांवर बसून ढसाढसा रडतो..... आजी सुकन्याला जयाकडे देऊन, त्याला दोन्ही हातांनी पकडून उठायला सांगतात......

आजी : "संजू बाळा उठ..... इकडे बघ..... बाळा मी सुकन्या बाबतीत जास्तच पसेसीव्ह आहे तुला माहितीये ना...... म्हणूनच, कदाचित काल मी तसा रिअॅक्ट केला असेल..... पण, संजू तू चुकलास हे ही तितकंच खरं होतं..... यानंतर तू अशी चूक कधीच करणार नाहीस हे वचन आज तुझ्याकडून मला हवंय....🤜"

संजय : "आई माझाही जीव आहे ग ती...... फक्त त्यावेळी माझ्या ध्यानातून निघून गेलं आणि मी बोलत बाहेर आलो... पण, समजलं आणि लगेच आत आलो..... बघितलं तर, सुकन्या तिथं नव्हती..... माझी आत्मा शरीर सोडून गेली असच वाटत होतं.... त्या टेन्शनमध्ये तुझा तो अबोला....😒😒 अजूनच दुखावणारे ते क्षण मी अनुभवले...... तुझा अबोला नाही होतं ग सहन वाटल्यास तू मला मार पण, असं शांत राहून जीव नको काढत जाऊस.....😒😒😒😣 आणि वचन आहे पुन्हा अशी चूक करणं तर दूरच, मी विचारही करणार नाही.....🤛"

आजी : "आणि केलीच तर सुकन्याच्या मामाशी तुझी गाठ समझ.... झेपेल का...😉😆😅"

संजय : "बाबारे.... नको.....🤭🤭"

सगळे : "....😁😅🤣🤣"

आजी त्या मुला जवळ जाते....... तो अतिशय आत्मविश्वासू, खंबीर मनाचा असतो..... अतिशय विनम्र स्वभावाने तो आजींकडे बघतो..... हे बघून आजी एक स्मित चेहऱ्यावर आणून त्याला प्रश्न विचारतात......☺️


ही प्रश्न पुढील भागात घेऊन येते कारण, आता तो मुलगा कोण?? हे कळणार....😉

काळजी घ्या.... जुळवून घ्या.... येते परत.....😘

@खुशी ढोके..🌹