Julale premache naate - 79 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते-भाग-७९।।

Featured Books
Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७९।।

आता बाबा मागे आईजवळ बसले होते आणि मी पूढे निशांतसोबत.. रेडिओवर मस्त रोमँटिक गाणी लागली होती.. मी लगेच गाडीची काच खाली घेतली.. सूर्य ही परतीच्या प्रवासाला लागला होता.. चहुबाजूने पसरलेली त्याची गुलाबी, हलकी निळी, मधेच लाल-पिवळी किरणं पसरली होती.., तर मधेच कुठेतरी गोबरे गाल असलेले ढग मधे-मधे गुसु पाहत होते... मधेच एकत्र येत होते तर मधेच धावत होते जस काही त्या पसरलेल्या लाल-गुलाबी अग्नीमधुन स्वतःला वाचवत असावेत...

आम्ही ही आता अलिबागच्या जवळ पोहोचत होतो.. जसजशी गाडी पुढे जात होती.. समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची हलकीशी हुळूक खिडकीतून अंगाला स्पर्शून जात होती.. तो खारटपणा उगाचच त्रास देत होता. पण थंड वारा काही खिडकी बंद करू देत नव्हता.

सूर्य कधीच मावळतीला झुकला होता.. आणि आभाळात काळ्या ढगांनी आपलं साम्राज्य पसरवल होत. हवेत गारवा जाणवायला लागला होता. आणि आम्ही काही वेळातचं एका मोठ्या हॉटेल जवळ पोहोचलो.. ते हॉटेल वेगवेगळ्या लाईट लावुन चांगलंच उजळल होत.. पार्किंगमध्ये महागड्या गाड्या उभ्या होत्या.. आम्ही ही आमची गाडी तिथे पार्क केली आणि आतमध्ये गेलो..

समोरचा नजरा डोळे दिपवणारा होता.. काचेचा महाल असावा अस ते हॉटेल होत.. समोर असलेल्या रिसेप्शनवर निशांतने चौकशी केली तस कळलं की आम्हाला दोन रूम दिल्या होत्या. एक निशांत आणि फॅमिलीसाठी आणि दुसरी मला आणि माझ्या फॅमिलीसाठी. किल्ल्या घेऊन आम्ही आमच्या रूममध्ये गेलो..

ते रूम देखील पॉश होते.. एकाच रूममध्ये दोन रूम असे होते. त्यातले बेड, पडदे, इतर वस्तू महागड्या होत्या.. त्यातल्या एका रूममध्ये जाताच मला समोर मोठी ओपन गॅलरी दिसली.. मी ती खोलून बाहेर गेले. रात्र झाल्याने समोरचं नीट अस काही दिसत नव्हतं.. पण समुद्राच्या लाटांचा आवाज मात्र येत होता.

आनंदी होऊन मी आत आईला सांगायला आले तर समोर राज आई-बाबांशी बोलत होता.. सूट बूट मध्ये एखाद्या राजबिंडा प्रमाणे दिसणारा राज!!... उगाचच मनात येऊन गेल..., की आपण कधी राजला नीट असं पहिलच नाही...!!
म्हणजे त्याचं पिळदार शरीरावर तो कोट चांगलाच शोभुन दिसत होता.. त्यातच वंशाने मिळालेला गोरेपणा.. बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा खानदानीपणा दिसून यायचाच.. नाही म्हटलं तरी तो मोठ्या घरातला श्रीमंत. या सगळ्या गोष्टी असणं महत्त्वाचं होतं...
मी या सर्व विचारात असताना राजच्या टिचकीने मी भानावर आले..

"काय मॅडम.., विश नाही का करणार आहात.?? की अशाच बघत राहणार आहात..??" राजच्या बोलण्यावर मी भानावर आले आणि त्याच्या समोर हात धरून त्याला खूप साऱ्या ब्लेसिंग दिल्या..

"राज विश यु मेनी मेनी हॅप्पी बर्थडे डिअर. तुझ्या साऱ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊदेत हीच देवाकडे प्रार्थना..."

"हो हो.., माझ्या साऱ्या ईच्छा पूर्ण होउदे. पण सुरुवात मात्र तुझ्यापासून होऊ देत..."

"म्हणजे....???!" माझ्या आणि आई-बाबांच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नांवर त्याने हसुन आमच्याकडे पाहिलं. तेवढ्यात निशांत ही आमच्या रूममध्ये आला.. तो येताच त्याने राजला ब्रो हग केली आणि वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या..

