Julale premache naate - 7 in Marathi Fiction Stories by Hemangi Sawant books and stories PDF | जुळले प्रेमाचे नाते - भाग-७

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

जुळले प्रेमाचे नाते - भाग-७

"हॅलो..., बॉस आपने बोला वैसे काम हुआ।" अब हम लोग का पैसा कब मिलेगा।...... दुसऱ्या बाजुला काही वेळाने आवाज आला..... "मैं ने उसे डराने बोला था, फिर उसको मारा क्यु...??"
अब पैसा भी आधा मिलेगा समझे।...आणि कॉल कट झाला.


माझ्या वेतिरिक्त तिला कोणी स्पर्श ही केला नाही पाहिजे. आणि याने तर तिला मारलं आता बघ मी काय करतो ते... त्या व्येक्तीने कुस्तीत हसत परत एक कॉल केला....
"हॅलो..., इन्स्पेक्टर सर... तुम्ही त्या एका गुंड ग्रुपला शोधत आहेत ना... मी पेपर मध्ये पाहिलं होतं..... आज मी त्यांना येताना एका चाळीच्या कट्ट्यावर पाहिलं मला वाटत तुम्ही तिकडे शोधलं पाहिजे ते नक्कीच मिळतील... सर आभार कसले... हे माझं कर्तव्य आहे... चला ठेवतो. जुजबी बोलून कॉल कट झाला.. "तिला स्पर्श केल्याची शिक्षा घ्या भोगा आता....." स्वतःशी हसतच त्याने व्हिस्कीचा ग्लास तोंडाशी लावत सगळी एकाच दमात संपवली...

"अग., प्राजु बाळा ऐकतेस का.... जरा बाहेर ये.." आईचा आवाज ऐकून मी बाहेर आले.... "काय ग काय झालं...?? अशी काय ओरडत आहेस..." अग बाळा बाबांचा फोन आला होता. उद्या शनिवार म्हणुन ते बोलले की आपण उद्याच गोपाळ बाबांना भेटायला जाऊया अस सांगत होते. ते बोलले की, प्राजु आणि निशांतला कॉलेज वरून डायरेक्ट येउदे.. आपण सकाळी जाऊ. तर पहिल्यांदाच जायचं आहे म्हणून काही शॉपिंग करूया. त्यांनी तय्यार रहायला सांगितलं आहे. ते लवकर निघणार आहेत... आपण त्यांना मॉलमध्येच भेटुया आणि जाऊया. आईने न थांबता सगळं एकाच दमात सांगून टाकल.

बाहेर जायचं म्हणुन मी देखील स्वतःचा अभ्यास करायला खोलीत गेले..... काही वेळाने तय्यार होऊन मी आणि आई मॉलमध्ये जायला निघालो. बाबांना भेटुन आम्ही मॉलमध्ये आजीसाठी छान अशी साडी तर आजोबांसाठी कुर्ता घेतला... तर निशांतसाठी ओशन ब्लु कलरचा आणि ब्लॅक कलरचा शर्ट घेतला. खर तर त्याला सगळंच सुट होतं..., पण मला त्याच्यासाठी ओशन ब्लु कलरचा शर्ट जास्तच आवडला होता.

मग आम्ही देखील थोडी शॉपिंग केली. माझ्यासाठी मी काही कुर्ते, टॉप आणि जीन्स घेतल्या.. सगळं समान घेऊन आम्ही फुड कॉर्नरला जाऊन खाल्लं आणि निघालो. खाली येऊन बाबा गाडी घेऊन आले. आम्ही सगळं सामान गाडीत ठेवुन घरी जायला निघालो. बाहेर मस्त थंड हवा वाहत होती. मला नेहमीच गाडीची काच खाली करून हवा एन्जॉय करायला आवडते म्हणुन मी लगेच काच खाली केली.

बाहेर बघता बघता अचानक मला निशांतची आठवण आली.. का ते नाही म्हाहित पण आजकाल निशांत जरा जास्तच जवळचा वाटु लागला होता. आमच्यातली मैत्री आता घट्ट होत चालली होती... पण मला तो आवडू तर नाही ना लागला अस मलाच माझं वाटुन गेलं. पण सगळे विचार बाजुला करत मी बाहेर बघत राहिले..


