Sparsh - 2 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | स्पर्श - भाग 2

Featured Books
  • નારદ પુરાણ - ભાગ 61

    સનત્કુમાર બોલ્યા, “પ્રણવ (ૐ), હૃદય (નમ: ) વિષ્ણુ શબ્દ તથા સુ...

  • લગ્ન ને હું!

    'મમ્મી હું કોઈની સાથે પણ લગ્ન કરવાના મૂડમાં નથી, મેં નક્...

  • સોલમેટસ - 10

    આરવને પોલીસ સ્ટેશન જવા માટે ફોન આવે છે. બધા વિચારો ખંખેરી અન...

  • It's a Boy

    સખત રડવાનાં અવાજ સાથે આંખ ખુલી.અરે! આ તો મારો જ રડવા નો અવાજ...

  • ફરે તે ફરફરે - 66

    ફરે તે ફરફરે - ૬૬   માનિટ્યુ સ્પ્રીગ આમતો અલમોસામાં જ ગ...

Categories
Share

स्पर्श - भाग 2

तिकीट घेऊन सरळ विमानात बसलो ..काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर विमानाने झेप घेतली ..घरी पोहोचायला आणखी बराच वेळ लागणार होता तेव्हा डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणात पोहोचलो ...


सात वर्षांपूर्वी .....



मी अभिनव सरपोतदार ..नावातच खूप काही सापडत ..मला लहानपणापासूनच नवं- नवीन गोष्टी करण्यात खूप रस असायचा ..त्यामुळे अभिनव हे नाव अगदीच सार्थकी झालं ..बाबा घरी संगणकावर काम करत बसायचे तेव्हापासून त्याची ओढ लागली ..तो सुरू कसा होतो , त्याच्यावर लोक कसे बोलू शकतात असे बरेच प्रश्न विचारून बाबांना सतवायचो ..त्यांच्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नसलं की ते म्हणायचे तू संगणक अभियांत्रिकी कर म्हणजे तुला त्या सर्वच प्रश्नाची उत्तरे मिळतील ..बाबांनी लहान असताना एक वाट दाखवली आणि ती वाट मी स्वतःचीच बनवून घेतली ...माझं स्वप्न म्हणजे संगणक अभियांत्रिकी ..12 वीला मला 90 % मिळाले असल्याने शिवाय एन्ट्रन्स पेपरलासुद्धा उत्तम मार्क्स असल्याकारणाने मला संगणक अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळणे निश्चित होते ...आई - वडिलांनी बाहेर जाण्यास नकार दिल्यामुळे औरंगाबादलाच प्रवेश घेणं गरजेचं होतं आणि नशिबाने साथ दिली व माझा तिथेच नंबर लागला ...
आता वेळ होती ती लहानपणापासून पाहिलेल स्वप्न पूर्ण करण्याची ..स्वताला स्वतःच्याच स्वप्नासाठी झोकून देण्याची ..ती सारे स्वप्न घेऊन मी कॉलेजला गेलो ..त्यावेळी कॉलेजमध्ये फार प्रमाणात रॅगिंग चालत नसली तरी सिनियर थोड्या फार प्रमाणात रॅगिंग करायचे ..त्यामुळे सिनियरपासून नजर लपवत मी आमच्या शाखेकडे जाऊ लागलो ..पण शेवटी एका सिनियरने पकडलंच ...सर्वांच्या समोर बोलावण्यात आल..मागील जन्माचा सर्व इतिहास शोधून काढण्यात आला आणि मग खरी रॅगिंग सुरू झाली ...आयुष्यात गाणं कधीच गायल नव्हतं साधं बाथरूममध्ये गायच ठरवलं की आई लोकांना शांत झोपू देशील का म्हणून ओरडायची आणि इथे तर चक्क सर्व मुलींसामोर गाणं गायच होत ..त्यात सुंदर- सुंदर सिनियर मुली समोर असताना इज्जतीचा भाजीपाला करण्यात अजिबात रस नव्हता ..पण पर्याय नसल्याने आता गाणं तर म्हणावच लागणार होतं ..गायला सुरू करणार तेव्हढ्यात एक भारदस्त आवाज मागून आला " भावा घाबरायचं नाही आपण आहो तुज्यासोबत " , तो म्हणाला ..

