Sparsh - 20 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - भाग 20

Featured Books
  • રેડ સુરત - 6

    વનિતા વિશ્રામ   “રાજકોટનો મેળો” એવા ટાઇટલ સાથે મોટું હોર્ડીં...

  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

Categories
Share

स्पर्श - भाग 20

ती माझ्या मिठीत होती आणि मी मिठी घट्ट करू लागलो ..ती मिठी सैल करत कुशीतून निघाली ..तिच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता पण माहिती नाही मला ती दुःख लपविण्यासाठी आनंद दाखवत आहे असच वाटत होतं..क्षणाला वाटायचं की तिला सर्व काही विचारावं पण मला हे क्षण खराब करायचे नव्हते ..मी शांत होतो आणि ती कपडे चेंज करून आली ..मीही कपडे चेंज करून बेडवर परतलो ..दोघेही शांत पडून होतो ..कुणीच कुणाकडे पाहत नव्हतं पण झोपलो मात्र नव्हतो .." अभि तू झोपला आहेस ? " , मानसी म्हणाली आणि मी फक्त वर सिलिंगकडे पाहू लागलो . ती पुन्हा एकदा बोलू लागली , " तू कसल्या तरी विचारात आहेस .माझ्या वागण्याचा विचार करतो आहेस का ? .." खर तर मी तिचाच विचार करीत होतो पण तिला सांगून दुखवायच नव्हतं म्हणून म्हणालो , " नाही ग आजचे क्षण आठवतोय ..माझं स्वप्न होत की तुझ्यासोबत आजचे क्षण जगावे ..गेले काही वर्षे याच बेडवर पडून तुझ्यासाठी रडलो आहे आणि आता तुझ्यासोबतच आहे हे पाहून विश्वासच बसेना ..आणि विचार म्हणशील तर तुझाच करतोय पण वागण्याचा नाही ..आपल्या भविष्याचा .." ती माझ्याकडे चेहरा करत म्हणाली , " अभि एक विचारू ..तू रागावणार नसशील तर ? " मी होकार देताच ती पुन्हा एकदा बोलू लागली , " मला येताना ताईने सांगितलं होतं की लग्नानंतर लगेच शारीरिक संबंध होतात पण तू अस काही बोलला नाहीस ..मला हे आवडलं पण तरीही तुझीही इच्छा असेलच त्या टिपिकल पुरुषांप्रमाणे " ..मी थोडा हसलो आणि तीच उत्तर देऊ लागलो , " बऱ्याच लवकर विचारलंस तू.. बाय द वे मला कालच सोनाली याबद्दल विचारत होती ...बघ मानसी मला नाही माहीत लोकांचे विचार टिपिकल आहेत की नाही मे बी ते बरोबर असतील पण माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे ..जेव्हा आपण एक होऊ ते कुना एकाच्या इच्छेने नाही ... तर तो असा प्रसंग असावा की दोघानाही तो क्षण हवाहवासा वाटेल ..आपल्याला त्या क्षणी परमोच्च सुख मिळावं तेव्हाच तो क्षण खास होईल ..राहिला प्रश्न पहिल्याच दिवशी शारीरिक संबंधाचा ..तर बहुतांश अरेंज मॅरेजमध्ये ते होतच पण मी तुझ्यावर प्रेम केलंय तेव्हा तुला मनाने ओळखू दे मग शरीर काय आयुष्यभर आहेच साथ द्यायला ..तरुणपणात ओढ म्हणून आणि म्हातारपणात साथ देऊन आणि हे क्षण सुंदर बनवायचे आहेत म्हणजे शरीराने नव्हे तर मनाने "..अचानक तिच्या चेहऱ्यावर मला एक चमक जाणवली जी मला याआधी कधीच जाणवली नव्हती ..मीही तिच्या मनातलं ओळखून घेण्यासाठी तिला हवं तसच बोललो होतो आणि मला हवे तेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते ..मनात शंकांनी वेग घेतला पण तरीही मी स्थिर होतो ..पुन्हा एक रात्र तिच्या सहवासातच गेली ..