काही वेळाने आम्ही बिल्डिंग खाली पोहोचलो. सामान घेऊन लिफ्टने घरात दाखल होताच मी स्वतःला सोफ्यावर झोकुन दिल. आज काही जेवण नसल्याने आम्ही आज लवकरच झोपायचं ठरवलं... "बाळा तु निशांतला कॉल करून सांग की, आपण येतो आहोत ते... पण बाबांना सांगू नकोस अस सांग. आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहोत." बाबा खुश होत बोलले. मला देखील ही आयडिया आवडली. मी लगेच निशांतला कॉल केला.


"हॅलो..., निशांत प्राजु बोलतेय..".... "हो बोल ना.?? काय ग एवढ्या रात्री आठवण आली... ठीक आहेस ना तु..?"
"मी ठीक आहे... अरे बाबांनी एक निरोप द्यायला सांगितला आहे..." "हा बोल ना.".... अरे उद्या आई- बाबा तिकडे यायच बोलत होते आजोबांना भेटायला. आपल्याला कॉलेजमधून डायरेक्ट या अस बोलत आहेत. हा..,पण हे आजोबांना नको सांगु नकोस... बाबांना आजोबांना सरप्राईज द्यायचं आहे..."
"ओह...! चालेल या तुम्ही मस्त आयडिया आहे बाबांची."
मग इकडच्या तिकडच्या गप्पा करून मी कॉल ठेवला आणि झोपी गेले...

सकाळी लवकर तय्यार होऊन कॉलेजसाठी निघाले. ऑडीमध्ये आज निशांत नव्हता. मला वाटलं लेट येणार असेल म्हणुन मी ऑडीमध्ये वाट बघत बसले. बराच वेळ झाला पण आला नाही म्हणून कॉल केला तर कळलं की हा कॅन्टीनमध्ये होता... मी जरा रागातच कॅन्टीनमध्ये गेले.. तर हा हर्षु सोबत मस्त गप्पा मारत बसला होता. मी जाताच मला ही त्यांनी बसायला सांगितले.. "अग ये प्राजु..., मी आणि निशांत आल्यापासून इकडेच बसलो आहोत. गप्पा मारत...," हर्षुने मला डोळा मारत सांगितले.. आधी मला रागच आला पण नंतर म्हटलं जाऊदे याला नंतर बघते स्वतःशीच ठरवून मी हर्षुच्या बाजुला जाऊन बसली.. तिथून मी अनही हर्षु लेक्चर्सला गेलो. जाताना ही मी त्याला बाय न करताच निघुन गेले.


लेक्चर्स संपवुन मी निशांतला कॉल केला... "हॅलो., निशांत कुठे आहेस...? मी निघतीये तुला किती वेळ आहे अजून..??.... वेळ लागणार आहे का...??, तर मी लायब्ररीत जाऊन बसते तुझं झालं की कॉल कर... मी एकटीच सगळं बडबडत होती.... "अग.. हो मी काही बोलु की तूच बोलणार आहेस सगळं..." त्याने मध्येच थांबवत विचारले.... "मी देखील निघालो आहे.. बाईक घेऊन येतो मला गेटवर भेट." एवढं बोलून त्याने कॉल कट केला..

मी देखील लेगच कॉलेजच्या गेट जवळ पोहोचले.. हा आधीच येऊन उभा होता. मी जाऊन गप्प बाईकवर बसले.. तो देखील काही न झाल्यासारखा बाईक चालवत होता.. मी निघण्याआधी आईला कॉल करून आम्ही निघाल्याच सांगितल होतं.. तर ते देखील निघाले होते. त्यांना मी आधीच पत्ता देऊन ठेवला होता.


आम्ही बाईकने आणि आई-बाबा गाडीने एकाच वेळेस अशी आमची गाठ पडली. गेट बाहेर आम्ही एकत्रच उतरलो. खर तर ते बरच झालं. आता आम्हाला आजी-आजोबांना छान सरप्राईज द्यायला मिळणार होत. आम्ही बाईकवरून उतरलो आणि आई-बाबांसोबत गेटमधून आत आलो. आम्ही आई-बाबांना गार्डन मध्ये बसुन राहायला सांगितलं आणि आम्ही दोघे बंगल्याच्या दिशेने गेलो. निशांतने डोअर बेल वाजवली.... बेल वाजवतात आजींनी दरवाजा उघडला.. उडताच आम्ही आत गेलो.