काही क्षणातच दोन तरुण समोर आले ..मला वाटलं की हे आता यातून माझी सुटका करतील आणि सिनियरना छान धडा शिकवतील आणि दोघेही त्यांच्या समोर उभे झाले ..तेवढ्यात वरून सिनियरचा आवाज आला आणि तोच मुलगा म्हणाला , " दादा आम्ही याला अस म्हणत होतो की बेटा तूच नाही गाणार आम्ही पण आहोत सोबत गायला " ..मला हसावं की रडावं काहीच कळेना आणि मग त्या दोघांसोबत आमचा कार्यक्रम सुरू झाला ..एकाने तर स्वताची बॅग काढून घेतली आणि बॅगलाच गिटार बनवून वाजविण्यासाठी सज्ज झाला तर दुसर्याने आपला हात माइक बनवून घेतला आणि मी त्यांच्याकडे पाहत बसलो कारण गीत कुठलं म्हणायचं होत याचा मला थांगपत्ता नव्हता ..आणि आमचा स्टेज परफॉर्मन्स सुरू झाला ..आवाज कसा होता हे विचारू नये ..

पापा कहते है बडा नाम करेगा
बेटा हमारा ऐसा काम करेगा
मगर ये तो कोई न जाणे
ए मेरी मंजिल है कहा

पापा कहते है बडा नाम करेगा ..