केनी एक तर माझी बेस्ट फ्रेंड होती आणि लग्नात आल्यापासून ती मानसीलादेखील खूप चांगल्या पद्धतीने ओळखू लागली होती .मी मानसी कॅनडाला येणार असल्याच सर्वाना आधीच सांगितलं होतं ..लग्नात त्यांना तिला फार वेळ बोलता आलं नव्हतं आणि पार्टीही होऊन जाईल म्हणून केनीने आमच्या काही खास कलीगना जेवणासाठी घरी बोलविल होत ..खर तर मानसिला अस एकट सोडून ऑफिसला जायची इच्छा नव्हती पण तरीही जावं लागणार होतं शिवाय ती स्वताला पुस्तकात गुंतवून घेणार होती म्हणून मला ऑफिसला जायची परवानगी दिली ..केनिकडे रात्री जेवायला जायचं होतं आणि मी त्याबद्दल मानसीला सांगितलं ..आम्ही सर्वच कलिग पुन्हा एकदा पार्टी करता येईल म्हणून खुश होतो आणि ऑफिस संपायची वाट पाहू लागलो ..सायंकाळी 6 ला ऑफिस सुटलं आणि आम्ही एकमेकांना हग करून पुन्हा एकदा भेटण्यासाठी घरी निघालो...

घरी पोहोचलो तेव्हा मानसी माझीच वाट पाहत होती ..मी फ्रेश होऊन बसलो आणि तिने चहा आणून दिला ..ती आताही पुस्तक वाचण्यात व्यस्त होती त्यामुळे बाईसाहेबांच माझ्याकडे लक्षच नव्हतं ..मी तिला जायचं आहे म्हणून सांगत होतो आणि ती पुस्तकाची शेवटचे पाने वाचण्यात व्यस्त झाली ..शेवटी तिला एकटच सोडून जाण्याची धमकी दिली आणि ती लगेच तयारी करण्यास गेली ..मी फ्रेश होऊन तिची वाट पाहू लागलो ..केनिचेही कॉल्स येऊन गेले होते ..अर्धा तास झाला होता तरीही ती बाहेर आली नव्हती ..मी वाट पाहून थकलो होतो ..पण भीतीही वाटत होती की मी आतमध्ये जावं आणि ती कपडे बदलत असेल तर ऑकवर्ड फील करेल ..हो नाही करत - करत शेवटी दारावर पोहोचलो .." मानसी आत येऊ शकतो का ? " , मी विचारलं आणि तिने येण्याची परवानगी दिली ..दरवाजातून आत गेलो आणि तिच्याकडे पाहतच राहिलो ..मानसीने लाल रंगाची साडी परिधान केली होती
..त्यावर मॅचिंग असे झुमके ..तिने केस बांधण्याऐवजी मोकळे ठेवले होते त्यामुळे ती सुंदरता आणखीनच निखरू लागली ..तिने कुठला तरी परफ्युम लावला होता आणि तो सुगंध रूमभर पसरला ..दोन्ही हातात सोन्याची एक - एक बांगडी आणि बिचारी बेडवर आपल्या कोमल पायात पैंजण घालू लागली ..मी तिच्याकडे पाहत होतो पण तीच माझ्याकडे लक्ष नव्हतं ..ती पैंजण लावायला हात पायाकडे न्यायची आणि तिचे केस डोळ्यांसमोर यायचे ..ती पुन्हा एकदा केस काना मागे करून पैंजण घालण्याचा प्रयत्न करू लागायची पण पुन्हा एकदा अपयश ..मी तिच्यावर बघून हसू लागलो ..ती माझ्याकडे पाहत तर होती पण बिचारी एका शब्दाने काही बोलणार तर ..मला आधीच उशीर होत असल्याने तिच्याकडे गेलो ..तिच्या हातातली पैंजण घेऊन पायात घालू लागलो आणि नकळत तिला माझ्या हातांचा स्पर्श होऊ लागला .तिला त्याक्षणी पहावस वाटत होतं पण तिनेही त्या क्षणी माझ्याकडे पाहिलं असत तर मग केनिकडे जाण शक्यच झालं नसत म्हणून मी काही पाहिलं नाही ..तिने दुसरा पाय समोर करत पैंजण माझ्या हातात दिली आणि मीही ती पायात घालू लागलो ..पैंजण घालून होताच तिने पायात सँडल लावली आणि आम्ही जाण्यासाठी निघालो ..तिने दरवाजा लॉक केला आणि गाडीत येऊन बसली ..." मॅडम आज खूप सुंदर दिसत आहात अगदी ट्रॅडिशनल डे ला दिसत होत्या तसच ..त्यावेळी तर मनातलं सांगू शकलो नाही म्हणून म्हटलं आज तरी सांगावं ..आज माझ्या मित्रांच काही खर नाही " , मी म्हणालो आणि ती त्यावर हसत म्हणाली , " काहीही असत हा अभि तुझं ..काही पण बोलतोस वेड्यासारख " आणि मी तिच्याकडे पाहत म्हणालो , " वेडाच तर आहे फक्त तुझ्या प्रेमात " ..तिला आता शब्दच सुचत नव्हते ..तिने आपला चेहरा माझ्या विरुद्ध बाजूने केला आणि गालातल्या गालात हसू लागली ..तो लाजेचा भाव तिला आणखीनच सुंदर बनवत होता ..तिने माझ्याकडे पाहावं म्हणून मी प्रयत्न करीत होतो पण ती काही पाहणार नव्हती शेवटी तीच लक्ष जावं म्हणून म्हणालो , " मानसी तुला लग्नाचा नवरा असताना पैंजण लावून मागण्यासाठी तरी का लाजायचं ? " , आणि यावेळी ती माझ्याकडे पाहत म्हणाली , " काय आहे न नवरोबा आई म्हणते की नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावला की पाप चढत म्हणून नव्हते सांगत आणि बघ ना तू स्वताच माझ्या हातातून पैजन घेतले ..." मला मस्करी सुचू लागली आणि तिला म्हणालो , " म्हणजे आता तू पाप केलं आहेस घोर पाप पण ना तुझं पाप हटविण्याचा मार्ग माझ्याकडे आहे तू म्हणत असशील तर देऊ शकतो .."