"आजी कशा आहात.." मी आत जाताच त्यांच्या पाय पडून त्यांना मिठी मारली.... "बाळा मी छान आहे..., तु कशी आहेस..." "आजी, मी पण एकदम मस्त." आजोबा कुठे आहेत....? " अग ते वर पुस्तक वाचत बसले आहेत. थांब बोलावते तु बस..." आजी आजोबांना बोलवायला गेल्या. मी आणि निशांत खाली थांबलो होतो. पण एकमेकांशी मात्र काही बोलत नव्हतो. थोड्या वेळाने आजोबा-आजी खाली आले..


"आजोबा कसे आहात..??" मी त्याच्याकडे धावत जात त्यांच्या पाया पडत त्यांना विचारल. "बाळा., मी एकदम मस्त .. बर केलंस आलीस ती नाही तरी आज मी निशांतला सांगणार होतो तुला घेऊन यायला..."


आजोबा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे चला गार्डनमध्ये.. पण आधी तुमचे डोळे बांधू द्या मला.. मी पुढे होत त्यांचे डोळे एका कपड्याने बांधले. तर आजींचे डोळे निशांतने स्वतःच्या हाताने बंद केले. आम्ही दोघांना घेऊन हळुहळू गार्डनमध्ये आलो. त्यांना गार्डनमध्ये असलेल्या चेअरवर बसवुन आम्ही त्यांचे डोळे बंद ठेवायला सांगितले... "आजोबा-आजी उघडु नका हा डोळे..."


"नाही उघडत.., एवढं काय आहे...?" त्यांच्या समोरच्या चेअरवर आई-बाबांना बसवलं. "आजी-आजोबा आता उघड बघू तुम्ही तुमचे डोळे..."
दोघांनी डोळे उघडले आणि समोर आई-बाबांना बघुन एकक्षण ते बघतच राहिले... थोड्या वेळाने आजोबांच्या तोंडातुन फक्त... "प्रसाद" एवढाच शब्द बाहेर आला आणि बाबांनी जाऊन आजोबांना मिठी मारली.. दोघे ही काही वेळ मिठीत रडत होते. खुप वर्षांनी सगळे एकमेकांना भेटुन अश्रुद्वारे आपला आनंद व्यक्त करत होते..

आईने आजीला मिठी मारली. त्यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सगळं चालू असता माझ्याही डोळ्यात पाणी आलं. नकळत माझं लक्ष निशांतकडे गेलं असता तो देखील स्वतःचे अश्रू पुसत होता.. काय करणार वातावरणच अस होत की कोणाचाही डोळ्यात पाणी आलच असत. त्यानंतर आम्ही सगळे आत गेलो. आत जाऊन चहा- पाण्याचा आणि पोह्यांचा बेत झाला. मी आत आजी आणि
आईला मदत करत होते.., तर निशांत बाहेर आजोबा आणि बाबांसोबत गप्पा मारत होता.


आजोबांच्या तर गप्पा काही संपत नव्हत्या... मी हातात पोह्यांचा ट्रे तर आई चहाचा घेऊन आम्ही बाहेर आलो. "आई तुम्ही केलेत पोहे...?" "हो बाळा, तुला आवडतात ना माझ्या हाताचे तसेच केलेत.. शेंगदाणे आणि वरून कोथिंबीर घातलेली. " वाह..! सुनबाई एकदम मस्त झालेत हा कांदेपोहे..." तुझ्याच हाताची चव घेतली आहे प्रांजलने.."


"मग आजोबा कस वाटलं आमचं सरप्राईज"... मी हसतच आजोबांकडे पाहिलं.. "काय बोलु बाळा..., शब्दच नाहीत माझ्याकडे काही बोलायला... एवढं छान सरप्राईज मला दिलत तुम्ही... आमच्या नातवाने ही सांगितलं नाही आम्हाला तुम्ही येणार ते..." "मग काय आजोबा सांगितलं असत तर सरप्राईज कस राहील असत ना..."
यावर सगळेच हसले..


"मग प्रसाद बाळा कस चालू आहे सगळं..?" "बाबा एकदम छान चालू आहे देवाच्या कृपेने.. बस आज बाबा असते तर खुप बर वाटल असत..." हे बोलताना मात्र बाबांचा आवाज जड झाला होता.. "हो बरोबर बोललास आज माधु असता तर त्याला तुझा खुप अभिमान वाटला असता.." मग आजोबा आम्हाला त्यांच्या आणि आजोबांच्या आठवणी सांगू लागले..