आम्हा सर्वांचा तो मॅजीकल आवाज ऐकून सर्वच खळखळून हसू लागले होते शिवाय गीत गाताना हावभाव आणि गिटार वाजवण्याची पद्धत पाहून सर्वानाच हसू आवरेनास झालं ..आमचा मनमोकळा स्वभाव पाहून सर्व सिनियर अगदी पहिल्याच भेटीत मित्र झाले ..आमचा आवाज ऐकून आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती जवळ थांबून स्टेज शो पाहत होता आणि खळखळून हसत होता ..पण काही म्हणा दम होता त्या दोघांत ..अगदीच पहिल्याच भेटीत त्यांनी सिनियरचे आणि माझेही मन जिंकून घेतले ..शेवटी सर्व कलासकडे जाऊ लागले आणि मी त्यांच्यासोबत प्रवासावर निघालो ..
त्या कॉलेज जीवनातले माझे पहिले मित्र ..एकाच नाव शाश्वत तर दुसरा विकास पण त्या दोघांचाही शाश्वत विकास काही झालाच नव्हता ..आपल्याला हवं तस जगायच असा त्यांचा नियम ..कधी कुणाची भीती नाही की काही नाही आणि गावातला बोलण्यातला अंदाज मात्र त्यांना वेगळं बनवून जायचा ..आयुष्यात कधी सिरीयस झाले असतील अस तरी मला वाटत नाही ..जेव्हापासून ते भेटले तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलल ..कॉलेज सुरू झालं आणि हळूहळू क्लास सुरू झाले ..हळूहळू मुलीही येऊ लागल्या होत्या ..तशा संपूर्ण अभियांत्रिकीमध्ये फक्त आमचीच शाखा मुलींनी भरून असायची आणि बाकी शाखा ह्या विराण बंगल्यासारख्या भासायच्या.. त्यामुळे मुलांची सर्व गर्दी ही आमच्याच शाखेसमोर असायची .अशी आमची संगणक शाखा ..जिने सर्वानाच प्रेम दिलं ..त्यात कुणीच खाली हाताने गेलं नाही फक्त अपवाद म्हणजे शाश्वत विकास ...
कॉलेज सुरू झाल्यापासून हे दोघेही फक्त पार्किंग मध्ये दिसायचे आणि काम काय तर ही मुलगी तुझी आणि ही माझी ..पण फक्त प्लानिंगच व्हायची कारण 4 ही वर्षात याना एक पण पोरगी पटली नाही ..पण बिचारे किती सकारात्मक होते ..भेटली नाही म्हणून प्रयत्न सोडून द्यायचे का अस मत बनवून स्वताला दिलासा देत बसायचे ..एकदम टपोरी ..एक तर क्लास मध्ये यायचे नाही आणि क्लास मध्ये आले की संपूर्ण क्लास त्यांच्याकडे पाहत बसायचा ..एक किस्सा आठवतो ..हे दोघेही आज सर्वात आधी क्लास करण्यासाठी येऊन बसले कारण काय तर कुणीतरी त्यांना सांगितलं होतं की आपल्या मॅडम भारी दिसतात म्हणून त्याच प्रकरणाचा छडा लावण्यासाठी त्यांनी आज सकाळीच दर्शन दिले ..क्लास सुरू झाला ..आमच्या मॅडम म्हणजे मै हु ना मधल्या सुश्मिता सेनसारख्या ..फार जास्त वय नव्हतं पण सजून अस यायच्या की प्रत्येक तरुण त्यांना वळून- वळून पाहिल्याशिवाय राहत नसे मग त्यात हेही विसरून जायचे की मॅडमना छोटे - छोटे पिल्लू आहेत ..त्यात हे दोघे आज क्लासमध्ये असल्याने कलासची शोभाच वाढली ..क्लास सुरू झाल्यापासून दोघातून एकाचीही नजर मॅडमवरून क्षणांसाठीही हटली नाही ..मॅडमची आज पार धांदल उडाली ..एक वाक्य बोर्डवर लिहायच्या आणि पुन्हा आपल्या साडीच्या पदराला पकडायच्या ..तरीही ह्या दोघांनी त्यांच्यावरून नजर काही हटवली नाही ..मॅडमच्या हातून खडू पडला तरीही मॅडमची खडू उचलण्याची हिंमत झाली नाही असा काय तो त्यांचा दरारा .. मॅडम आज काय शिकवत होत्या त्यांचं त्यांनाच माहिती पण संपूर्ण क्लास मात्र आज त्यांच्याकडे पाहून खूप हसत होता .शाश्वत विकास जिथेही असायचे तिथे असच प्रफुल्लित वातावरण असायचं ..मॅडमने कसा तरी कलास संपवला आणि बेल वाजताच अशा पळाल्या की त्यांच्यासमोर वाऱ्याची गतीही कमी पडू लागली ..त्या दिवसानंतर मॅडमने कधी साडी घातली असेल अस आठवत नाही ..असे होते माझे मित्र ..शाश्वत विकास ...