" अभि देऊ शकतो नाही सांगू शकतो म्हणतात " , ती म्हणाली आणि मी तिच्याकडे पाहून हसत म्हणालो , " द्यायची गोष्ट आहे तर सांगणार कस .." बिचारीला उशिरा का होईना पण समजलं की मी पप्पीबद्दल बोलत होतो ..तिने जो आपला चेहरा माझ्या विरुद्ध बाजूने केला तो केनीच घर आल्याशिवाय माझ्या बाजूने आला नाही..

केनीच घर आलं ..तिने आपली साडी सावरली ..आरशात केस ठीक आहेत की नाही ते पाहिलं आणि आम्ही दाराकडे जाऊ लागलो ..दाराची बेल वाजवली आणि केनी ओरडतच बाहेर आली ..मी मानसीला तयार होण्यासाठी वेळ लागला अस सांगितलं आणि तेव्हा कुठे ती मानली ..तिने दोघानाही झप्पी देऊन आतमध्ये घेतलं ..माझ्या सर्व कलिगनि येताच मला हग केलं आणि आतमध्ये पोहोचलो ..मी समोर जात होतो की रिचर्डने मानसिशि हात मिळविण्याचा प्रयत्न केला ..मी तिच्याकडे पाहू लागलो ..ती आता काय करेल याची भीती वाटू लागली आणि झालंही तसच तिने हात मिळविण्याऐवजी फक्त नमस्कार केला ..रिचर्ड खूप सेन्सिअर होता त्यामुळे तिने त्याच्याशी हात मिळविण चुकीच नसतंच शिवाय तिलाही काहीही बोलू शकलो नसतो..इकडे त्यालाही वाईट वाटण्याचे चान्सेस होते म्हणून मधात पडून ही आमची प्रथा परंपरा कशी आहे हे समजावून सांगितलं ..त्यालाही ते पटलं आणि मी सुटकेचा श्वास सोडला ..आम्ही दोघेही सर्वाना जॉइन झालो ..पार्टीत सात लोक होते ..आम्ही दोघे , केनी , दोन मित्र आणि दोन मैत्रिणी ..पार्टी तेव्हा रंगात आली जेव्हा रिचर्ड म्हणाला , " मानसी यु आर लुकिंग वेरी ब्युटीफुल इन धीस ड्रेस .." आणि तो तिच्याकडे पाहू लागला ..मानसीच्या चेहऱ्यावर कुत्सित भाव होते ..म्हणजे मनातून तर तिला ते आवडलं नव्हतं पण तरीही चेहऱ्यावर आनंद होता ..तिने तो रागाचा भाव मनात लपविला आणि रिचर्डला धन्यवाद म्हणाली ..