आता आई आणि आजी जेवणाची तय्यारी करत होत्या. शनिवार असल्याने साधाच जेवण बनवायच ठरलं.. मधेच बाबांना आठवलं की, गिफ्ट तर गाडीतच राहिले म्हणुन आम्हाला म्हणजे मला आणि निशांतला गाडीतुन आणायला सांगितले... "परी जरा गाडीतून सामान घेऊन ये जा... निशांत तु देखील जरा तिला मदत कर..."

चावी घेऊन आम्ही बाहेर गेलो.. एवढ्या वेळात माझं आणि निशांतच काहीच बोलत झालं नव्हतं.. तोच बोलु लागला..."छान झालं ना आपण आजी- आजोबांना सरप्राईज दिल ते." मी फक्त हं.. एवढंच केलं. गाडीतुन सामान काढुन आम्ही येता नाही निशांतच बोलत होता मी मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी तशी त्याच्याशी बोलत होते..

"मॅडम.., काय झालय..? बोलायच नाहीये का तुला..??"
मी फक्त एक नजर त्याच्यावर टाकली आणि काही न बोलता आत आले... "आता हिला काय झालं..?"
आत सगळे गप्पा मारत होते.. आजोबा तर सर्वाना जुने अल्बम मधले फोटो दाखवत होते.. मग मी देखील त्यांना जॉईन झाले.

"वाह..! आजोबा तुम्ही किती हँडसम दिसत होतात..."
"मग उगाच आजी माझ्या प्रेमात पडली की काय...?"
या वाक्याला आम्ही सगळेच ओरडलो आणि आजी चक्क लाजल्या... "अहो तुमचं काही ही असत हा..."
गप्पा गोष्टी करत आम्ही जेवणाच्या तय्यारीला लागलो... यासर्वात निशांत सारखा बोलण्याचा प्रयत्न करत होता.. पण मी मात्र त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत होते....

आज जेवणाचा साधाच मेनु होता... डाळ,भात, बटाटा भाजी आणि श्रीखंड-पुरी.. जेवुन आजी-आजोबा आणि आई-बाबा बाहेर गार्डन मध्ये जाऊन बोलत होते....


"प्रसाद तुझी मुलगी खरचं खुप गुणी आहे हा.." पहिल्या दिवसापासून म्हणजे मला म्हाहित नव्हतं की ती माधुची नात आहे. अगदी तेव्हापासून तिने आम्हाला आपलंच केलं. आज माधु हवा होता.. तुला म्हाहित आहे का,..? आम्ही ठरवल होत की, आम्हाला जर नात नातु झाले तर एकमेकांना देणार... "बाबा मला तर आवडेल जर प्रांजल या घरात आली तर... पण हा काळ वेगळा आहे. आपल्याला वाटलं आणि आपण ठरवल अस चालत नाही.. आणि मी माझ्या मुलीच्या मना विरुद्ध तीच लग्न काही करून देणार नाही... हा पण जर तिलाही निशांत आवडत असेल आणि निशांतला ती तर आम्हाला काहीच प्रोब्लेम नसेल.. या वाक्यावर मात्र आजोबांना बर वाटल...मग इकडच्या तिकडच्या गप्पा ते मारत होते..


इकडे मी किचनमधून जात असता मधेच निशांतने मला अडवलं...
"हनी-बी....!! काय झालंय...? माझ्याशी बोलत का नाही आहेस... "असच... माझी मर्जी.. मी जातच होते की त्याने माझा हात धरला आणि मला घेऊन त्याच्या रूममध्ये गेला... "अरे सोड... कोणी बघितल तर..." पण त्याने माझा हात काही सोडला नाही.... "आता बोलणार आहेस का...?"


"का...! आता आली का माझी आठवण." तुला एकदाही वाटलं नाही मला सांगावस की तू आज प्रॅक्टिससाठी येणार नाही आहेस. ओह!! सॉरी कस सांगणार मला....तुला टाईम जो स्पेन्ड करायचा होता ना हर्षु सोबत माझी लुडबुड जी झाली असती... मधेच स्वतःच्या नाकाला हात लावत त्याने माझ्याकडे पाहिलं..." जळल्याचा वास येतोय ना कुठे तरी..." यावर मी फक्त माझ्या भुवया उंचावल्या... "मी का जळू तुमच्यावर... मला फक्त तु सांगायला पाहिजे होतस की, आज प्रॅक्टिस नाहीये.. मी मूर्खां सारखी वाट बघत बसले नसते त्या ऑडीमध्ये... बर झालं तो राज आला नाही तर....