"बर झालं निशांत तू देखील आलास.. आता सर्वांनी लवकर फ्रेश व्हा आणि तय्यार होऊन खाली या. काही वेळातच पार्टी आणि सेलिब्रेशन सुरू होईल. आणि मला माझ्या जवळचे सगळे तिथे हवे आहेत..." शेवटचं वाक्य मात्र त्याने माझ्याकडे बघून पूर्ण केलं. जे निशांतच्या नजरेतुन सुटलं नाही...

मग हो.., हा करून आम्ही सगळेच फ्रेश व्हायला गेलो. आणि तय्यारीला लागलो. मी माझा पार्टी ड्रेस घातला. हकला मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक.. कानात छोटे डायमंड चे कानातले घातले. आणि आईला केसांची एखादी हेअरस्टाईल करायला सांगितली..

आईने केसांचा फ्रेंचबन करून दिला. सोबत एक-दोन डायमंड चे क्लिप लावून तो सेट केला. जेणे करून तो सुटणार नाही. एका हातात ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात घड्याळ. शेवटी ब्रॅण्डेड परफ्यूम लावुन आणि पायात हाय हिल्स घालून मी तय्यार झाले.

त्या मोठ्या आरशात पुन्हां पुन्हा स्वतःला बघत मी लाजत होते.. त्यानंतर मोबाईल मधून एक दोन फोटो क्लीक केले आणि आई-बाबांसमोर आली. त्या रेड वेलवेटच्या गाऊन मध्ये मी एखाद्या प्रिन्सेस सारखी बाबांना वाटत होती. आईने लगेच माझ्या चेहऱ्याभोवती हात फिरवुन माझी नजर काढली.. आणि एक काळा टीका तिच्या काजळाचा माझ्या कानामागे लावला..

मग आम्ही तिघेही खाली जायला निघालो.. मी निशांतच्या रूममध्ये गेले तर तो तिकडे नव्हता. कदाचित खाली गेला असावा. म्हणुन आम्ही तिघेही खाली आलो..

एका मोठ्या हॉलमध्ये पार्टी चालु होती.. पूर्ण हॉल श्रीमंत लोकांनी भरलेला होता. वेटर वेगवेगळ्या ब्रॅंडने भरलेली ग्लासं आणि स्टार्टर घेऊन फिरत होते. हा तस साधही होत. पण श्रीमंत म्हटलं की हे आलंच नाही.!!


मागुन कोणाचे तरी थंड हात माझ्या डोळ्यावर आले... आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला... तो निशांत होता.
मी मागे बघताच तो आता तो शॉक मध्ये होता.. माझ्या रूपावर घायाळ झालेला एक राजकुमार...

तेवढ्यात कोणी तरी आई-बाबांना बोलावलं म्हणून ते तिकडे गेले. तसा आम्हाला एकांत वेळ मिळाला..

"वाह मॅडम...!! कमाल दिसत आहात.. म्हणजे एखाद्या प्रिन्सेस सारख्या... काय ग हनी-बी तु नेहमी मला तुझ्या प्रेमात पाडत असतेस हा...!!"

"अरे...!! आता मी काय बर केलं..?? तु सारखा प्रेमात पडतोस त्यात माझी काय बरं चुक..???"

त्यानंतर थोडी अजुन स्तुती झाली... थोड्या खोड्या.. मग त्यानेच माझ्या आणि त्याच्यासाठी कोल्ड ड्रिंग्स मागवल्या. हे सर्वच होत असताना अचानक राज आला आणि मला घेऊन गेला..

यामुळे निशांतचा मात्र चांगलाच हिंडमुस झालेला मी मागे वळुन पाहिला आणि लांबुनच माझे कान धरून माफी मागितली.. त्यावर त्याने एक हलकी स्माईल दिली आणि तो त्या गर्दीमध्ये दिसेनासा झाला..

राज मला त्याच्या डॅड ला भेटायला घेऊन गेला होता. ते काही लोकांशी बोलण्यात बिझी होते तरीही त्यांनी माझी ख्याली खुशाली विचारली.. आई-बाबा आणि निशांत बद्दल आवर्जून विचारलं. त्याचं मला खरच छान वाटलं.. कारण एवढा मोठा बीसीनेसमॅन आपल्याला आणि आपल्या घरच्यांना लक्षात ठेवलं हेच खूप आहे. मग थोडं बोलून मी परत आई-बाबा आणि निशांत बसलेल्या टेबलावर येऊन बसले..


To be continued....