गप्पा तर नंतरही मारता येणार होत्या म्हणून सर्वात आधी जेवण करून घेण्याच केनीने सुचवलं आणि आम्ही सर्वांनी ते मान्य केलं ..केनी भांड्यात नॉनव्हेज घेऊन येऊ लागली ..तिने भांडी टेबलवर ठेवली ..त्यात नॉनव्हेज तर होत पण व्हेज कुठेच दिसत नव्हतं म्हणून केनिला म्हणालो , " केनी यु नो डॅट शी इज वेजीटेरिअन ..आय टोल्ड यु " केनिला मी मानसीला नॉनव्हेज आवडत नाही नाही हे सांगितलं होतं पण बहुदा ती विसरली होती .." सॉरी डिअर आय फॉरगेट ईट ..डोन्ट वरी आय विल मॅनेज " , केनी म्हणाली आणि मानसी तिला उत्तर देत म्हणाली , " केनी डोन्ट वरी ..आय एम ओके विथ धिस .." मानसीने अस म्हटल्यावर केनी बाजूला बसली ..पण मला मानसीचा राग आला आणि म्हणालो , " तुला नॉनव्हेज तर आवडत नाही मग काय खाणार आहेस ? " , आणि ती शांत होत म्हणाली , " अभि मी तुला सांगायचं विसरले की मीसुद्धा खायला लागले ..घरी विकमध्ये एकदा बनतच म्हणून म्हटलं सवय करून घ्यावी ..आता आवडीने खाते मी आणि तुझ्यापेक्षा टेस्टी बनवतेही खाऊन बघ कधीतरी माझ्याहातच .." आता तिच्यावरचा सर्व राग हवेत उडून गेला ..खरच न एका मुलीला लग्नानंतर किती सवयी बदलून घ्याव्या लागतात ..काहीच वेळात आमचं जेवण झालं ...

आता वेळ होती ओल्या पार्टीची ..केनीने वाइनची आधीच सोय करून ठेवली होती आणि क्षणातच सर्व टेबलच्या अवतीभवती बसले ..केनिलाही वाइन फार आवडायची ..बॉटल उघडली आणि जॅक म्हणाला , " हे कम डिअर अभि अँड जॉइन अस " , मी नकार दिला आणि तो मानसीला विचारू लागला ..मी तिची गंमत घ्यावी म्हणून विचारू लागली , " मानसी तू घेणार आहेस का गुपचूप ..मी कुणालाच सांगणार नाही .." आणि राव तिने पाठीवर दिला ना प्रसाद..आता आम्ही दोन ग्रुपमध्ये विभाजित आलो ..इकडे केनी , मी आणि मानसी बसलो होतो ..त्यांच्या सर्वांच्या हातात वाइन होती तर आमच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्स ..ते चौघेही पॅग भरण्यात व्यस्त होते तर मी केणीची मज्जा घेण्यासाठी तयार झालो आणि मानसीला म्हणालो , " मानसी इथे शाश्वत असता तर किती जास्त मज्जा आली असती न ? " ..केनी शाश्वतच नाव ऐकताच आमच्याकडे पाहू लागली आणि मानसिही मला साथ देत म्हणाली , " हो पण तो तर व्यस्त असेल न आपल्या गोपिकांमध्ये .." यावर रिऍक्ट करत केनी म्हणाली , " त्याला खरच गर्ल फ्रेंड्स आहेत ." तीच अस बोलणं ऐकून आम्ही हसू लागलो ..आणि ती पुन्हा म्हणाली , " सांग तर ?" आणि मी पुढाकार घेत म्हणालो , " नाही ग कुणीच नाही पण या सर्वात एक गोष्ट मला समजली ती ही की तुला शाश्वत आवडायला लागला आहे .." आणि च्यायला ती खरच लाजली ..मानसिने मला टाळी दिली आणि म्हणाली , " केनी तुला हवं असेल तर आम्ही तुझी काही मदत करू शकतो .." आणि ती लगेच उत्तरली , " कसली मदत ? " आणि मी शेवटचच बोललो , " तुझं आणि शाश्वतच लग्न .." ती लाजली आणि आम्हाला आमचं उत्तर मिळालं ( इंग्रजी भाषांतर मी टाळल आहे सर्वाना समजावं म्हणून )..त्याक्षणी वाटलं च्यायला भावाची लाइफ पण सेट झाली..रिचर्ड आम्हाला काय झालं म्हणून विचारत होता तर आम्ही काहीच नाही म्हणून सावरुन घेतलं .आम्ही कितीतरी वेळ केनीची मज्जा घेत होतो आणि ती बिचारी फक्त लाजत होती . काही वेळातच आम्ही एकत्र बसून गप्पा मारू लागलो..रिचर्ड माझ्याबद्दलचे ऑफिसमधले किस्से सांगत होता आणि सर्व माझ्यावर हसत होते ..केनीने तर माझी संपूर्ण पोल मानसीसमोर खोलली होती .आणि तीही माझ्याकडे पाहून हसत होती ..गप्पा बऱ्याच रंगायला लागल्या होत्या पण रिचर्डला घरून वाईफचा फोन आला आणि तो घरी जाण्यासाठी निघाला ..उशीर झाला असल्याने आम्हीही सर्वाना भेटून निघालो ..सुमारे अर्धा तास प्रवास करत पुन्हा एकदा घरी पोहोचलो..