मला आधीपासूनच संगणक क्षेत्रामध्ये फार रस होता त्यामुळे अभ्यासय मला सोपी जात होता शिवाय रोज अभ्यास सुरू असल्याने मी नेहमीच ऍक्टिव्ह राहत असे ..अगदी काही दिवसातच माझं कलासमध्ये नाव झालं होतं ..मी तसा शांत.. एका जागी बसून आपलं काम करणारा पण शाश्वत विकाससोबत असलो की मग सर्व मात्र वेगळंच असायचं ..अगदी टॉप क्लास असायचं ..त्या दोघांमुळे आयुष्य फार सुंदर वाटू लागलं ..आयुष्य असही असत यावर विश्वास बसत नव्हता ..
शाश्वत विकास दिसेल त्या मुलीवर ट्राय मारत फिरायचे पण एकही मुलगी त्यांना भाव देत नसे एवढंच काय तर सिनियरवर देखील प्रयत्न करून झाले होते पण तिथेही अपयशच हाती लागलं ..हे दोघेही दिसले की मुली आपला रस्ता बदलून घ्यायचा आणि समजाच एखादी मुलगी यांच्या कचाट्यात सापडली की ती दादा म्हणून उरलेल्या सर्व दुःखांवर मीठ चोळून निघून जायची पण तरीही प्रयत्न करणं त्यांनी काही सोडलं नव्हतं ..आणि इकडे संपूर्ण कलासच्या मुली माझ्याशी बोलायच्या ..एकदा विकासच्या बोलण्यावरुन मी त्याची सेटिंग करून देण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्याच नाव एकूण ती मुलगी अंगावर धाऊनच आली आणि तो माझा शेवटचा प्रयत्न ठरला ..इकडे मुलींबाबत अपयश होत तर दुसरीकडे अभ्यासाबद्दल देखील तीच स्थिती ..वर्षभर मुलींना पाहत फिरायचे आणि शेवटी प्रॅक्टिकल बुक मागण्यासाठी माझ्या शिव्या खायचे ...असा एकही शिक्षक नाही ज्यांच्या त्यांनी शिव्या ऐकल्या नव्हत्या ..अभ्यास पण मजेदार असायचा ..वर्षभर नोट्स कुठं असायच्या ते माहिती नसायचं आणि पेपरच्या एका दिवसांपूर्वी नोट्स शोधण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा ..सर्व उपाय संपले की माझी वाट धरायची आणि मी त्यांना नेहमीप्रमाणेच मदत करायचो ..काय तर रात्रभर वाचून पेपर द्यायचे आणि थ्री इडियट्स मधल्या राजू आणि फरहान सारखे कनसिस्टंटली शेवट यायचे आणि मी मात्र सर्वात वर असायचो ..कधी - कधी तर या दोघांनाही इथे प्रवेश मिळाला कसा ?? ..असा विचार येऊन जायचा पण विचारण्याची हिम्मत कधी केली नाही ..या दोघांच नाव एवढं बदनाम होत की मुली पाहताच पळून जायच्या त्यामुळे आमच्या तिघात एकच मैत्रीण होती ..ती पण जिवाभावाची ..तीच नाव सोनाली ..आता ती या दोघांत स्वताला कस सांभाळून घ्यायची तीच तिला माहीत ..पण भारी होते ते पहिल्या वर्षाचे दिवस ..पाहता - पाहता एक वर्ष पूर्ण झालं ..
आता आम्ही वरच्या वर्गाला गेलो म्हणजे काय तर सिनियर झालो ..नवीन बॅचचे प्रवेश संपले होते आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार होती ..आज प्रत्येक शाखेतला मुलगा कॉलेजच्या गेटकडे नजर लावून बसला होता ..आज सर्विकडे नवीन अप्सरा दिसणार होत्या आणि सर्व मूल त्यांना पाहण्यास उत्सुक झाले होते ..जसजसा वेळ जात होता तशा तशा अप्सरा येऊ लागल्या आणि ही तुझी वहिनी म्हणून सर्व मुलांनी बुकिंगसुद्धा सुरू केल्या ..शाश्वत विकासनेही आपल्या पार्टनर शोधायला सुरुवात केली ..कॉलेज लाइफचा एक मजेदार किस्सा असतो ..प्रत्येक मुलांना असच वाटत की यार आपलंच नशीब एवढं का खराब असत सर्व सुंदर मुली फक्त दुसऱ्याच वर्गात सापडतात ..आम्ही कोणते पाप केले काय माहिती ? ..आणि मजेदार गोष्ट ही की सिनियरना देखील खालच्या कलासच्या मुली आवडतात ( आमच्याच कलासच्या मुली ज्या आम्हाला आवडत नाही ) ..आपल्या कलासच्या नाही ..त्यामुळे प्रत्येक मुलगा आतुरतेने वाट पाहत असतो तो ज्युनिअरची आणि तिथूनच खरे प्रेम प्रकरण सुरू होतात ...आज संपूर्ण शाखा त्यातच व्यस्त होती ..मूल मुलींकडे पाहत होते तर मूल आमच्याकडे न पाहता दुसऱ्या मुलींकडे का पाहत आहेत म्हणून त्या मुलांकडे पाहत होत्या ..असा तो पहिल्या दिवसाचा मजेदार किस्सा ..