राजच नाव घेताच त्याने डोळे मोठे केले... "काय... राज.. तो होता तुझ्यासोबत... काय करत होता तो तिकडे.. पण हर्षु तर बोलली की, तो आलाच नाहीये.. म्हणजे ती खोट बोलली माझ्याशी...' हे सगळं तो एकाच दमात बोलून गेला... मी मात्र स्वतःच पोट धरत हसत सुटले... त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते... " यात हसण्यासारख काय आहे.."
मग काय करू जेलस तर तू होतो आहेस. आणि हो ऑडीमध्ये राज काही आला नव्हता. मुळात तो कॉलेजला आलाच नव्हता. "मग तु अस का बोललीस...?" मी बघत होते आपल्यामध्ये कोण जेलस होत ते... मी डोळा मारतच त्याला बोलले.

स्वतःच्या डोक्यावर हात मारतच त्याने माझ्यासमोर हात जोडले.. आणि मी देखील एखाद्या देवीसारखी ऍक्टिन करून त्याला आशीर्वाद देऊन टाकला. यावर मात्र आम्ही दोघे ही हसलो.. मग गॅलरीमध्ये जाऊन बसलो. "पण तु आला का नाहीस आज ऑडीमध्ये..." मी समोर बघत विचारल.
कारण आज तुला आमच्या घरी यायच होत.. आपण प्रॅक्टिस करणार त्यात तुझा ड्रेस खराब होईल म्हणून मुद्दामच मी आलो नाही... हे ऐकताच मी त्याच्याकडे पहिल. आता तो समोर बघत होता. "एवढी काळजी...!" मी मनातच स्वतःशी म्हटले.


"हो मग काय मॅडम तुमची काळजी घ्यावी लागते." त्याने माझ्याकडे बघत हे वाक्य म्हणताच मी समोर पाहिलं... "आता याला मनातल ही कळत की काय...?" त्याच्याकडे पाहून एक स्माईल दिली....


"आणि हो त्यात तुझी मैत्रीण भेटली ती हर्षल आणि मला जबरदस्तीने कॅन्टीनमध्ये घेऊन गेली. मी तुला कॉल करण्यासाठी मोबाईल काढला तर तिने तो काढुन घेतला आणि गप्पा मारत बसली. काय करणार मी बिचारा.."..... बिचारा या शब्दावर त्याचा जरा जास्तच जोर होता.... मी त्याच्याकडे बघताच त्याने लगेच स्वतःचा चेहरा एखाद्या बिचाऱ्या सारखा केला.... "गप्प नौटंकी कुठचा.."
आणि आम्ही दोघेही हसु लागलो.

अकडु, खडूस निशांत..., आता जास्तच मस्तीखोर आणि हसवणारा वाटत होता. पण बोलतात ना. वाईट प्रसंग घडले की माणुस बदलतो. तसच काहीच त्याच झालं होत. पण आता तो हळूहळू बदलत ही होता... काही वेळाने आम्ही देखील खाली जात सर्वांना जाइन्ट झालो... संध्याकाळचा चहा झाला. आणि आमचा निघायचा विचार बाबांनी काढताच आजोबांनी राहायचा प्रस्ताव मांडला...

"प्रसाद बाळा उद्या सुट्टी असेल तर आज रहा एक दिवस आमच्याकडे..." बर वाटेल मला आणि आजीला ही. आधी नाही नको करून आमचं राहण्याच ठरलं. मग काय परत गप्पा-गोष्टी चालू झाल्या.. रात्रीचा ही बेत साधाच होता. मी, आई आणि आजी किचनमध्ये निघून गेलो. बाहेर हे तिघे बोलत बसले होते.

"बाबा निशांतच्या आई-वडिलांचा देहांत झाला कळलं. वाईट वाटत, पण नियतीच्या हातात असत सगळं जे लिहिलंय तेच होणार. मी आणि निशांतचे वडील विराज खुप चांगले मित्र होतो. हे ऐकताना आजोबांना आणि निशांतला भरून आलं. "हो बाळा..., एका कार ऍकसिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. पाच वर्षांचा राज मागे ठेवून ते देवाघरी गेले. हे सांगताना ही त्यांना हुंदका आवरत नव्हता. आई-वडिलांचा विषय निघताच निशांत स्वतःच्या रूममध्ये निघून गेला..