घरी पोहोचलो ..दोघाणीही कपडे चेंज केले आणि बेडवर शांत पडलो ..बेडवर पडताच मानसी विचार करू लागली .माझ तिच्याकडे लक्ष होत पण काहीही बोलण्याची इच्छा नव्हती त्यामुळे शांत बसून होतो त्यावेळी तीच मला विचारू लागली , " अभि मी तुलाही विचित्र वाटते का रे इतर लोकांसारखी ? " , खर तर हाच प्रश्न माझ्याही डोक्यात होता म्हणून मी शांत होत म्हणालो , " नाही ग पण तू अस का म्हणत आहेस "

आणि ती सांगू लागली , " अरे मी कॉलेजला होते न तेव्हा सर्व मला असच म्हणायचे ..मुली मुलाबद्दल गप्पा मारत असायच्या आणि मी मात्र पळून अभ्यास करत बसायचे ..सर्व मित्र मिळून मूवी पाहायला जायचे आणि मी प्रत्येक वेळेला नकार देऊन घरी बसायचे ..प्रत्येक मुलगी कुणासाठी तरी सजून यायची आणि मी आपली वेंधळीच ..नंतर नंतर अस होत गेलं किया आयुष्यात मित्र नावाचा प्राणीच उरला नाही ..फक्त एकच होता राहुल तो पण म्हणायचा तू अशी का वागतेस आणि बघ ना आज पण रिचर्ड काही चुकीच वागला नव्हता तरीही मी कशी वागले त्याच्याशी ..तुला राग आला असेल माहिती आहे ..सॉरी पण अस का होतंय नाही माहीत ..मला नसता आवडला तो स्पर्श .." नंतर मी समजावत म्हणालो , " मी समजू शकतो तुला ..काळजी करू नको शांत झोप मला नाही वाटत तू विचित्र .." त्यानंतर ती काहीच बोलली नाही आणि शांत झोपी गेली ..
ती जरी झोपी गेली असली तरी मी मात्र जागाच होत ..ती कोड नव्हती पण तिच्या आयुष्यात अस काहीतरी होत जे ती सांगू शकत नव्हती ..तिला बहुतेक भीती वाटत होती की मी तिला समजून घेणार नाही ..पण खरं सांगायचं तर मी स्वीकारलंच होत की तिच्याआयुष्यात भूतकाळ आहे आणि त्या भूतकाळासोबत मी तिला आताही स्वीकारायला तयार होतो ..पण ती आज जे बोलत होती आणि विशेष म्हणजे थेटरमधील किस्सा जेव्हा आठवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की तिला स्पर्श या शब्दाची नक्कीच चीड आहे ..माझ्या डोक्यात हळूहळू तर्क वितर्क घर करू लागतात ..मला राहवत नाही ..मी बेचैन होऊ लागतो ते उत्तर जाणून घेण्यासाठी आणि अचानक लक्षात येत की मुलगी अशी तेव्हाच वागते जेव्हा तिला कुणीतरी चुकीचा स्पर्श केला असेल ..खरच तिच्यासोबत अस काही तर नसेल झालं ना ? आणि म्हणूनच तर जेव्हा ती माझ्यासोबत बोलते तेव्हा खुश होते पण स्पर्श झाला की मात्र तिला ते आवडत नाही ..म्हणजे मानसी आजही त्या यातना भोगत आहे ..हा विचार येताच डोकं फुटायची वेळ आली..मन बधिर झालं ..हात थरथर कापायला लागले आणि एकच विचार मनात आलं ..खरच अस काही असेल तर ??


क्रमशः ..