" शाश्वत काय पाहतो आहेस रे ? " , सोनाली म्हणाली ...

" चशमिश दिसत नाही होय तुझ्यासाठी वहिनी शोधतोय !! " , शाश्वत म्हणाला ..

" हो हो तुम्ही तेच करा वर्षभर दुसरे काम कुठे आहेत तुम्हाला ..टपोरी कुठले !! " , सोनाली म्हणाली ..

टपोरी हा शब्द एकूण शाश्वत सोनालीच्या मागे धावू लागला आणि तीही तेवढ्याच गतीने पळू लागली ..असाच कितीतरी वेळ दोघांचा पळण्याचा कार्यक्रम सुरू होता ..आणि ती धावत माझ्याजवळ येऊन बसली ..तो तिला मारणार तेवढयात मी डोळे वर करून पाहिलं आणि शाश्वत पून्हा एकदा विकासकडे गेला .ते कितीही टपोरीपणा करत असले माझ्या समोर फारसा शांत असल्याचे ..मी बाजूला डेस्कवर बसून होतो ..सोनालीही धावून - धावून थकली त्यामुळे तिने लांब श्वास घेत बाजूला जागा पकडली ..काही क्षणातच हार्ट बिट्स कमी झाले आणि ती बोलू लागली ..

" अभिनव तू आज एवढा शांत का ? " , सोनाली म्हणाली ..

" नाही तर अस काही नाही " , तिच्या प्रश्नःच उत्तर देत म्हणालो ..

" नाही हा आज काहीतरी वेगळा आहेस तू ..सांग ना तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांगणार नाहीस ..जा मी नाही बोलणार तुझ्याशी " , ती लटक्या रागात म्हणाली ...

" बर एक ..तुम्ही सर्व बोलण्यात व्यस्त होतात आणि मी तेव्हाच कॉलेज गेटकडून कलासला यायला निघालो ..आणि वाटेतून येताना एक स्पर्श झाला ..तो स्पर्श ...आज पहिल्यांदाच स्पर्शाची वेगळीच नशा जाणवली ..किती सुंदर होता तो तिच्या हातांचा स्पर्श .अगदी नकळत त्याच्याकडे ओढला गेलो ..माहिती नाही यार काय होतंय मला " , मी म्हणालो ...

" ए कोण आहे रे ती नशीबवान मुलगी आणि प्रेमात वगैरे पडलास की काय ? " , तिने उत्सुकतेने विचारलं

तिने अस विचारताच मी तीला शोधू लागलो ..आता तिच्या बोलण्याकडे माझं लक्षसुद्धा राहील नव्हतं ..कुठे गेली यार ती ?? ..इथेच तर होती ..आणि बेचैन होऊन तिला इकडे - तिकडे शोधू लागलो आणि माझी नजर पार्किंगच्या कोपऱ्यात गेली ..तिथे एक कुत्र्याचं छोटस पिल्लू ओरडत होत ..तिने स्वतःच्या बॅगमधून बिस्कीट काढून त्याला दिलं ..ती शांतपणे त्याला भरवत होती ..आताही तिचा चेहरा त्याच्याकडेच होता आणि मी ती माझ्याकडे पाहण्याची वाट पाहू लागलो ..त्याने सर्व बिस्कीट खाऊन घेतले आणि उड्या मारत निघून गेला ..कितीतरी वेळेची माझ्याकडे पाठ करून बसली होती आणि मी ती पलटण्याची वाट पाहू लागलो .

ही तर फक्त तुझ्या आणि
माझ्या क्षणांची कहाणी
तुझ्या माझ्यातले क्षण
हीच तर आयुष्यातली सुखद साठवण ...

फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावी अशी प्रेमला तू

फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावी अशी प्रेमला तू

तुझा मखमली स्पर्श वाऱ्यास होतो
वाहने विसरतो तो धुंद होतो
कसा त्या कळावा तुझा गोड कावा
कुणीही फसावे अशी मृगजला तू

फुलांनी रुसावे अशी कोमला तू..

असे रूप लपवू नको फार आता
खुळा जाहला केश संभार आता
मला गुंतू दे त्या भ्रमरा परी गे
किती दा वि यु अक्षयी मध फुला तू

फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावी अशी प्रेमला तू


फुलांनी रुसावे अशी कोमला तू
सलांनी फुलावी अशी प्रेमला तू

ती माझ्याकडे वळाली आणि मी तिच्यात हरवून गेलो .. ते तिचे लांबसडक केस , डोळ्यांना हलकंस काजळ , फिकटशी लिपस्टिक आणि शरीरावर गुलाबी सलवार ..तिला पाहताच पार वेडा झालो ..तिच्या डोळ्याच्या बारीक खुणाही आता नजरेतून सुटत नव्हत्या ..आणि तिचा तो कोमल स्पर्श ..त्याला तर शब्दच नाहीत ..सोनालीचे शब्द कानात घुमू लागले ..अभिनव तू प्रेमात पडला आहेस तिच्या ..पहिल्या भेटीतच प्रेम ??

क्रमशः ....