काही वेळाने मी बाहेर आले तर मला निशांत दिसला नाही म्हणून मीच बाबांना विचारल... "बाबा.., हा निशांत कुठे गायब झाला, इथेच बसला होता ना..." "अग ते परी बाळा...! आणि त्यांनी घडलेलं मला सांगितलं.... "तु जरा बघतेस का तो ठीक आहे का.. स्वतःच्या रूममध्ये गेला वाटत.." त्यांनी वर हात दाखवत मला सांगितलं.

मी लगेच वर गेले तर खोलीत अंधार होता. "हॅलो.., निशांत... कुठे आहेस तू...? आणि खोलीत अंधार का आहे.." मी आत जात लाईट लावली तर हा बेडच्या एका कोपऱ्यात स्वतःच्या गुढग्याच्या आत स्वतःच डोकं खुपसून बसला होता. मी जवळ जात त्याला आवाज दिला....


"निशांत.., काय झालं...? असा का बसला आहेस." मी जवळ जाऊन खाली बसले आणि त्याला हात लावत उठवलं. तो चक्क त्या अवस्थेत झोपला होता.. पण त्याचे डोळे व नाक मात्र रडून लाल झाले होते. डोळ्यांतल्या पाण्याने त्याचा पूर्ण चेहरा भरला होता. हे बघून मलाच वाईट वाटलं. मी लगेच त्याला मिठीत घेतल.

"निशांत...." तो काहीच बोलु शकला नाही... परत रडु लागला. "शांत हो... सॉरी माझ्या बाबांना तुला दुखावण्याचा हेतू नव्हता.. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते." मी त्याच्या डोक्यावरून स्वतःचा हात फिरवत त्याला समजावू लागले.


आणि माझे बाबा हे आता तुझेही बाबाच आहेत ना... मी त्याचा चेहरा स्वतःच्या समोर करत त्याला सांगितलं. स्वतःच्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरील सुकलेले अश्रु पुसले. एखाद्या लहान मुलांसारखा तो गप्प बसून होता.


"वाटतोस तेवढाही खडूस नाही आहेस..." माझ्या या वाक्यावर त्याने स्वतःचे डोळे मोठे करत माझ्या डोक्यात टपली मारली. "थँक्स..." मी त्याच्याकडे पाहिलं... असच ग...त्याने हसुन पाहिलं.


"चला आता खाली जेवायला." येवढ बोलत मी खाली जायला निघाले... " आणि हो चेहरा धुवून ये नाही तर वाटायचं की, मीच मारल तुला..." यावर मात्र त्याला ही हसु आवरलं नाही... "पागल आहेस. जा आता खाली मी येतो फ्रेश होत." मी खाली आले.


मी जाईपर्यंत तो मलाच बघत तिथे उभा राहिला... "पागल आहे पण खुप गोड आहे..." स्वतःशीच बोलत फ्रेश होण्यासाठी गेला.


खाली डायनिंग टेबलावर गरमागरम जेवण वाढण्यात येत होतं. आम्ही सगळेच ते खात मस्त एन्जॉय ही करत होतो. नंतर आवरून आम्ही परत हॉलमध्ये बसलो... तोच डोअर बेल वाजली... एवढया रात्री कोण आल असेल म्हणुन बाबा उठुन जात असता निशांतने त्यांना थांबवलं.. "बाबा थांबा मी जातो..., मी आईसक्रीम मागवली आहे सर्वांसाठी तोच आला असेल."


आईस्क्रीमच नाव येताच सर्वांच्याच चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. निशांत घेऊन आला आणि त्यानेच सर्वांना दिली... "आजोबा ही तुमच्यासाठी मँगोवाली... आजी तुझी स्टोबेरी. आई तुमची टेंडर कोकोनट. आणि बाबा तुमच्या आवडीची सीताफळ... माझ्याकडे बघत त्याने माझ्या आवडीचा फ्लेवर माझ्या हातात दिला... घ्या मॅडम तुमच्या आवडीचा रोस्तेड अलमंडची....." मी चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं... मला वाटलं आईने सांगितलं असेल. मग आम्ही खाऊ लागलो. त्याने स्वतः साठी केसर पिस्तावाली मागवली होती.


आईस्क्रीम खाऊन मग आजोबांनी काही तरी वेगळं करूया म्हणुन गेम खेळत बसू सांगितलं....

हा आजचा दिवस खुप वेगळा आणि स्पेसिएल होणार होता.. आजच्या आठवणी कायमच्या लक्षात राहतील असा होणार होता. काय ते कळेलच.......

to be continued..........